Saturday 9 February 2019

कचरा वाहतुकीसाठी ठेकेदाराला मुदतवाढ

पिंपरी – शहरातील सात प्रभाग कार्यालय हद्दीतील कचरा गोळा करणे आणि त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी चार कोटी रूपये खर्च होणार आहे.

बोपखेलमध्ये सव्वातीन कोटींचे उद्यान

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बोपखेल येथील आरक्षित जागेवर उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 3 कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

स्थायी समितीचे “काउंट डाऊन’

पिंपरी – महापालिकेच्या तिजोरीच्या चावी असलेल्या स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी नगरसेवकांमध्ये चूरस लागणार आहे. समितीच्या आठ सदस्यांची 28 फेब्रुवारीला मुदत संपणार आहे. त्यामुळे समितीत जाण्यासाठी इच्छुकांनी नेत्यांकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. 20 फेब्रुवारीच्या महासभेत नवीन आठ सदस्यांची निवड केली जाणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी गतवर्षी समितीतील दहा आणि अपक्ष एक अशा 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. त्यामुळे यावेळी देखील सर्वच सदस्यांचे राजीनामे घेतले जाण्याची दाट शक्‍यता आहे.

विरोधकांचा सोमवारी महापालिकेला गाजरांसह घेराव

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबत प्रश्‍नांकडे सत्ताधारी भाजपचे लक्ष वेधण्यासाठी विरोधकांकडून येत्या सोमवारी (दि. 11) महापालिका मुख्यालयाला मानवी साखळीतून गाजरांसह घेराव घालणार आहेत. दुपारी तीन वाजता हे आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी शुक्रवारी (दि. 8) पत्रकार परिषदेत दिली. शिवसेना गटनेते राहुल कलाटे, शहर प्रमुख योगेश बाबर, मनसे गटनेते सचिन चिखले, सामाजिक कार्यकर्ते मारूती भापकर तसेच विविध पक्ष आणि सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Pimpri : क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती तर्फे रविवारी भूमिवंदन, पारधी बांधवांना गाईचे वाटप

एमपीसी न्यूज -क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने येत्या रविवारी (दि.10) भूमिवंदन, कुर्डुवाडी परिसरातील दहा पारधी बांधवांना गाईचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पुणे सायन्स फोरम आई गुरुकुलम यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘डिजिटल सायन्स लॅब’चे केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी, नदी विकास व गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 

Pimpri: शास्तीकर माफीसाठी विरोधक सोमवारी महापालिकेला घालणार घेराव

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांचा शास्तीकर माफी, अनियमित बांधकामे नियमितीकरण, रेड झोन, रिंग रोडबाबतच्या प्रश्नांकडे सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी, दिलेल्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संघटनांच्या वतीने येत्या सोमवारी (दि.11) दुपारी तीन वाजता मानवी साखळीव्दारे महापालिका मुख्यालयाला घेराव घालणार आहेत. 

Bhosari: रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने विविध प्रकल्पांचे खासगीकरण करण्याचा घाट घातला आहे. सत्ताधारी उद्या महापालिका खासगी संस्थेस भाडेतत्वावर चालविण्यास देण्याची निविदा काढतील, अशी उपरोधिक टीका शिवसेना शहरप्रमुख योगेश बाबर यांनी केली आहे. रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मागे घ्या, अन्यथा शिवसेनेच्या स्टाईलने विरोध करु’ असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

Pimpri: मोरवाडीत रविवारी रक्तदान, आरोग्य शिबिर

एमपीसी न्यूज – नंदा ज्ञानदेव भोजने यांच्या चतुर्थ स्मृती दिनानिमित्त येत्या रविवारी (दि.10) मोफत रक्तदान व आरोग्य  शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. मोरवाडी, म्हाडा कॉलनीतील एसएनबीपी शाळेत रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत हे शिबिर होणार आहे. यामध्ये सामान्य तपासणी, महिलांची तपासणी, डोळे तपासणी, बालकांची तपासणी केली जाणार आहे. 

वाकड पोलिसांकडून तीन सराईत जेरबंद

पिंपरी – तीन आरोपींना अटक करत वाकड पोलिसांनी वाहनचोरी व सोनसाखळी चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आणले असून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
महम्मद आरिफ उस्मानअली सहाय्यक (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश), आयुब रियासत अली (रा. कस्पटे वस्ती, वाकड. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश), फहीम मतीन सिद्दीकी (रा. फुल चौक धुळे. मूळ रा. उमरीकला, जि. मुरादाबाद, उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

‘अनधिकृत’चा प्रश्‍न कायम

पिंपरी - अनधिकृत बांधकामे नियमानुसारच नियमित करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे शहरातील एक लाखाहूनही अधिक असलेल्या अनधिकृत बांधकामांचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने गेल्या वर्षी काढलेल्या आदेशातही अधिकृत करण्यासाठीची रक्कम जास्त असल्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दशकाहून अधिक काळ महत्त्वाची असलेली ही समस्या तशीच राहिली आहे.  

बाप्पांचा जन्मोत्सव उत्साहात

पिंपरी – गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष…, टाळ-मृदंगाचा गजर…, महापूजा, आरती, महाप्रसाद, पालखी सोहळा अशा भक्तिमय वातावरणात माघी गणेश जयंती उत्सव शुक्रवारी (दि. 8) पिंपरी-चिंचवड शहरात साजरा झाला.

सत्तेच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादीने स्वत:ची घरे भरली – पंकजा मुंडे

पिंपरी (Pclive7.com):- राज्यभर विरोधक भारतीय जनता पार्टीवर आरोप करत सुटले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेच्या काळात स्वत:ची घरे भरली. बगलबच्चे मोठे केले; परंतु भाजपने सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून त्यांना मोठे करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले. दलालांची फौज बंद केली, अशी टीका राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केली.

शिक्षण समितीचा सावळा गोंधळ

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांना राज्य सेवेत पाठविण्याबाबतचा ठराव महासभेने मंजूर केल्यानंतर पुन्हा शिक्षण समितीने शिंदे यांना राज्यसेवेत पाठविण्याचा ठराव आयत्यावेळी मंजूर केला आहे. अंतिम मान्यतेसाठी ठरावाची महासभेकडे शिफारस केली आहे. महापालिकेतील सर्वोच्च असलेल्या महासभेने ठराव केल्यानंतर पुन्हा शिक्षण समितीने तोच ठराव मंजूर केल्याने समितीतील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.

बेरोजगारी देशासमोरील मोठे आव्हान – डॉ. प्रफुल्ल पवार

पिंपरी – आज व्यवस्थापन शिक्षणासाठी सात लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. मात्र त्यापैकी 5 टक्के कुशल विद्यार्थ्यांनाच नोकरी मिळते. आज विद्यार्थी शिक्षणाला कौशल्याची जोड देत नसल्याने 95 टक्के विद्यार्थी बेरोजगार राहतात. बेरोजगारी हे देशासमोरील मोठे आव्हान बनले आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निबंधक व वाणिज्य व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांनी केले.

एमपीसी न्यूज इफेक्ट : दर्शन हॉलसमोरील भुयारी गटाराचे झाकण दुरुस्त

एमपीसी न्यूज- चिंचवड-पिंपरी लिंकरोडवर दर्शन हॉलजवळ भुयारी गटाराचे झाकण धोकादायक स्थितीत असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. अशा आशयाची बातमी एमपीसी न्यूजवर 6 फेब्रुवारी रोजी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीची दखल घेऊन पिंपरी महापालिकेच्या संबंधित विभागाने या झाकणाच्या त्वरित दुरुस्ती केली.

Pune : पुणे गारठले ! पारा 5.1 अंशावर

एमपीसी न्यूज-आठवड्यापूर्वी पुण्याच्या तापमानात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे पुण्यातून थंडीने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच आज पुण्यातील किमान तापमानाने नीचांक गाठला आहे. आज पुण्याचे किमान तापमान 5.1 अंश सेल्सियस इतके नोंदले गेले आहे. गेल्या दहा वर्षातील पुण्यातील हे सर्वात नीचांकी तापमान आहे.

Bopkhel: बोपखेलच्या आरक्षित जागेवर विकसित होणार उद्यान

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बोपखेल येथील आरक्षित जागेवर महापालिकेतर्फे उद्यान विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे तीन कोटी 13 लाख रुपये इतका खर्च येणार आहे. स्थानिक नगरसेवक विकास डोळस यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची बोपखेल येथे आरक्षित जागा आहे.