Thursday 18 January 2018

[Video] सुखवार्ता | पर्यावरण रक्षणासाठी पिंपरी-चिंचवडच्या तरुणाची भन्नाट शक्कल

Pimpri Chinchvad Sukhvarta On Varun Salunkhe Recycle Pevhing Block From Plastic And Rubber

तुकाराम मुंडेंपेक्षा हिटलर बरा...त्यांना परत पाठवा! 

पिंपरीः पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना पुन्हा राज्य शासनाच्या सेवेत पाठविण्याची जोरदार मागणी आज पिंपरी-चिंचवड स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आली. मुंडे यांनी पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फी केल्याचा निर्णय घेतल्यानंतर पिंपरीच्या स्थायी समितीनेही त्यांच्याविरुद्ध हे टोकाचे पाऊल उचलले. 

250 truckloads of water hyacinth removed in 71 days from Pavana

Pimpri Chinchwad: Some social organizations removed 250 truckloads of water hyacinth from Pavana river in 71 days during a cleanliness drive.

जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करा

चौफेर न्यूज – जे.के.यु रोड खोदाई करणाऱ्या रिलांयन्स जिओ कन्ट्रक्शन कंपनीवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना प्रणित शिवव्यापारी सेना पिंपरी- चिंचवड शहरप्रमुख  युवराज दाखले यांनी केली आहे. या संदर्भात पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

PCMC selects winners of cleanliness competition

Pimpri Chinchwad: The civic body has selected the three winners in each of the six categories of the Swachh Bharat drive competition.

Many open manholes covered up in Akurdi

After Mirror report, PCMC fixed several gutters on 2.5-km Akurdi-Chikali stretch that had become risky for commuters

After IIT-Bombay team suggests changes: Three years on, PCMC's plans for BRTS launch postponed again

THE MUCH-DELAYED BRTS route from Dapodi to Nigdi on Pune-Mumbai Highway has been postponed again. The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) had planned to make the route operational before January 26. Vijay Bhojne, in-charge of PCMC BRTS cell, said a IIT-Bombay team had conducted a day and night safety audit of the route and suggested some amendments. “We had implemented all the suggestions that were made earlier. This time, however, there were minor requirements, which we have fulfilled,” he said.

विरोध होत असताना एम्पायर इस्टेट रॅम्पला अखेर मंजुरी

काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलासाठी दोन रॅम्प एम्पायर सोसायटीजवळ उतरविले जाणार आहेत. त्या रॅम्पला एम्पायर इस्टेट सोसायटीतील दहा हजार रहिवाशांनी विरोध दर्शविला होता. परंतू, रहिवाशांचा विरोध डावलून स्थायी समितीने त्या प्रस्तावाला आज (बुधवारी) झालेल्या सभेत मान्यता दिली.

‘महारेरा’कडे नोंदवा तक्रारी

तक्रार निवारण समिती स्थापन; क्रेडाई आणि ग्राहक पंचायतीच्या सदस्यांचा समावेश

Bhoomipoojan of maiden Metro station

Pimpri Chinchwad: State cabinet minister Girish Bapat would perform the bhoomipoojan of the first Metro station on Pimpri-Swargate route at Sant Tukaramnagar on Thursday, said Eknath Pawar, the ruling party leader of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC).

Maha-Metro to finalise loan for Pune Metro from European Investment Bank, French Development Bank

Pune Metro is likely to finalise funding from European Investment Bank (EIB) and French Development Bank (FDB) very soon as the team from both the financial institutes are visiting the city on Wednesday and Thursday.

Maha-Metro has already started the Metro work between Pimpri-Chinchwad and Range Hills as well as between Vanaz and Shivajingar Godown.

85 families face eviction from flats on attached land

PUNE: At least 85 families of software professionals are facing eviction notices served by the Enforcement Directorate (ED), Mumbai in relation to a housing project constructed on a 0.83 hectare land in Hinjewadi. The ED had in 2013 attached the land in a money laundering case.
The project, Scrum Utkarsh housing cooperative, comprising 140 flats in three multi-storey buildings, is located near Le Royale hotel on Maan Road in Hinjewadi. The notices were served over the last three days.

संस्कार ग्रुपची मालमत्ता जप्त

पिंपरी - दामदुप्पट व्याजाच्या आमिषाला बळी पडून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या कोटी रुपयांच्या ठेवी परत न करणाऱ्या संस्कार ग्रुपची सुमारे ४० कोटींची मालमत्ता दिघी पोलिसांनी जप्त केली आहे. तसेच या मालमत्तेच्या लिलावाबाबत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

[Video] पिंपरी चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचाराकडे लक्ष द्या… अण्णा हजारेंना साकडे!


कोयनानगर चौकतील वाहतूक समस्या सोडवा; सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या वाहतूक पोलिसांना सूचना

कोयनानगर चौकात सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापलिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी बुधवारी (दि.17) सायंकाळी या भागाचा निगडी वाहतूक पोलीस अधिका-यांसह पाहणी दौरा केला. वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी, रस्त्यावरील अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग हटवून आणि आवश्यक बदल करून ही समस्या सोडवा, अशा सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी वाहतूक पोलिसांना दिल्या आहेत.

PCMC denies increments to top official for 'misbehaving with colleague'

Civic officials added, “As a senior officer, it was Kulkarni’s duty to ensure the safety of the colleague but he failed.”

गैरवर्तन करणा-या संजय कुलकर्णीवर अखेर कारवाई

सहकारी महिला कर्मचा-याची छेड काढल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्या दोन वेतनवाढ आयुक्तांनी रोखल्या आहेत. तसेच यापुढे कोणत्याही स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचे निदर्शनास आल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ही कारवाई आज (बुधवारी) करण्यात आली.

Infighting in Shiv Sena over Babar's appointment

Pimpri Chinchwad: Differences have cropped up in the Shiv Sena over the appointment of Yogesh Babar as president of Pimpri Chinchwad city unit. Babar took over from Rahul Kalate, who is Sena group leader in the PCMC, on Monday.

BJP corporator Kamthe likely to face action

PIMPRI CHINCHWAD: Municipal commissioner Shravan Hardikar said action would be taken against BJP corporator Tushar Kamthe for dumping unauthorized flex boards and banners in PCMC's building premises.

मुळशीत विक्रमी भाडेकरार

पिंपरी - फ्लॅट किंवा दुकानाचे भाडेकरार ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याच्या सुविधेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मागील वर्षांत (जानेवारी ते डिसेंबर २०१७) मुळशी दुय्यम निबंधक कार्यालयातून तब्बल साडेआठ हजार करारनाम्यांची नोंदणी झाली. मुळशी तालुक्‍यातील ही आतापर्यंतची विक्रमी नोंदणी असून, सुशिक्षित नागरिक विशेषत: आयटीयन्स या नोंदणीला विशेष प्राधान्य देत असल्याचे त्यावरून स्पष्ट झाले आहे. त्यातून शासनाच्या तिजोरीत सुमारे ५० लाख रुपयांचा महसूल जमा झाला आहे. 

पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी सुचवा नाव

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) रिंग रोडचे काम हाती घेण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी भारतमाला प्रकल्पांतर्गत प्राधिकरणाच्या रिंगरोडचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे 128 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा रिंगरोड असणार आहे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला एक यथोचित नावे मिळावे, यासाठी पीएमआरडीएने पुणे रिंगरोडसाठी नामकरण स्पर्धा आयोजित केली आहे. या नावामधून पुण्याचा सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक दृष्टीकोन दिसून येणे अपेक्षित आहे. पीएमआरडीएच्या रिंगरोडसाठी योग्य असे नाव सुचविण्याचे आवाहन प्राधिकरणाचे आयुक्त किरण गित्ते यांनी केले आहे.

परवडणाऱ्या घरांसाठी पीएमआरडीए मध्ये कार्यशाळा

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीत प्रधानमंत्री आवास योजना राबविण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. या योजनेची अंमलबजावणी परिणामकारक व प्रभावीपणे करण्यासाठी पीएमआरडीएने पुढाकार घेतला आहे. येत्या सोमवारी (दि.22) बॅंक, विकसक, ग्राहक, बांधकाम व्यावसायिक संघटना यांची कार्यशाळा आयोजित केली आहे.

सरकारी शाळांमधून लवकरच खडू-फळा होणार हद्दपार

नवी दिल्ली :डिजिटल तंत्रज्ञानाला बळ देण्यासाठी प्रयत्नशील सरकारने देशाच्या सर्व शाळांना देखील आता याच्याशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना स्मार्ट बोर्डची सुविधा पुरविली जाणार आहे. सर्व राज्यांनी या निर्णयाला सहमती दर्शविल्याची माहिती मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.

तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही दणका

चौफेर न्यूज – पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत युनियनचे कार्यालय सील केल्यानंतर आता काँग्रेसप्रणीत इंटक या संघटनेला कार्यालय रिकामे करण्याची नोटीस बजावली आहे.

संपूर्ण राज्यात प्लास्टिक होणार लवकरच बंदी !

मुंबई : संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्लास्टिकच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर होणारे गंभीर परिणाम रोखण्यासाठी, प्लास्टिकच्या साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागाने काढली आहे. त्यामुळे प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवर बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या निर्णयानंतर दुकाने, मॉल्स, तसंच विविध आस्थापनांच्या परवान्यांसाठी प्लास्टिक वापर बंदीची अट घालण्यात येणार आहे. यासोबत संबंधित प्राधिकरण अथवा निरीक्षकांना परवाने नूतनीकरणावेळी प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळण्याबाबतची अट घालण्याच्या सूचना पर्यावरण विभागाने दिल्या आहेत. प्लास्टिक नैसगिक आणि जैविकदृष्ट्या विघटनशील नसतो. प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिकच्या इतर उत्पादनांच्या वापरामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यात अडथळे निर्माण होऊन पाणी तुंबते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. प्लास्टिक पिशव्या जनावरांच्या पोटात जाऊन त्यांचा मृत्यू होत असल्याने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय पर्यावरण विभागातर्फे घेण्यात आला आहे.