Wednesday 29 November 2017

प्रॉपर्टी कार्ड मिळणार ऑनलाइन

डिजिटायझेशनचे काम अंतिम टप्प्यात

सातबारा आणि फेरफार हे ऑनलाइन मिळण्याचा प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असताना, आता भूमि अभिलेख विभागाकडून मिळकत पत्र (प्रॉपर्टी कार्ड) हेदेखील ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिले जाणार आहेत. याबाबतची डिजिटायझेशनची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना घरबसल्या पाहता येणार आहेत.

महापालिकेचा स्वीडनसोबत करार?

  • आयुक्‍ताची माहिती ः “स्मार्ट सिटी’तील कामांची तयारी
पिंपरी, (प्रतिनिधी) – प्रदुषणविरहीत सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था आणि दैनंदिन घनकचरा संकलन व त्याचे विघटन व्यवस्थापन करण्यासाठी स्वीडनची राजधानी स्टॉकहोल्ममध्ये राबवलेली संकल्पना पिंपरी-चिंचवडमध्ये राबवता येऊ शकते. त्यासाठी नेमके काय करता येईल, हे जाणून घेण्यासाठी स्वीडन येथील शिष्ठमंडळ पुढील महिन्यात पिंपरी-चिंचवडला भेट देणार आहे. या भेटीदरम्यान स्वीडन आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्यातील करार करण्याबाबत चर्चा होईल, अशी माहिती आयुक्‍त श्राव

Bapat urges hoteliers to pass on reduced GST benefits to patrons

PIMPRI CHINCHWAD: State minister for food and civil supplies Girish Bapat on Monday appealed to the hoteliers to pass on the benefits of the reduced goods and services tax (GST) rates to their customers.

भोसरीकरांची कोंडी

पिंपरी - पदपथांवरील अतिक्रमणे, रस्त्याच्या कडेला उभी वाहने, अरुंद रस्त्यावर वाहनांच्या रांगा आणि जीव मुठीत घेऊन वाट शोधणारे विद्यार्थी व पादचारी... हे नित्याचे दृश्‍य आहे भोसरीतील आळंदी रस्त्याचे. 
रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या पदपथांवर दुकानदार व पथारीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यालगतच खासगी दुचाकी व चारचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे मूळचा अरुंद रस्ता अधिकच अरुंद होतो. वाहने चालविताना त्रेधातिरपिट उडते. सकाळी, सायंकाळी विशेषतः गुरुवार, रविवार आणि अन्य सुटीच्या दिवशी वाहतूक कोंडी ही वाहनचालकांची परीक्षा घेणारी ठरते. 

शहरात धावणार मिडी गाड्या

पिंपरी - शहरातील अंतर्गत मार्गांवर लवकरच पीएमपीच्या नवीन मिडी गाड्या धावणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना चांगली सुविधा मिळणार आहे. या गाड्या आकाराने लहान असल्याने त्या मोठ्या गाड्यांच्या तुलनेत जास्त लवकर प्रवाशांची वाहतूक करू शकतील. डिसेंबरच्या अखेरीला किंवा नववर्षाच्या प्रारंभी या गाड्यांची सेवा शहरास उपलब्ध होईल.

अजगर, मगरीची चोरी, सापांच्या मृत्यूवरून वादंग

पिंपरी - महापालिकेच्या संभाजीनगर येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयातील अजगर, मगरीची चोरी आणि सापांचा मृत्यू आदी मुद्‌द्‌यांवरून मंगळवारी (ता.28) सर्वसाधारण सभेत जोरदार वादंग झाले. सभेमध्ये उपसूचना न वाचता मंजूर केल्या जात असल्याबद्दल राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला; तर राष्ट्रवादी कॉंग्रेस महापालिकेत सत्तेत असताना ढिगाने उपसूचना मंजूर केल्या जात होत्या, असा प्रतिटोला भाजपच्या सदस्यांनी लगावला.

अपंगांना पेन्शन योजना

शहरातील अपंगांना दरमहा दोन हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. आर्थिक उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नसलेल्या आणि तीन वर्षांपासून शहरात अस्तित्त्वात असलेल्या अपंगांना योजनेचा लाभ मिळणार आहे. जन्मतःच अपंग असणाऱ्यांना योजनेत सामावून घेण्याची उपसूचना मात्र फेटाळण्यात आली.

Have suggestions for easing traffic congestion? Send them to police

Pune: Police commissioner Rashmi Shukla on Tuesday decided to encourage people's participation in traffic planning of the city and to find micro-level solutions to decongest the roads. Shukla announced her plans on a social networking site which went viral.

Battling dengue, city records highest cases in Maha till Oct

Pune: The city, including areas within Pune and Pimpri Chinchwad municipal limits, continues to record highest number of dengue cases in the state this year .
As per the latest report of the state health department, the areas falling under Pune municipal limits recorded 1,058 dengue cases, followed by Greater Mumbai (913), Nashik (504) and Pimpri Chinchwad (342). The areas under these four municipal corporations collectively recorded 2,817 (58%) of the total dengue cases in the state till October this year. The state's tally stands at 4,797.

रिंगरोडला गती

पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पहिल्या टप्प्यातील पुणे-सातारा महामार्ग ते नगर महामार्ग यांना जोडणाऱ्या रिंगरोडच्या कामाची निविदा काढली आहे. या रस्त्याची लांबी ३३ किलोमीटर एवढी असणार आहे. निविदा भरण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली आली आहे. यामुळे रिंगरोड मार्गी लावण्यासाठी पीएमआरडीएचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.  

‘रेफ्युज एरिया’ विकला!

पुणे - तुम्ही २४ किंवा त्यापेक्षा अधिक उंचीच्या इमारतीत राहाता? त्याचा ताबा अजूनही बांधकाम व्यावसायिकाकडेच असल्यास इमारतीत ‘रेफ्युज एरिया’ आहे का? याची नक्की खात्री करा. कारण, तुमच्या सुरक्षिततेसाठी इमारतीमध्ये हा ‘एरिया’ असायलाच हवा. तो बंधनकारक आहे. पण, तुम्हाला गाफील ठेवून संबंधित बांधकाम व्यावसायिक तो विकण्याची शक्‍यता आहे.  हा ‘एरिया’ विकणे सोडाच पण, त्याचा अन्य कारणांसाठीही वापर नियमबाह्य असेल. हा प्रकार म्हणजे, तुमच्या जिवाशी खेळच असेल! अशा गंभीर बाबींची दखल घेऊन महापालिकेच्या अग्निशामक दलाने ३६ जणांना नोटिसा बजाविल्या आहेत. त्यातील तिघा जणांवर कठोर कारवाईच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

इम्पोर्टेड बाइक, कारची वाढती क्रेझ

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क, पुणे- मुंबई द्रुतगती मार्गामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासाला गती मिळाली. परिणामी शहरातील जमिनींचे भाव गगनाला भिडले. त्याचा फायदा जमीन मालकांना मिळाला. भरघोस पैसा मिळाल्याने अनेकांचे राहणीमान तसेच जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले.

रोटरी क्‍लब ऑफ निगडीच्या शिबिरात 40 जणांची मोफत शस्त्रक्रिया

पिंपरी – रोटरी क्‍लब ऑफ निगडीतर्फे डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर पिंपरीमध्ये मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले असून या शिबिरात 40 जणांची शस्त्रक्रिया करण्यात आली.
यावेळी डॉ. डी. वाय. पाटीलचे अधिष्ठाता जे. एस. भावलकर, ब्रिगेडियर व प्रिन्सिपल डायरेक्‍टर ऍण्ड सीईओ अमरजित सिंग, ऍकेडमिक्‍स संचालक वत्सला स्वामी, अध्यक्ष हेमंत कुलकर्णी, प्रकल्प संचालक विनोद बन्सल, निगडी क्‍लब सचिव प्रवीण घाणेगावकर, माजी अध्यक्ष राणू सिंघानिया, चिंचवड क्‍लबच्या अध्यक्षा अनघा रत्नपारखी, सर्व्हिस डायरेक्‍टर सुहास दामले, पुंडलिक वानखेडे, सुहास वाघ उपस्थित होते.

पिंपरी न्यायालयात संविधान दिन साजरा

पिंपरी, (प्रतिनिधी) – मोरवाडी येथील न्यायालयात पिंपरी चिंचवड ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड.श्रीकांत दळवी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुहास पडवळ व पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मे.धुमकेकर उपस्थित होते. यावेळी न्यायाधीश धुमकेकर यांनी घटनेचे महत्त्व समजावून सांगितले. ऍड. श्रीकांत दळवी घटनेतील कलम 19(1) अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य या विषयावर विचार व्यक्‍त करताना म्हणाले की, आपण आपले स्वातंत्र्य उपभोगताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.