Wednesday 28 March 2018

पुणे हवा बदलतीये...!

हवाबदलासाठी प्रसिद्ध असलेल्या आपल्या शहरात फक्त सहा महिने चांगली हवा वाहत आहे. विशेषतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हवेत विष भिनत जात आहे... 
‘छान हवा’ ही पुण्याची ओळख 
आता पुसली जात आहे...!


Branches take over Kasarwadi footpath

Pile of trimmed wood taking up pavement, creating risks for both pedestrians and commuters; citizens demand PCMC action

PCMC general body finally approves annual budget

PIMPRI CHINCHWAD: The general body (GB) of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday approved the annual budget for 2018-19 with an outlay of Rs5,767 crore — around Rs505 crore more than the disbursement sum highlighted in the draft budget.

तहकुबीचे “ग्रहण’ सुटले: अर्थसंकल्पाची चिरफाड

पिंपरी- तहकुबीचे ग्रहण लागलेला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी 2018-19 आर्थिक वर्षाचा 5 हजार 262 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प अखेर मंगळवारी (दि.27) मंजूर करण्यात झाला. सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी केलेल्या तब्बल 1 हजार 112 उपसूचनांपैकी ग्राह्य ठरलेल्या 981 उपसूचनांसह हा अर्थसंकल्प मंजूर झाला. मात्र, उपसूचनांमुळे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाची पुरती चिरफाड करण्यात आली. तसेच, विकासकामांच्या नियोजनावर पाणी फेरले गेल्याने महापालिका प्रशासन तोंडघशी पडले आहे.

थकबाकीदारांवर कारवाई

सव्वा लाख मिळकतदारांना नोटिसा; ७७ मिळकतींना ठोकले टाळे

पाच हजार रुपयांपेक्षा अधिक मिळकतकराची थकबाकी असणाऱ्या मिळकतधारकांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत सुमारे सव्वा लाख मिळकतधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून थकबाकी असलेल्या ७७ मिळकतींना टाळे ठोकले गेले आहे.

दापोडी नदी पात्रालगत भराव टाकून अनधिकृत घरे उभारली

दापोडीजवळ नदीपात्रालगत भराव टाकून अनधिकृत घरे उभारली जात आहेत. प्रथम नदीपात्रालगत राडारोडा टाकायचा. त्यानंतर त्याचे सपाटीकरण करून त्याठिकाणी पत्र्यांची घरे ठोकायची आणि काही महिन्यानंतर पक्की घरे बांधायची. असा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. काही ठिकाणी नाल्याकडेनेही घरे उभारली जात आहेत. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. (अरुण गायकवाड - सकाळ छायाचित्रसेवा)

प्राधिकरणाचे विलीनीकरण अशक्य

पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण तूर्तास अशक्‍य असल्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ‘पीसीएनटीडीए’चे काम मर्यादित राहिल्याने गेल्या काही वर्षांपासून त्याच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू आहे. मात्र, तसे शक्‍य नसल्याचे गित्ते यांनी आवर्जून सांगितले.

जलपर्णी काढण्यासाठी आधुनिक मशिन

पिंपरी - नदीपात्रात फोफावलेली जलपर्णी काढण्याचे काम महापालिका प्रशासनासाठी दरवर्षी एक मोठे आव्हान असते. आता मात्र, ते संपुष्टात येणार आहे. जलपर्णी काढून जागेवरच विल्हेवाट लावणारे संपूर्ण देशी बनावटीचे मशिन पिंपरी-चिंचवडमधील उद्योजक प्रदीप तुपे यांनी तयार केले आहे. 

खोदलेले रस्ते बुजविण्यास ठेकेदारांची ना ना !

पिंपरी-चिंचवड शहरात रस्त्यांवर पावसाळ्यात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी तब्बल ८ कोटी ३२ लाख ४१ हजार ७७२ रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, संबंधित निविदा प्रक्रिया ‘ई’ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने खासगी कंपन्या व पालिकेने भूमिगत वाहिन्यांसाठी खोदलेले रस्ते बुजविण्यासाठी काढण्यात आल्याचा उल्लेख स्थायी समितीच्या विषयपत्रिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे शहरात खोदून ठेवलेले रस्ते व पदपथ दुरुस्तीचे काम संबंधित ठेकेदार करणार नाही. स्थापत्य विभागाकडून धूळफेक करणारा हा विषय मंजुरीसाठी ‘स्थायी’च्या बुधवारच्या (दि.२८) सभेपुढे ठेवण्यात आला आहे. 

“जेट पॅचर’मधून आता “थेट लूट’?

पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातील खड्‌डे नवीन नाहीत. संबंधित खड्डे बजुवण्यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, तरीही महापालिका प्रशासन केवळ पावसाळ्यात निर्माण होणारे खड्डे बजुवण्यासाठी नवीन व्यवस्था करण्याच्या मन:स्थितीत आहे. त्यासाठी सुमारे 8 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रशासन “जेट पॅचर’मधून सर्वसामान्य नागरिकांच्या कररुपी पैशाची “थेट लूट’ करणार का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

शहरबात पिंपरी : उद्योनगरीतील वाहतुकीचा बोजवारा

भले मोठे रस्ते आणि मर्यादित वाहतूक असतानाही पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. शहरातील वाहतुकीचा विचका झाला असून त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. वाहनस्वारांची बेशिस्त, वाहतूक पोलीस व महापालिका प्रशासनाची निष्क्रियता व हप्तेगिरी, राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव, यामुळे अतिक्रमणांकडे डोळेझाक केली जाते. त्यामुळे नुसताच बोलघेवडेपणा करून उपयोगाचे नाही, तर ठोस कृतिशील कार्यक्रम राबविला पाहिजे.

शहरात हॉटेलचालकांकडून खाद्यपदार्थासाठी फॉईल पिशव्या

राज्यातील प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका हॉटेल व्यावसायिकांना बसला आहे. खाद्यपदार्थ पार्सल घरी नेणाऱ्या ग्राहकांना या निर्णयाचा त्रास होत असून त्यावर तोडगा म्हणून आतून लॅमिनेटेड असलेल्या फॉईल पिशव्या आणि कंटेनरचा वापर करून अन्नपदार्थ पार्सल देण्यास सुरुवात झाली आहे.

कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर!

मागणी वाढल्याने कागदी पिशव्यांचा तुटवडा

प्लास्टिकबंदीचे आदेश सरकारकडून देण्यात आल्यानंतर बाजारातील भाजी तसेच फळ विक्रेते, किराणामाल विक्रेत्यांसह अनेक व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानातून प्लास्टिक पिशव्या हद्दपार केल्या आहेत. कारवाईच्या धसक्यामुळे कागदी पिशव्यांचा वापर सुरूकरण्यात आला असला तरी कागदी पिशव्या जादा वजनाचा माल ठेवण्यास तकलादू ठरत असल्याची ओरड विक्रेते करत आहेत.

PWD to use plastic waste to build ‘superior quality’ roads

PUNE: The state public works department (PWD) will use the waste generated at various recycling points after the plastic ban in building asphalt roads.

कुत्री उठली जिवावर !

शहरात मोकाट जनावरांबरोबरच भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सध्या शहरामध्ये अनेक वेळा भटक्या कुत्र्याने चावा घेण्याबरोबरच नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत आहेत. अलीकडे भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांना आपले लक्ष्य केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत असून, त्यांच्या संख्येचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये एप्रिल 2017  ते फेब्रुवारी 2018  या वर्षात 2678 व्यक्तींना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना घडलेल्या आहे, तर सध्या चालू वर्षात 518 जणांना कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनांची नोंद आहे, तर खासगी रुग्णालयांत आणखी रुग्ण असण्याची शक्यता आहे. 

पीएमपी’च्या रोजच्या उत्पन्नात 10 लाखांचा तोटा

‘पीएमपी’साठी अत्यंत कडक शिस्तीचे लाभलेले अध्यक्ष  तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर  पीएमपीची स्थिती अत्यंत भयावह झालेली दिसून येत आहे. मुंढे यांनी  ब्रेकडाउनचे प्रमाण कमी केले होते. तर  प्रवासी संख्यासुद्धा वाढली होती. आता मात्र  एका महिन्यातच विविध  मार्गांवरील बसची संख्या घटली आहेच,  शिवाय  प्रवाशांची संख्यासुद्धा कमी झाली आहे. परिणामी पीएमपीच्या उत्पन्नात रोज सुमारे दहा लाख रुपयांचा तोटा होऊ लागला आहे. तसेच रोजच्या प्रवाशांची संख्या सुमारे 80 हजाराने घटली आहे. दरम्यान  मनमानी करण्यास कर्मचार्‍यांना मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.

अलायन्स क्‍लबतर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर

दिघी – अलायन्स क्‍लब ऑफ पिंपरी चिंचवड, अलायन्स क्‍लब ऑफ पुणे व संकल्प सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्‍त विद्यमाने आदर्शनगर दिघी येथे मोफत नेत्र चिकित्सा, रक्‍तदाब, मधुमेह व त्वचारोग तपासणी शिबीर संपन्न झाले. या शिबिरामध्ये एच.व्ही.देसाई नेत्र रुग्णालय येथील नेत्रतज्ञांद्वारे पाचशे नेत्ररुग्णांची तपासणी करण्यात आली.

महावीर जयंतीनिमित्त कत्तलखाने बंद ठेवण्याचे आवाहन; आमदार महेश लांडगे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी (Pclive7.com):- भगवान महावीर जयंती निमित्त शहरातील सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यात यावेत. महावीर जयंती अंहिसेच्या मार्गाने साजरी व्‍हावी. सर्व मुक जनावरांची होणारी कत्तल थांबविण्याकरीता शहरातील मटण, चिकन व मांस विक्रेते यांनी आपली दुकाने बंद ठेवावीत, असे आवाहन भाजपचे सहयोगी सदस्य आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. 

दोन वर्षानंतर “आयटी हब’ची गाडी रुळावर

हिंजवडी – सदस्यांची अपात्रतेच्या ग्रहणातून मुक्‍तता झाल्यानंतर हिंजवडी ग्रामपंचायतच्या कारभारास पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. तब्बल दोन वर्षे प्रशासकांच्या अंमलाखाली असलेल्या हिंजवडी ग्रामपंचायतच्या सदस्यांनी जोरदार पुनरागमन करत पहिल्याच मासिक सभेत सात कोटी रक्‍कमेच्या विविध विकास कामांना मंजुरी दिली आहे. कित्येक नाट्यमय वळणानंतर आता कुठे हिंजवडी ग्रामपंचायतीची गाडी रुळावर आली आहे.