Friday 24 November 2017

[Video] सल्ला द्यायचाय, पिंपरीत या पैसे मिळतील...!

पिंपरी चिंचवड महापालिकेने सल्लागार नेमण्याचा धडाका लावला 

पेव्हींग ब्लॉकनंतर आता रस्त्यालाही सल्लागार

पिंपरी – शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. मागील स्थायी समितीत पेव्हींग ब्लॉकच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. त्यानंतर आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलखमधील रस्त्यांच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने गेल्या आठ महिन्यात केवळ सल्लागार नियुक्‍तीचा कार्यक्रम हाती घेवून पध्दतशीरपणे करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरु केली आहे.

Roseland Residency in Pimple Saudagar introduces dockless cycle rental system

PIMPRI CHINCHWAD: Roseland Residency, a housing society in Pimple Saudagar, will start dockless cycle rental service — PEDL — on November 25 with the help of a private company. This will help people rent cycles to reach bus rapid transit system stations or offices in Hinjewadi IT park and other destinations.

समांतर पूल झोपडपट्टीमुळे रेंगाळले

पिंपरी - पुणे महापालिकेतर्फे झोपडपट्टी स्थलांतराचे काम रेंगाळल्याने पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील हॅरिस पुलालगत आणखी दोन पूल बांधण्याच्या कामाची गती मंदावली आहे.

 

Hinjawadi IT Park to get 4 new connecting routes

Works on developing these roads to start on Jan 26, 2018

Always fraught with traffic congestion, no thanks to its problematic road infrastructure, the information technology hub of Pune — Hinjawadi — is not quite a perfect location for this burgeoning industry yet.

Demolition notice to ex-corporator

PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has sent a notice to former NCP corporator Rajendra Jagtap, directing him to remove unauthorised construction in his bungalow in Pimple Gurav.

Conference to promote use of ethanol

PIMPRI CHINCHWAD: The central government's policy of blending petrol with ethanol was formulated in 2000. "It was then decided to blend petrol with up to 5% of ethanol, and the target was to be achieved in the next four years. However, at present, only 2.6% of blending is taking place," said former central minister for rural development and bio-fuel committee chairman Annasaheb M K Patil on Monday.

‘नगरसेवक आपल्या भेटीला’ उपक्रमातून पक्षनेते एकनाथ पवार यांचा नागरिकांशी थेट संपर्क

‘नगरसेवक आपल्या भेटीला’ या उपक्रमास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद
पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी कृष्णानगर, महात्मा फुलेनगर,पूर्णानगर, शिवतेजनगर, येथून ‘नगरसेवक आपल्या भेटीला’ या उपक्रमाच्या माध्यमातून थेट नागरिकांशी संपर्क साधला. या उपक्रमातून थेट जनतेशी संपर्क साधत स्थानिक नागरिकांचे प्रश्‍न समजावून घेवून ते मार्गी लावण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बँकांमध्ये मराठी न वापल्यास मनसेचे आंदोलन – सचिन चिखले

शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी येत्या पंधरा दिवसात कामकाजात मराठीचा वापर सुरू करा. अन्यथा,  मनसे स्टाईलने आक्रमकपणे आंदोलन केले जाईल,  असा इशारा मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी गुरुवारी (दि. २३) पत्रकार परिषदेत दिला आहे.

आकुर्डीत बोंबाबोंब आंदोलन

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या अटी रद्द करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी घर बचाव संघर्ष चळवळीने आकुर्डी येथे गुरुवारी बोंबाबोंब आंदोलन केले.

पुणे-नाशिक लोहमार्गाच्या कामाला पुढील वर्षी प्रारंभ

मंचर - ‘‘पुणे-नाशिक लोहमार्गाच्या कामासाठी पाठपुरावा केला होता. रेल्वेचे काम पुढील वर्षी सुरू होणार आहे,’’ असे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.

उच्चस्तरीय वाहतूक समितीच ‘गायब’

पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करून तिच्यात सुधारणा घडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने नेमलेली उच्चस्तरीय वाहतूक समिती ‘गायब’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा भरणा असलेल्या या समितीच्या गेल्या दहा वर्षांत हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्‍याच बैठका झाल्या आहेत. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांत एकही बैठक घेण्यात आलेली नाही. वाहतुकीचा बोजवारा उडाला असतानाही दोन्ही महापालिकांच्या अधिकाऱ्यांनाही या समितीचा विसर पडला आहे.

पिंपरी महापालिकेच्या 21 डॉक्‍टरांच्या बदल्या

चौफेर न्यूज  महापालिकेच्या रुग्णालय, दवाखान्यातील 21 डॉक्‍टरांच्या शहरांतर्गत अन्यत्र बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र तज्ज्ञ, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्या आदेशाने प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

Security guard from posh Wakad society held for cruelty to puppy

PUNE: A security guard in a Wakad society, who brutally beat a four-month old puppy with sticks and stuffed it alive in a cement sack, after stamping on its neck with his shoe, was arrested on Wednesday. An eyewitness filed a first information report (FIR) 

First edition of industrial safety summit begins in Pune

New Delhi, Nov 21 () The first edition of Industrial Safety Summit with an aim to make factories accident free kicked off in Pune today.

The summit, organised in collaboration with the Federation of Chakan Industries, SAMA and Schmersal India Pvt in Pimpri near Pune, seeks to deliberate on and create solutions for all-round safety of the stakeholders, an official statement said. The objective of this exercise is to emphasise the importance of safety of industrial workers and have zero accident in factories.

‘पाइप नॅचरल गॅस’ची जोडणी मोफत

घरगुती वापराच्या ‘पाइप नॅचरल गॅस’च्या (पीएनजी) वापराला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) नळ जोडणी (कनेक्शन) मोफत देण्याची महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. यामध्ये नोंदणी शुल्काचा शंभर टक्के परतावा केला जाणार असून, डिपॉझिटची रक्कम एकरकमी न घेता मासिक बिलामध्ये वसूल केली जाणार आहे.

स्पेनच्या शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवड डिजिटल करू – महापौर नितीन काळजे

पिंपरी-चिंचवडमध्ये जागतिक दर्जाच्या भौतिक सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देवून स्पेनमधील शहरांप्रमाणे पिंपरी-चिंचवड डिजिटल करू, असे स्पेन दौ-यावरून परतल्यानंतर महापौर नितीन काळजे यांनी म्हटले आहे.

Centre approves PCMC’s Rs 244 crore 24x7 water supply project

Under the Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation (AMRUT) scheme, the central government has sanctioned the Rs 244 crore plan.

हिंजवडीची वाटचाल कचरामुक्तीकडे

पिंपरी - हिंजवडीमधील कचऱ्याची समस्या दूर करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) कंबर कसली आहे. आयटी पार्कमधील टप्पा तीनमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्याचे काम येत्या चार महिन्यांमध्ये सुरू होणार असल्याचे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी ‘सकाळ’ला सांगितले. या प्रकल्पामध्ये १५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. 

निगडी-दापोडी बीआरटीला दिरंगाई

पिंपरी – निगडी-दापोडी बीआरटी बससेवा मार्ग सुरु करण्यास महापालिका बीआरटीएस विभागाकडून दिरंगाई होत आहे. या मार्गावरील बस स्थानकांसह किरकोळ कामे लांबल्याने आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी बीआरटी सुरु करण्याचा मुहूर्त पुन्हा लांबला आहे. त्यामुळे प्रवासी वर्गांतून नाराजी व्यक्‍त होत आहे.

अतिक्रमणांवर पालिकेची धडक कारवाई

पिंपरी – महापालिकेने अतिक्रमण विरोधी मोहीम तीव्र केली आहे. मंगळवारी (दि. 21) ब क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत प्रभाग क्रमांक 16 मधील चिंचवड, मोरया गोसावी गणपती मंदिरासमोरील फुटपाथवरील पत्राशेडवर पालिकेने हातोडा चालविला. वाल्हेकरवाडी येथील अनधिकृत घरांवर पालिकेने धडक कारवाई केली आहे.

चौका-चौकांतील दृष्य; हम यार चार है!

वाहतूक नियम धाब्यावर : पोलीस प्रशासनाचा वचक नाही?
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात दुचाकी अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दुचाकीचालकांचा बेशिस्तपणामुळे अनेकदा अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यापूर्वी दुचाकीवर “ट्रिपल सिट’ बसून नियमांचे उल्लंघन करणारे चित्र ठिकठिकाणी पहायला मिळत होते. मात्र, आता “हम यार चार है’ अशा आविर्भावात शाळा-महाविद्यालयांतील तरुण आणि काही नागरिक “फोर सिट’ बसून दुचाकी रेटतानाचे चित्र पहायला मिळत आहे.

विदेशातील उच्च शिक्षण योजनेचा लाभ थेट बॅंकेत

पिंपरी – परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला शैक्षणिक अर्थसहाय्य या तत्वावर ती शिकत असलेल्या विद्यापीठाच्या नावे दीड लाख रुपयांचा धनादेश पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे देण्यात येतो. मात्र, ही रक्कम विद्यापीठाच्या नावे न देता विद्यार्थिनीच्या वैयक्तीक बॅंक खात्यात जमा केली जाणार आहे. त्यामुळे परदेशातील उच्च शिक्षण अपूर्ण ठेवणाऱ्या बोगस लाभार्थ्यांना योजनेच्या लाभापासून रोखायचे कसे? हा प्रश्‍न निर्माण होत आहे.