Sunday 24 December 2017

महापालिकेने खर्च केल्यास मंजुरी, निगडी मेट्रोबाबत केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री पुरी यांची सूचना

महापालिकेने खर्च केल्यास मंजुरी, निगडी मेट्रोबाबत केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री पुरी यांची सूचना! माननीय खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी सदर विषय केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभार!
मेट्रोचा निर्णय आता पालिकेच्या कोर्टात असल्याचे समजते असे असेल तर सर्व पक्षीय नेत्यांना आव्हाहन, येत्या सर्वसाधारण सभेत प्राधान्याने हा विषय मंजूर करावा 

दापोडी-निगडी समस्यांच्या गर्तेत

पिंपरी : निगडीच्या चौकात सुरू असणारी विकासकामे, सर्व्हिस रोडवर असणारी अतिक्रमणे, मेट्रोचे काम अशा समस्यांच्या गर्तेत पुणे-मुंबई महामार्ग दापोडी ते निगडीदरम्यान अडकला आहे. या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात प्रयत्न अपुरे पडत असल्याचे चित्र आहे. 

PCMC plans to build user-friendly streets

PIMPRI CHINCHWAD: Giving priority to people's safety and comfort, Pimpri Chinchwad Municipal Corporation has proposed to design streets based on the National Urban Transport Policy, which envisions better facilities like walking and cycling tracks.

Civic officials told TOI that the civic body aims to usher in the design change through the Pimpri Chinchwad Complete Streets Mission (PCCSM) that will aim at creating equitable, livable and non-motorized transport streets.

Appeal to use Swachh app more

PIMPRI CHINCHWAD: With an upcoming national cleanliness survey, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has urged citizens to use the Swachhta app for addressing cleanliness issues and submitting feedback to it.

The survey will start in January under the Swacch Bharat Abhiyan. It will focus on garbage management (collection, transportation, processing and disposal), action against open defecation, education and information, behavioural change, capacity building, public awareness and innovative projects. Standing committee chairperson Seema Savale said Pimpri Chinchwad should be among the top cities in the survey.

कुणाल आयकॉन रोडवरील हॉकर्सचे स्थलांतर करा!

पिंपरी – पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोडवरील “हॉकर्स’मुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्व फेरीवाल्यांचे आण्णा भाऊ साठे भाजी मंडई येथे स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आली.

‘स्कूल ऑफ प्लॅनिंग’ पुण्यातच होणार

पुणे – केंद्र सरकारकडून प्रस्तावित असलेल्या ‘स्कूल ऑफ प्लॅनिंग अॅन्ड आर्किटेक्‍चर’ ही संस्था पुण्यातच होणार असल्याचे निश्‍चित होत आहे. याबाबत स्वत: मुख्यमंत्र्यांनीच काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे ही संस्था औरंगाबादला जाणार असल्याच्या वृत्तावर पडदा पडला.

उंदीर पकडला, बोका मोकाट!

पिंपरी – महापालिकेच्या लेखा विभागातील कारकून चार हजाराची लाच घेताना शुक्रवारी रंगेहाथ पकडला, मात्र, हा कारकून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी “कलेक्‍शन’चे काम करीत होता. मुख्य सुत्रधार असलेला संबंधित अधिकारी अद्याप मोकाट आहे, त्यामुळे उंदीर पक

पालिकेचा लिपिक “एसीबी’च्या जाळ्यात

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या लेखा विभागाच्या कनिष्ठ लिपिकाला चार हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पोलिसांनी शुक्रवारी (दि.22) दुपारी एकच्या सुमारास रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई पालिकेतील लेखा विभागात करण्यात आली.

चिंचवड वाहतूक विभाग संशयाच्या भोव-यात?

पिंपरी – चिंचवड येथील लोकमान्य हॉस्पिटल शेजारी दोन दिवसांपूर्वी ट्रक दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात जखमी झालेला ट्रक चालक रेवन्ना कोपणर यांचा शुक्रवारी (ता. 22) उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातास चिंचवड वाहतूक विभागातील पोलीस जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या वाहतूक पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

आता फेसबुकच्या माध्यमातून गॅस सिलेंडरचे बुकिंग

चौफेर न्यूज: केवळ सोशल मीडियाला आणि मोबाईलला सध्याची तरूण मंडळी चिकटून बसले असल्याचा आरोप सर्रास केला जातो. सोशल मीडियावर अनेकजण टीका करतात. पण स्मार्टली सोशल मीडियाचा वापर केल्यास अनेक गोष्टींची उत्तर आणि महत्त्वाची कामेदेखील अगदी चुटकीसरशी पूर्ण होऊ शकतात.