Tuesday 4 March 2014

बेकायदा बांधकामांना अभय देण्याचा निर्णय लांबणीवर


मुंबई-ठाण्यासह पुणे, पिंपरी-चिंचवड आणि अन्य शहरांतील बेकायदा बांधकामांचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. सुरवातीला ग्रामीण भागातील बांधकामांना संरक्षण द्यायचे आणि याच कायद्याचा आधार घेत शहरातील आणि शहरालगतची बांधकामे नियमित ...

MIDC to widen road to Hinjewadi IT Park

The Maharashtra Industries Development Corporation (MIDC) will begin widening a 250-m stretch of the road going towards Hinjewadi IT park from Shivaji Chowk to Wakad Road to reduce traffic congestion.

We’re determined to do something for our country: Bhapkar

Former Pimpri Chinchwad Municipal corporator, Maruti Bhapkar , has been named the Aam Aadmi Party (AAP) candidate from Maval Lok Sabha constituency.

अनधिकृत फलक, स्टीकर्स काढा ; पाहणी दौऱ्यात आयुक्तांचे आदेश

शहरातील नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी सर्व प्रभागांमध्ये स्वच्छता ठेवा, शहराच्या सौंदर्यीकरणाला बाधा आणणारे पोस्टर्स, बॅनर्स, स्टीकर्स तातडीने काढा, असे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज पहिल्या प्रभाग दौ-यात दिले. चापेकर स्मारकाचे काम लवकरात लवकर करुन चौकाचे सुशोभिकरण करा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या 'ब' क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या भागाची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर झालेल्या नगरसवेक व अधिका-यांच्या बैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. तसेच दर तीन महिन्यांनी आढावा दौरा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी ब प्रभाग अध्यक्ष शेखर ओव्हाळ, नगरसेवक संदीप चिंचवडे, अनंत को-हाळे, संपत पवार, नीलेश बारणे, माजी महापौर अपर्णा डोके नगरसदस्या शमीम पठाण, विमल जगताप, छाया साबळे, माया बारणे, अश्विनी चिंचवडे, आशा सूर्यवंशी, तसेच अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, शहर अभियंता एम.टी. कांबळे, क्षेत्रीय अधिकारी सुभाष माछरे, सहायक आयुक्त सतीश कुलकर्णी, आरोग्य कार्यकारी अधिकारी राजाराम चव्हाण, कार्यकारी अभियंता शरद जाधव,

मोहननगरच्या सांस्कृतिक भवनाला ...

मोहननगर येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाच्या नामकरणावरुन आजी-माजी नगरसेवकांमध्ये वाद उफाळला होता. अखेर महापालिकेने या भवनाला राष्ट्रमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन असे नामकरण करण्याचा निर्णय घेत या वादावर पडदा टाकला आहे. उद्या (मंगळवार) राज्याचे जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते त्याचे उद्‌घाटन होत आहे.

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी महेश लांडगे

स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश लांडगे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे स्थायी समितीचे नवीन अध्यक्ष त्यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. येत्या 7 मार्च रोजी निवडणूक प्रक्रियेची औपचारिकता पार पडणार आहे.

व्यापा-यांना बाबरांनी सांगितला ...

व्यापा-यांकडून खासदार गजानन बाबर यांचा सत्कार
तुम्ही सगळे व्यापारी माझा बसल्या-बसल्या प्रचार करू शकता. माझं नाव घेऊन सांगू, नका डोळ्यावर येताल. पण "त्याच्या पेक्षा हा चांगला आहे", असं चार-चौघांना सांगा, असाच काहीशा प्रचाराचा फंडा खासदार गजानन बाबर यांनी व्यापा-यांना सांगितला. देश वाचविण्यासाठी देशात सत्ताबदल आवश्यक असल्याचे सांगत आपल्याला लोकसभा लढविण्याची संधी मिळणार, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

थकीत वेतनासाठी एच. ए. कामगारांचा आज लाक्षणिक उपोषण

पिंपरी-चिंचवड औद्योगिकनगरीचा पाया असलेल्या केंद्र शासनाचा हिंदुस्थान अ‍ॅण्टीबायोटिक्स (एचए) कारखाना आर्थिक गर्तेत सापडला आहे. मागील पाच महिन्यांपासून कामगारांना वेतन मिळालेले नाही. खासदार सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी लक्ष घालूनही त्यावर तोडगा निघत नाही. त्यातच आचारसंहिता उंबरठ्यावर असल्याने धास्तावलेल्या एच. ए. कामगारांनी आज लाक्षणिक उपोषण केले.

भापकर यांनी रेल्वे स्थानकावर फोडला प्रचाराचा नारळ

आम आदमी पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार मारुती भापकर यांनी पिंपरी रेल्वे स्थानकावर आज (सोमवारी) आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. पुणे-लोणावळा लोकल 'पकडत' रेल्वे प्रवाश्यांशी संवाद साधला. प्रवासा दरम्यान प्रवाश्यांनी अनेक गा-हाणी त्यांच्याकडे मांडली.   

जगताप समर्थकांची पानसरें विरोधात ...

आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर खडेफोड करीत आझम पानसरे यांनी नुकताच काँग्रेस प्रवेश केला. त्यावरुन दोघांच्या समर्थकांमध्ये 'वॉटस्‌अप'बाजी रंगली आहे. "गेले ते डोमकावळे" अशी शेरेबाजी जगताप समर्थकांनी केली आहे. तर पानसरे समर्थकांनी "सबका एक भाईजान" म्हणत त्याला गांधीगिरीने प्रत्युत्तर दिले आहे.