Friday 2 June 2017

पिंपरीत ‘घनकचरा’ मोहीम

‘स्वच्छ भारत अभियाना’त झालेली घसरण लक्षात घेऊन आणि पर्यावरण दिनाचे औचित्य साधून येत्या पाच जूनपासून पिंपरी-चिंचवडमध्ये घनकचरा विलगीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर नितीन काळजे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरुवारी दिली.

अतिरिक्त आयुक्तपदी अच्युत हिंगे यांची नियुक्ती

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाची सूत्रे तानाजी शिंदे यांच्याकडून अच्युत हांगे यांनी स्वीकारली. मावळते अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची बदली वन व महलूस विभागात करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या ...

PCMC is not PMPML's ATM, says Savale

Pimpri Chinchwad: For the second week running, the civic body's standing committee has withheld funds to Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML). The funds — Rs16.52 lakh for an education tour to Science Park and Rs5.72 crore for ...

पिंपरी मंडईतील निम्मे गाळे बंद

शेतकरी संपाचा परिणाम; भाज्यांच्या भावात १० टक्‍क्‍यांनी वाढ
पिंपरी - शेतकरी संपामुळे पिंपरी कॅम्पातील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईतील भाजीपाल्याची आवक गुरुवारी पहिल्याच दिवशी कमालीची रोडावली. त्यामुळे मंडईतील निम्मे गाळे जवळपास बंद राहिले. काही भाज्यांच्या भावात ५ ते १० टक्‍क्‍यांची वाढ झाली. शुक्रवारी (ता. २) भाजीपाल्याची आवक आणखी कमी होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

भाजीपाल्याची आवक घटली

शेतकऱ्यांनी कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी केलेल्या पहिल्यावहिल्या संपाचा थोडाफार परिणाम पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळाला. संपामुळे पिंपरी मंडईत भाजीपाल्याची आवक ४२ टक्क्यांनी घटल्याची माहिती उपबाजार समिती पिंपरीचे ...

उद्योगनगरीत पावसाची जोरदार हजेरी

पिंपरी,  (प्रतिनिधी) – अवकाळी पावसाने गुरुवारी (दि.1) सायंकाळी शहर व परिसरात जोरदार हजेरी लावली. यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. सायंकाळी सव्वा पाच वाजता सुरु झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत बरसत होता.

[Video] मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात

पिंपरी ते स्वारगेट मार्गावरील प्रस्तावित मेट्रोच्या कामाला कासारवाडीपासून सुरुवात झाली आहे. गुरुवारी (दि.25) पासून या कामाला सुरुवात करण्यात आली. मेट्रोचा मार्ग ग्रेडसेपरेटरमधून राहणार आहे. यामुळे याठिकाणी 250 मीटरच्या टप्प्यांमध्ये हे काम करण्यात येणार आहे. पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचा मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणा-या वृक्षांना जीवदान मिळाले आहे. दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार आहे. महामेट्रोने पहिल्या टप्प्यात पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानचे 10.75 किलोमीटर अंतराचे काम पूर्ण करण्याचे निश्चित केले आहे. पिंपरी ते रेंजहिल्स दरम्यानच्या मेट्रोमार्गावर नऊ स्टेशन्स प्रस्तावित करण्यात आली आहेत. मेट्रोचा मार्ग एलिव्हेटेड राहणार असल्याने सर्व स्टेशन्स वरच्या बाजूला राहणार आहेत. मेट्रोला स्टेशन्ससाठी जागेची आवश्‍यकता भासणार आहे. त्यासंदर्भात महा मेट्रोच्या व्यवस्थपकांनी महापालिकेबरोबर पत्रव्यवहार केला आहे. ग्रेड सेपरेटरच्या बाजूला असणा-या बीआरटी मार्गावर करण्यात आलेल्या थांब्याचा वापर मेट्रो स्टेशनसाठी होऊ शकतो. मेट्रोचे काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. मेट्रोचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. महामेट्रोकडून काम सुरू असताना वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार असली तरी नाशिक फाटा चौकामधील वाहतूक कोंडीमध्ये भर पडण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी सकाळीच या ठिकाणी अपघात झाला आहे.

पालखी सोहळ्यासाठी पोलीस मित्रांची बैठक

– सहायक आयुक्त भामरे यांचे मार्गदर्शन 
निगडी,  (वार्ताहर) – संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यास पोलीस यंत्रणेला सर्व पोलीस मित्र दरवेळी मदत करतात. त्याचप्रमाणे यावर्षीही तुमच्या सारख्या नागरिकांची पोलीस यंत्रणेला सहकार्य अपेक्षित आहे. सुरक्षा पथकाच्या माध्यमातून निगडी ते आकुर्डी विसावा (श्री विठ्ठल मंदिर) वारकऱ्यांना सहकार्य करावे, असे सांगून सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) राजेंद्र भामरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

गॅस शवदाहिनी घोटाळ्यातील दोषींवर कारवाई अटळ ?

– आयुक्त श्रावण हर्डीकर यांची स्पष्टोक्ती
पिंपरी,   (प्रतिनिधी) – गॅस शवदाहिनी घोटाळयासंदर्भात त्रिसदस्यीय चौकशी समितीने तयार केलेला अहवाल आजच पाहिला मिळाला. हा चौकशी अहवालाचे सविस्तर वाचन केल्यानंतरच दोषींवर उचित कारवाई करु, अशी स्पष्टोक्ती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

कुदळवाडी परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढिग

पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखलीतील कुदळवाडी परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढिग साचले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते दिनेश यादव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.

रहाटणीतील घरफो़डीत नऊ लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी,  (प्रतिनिधी) – रहाटणी येथे फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे नऊ लाखाचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. ही घटना बुधवारी सकाळी साडेसहा वाजता घडली.

पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांची दहशत

पिंपरी चिंचवड, दि. 1 - वडमुखवाडी येथे चोरट्यांनी घरात घुसन केले 92 हजार रुपयांचे दागिने लंपास केलेत. यामध्ये 66 वर्षीय आजीच्या कानातले दागिने हिसकावल्याने आजीचे दोन्ही कानांना दुखापत झाली आहे. बुधावारी (31 मे) रात्री उशीरा ही घटना ...