Friday 12 October 2018

Happy Eating Spread Positivity; #PCMCEatOuts launched on 36th Anniversary of Pimpri-Chinchwad

On the great occasion of 36th Anniversary of Pimpri-Chinchwad, We city youth (#PCMCFirst) are delighted to announce that we have started #PCMCEatOuts. A facebook group to provide a platform for city based foodies

चाकणमध्ये इलेक्‍ट्रॉनिक हब होणार

चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेने जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या पाचव्या टप्प्यात इलेक्‍ट्रॉनिक हब होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी तीनशे एकर जमीन एका इलेक्‍ट्रिक कंपनीला देण्यात येणार आहे, अशी माहीती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली. 

पिंपरीत पुढील वर्षी धावणार मेट्रो

पिंपरी-फुगेवाडी मार्ग डिसेंबर २०१९पर्यंत कार्यान्वित करण्याचा निर्धार

पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते फुगेवाडी या प्राधान्य मार्गावर डिसेंबर २०१९ पर्यंत मेट्रो सुरू करण्याचा निर्धार 'महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन'ने (महामेट्रो) केला आहे. त्यामुळे, या मार्गावरील मेट्रो मार्गिकेच्या बांधकामासह स्टेशनच्या बांधकामाचे काम गतीने सुरू करण्यात आले आहे. पुढील वर्षभरात या मार्गावरील किमान पाच किलोमीटरचे काम पूर्ण करण्याचे आव्हान 'महामेट्रो'समोर असणार आहे.

...अन्‌ कॅरिबॅग विक्रेत्यांनी केले पलायन

पिंपरी - पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक वस्तू व कॅरिबॅगवर राज्य सरकारने सहा महिन्यांपूर्वी बंदी घातली आहे. तरीही शहरात त्यांचा वापर सर्रास होतो आहे. या पार्श्‍वभूमीवर ‘कॅरिबॅग येतात कुठून?’ याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता, काही जण शहरातील सिग्नलवर कॅरिबॅग विकत असल्याचे आढळले. त्यांचे छायाचित्र घेण्यासाठी कॅमेरा काढताच, सर्वांनी कॅरिबॅग ठेवलेल्या पिशव्या घेऊन पळ काढला. साधारणतः दोन-अडीच तास सिग्नलवर कुणीही फिरकले नाही. सायंकाळी परिस्थिती जैसे-थे आढळली. ठिकाण होते महापालिका भवनाजवळील मोरवाडी चौक. प्लॅस्टिक व कॅरिबॅग बंदीबाबत महापालिकेने वेळोवेळी जनजागृती केली आहे. तरीही कॅरिबॅग आढळलेल्या विक्रेत्यांवर तातडीने कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये दंड वसूल केला. तरीसुद्धा कॅरिबॅग मोठ्या प्रमाणात शहरात आढळत आहेत.

सिंधी बांधवांची आराध्य वैष्णोदेवी

पिंपरी – शहरातील वैष्णो देवी मंदिरामध्ये नवरात्रोत्सावानिमित्त भावीक मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर शहराच्या कानाकोपऱ्यातून येत आहेत. पिंपरीतील वैष्णो देवी मंदिराची स्थापना 16 ऑक्‍टोबर 1193 साली हरिश मूलचंदानी यांनी केली. जम्मू-कश्‍मिरमध्ये त्रिकूट पर्वतावर वैष्णो देवीचे मूळ स्थान असून त्या पार्श्‍वभूमीवर या मंदिराची बांधणी येथे करण्यात आली आहे.

बिल न भरल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील फोनचे ‘आऊट गोईंग बंद’

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांच्या कार्यालयातील फोनचे बिल भरले न गेल्याने आऊटगोईंग बंद झाल्याचे धक्कादायक प्रकार समोर येत आहे. वाहन, कर्मचाऱ्यांचा तुटवडा एकीकडे असताना आता आयुक्तालयातील फोनचे आऊटगोईंग बंद झाल्याने पोलीस आयुक्तालयात सुरू करण्याची घाई झाल्याची चर्चा सुरू झालीयं…

शहराचा ‘डीपीआर’ तयार करण्यासाठी दोन एजन्सी पात्र : आयुक्तांच्या निर्णयानंतर ‘स्थायी’कडे शिफारस

पिंपरी-चिंचवड शहराचा सुधारीत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेसह एका खासगी एजन्सीचा प्रस्ताव पात्र ठरला आहे. त्यासंदर्भातील अहवाल नुकताच आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला आहे. त्यांच्या मान्यतेनंतर सदर प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.

Wakad : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात पहिली एमपीडीए कारवाई

एमपीसी न्यूज – वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गर्दी मारामारी, दरोडा, दंगा, वाहनांची तोडफोड, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा प्रकारचे गुन्हे करणा-या एका सराईत गुन्हेगारावर वाकड पोलिसांनी घातक कारवाया प्रतिबंध कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली आहे. त्यानुसार त्याला एक वर्ष स्थानबद्ध करत येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे. ही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एमपीडीए ची पहिलीच कारवाई आहे. अनिकेत अर्जुन

Wakad: परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटणार; अमृत योजनेच्या कामास सुरूवात

एमपीसी न्यूज – वाकड मधील दक्षतानगर, कस्पटेवस्ती येथे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याच्या 160 मी.मी. व्यासाचे HDPE पाईप टाकण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्षा ममता  गायकवाड यांच्या हस्ते आज (गुरुवारी)कामाचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे वाकड परिसरातील पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार आहे.  कामाच्या शुभारंभाप्रसंगी यावेळी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता भाऊसाहेब साबळे, कनिष्ठ अभियंता सचिन 

उपमहापौरांच्या प्रभागातच टॅंकरने पाणी

वाल्हेकरवाडी - येथील संत तुकारामनगर, ओंकार कॉलनी, ओम साई कॉलनीसह इतर भागात काही दिवसांपासून कमी दाबाने, अपुरा व दूषित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी इतरत्र भटकंती करावी लागत आहे. ऐन नवरात्रोत्सवात पाण्याचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक कार्यकर्ते टॅंकरने नागरिकांची तहान भागवत आहेत.

पिंपरीत म्हाडाची ८५० घरे (व्हिडिओ)

पिंपरी - तुम्ही जर हिंजवडी किंवा तळवडे आयटी पार्कमध्ये काम करत आहात आणि महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर तुम्हाला परवडणारे घर घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. म्हाडाकडून लवकरच सुमारे ८५० घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, महिनाअखेरीस या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. म्हाडासाठी वेगवेगळ्या बांधकाम व्यावसायिकांकडे आरक्षित असलेली ही घरे असतील.

पर्यावरणपूरक ‘सुमन शिल्प’ (व्हिडिओ)

भोसरी - सोलर पॅनेल बसवून वीजबिलात प्रति महिना पन्नास हजारांची बचत, कचऱ्यापासून खतनिर्मिती आदी पर्यावरणपूरक प्रकल्प राबविणारी दिघी-परांडेनगरातील सुमन शिल्प सोसायटी आदर्श सोसायटी ठरली असून, ‘रेड डॉट’ मोहीम राबवून आरोग्याची काळजी घेणारी महापालिका हद्दीतील ही पहिलीच सोसायटी आहे.

रक्तदान शिबीराने पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वर्धापनदिनाचा प्रारंभ

चौफेर न्यूज :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात महापौर राहूल जाधव, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार व विरोधी पक्षनेते दत्तात्रय साने यांनी रक्तदान करून या शिबिराचा प्रारंभ केला.

दुर्गादेवी टेकडीवरील नवरात्रोत्सव, सलग दुसऱ्या वर्षी अंधार

चौफेर न्यूज – देशभरात सर्वत्र नवरात्रोत्सवाची धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. आदीशक्तीच्या जागरासाठी विविध मंदिरांचा परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला असताना निगडीतील दुर्गादेवी टेकडीवरील मंदिराचा परिसर मात्र, सलग दुसऱ्या वर्षी अंधा-या काळोखात बुडाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका व मंदिर नियोजन समितीच्या या अनास्तेबद्दल नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कुंदन गायकवाड यांच्या नगरसेवकपदाचा चेंडू कायदा विभागात

पिंपरी – महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी भाजप नगरसेवक कुंदन गायकवाड यांचे नगरसेवक पद रद्द केले आहे. मात्र, जात पडताळणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने नगरसेवक पद रद्द झाले नसल्याचा दावा गायकवाड यांनी केला आहे. तर महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी मात्र उच्च न्यायालयाच्या या आदेशावर कायदा विभागाचा अभिप्राय मागविला आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी या प्रकरणी “वेट ऍण्ड वॉच’ चे धोरण अवलंबले आहे.

Pimpri: संगीत खुर्चीत महापौरांनी पटकाविला प्रथम क्रमांक; रस्सीखेचमध्ये आयुक्त संघाची बाजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 36 व्या वर्धापनदिनानिमित्त घेण्यात आलेल्या संगीत खुर्चीत स्पर्धेत महापौर राहुल जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, महापौर संघ विरुद्ध आयुक्त संघ या रस्सीखेच स्पर्धेत आयुक्त संघाने बाजी मारली. वर्धापनदिनानिमित्त रक्तदान, सायकल फेरी असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.  महापालिकेच्या प्रांगणातील अण्णासाहेब मगर यांच्या पुतळ्यास महापौर राहुल जाधव व आयुक्त श्रावण हर्डीकर

काय सांगताय महापालिका कर्मचाऱ्यांना हेलिकॉप्टर?

पिंपरी- वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी कर्मचाऱ्यांना महापालिकेत येण्यासाठी हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध करुन द्यावी. तसेच कर्मचाऱ्यांसाठी मुख्यालयाच्या प्रत्येक मजल्यावर शाकाहारी-मांसाहारी कॅन्टीन उपलब्ध करुन देण्याची हटके उपसूचना करण्यात आली. याला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. मात्र, एकही उपसूचना स्वीकारायची नसल्याचे सांगत, या सर्व उपसूचना फेटाळून लावल्या.