Thursday 7 March 2019

‘प्राधिकरण खरचं धंदेवाईक नसेल, तर याच जागेची सोडत काढा’ – त्रस्त भूखंडधारक

पिंपरी (दि. ७ मार्च) :-  मोशी प्राधिकरण, संतनगर सेक्टर नं. ६ येथील जलवायू विहार शेजारील प्लॉट नंबर ३० ते ७५ या बंगलो प्लॉटचे पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने एकत्रीकरण करण्यात येणार आहे. त्याठिकाणी प्राधिकरणामार्फत “घरकुल” सारखी स्कीम होणार आहे. हे भविष्यकाळात परीसराच्या वैभवावर दुष्परीणाम करणारे ठरु शकते. सेक्टर ५, ८, ११, १२, १४, चिखली, मोशी गायरान येथे शेकडो एकर जागा शिल्लक असतानासुध्दा सेक्टर ४, ६, ९ या उच्चभ्रू लोकजीवनावर दुरगामी वाईट परीणाम करणारा हा गृहप्रकल्प येथे नकोच, इतरत्र करा, अशी ठाम भुमिका मोशी प्रधिकरण संतनगर सेक्टर ४, ६, ९ मधील तमाम मुळ रहिवाशी नागरीकांची आहे. 

Pimpri: ‘डोळ्यात तेल घालून काम करणार’- नवनिर्वाचित स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. बजेटमधील अखर्चित रक्कम जास्त राहू नये यासाठी प्रयत्नशिल राहील. चुकीच्या कामांना मंजुरी दिली जाणार नाही अशी ग्वाही देत डोळ्यात तेल घालून काम करणार असल्याचे स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती विलास मडिगेरी यांनी सांगितले. 

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात धावणार माजी सैनिकांच्या बस

पुणे – पीएमपीच्या ताफ्यात माजी सैनिक तसेच वीर पत्नींच्या बचतगटांच्या 40 बस धावणार आहेत. या बसेस भाडेकराराने घेण्यास पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Citizen facilitation centre proposal in PCMC

Multi-*service* integrated citizen facilitation centres have been proposed with property tax, water and *service* charges, and fees from citizens on publi.

In Hinjewadi, residents use DIY tactics to fight off fires

Residents' groups and tree plantation owners in Hinjewadi are preparing DIY fire beaters to ensure the quick dousing of any fire that may break out in.

Private agencies to advise on Mula bridge

The private contractors engaged by the Pimpri Chinchwad Municipal Corporation would give suggestions and clarifications on the design and construction.

Pune-Mumbai highway near Bopodi to be widened

PIMPRI CHINCHWAD: People travelling via Pune-Mumbai highway  .. 

स्थायी सभापती निवडणुक : भाजपचे विलास मडेगिरी विजयी, शिवसेनेनं ‘युती धर्म’ पाळला

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले शीतल शिंदे यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. सत्ताधारी भाजपकडून विलास मडेगिरी यांनाच मतदान करण्याचा व्हिप देखील सदस्यांना बजावण्यात आला होता. आज झालेल्या निवडणुकीत भाजपाचे विलास मडेगिरी विजयी झालेत. त्यांना शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनी युतीचा धर्म पाळत मडेगिरींना मतदान केले. मडेगिरी यांना १६ पैकी १२ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या मयुर कलाटे यांना ४ मतांवर समाधान मानावे लागले.

महापालिका आणि प्राधिकरणाच्या जागेवरील अनधिकृत घरे अधिकृत होणार; आमदार जगतापांच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर उभारण्यात आलेली अनधिकृत घरे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अधिकृत करावीत, अशी मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यांनी दिलेल्या निवेदनानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याच्या शहरी भागात सरकारी जमिनीवर (वन जमीन वगळून) असलेली सर्व अनधिकृत घरे अधिकृत करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 

स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड 52 व्या स्थानी

स्वच्छ भारत सर्वेक्षणात पिंपरी-चिंचवड शहराचे स्थान 52 व्या क्रमांकावर आले आहे.  शहर पुन्हा पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
केंद्र शासनाच्या पथकामार्फत जानेवारी महिन्यात शहरात सर्वेक्षण करण्यात आले होते. या अभियानासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने जय्यत तयारी केली होती. यंदा प्रथमच खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या माध्यमातून जनजागृती, मोबाईल अ‍ॅप डाउनलोड, घरोघरी जाऊन माहिती देणे आदी उपक्रम हाती घेण्यात आले होते. तसेच, शहरातील सर्व चौका-चौकात फ्लेक्स लावण्यात आले होते. संपूर्ण शहर चकाचका करण्यात आले होते.

विनापरवाना फ्लेक्स, फलकांवरील फौजदारी गुन्हे दाखल करण्यात पालिका उदासीन; सामाजिक कार्यकर्ते सरदार रवींद्र सिंह यांचा आरोप

पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना फ्लेक्स, फलक, किऑक्स, कमानी आदींवर कारवाई करून ते जप्त करण्याचे कामाची वर्क ऑर्डर सामाजिक कार्यकर्ते सरदार रवींद्र सिंह  यांना दिले आहे. मात्र, कारवाईनंतर संबंधित दोषी व्यक्ती किंवा एजन्सीवर फौजदारी कारवाई करून दंड वसुलीचा उल्लेख करारनाम्यामध्ये नाही. त्यामुळे शहरात विनापरवाना फ्लेक्स व फलक लावण्यास अटकाव राहणार नाही. परिणामी, पालिकेची ही कारवाई निव्वळ दिखाऊ ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोफत कारवाई काम करण्यास रवींद्र सिंह यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.

अरे बापरे…चक्क माजी विरोधी पक्षनेत्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोट्यावधीचा लावला चुना

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या अक्षम्य दुर्लक्षामूळे 16 विभागीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी महापालिकेला कोट्यावधी रुपयाचा चुना लावत आहे. शहरातील हजारो मिळकतींचा नोंदणी न करता अधिकारी व कर्मचा-यांना घरबसल्या लाखो रुपयांचा आर्थिक मलिदा मिळू लागला आहे. त्यामुळे करसंकलन विभागाचे अधिकारी व कर्मचारी हजारो अनधिकृत आणि जून्या मालमत्तेच्या नोंदणी करण्यास जाणिवपुर्वक टाळाटाळ करीत आहेत. याबाबत चिंचवडच्या सर्व्हे नं. 129 मधील एका माजी विरोधी पक्षनेत्यांच्या चार मजली आरसीसी इमारत असलेल्या 48 खोल्यांची गेल्या दहा वर्षापासून महापालिकेकडे नोंद नसल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे

अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन काँग्रेसने केला अनोखा निषेध

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणा-या नदीपात्राला जलपर्णीने विळखा घातला आहे. त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने महापालिकेच्या अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला. महापालिकेच्या ‘ब’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत आणि आरोग्य अधिका-याला जलपर्णीचा पुष्पगुच्छ देऊन निवेदन देण्यात आले.

प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेणा-या महिलांचा ‘इनरव्हील क्लब’कडून सन्मान

एमपीसी न्यूज – प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्वाची उत्तुंग भरारी घेणा-या विरांगणांचा इनरव्हील क्लबकडून सन्मान करण्यात येणार आहे. अनघा मोदक आणि दीक्षा दिंडे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा सन्मान सोहळा जागतिक महिला दिनानिमित्त करण्यात येणार आहे. 

महापालिकेचा सावित्रीबाई फुले पुरस्कार अदिती निकम यांना जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने देण्यात येणारा सावित्रीबाई फुले पुरस्कार नवी सांगवीतील सामाजिक कार्यकर्त्या अदिती निकम यांना जाहीर झाला आहे. पाच हजार रुपये रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ पुरस्काराचे स्वरुप असणार आहे. या पुरस्काराचे वितरण जागतिक महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी होणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

पुणे विभागात एक कोटी 94 लाख मतदार

पुणे -  पुणे विभागातील दहा लोकसभा मतदारसंघांत 1 कोटी 93 लाख 96 हजार 755 मतदार आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी नियोजन केले असून, प्रशासन सज्ज असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली. 

‘तेजस्विनी’तून महिन्यातून एकदा मोफत प्रवास

पुणे - महिला दिनाचे औचित्य साधून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांना पीएमपीच्या ‘तेजस्विनी’ बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी केली. पहिल्या टप्प्यात महिलांना ही सुविधा दर महिन्याच्या आठ तारखेला वर्षभर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिंपरी-चिंचवड : पालिकेच्या पत्रिकेत प्रोटोकॉलची “ऐशी तैशी’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकासकामांच्या निमंत्रण पत्रिकेत प्रोटोकॉल डावलून लोकप्रतिनिधींच्या नावांचा क्रम सोयीस्कररित्या बदलण्यात येतो. दिघी येथील विकासकामांच्या निमंत्रण पत्रिकेतही अशीच चूक करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन नेमके कोणाच्या सांगण्यावरून लोकप्रतिनिधींच्या नावाचा क्रम बदलून आपल्या सोयीची भूमिका घेत आहे, असा प्रश्‍न आता विचारला जात अहे.

पिंपरी : पहिल्याच दिवशी ‘आरटीई’ हॅंग

पिंपरी – शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या मोफत प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात मंगळवारपासून झाली. मात्र, अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळावर अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थी व पालकांना मनस्ताप सहन करावा लागला.

पिंपरी : कंत्राटी सफाई कामगारांना द्यावे लागणार 37 कोटी

पिंपरी -मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पिंपरी-चिंचवड महापालिकेने 469 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची फरकाची 16 कोटी 9 लाख 79 हजार रुपये रक्कम कंत्राटदारांमार्फत 14 वर्षाच्या 9 टक्के सरळव्याजाने महिन्याभरात देण्यात यावी, असा महत्वपूर्ण आदेश कामगार आयुक्‍तालयातील अप्पर कामगार आयुक्‍त शैलेंद्र पोळ यांनी 28 फेब्रुवारी 2019 रोजी दिला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 127 शिक्षकांची होणार भरती

पिंपरी – मागच्या कित्येक दिवसापासून पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांची डोकेदुखी होऊन बसलेल्या शिक्षकांच्या रिक्‍त जागांचा प्रश्‍न आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्य शासनाने जाहीर केलेल्या शिक्षकांच्या मेगा भरती प्रक्रियेमध्ये महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील 127 शिक्षकांच्या रिक्‍त जागाही भरण्यात येणार आहेत. त्यामुळे, कित्येक वर्षापासून शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या बेरोजगार उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षक भरती होणार असल्याने शाळांचा रिक्त पदांचा प्रश्‍न देखील सुटणार आहे.