Sunday 21 October 2018

Truncated metro routes 'not to serve purpose'

PUNE: The work on Pune Metro corridor one - Pimpri to Swarga ..

82% property taxpayers in PCMC limits take e-route

Pimpri Chinchwad: The payment of property tax through cashle ..

Chinchwad : बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथ दिवे

एमपीसी न्यूज – चिंचवड संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली परिसरात एलईडी पथदिवे बसविण्यात आले आहेत. प्रायोगिक तत्वावर हा प्रयोग सुरु असून यासाठी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.  याबाबत माहिती देताना अनुराधा गोरखे म्हणाल्या, पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जात आहे. पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक दिवसेंदिवस वाहतूक वाढत आहे. रात्रीच्या वेळी वाहनांचा वेग

Bhosari : भोसरीतील विकासकांना पालिकेने धाडल्या नोटीसा

एमपीसी न्यूज – बांधकाम व्यावसायिकांनी सदनिकाधारकांशी केलेल्या करारनाम्यातील नमूद तरतुदी, अटी व शर्तीचे पालन करावे. पालन न केल्यास महापालिकेमार्फत गृहप्रकल्पास देण्यात आलेली बांधकाम परवानगी रद्द करण्यात येणार असल्याच्या नोटीसा महापालिकेने भोसरी मतदार संघातील विकासकांना दिल्या आहेत. यामुळे बांधकाम व्यावसायिकांना चांगलाच दणका बसला आहे. त्यामुळे विकासकांना आता अटी-शर्तीचे पालन करावे लागणार आहे. अनेक बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पातील

Pimpri : पाणीपुरवठ्यावर तब्बल सहा तास चर्चा; कृत्रिम पाणी टंचाईचा आरोप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्यावर महासभेत तब्बल सहा तास गांभीर्यपूर्वक चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम पाणी टंचाई निर्माण केल्याचा आरोप विरोधकांनी केला. तर, सत्ताधारी पक्षाच्या काही नगरसेवकांनी देखील कृत्रिम पाणी टंचाईची शंका निर्माण केली. तब्बल 40 नगरसेवकांनी या चर्चेत सहभाग घेत पाण्याची समस्या मांडली. चर्चेअंती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी खुलासा देणे अपेक्षित

कोट्या, म्हणींमुळे हास्यकल्लोळ

पिंपरी- पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्यावरुन सुमारे साडे सहा तास झालेली सभा तहकूब करण्यात आली. मात्र, या प्रदीर्घ सभेत एकमेकांवर केलेल्या अपवादात्मक कोट्या, प्रशासनाला दिलेली आव्हाने आणि म्हणींचा वापर व खळबळजनक वक्तव्यांमुळे अनेकदा धीरगंभीर वातावरणातही हास्याचे फवारे उडाले.

पाणी प्रश्‍नावरून भाजपला “घरचा आहेर’

पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्‍न चांगलाच पेटला आहे. सत्ताधारी भाजप विरोधात विरोधक आक्रमक झाले असताना स्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेवर पाण्याच्या निषेधार्थ मोर्चा काढत “घरचा आहेर’ दिला आहे. पिंपळे निलख-वाकड प्रभागातील सत्ताधारी भाजपचे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्थानिक नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढला होता. कामठे यांनी काढलेल्या या मोर्चाला भाजपचे नगरसेवक संदीप कस्पटे, आरती चोंधे, सुजाता पालांडे यांनी देखील पाठींबा दर्शवत प्रशासनाविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.
गेल्या काही महिन्यांपासून पिंपळे निलख-वाकड प्रभागातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही पाण्याची समस्या सुटलेली नाही. त्याचाच निषेध करण्यासाठी या प्रभागातील नागरिकांना नगरसेवक तुषार कामठे यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढला. आज (शनिवारी) महापालिकेची सर्वसाधारण सभा होती. या सभेपूर्वी कामठे यांनी महापालिकेवर प्रभागातील नागरिकांसह मोर्चा आणला होता. मात्र मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावरच हा मोर्चा अडविण्यात आला. यावेळी मोर्चात असलेल्या नागरिकांनी गेटसमोर ठिय्या मांडत महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Pimpri Chinchwad police launch public awareness campaign for traffic violations

The Pimpri Chinchwad police commissionerate has taken a deci ..

आरोपींकडून ११० मोबाईल जप्त; चिंचवड पोलिसांची कामगिरी

चिंचवड : बेसावध व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावून लंपास करणाऱ्या टोळीचा चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला असून त्यांच्याकडून १२ लाख १२ हजार रुपयांचे एकूण ११० मोबाईल आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Pune: Election office seeks help from housing societies to revise electoral rolls

For the forthcoming Lok Sabha elections, the District Election Office (DEO) has urged the cooperative housing societies to help the election department revise the electoral roll by submitting information on the eligible voters residing in their societies. A meeting of all cooperative housing society office bearers was recently called by the DEO.

गृहनिर्माण संस्थांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी

पुणे - सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष-सचिवांना मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यांनी निवडणुकीशी संबंधित कामाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून लोकशाही सक्षमीकरणात महत्त्वपूर्ण योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.

प्राधिकरण कार्यालयात बेवारस बॅगेमुळे खळबळ

पुणे : प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ बेवारस बॅग आढळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (ता. 20) दुपारी घडली. 

खासगी ट्रॅव्हल्सची मनमानी दरवाढ

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरातील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी मनमानीपणे प्रवासी भाड्यांमध्ये दरवाढ केली आहे. वास्तविक, ट्रॅव्हल्स चालकांना तिकीट दरांच्या मर्यादा ठरवून दिल्या आहेत. तरीही, दसरा व दिवाळीच्या तोंडावर तिकीट दरांमध्ये दुप्पट ते पाचपट वाढ केली जात आहे. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या मनमानीला लगाम घालावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

गोवर, रुबेला प्रतिबंधक लसीकरणासाठी पालकसभा

सांगवी – सध्या विषाणूजन्य आजाराचे प्रमाण वाढत आहे. गोवर व रुबेला ही याच आजारांपैकी एक आहेत. पल्स पोलिओ प्रमाणेच भारत देश हा गोवर व रुबेला मुक्‍त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. येत्या नोव्हेंबर महिन्यात यासाठी मोठी मोहीम राबवण्यात येणार आहे. या सदंर्भात आरोग्य विभागातर्फे जुनी सांगवी येथील अरविंद एज्युकेशन सोसायटीमध्ये पालकसभेचे आयोजन करण्यात आले.

स्व. शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार प्रदान समारंभ बुधवारी

निगडी – महाराष्ट्र शाहीर परिषद आयोजित सातवा ‘स्व.शाहीर योगेश स्मृतिगंध पुरस्कार 2018’ प्रदान सोहळा बुधवारी निगडी येथे आयोजित करण्यात आला आहे. सांगली येथील शाहिरा अनिता खरात यांना यावर्षीचा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून ज्ञानप्रबोधिनी, निगडीचे केंद्रप्रमुख वा.ना.अभ्यंकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 

जे.आर.डी. टाटा उद्योग पुरस्कार सोहळा बुधवारी

चिंचवड –  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास परिषदेच्या वतीने दरवर्षी यशस्वी उद्योजकांना भारतरत्न जे.आर.डी.टाटा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा बुधवार दि. 24 ऑक्‍टोबर रोजी सायंकाळी चार वाजता चिंचवड येथील ऑटो क्‍लस्टर सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. टाटा मोटर्सचे माजी महाव्यवस्थापक मनोहर पारळकर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

आयुक्‍तांच्या प्रस्तावाला विधी समितीचा “ब्रेक’

पिंपरी – महापालिकेचे कार्यकारी अभियंता मकरंद निकम यांना पदोन्नती समितीने (डीपीसी) सहशहर अभियंतापदी पदोन्नती दिली. याविषयी प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विधी समितीसमोर ठेवला होता. विधी समितीच्या सभेत तो प्रस्ताव तहकूब ठेवला आहे.

खासदार श्रीरंग बारणे साधणार जनतेशी थेट संवाद

 चौफेर न्यूज – शिवसेना पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचा “ संवाद खासदारांचा थेट जनतेशी ”  हा उपक्रम रविवार दि. २१ रोजी सायं ६.०० वा. श्री विठ्ठल मंदिर, आकुर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील, पिंपरी विधान सभेचे आमदार अँड. गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, महिला संपर्क प्रमुख वैशालीताई सुर्यवंशी, पिंपरी विधानसभा संघटक प्रमोद कुटे, मधुकर बाबर, शिवसेना नगर सेवक व नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे, अशी माहिती योगेश बाबर यांनी दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे संभाजी महाराजावरती व्याख्यान व मार्गदर्शन आयोजित केले आहे.

शहरातील अनाधिकृत गॅस रिफिलींगवर छावा ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार

चौफेर न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात सध्या गॅस एजन्सी आणि अनधिकृत गॅस रिफिलींगच्या नावाखाली राजरोसपणे चोरी करणारी टोळीची सक्रीय झाली आहे. या सुरू असलेल्या गैरकारभारावर छावा संघटना ‘सर्जिकल स्ट्राईक’ करणार असल्याचे निवेदनाव्दारे कळविले आहे. यासंदर्भात छावाने पोलीस उपायुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच अन्नधान्य वितरण विभागाला देखील भेटुन कार्यवाही करण्याचे सांगण्यात आले आहे.

झिरो टू हिरो पुस्तकाची तिसरी आवृत्ती दुबईमधून प्रकाशित : भोसरीतील उद्योजकांची उत्तुंग भरारी

गल्फ महाराष्ट्र फोरमने आयोजित केलेल्या महाबीज 2018 या मराठी उद्योजकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत झिरो टू हिरो या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. हा पुस्तक प्रकाशाचा कार्यक्रम दुबईमधील जे एम मेरीएट येथे शनिवारी (दि. 13) झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत काही उद्योजकांनी आपापल्या क्षेत्रात अलौकिक ठसा उमटवला आहे, त्यांच्या यशोगाथा या पुस्तकातून समाजासमोर मांडण्यात आल्या आहेत.