Monday 9 July 2018

Lok Sabha Speaker Sumitra Mahajan releases postal ticket in honour of Krantiveer Chapekar

“Now during the rule of Narendra Modi, a postal ticket has been released in honour of Krantiveer Chapekar. This is the true gratitude expressed by the government towards the freedom fighter,” Sumitra Mahajan.

Ensure no ‘bad in law’ resolutions are implemented, PCMC chief tells officials

The Pimpri-Chinchwad Municipal Commissioner, Shravan Hardikar, has issued a directive asking officials to ensure that no resolution that is “bad in law” is implemented by them. Civic departments and officials have been asked to verify the legality of resolutions passed in various meetings before taking any decision to implement those. Officials said the commissioner has warned them of strict action if any such resolution was found to have been implemented.

 Pimpri-Chinchwad, PCMC, PCMC pune, shravan hardikar, pune news, indian express, latest news

क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या टपाल तिकिटाचे अनावरण

पिंपरी (Pclive7.com):- क्रांतिवीर दामोदर चापेकर यांच्या नावाने टपाल तिकीट सुरु होणे ही केवळ उत्सवाची बाब नाही. तर टपाल तिकिटाच्या माध्यमातून त्यांना वाहिलेली खरी आदरांजली आहे. त्यांचा इतिहास यानिमित्ताने संपूर्ण देशभरात वारंवार पोहोचणार आहे. असे मत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी  व्यक्त केले. 

उंचसखल ब्लॉक, खड्डेच खड्डे चोहीकडे

पिंपरी - उंचसखल सिमेंटचे ब्लॉक, रस्त्यावरील खड्डे, वाहनांची वाढती संख्या आणि बेशिस्त वाहनचालक यामुळे चिंचवड येथील चापेकर चौकातून नागरिकांना प्रवास करणे नागरिकांना दिवसेंदिवस जिकिरीचे होत आहे. 

कोट्यावधी खर्चूनही खड्ड्याने घेतला बळी

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात ऐन पावसाळ्यात जागो-जागी खड्डे पडले आहेत. हे खड्डे पडू नयेत किंवा ते बुजावेत यासाठी कोट्यावधी रुपयांचे बजेट राखीव ठेवले आहे. तरीही शुक्रवारी (दि. 6) सकाळी महिलेचा खड्डा चुकवताना बसच्या खाली येवून दुर्देवी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील रस्ते बांधणी व दुरुस्तीवरील शेकडो कोटी रुपयांच्या खर्चाबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.

अकरावीसाठी महाविद्यालयांकडून जादा शुल्क आकारणी

अकरावी- बारावीसाठी सरकारने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा दहापट अधिक शुल्काची आकारणी महाविद्यालयाकंडून करण्यात येत आहे. महाविद्यालयाकंडून आकारण्यात येणार्‍या शुल्कावर कोणत्याच प्रकारचे बंधन राहिलेले नाही. शहरातील प्रत्येक महाविद्यालयाचे शुल्क वेगळे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची लूट थांबविण्यासाठी आणि शुल्कामध्ये एकसमानता आणण्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ शुल्क निश्चित करावे, अशी मागणी शिक्षण सुधारणा मोहीम (सिस्कॉम)च्या  संचालिका वैशाली बाफना यांनी सरकारकडे केली आहे.

पिंपरीत चाटे कोचिंग क्लासेस विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी परिसारातील विद्यूत पुलांवर अनधिकृतपणे जाहिरात फलक लावल्या प्रकरणी चाटे कोचिंग क्लासेस विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी विजय पांडुरंग बाटे (वय ५३, रा. धनकवाडी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिला आहे.

'सायबर योद्धा' बनून काम करा - भाजप अध्यक्ष अमित शहा

पुणे - सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा संदेश, विचार आणि प्रसार माध्यमांतील पक्षविरोधी खोट्या बातम्यांमागील तथ्य तळागाळात पोचविण्यासाठी संकल्प, संघटन आणि नियोजनबद्ध संवादासह "सायबर योद्धा' बनून काम करा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज येथे केले.

भाजप अध्यक्ष अमित शहा

सचिन साठे यांचा कॉंग्रेस शहराध्यक्षपदाचा राजीनामा

पिंपरी-चिंचवड शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन साठे यांनी आज तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कॉंग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्याकडे साठे यांनी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे पिंपरी चिंचवड भाजपच्या वतीने स्वागत

लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे पिंपरी चिंचवड भारतीय जनता पक्षाच्या वतीने महापौर नितीन काळजे आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

“त्या’ तीन संस्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई

पिंपरी – महापालिकेला साहित्य पुरवठा करणाऱ्या तीन वेगवेगळ्या पुरवठादार संस्थांच्या दरपत्रकावर एकच मोबाईल क्रमांक दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुरवठादारांची ही रिंग उघडकीस आल्याने तीनही पुरवठादार संस्थांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. या तीन संस्थांकडून कोणत्याही खरेदीसाठी दरपत्रके मागवू नयेत. तसेच त्यांची दरपत्रके ग्राह्य धरू नयेत, असे आदेश सर्व विभागांना दिले आहेत.

थेरगावात मोकाट कुत्रे, डुक्करांमुळे त्रास; नगरसेविका माया बारणेंची आयुक्तांकडे तक्रार

थेरगाव परिसरात मोकाट कुत्रे, डुक्करांचा नागरिकांना त्रास होत असून महापालिका पशुवैद्यकीय विभाग निष्क्रिय झाला आहे. या संदर्भात शहरातील भाजप नगरसेविका माया बारणे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे केली आहे.