Wednesday 11 April 2018

पिंपरी शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयावर शिक्कामोर्तब

पिंपरी - शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाला राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी मान्यता दिली. या आयुक्तालयाच्या कार्यकक्षेत शहरातील 10 आणि ग्रामीण भागातील पाच अशी 15 पोलिस ठाणी असतील. 

Image result for police commissioner pimpri

Police commissionerate for Pimpri-Chinchwad gets govt nod

The Maharashtra government today gave its approval for setting up a separate police commissionerate for the Pimpri-Chinchwad industrial township, located on the outskirts of Pune city.

Pimpri-Chinchwad to get police commissionerate

Mumbai: The Maharashtra cabinet on Tuesday cleared the proposal to carve out a separate Pimpri-Chinchwad Police commissionerate from the existing Pune police commissionerate, with an aim to tackle the growing population, urbanisation, industrialisation, number of motor vehicles, political constituencies and increasing number of complaints.

आता गुन्हेगारीला आळा बसणार

पिंपरी - पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय स्थापन करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या निर्णयाचे शहरातील विविध संघटना, राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले आहे. त्यांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे... 

आयुक्तालयासाठी ३९३ कोटी मंजूर

पिपंरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांची संख्या, औद्योगिकीकरण, शिक्षणसंस्था, हिंजवडीतील आयटी नगरीच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र आयुक्तलयाचा निर्णय घेण्यात आला आहे. या आयुक्तालयासाठी ३९३ कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली. दरम्यान, मुख्यालयासाठी तात्पुरती भाडे तत्वावर जागा घेण्यात येणार आहे. तसेच या आयुक्तालयासाठी २६३३ नवीन पदांची निर्मिती करणार असल्याचेही बापट म्हणाले.

स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालयाला लाभला मुहूर्त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्‍तालय निर्माण करण्यासह त्यासाठी होणाऱ्या खर्चास मंत्री मंडळाच्या बैठकीत मंगळवारी (दि. 10) मान्यता देण्यात आली. लवकरच शहरास स्वतंत्र आयुक्‍तालय मिळणार असल्याचे आता निश्‍चित झाले आहे. स्वतंत्र आयुक्‍तालयासाठी दोन हजार 633 नवीन पदे निर्माण केली जाणार आहेत. या नव्या पोलीस आयुक्‍तालयात एकूण 15 पोलीस स्टेशन्सचा समावेश असणार आहे. यामध्ये पुणे पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीतील दहा आणि पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील पाच स्टेशनचा यामध्ये समावेश असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात एक मे पासून नवे आयुक्‍तालय सुरु होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

प्रश्‍नपत्रिका ‘मेट्रो’ची

केंद्र आणि राज्याप्रमाणे महापालिकेतही आम्हाला स्पष्ट बहुमताने निवडून द्या, तुमची सारी स्वप्ने साकार करून दाखवू, असे आश्वासन दिलेल्या भारतीय जनता पक्षाला फक्त पुणेकरांनीच नव्हे, तर पिंपरी-चिंचवडकरांनींही घसघशीत बहुमताने सत्ता दिली. या वर्षभरात कोणकोणती कामे भाजपने केली, कोणती प्रगतीपथावर आहेत, कोणते नवे प्रकल्प येऊ घातले आहेत, कोणते संकल्प सोडले जात आहेत, याचे रंगीबेरंगी अहवालही प्रसिद्ध होऊ लागले आहेत. मात्र याचबरोबर लोकहिताची अनेक कामे रखडली आहेत.

लष्करीभागातील जागेच्या ताब्यासाठी महामेट्रोचा पाठपुरावा

शहरातील मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी महानगरपालिकेकडून येणार्‍या जागा महामेट्रोच्या ताब्यात आलेल्या आहेत. मात्र पिंपरी चिंचवड ते स्वारगेट या मार्गिका क्रमांक 1 मधील खडकी ते रेंजहिल्स दरम्यानच्या जागा ताब्यात येणे बाकी आहे. या जागा लवकरात लवकर ताब्यात येऊन कामाला गती मिळावी यासाठी खासदार अनिल शिरोळे यांच्या बरोबर महामेट्रोची  नुकतीच बैठक पार पडली. याप्रसंगी भाजपचे खासदार अनिल शिरोळे आणि महामेट्रोचे उपसंचालक रामनाथ सुब्रम्हण्यम उपस्थीत होते. 

आयटी पार्क "चकाचक' करण्याचा ध्यास

पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमध्ये येणारी विदेशी मंडळी या परिसरातील स्वच्छतेबाबत कायम प्रश्‍न उपस्थित करीत असतात. या पार्श्‍वभूमीवर स्वच्छतेचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागावा, म्हणून हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने क्‍लीन अँड ग्रीन आयटी पार्क इनिशिएटिव्ह या अनोख्या उपक्रमाची सुरवात केली आहे. 

Smart City Project: Pune plans comprehensive bicycle master plan

Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) received INR 27 Crore from the Centre as part of its Smart City Project to begin its tendering process of area-based development.

Pavements lie defunct for more than 6 months

“The 100-metre stretch of pavement on both sides of the busy Aundh-Wakad road is narrow. Now to make matters worse the already narrow footpath is strewn with uprooted cement blocks while trenches dot the pavement. It cannot be used by citizens. The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) should immediately conduct the repair work of the pavement so that the hapless pedestrians don’t suffer,” Hiremath added.


City police chief pulled up for inaction over Salman Khan's casteist remarks

Actor used a derogatory term on a television show offending the Valmiki community; cops failed to register a case despite numerous complaints

Branches cleared from pavement in Kasarwadi

PCMC swings into action soon after report on the issue

Pedestrians frequenting the Kasarwadi area of Pimpri-Chinchwad and its residents, who had earlier highlighted their problem regarding unattended tree branches on the pavement near Hotel Kala Sagar, are immensely relieved as their problem has now been solved.

0.5 TMC water for Wagholi and Pirangut areas, PMC and PCMC quota to remain unaffected

PUNE: Pune district guardian minister Girish Bapat has assured 0.5TMC of water per annum for Wagholi and Pirangut areas through separate water schemes without affecting the water quota assured for the city or Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) areas.

प्राधिकरणाच्या गृहप्रकल्पांची नोंदणी ‘रेरा’कडे नाही

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने वीस वर्षांनंतर गृहनिर्माण योजनांची कामे हाती घेतली आहेत.

शहरबात पिंपरी : आगीचे सत्र आणि संशयाचा धूर

पिंपरीत गांधीनगर-कामगारनगर येथील हॉटेल लोटसला पहाटे पावणेपाचच्या सुमारास मोठी आग लागली.

एकाकीपणावर संवाद हाच रामबाण

पुणे - एकटे-दुकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी समाजाबरोबर संवाद साधण्यावर भर देण्याची गरज आहे, तर ज्येष्ठ नागरिक संघ, सोसायट्यांचे पदाधिकारी, विद्यार्थी, पोलिस यांनीही अशा एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांशी संवाद वाढवून त्यांचा एकाकीपणा दूर करण्यासाठी प्रयत्न करावा. याविषयी अधिकाधिक जनजागृती झाली, तरच एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठांचे प्रश्‍न सुटण्यास मदत होऊ शकेल, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी व्यक्त केली आहे. 

शहराच्या गरजेनुसार पार्किंग धोरण असावे

पिंपरी -महापालिका प्रशासनाने पार्किंग धोरण आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सरसकट सर्वत्र त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. प्रारंभी १४ महत्त्वाच्या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी शुल्क आकारण्याचा प्रस्ताव आहे. पुण्यात गेल्या महिन्यात पार्किंग धोरणाचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर विरोधकांनी त्याला जोरदार विरोध केला. त्यामुळे सुरवातीला पाच रस्त्यांवर ते राबविण्याचे सत्ताधारी भाजपला ठरवावे लागले.

रेशन दुकानात दूध आणि दुधाचे पदार्थ

महाळुंगे पडवळ - आरे ब्रॅंडचे दूध व दुग्धजन्य पदार्थ राज्यातील सर्व अधिकृत रेशन दुकानांतून विक्री करण्यास राज्य सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने नुकतीच परवानगी दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडे आता दूध उपलब्ध होणार आहे.        

दापोडीकर पाणी टंचाईने त्रस्त

जुनी सांगवी (पुणे) : दापोडीत कमी दाबाने होणारा अपुरा पाणी पुरवठा, पाणी सोडण्याच्या अनियमित वेळा यामुळे गेली काही महिन्यांपासुन दापोडीत अपुऱ्या व विस्कळीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रासले आहेत.

हल्लाबोलचे होर्डिंग उतरविल्याने वादावादी

नवी सांगवी (पुणे) : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे होर्डींग काढणाच्या प्रयत्न नगरसेवक नाना काटे व त्यांच्या समर्थकांनी आज हाणून पाडला.

आगामी विधानसभेसाठी मनसैनिकांची मोर्चेबांधणी

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची मोर्चेबांधणी करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी संघटन मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षबांधणी अधिक मजबूत करण्यासाठी मनसेत सुमारे शंभर कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला आहे.

‘शास्ती’विरोधात शिवसेना मैदानात

खासदार श्रीरंग बारणे : आता महापालिकेवर महामोर्चा
पिंपरी – अनधिकृत बांधकाम नियमितीकरण आणि शास्ती कराविरोधात सर्वसामान्य नागरिकांना सत्ताधारी भाजपने फसवले आहे. अनेकदा मोर्चा, आंदोलन, निवेदन करुन सरकारचे डोळे उघडले नाहीत. शास्ती कर पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करावा, अशी मागणी करीत शहर शिवसेना महापालिकेवर महामोर्चा काढणार आहे, असा इशारा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिला आहे.