Wednesday 20 June 2018

पिंपरी-चिंचवड `स्थायी'चे घुमजाव; बांधकाम परवाना बंदीचा निर्णय फिरविला

पिंपरीः प्रखर विरोधामुळे बांधकाम परवाना बंदीच्या निर्णयावरून पिंपरी पालिकेला आज घुमजाव करावे लागले. विरोधकांच्या एकजुटीमुळे या गेल्या आठवड्यातच घेतलेला हा निर्णय फिरवावा लागला. त्यामुळे सत्ताधारी भाजप व शहराचे कारभाऱ्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागले आहे. त्यांना काहीशा नामुष्कीलाही सामोरे जावे लागले आहे.

पिंपरी पालिकेची उद्याची सभा वादळी ?

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची या महिन्याची उद्या (ता.20) होणारी मासिक सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्‍यता आहे. हे वादळ सभागृहात नव्हे, तर सभागृहाबाहेर येणार आहे. सभेच्या अजेंड्यावरून नव्हे, तर भलत्याच विषयावरून हा गोंधळ होण्याचे संकेत मिळाले आहेत.

Infrastructure work at Bhakti Shakti Chowk on track

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has completed 37% of the construction work on the grade separator and rotary flyover at the busy Bhakti Shakti Chowk in Nigdi. Once complete, the project will help reduce traffic congestion and improve north-south connectivity in the city.

PCMC builds homeless shelters at Pimpri vegetable market

Pimpri Chinchwad: Day and night shelters for the homeless were constructed at the Pimpri vegetable market, following a suggestion from the Supreme court to appoint committees for the urban homeless in all municipal cities in January. 

देशाला पाणी पुन:प्रक्रिये शिवाय पर्याय नाही -आयुक्‍त

चिंचवड – देशात दूषित पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी अनेक प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कृत्रिम अथवा रोबोटिक यंत्रणेचा वापर करण्यार भर दिला जात आहे. या क्षेत्रात सुध्दा अशा तंत्रज्ञानाचा योग्य त्यावेळी वापर केला जावा. भविष्यातील पाणी टंचाईमुळे एसटीपी’द्वारे शुध्दीकरण प्रक्रिया केलेले पाणी पिण्याची देखील वेळ आपल्यावर येऊ शकते. पाण्याचा पुन:वापर करण्या शिवाय देशाला पर्याय नाही, असेही आयुक्त हर्डीकर यावेळी म्हणाले.

Pimpri-Chinchwad civic body waiting for rains to clear hyacinth, says activist

The Pimpri Chinchwad municipal corporation (PCMC) has failed to control the growth of water hyacinth in the Pavana, Mula and Indrayani rivers and are now waiting for the rains to ‘wash out’ the hyacinth, alleges social activist Raju Salve.

On Friday, Sanjog Waghere Patil, Nationalist Congress Party city president, gifted a water hyacinth bouquet to Shravan Hardikar, PCMC municipal commissioner as a protest against the inability of the civic body to deal with the water hyacinth problem.

चुकीच्या पध्दतीने खोदाई केल्यामुळे झाड पडले

केबल टाकण्याच्या कामासाठी चुकीच्या पध्दतीने खोदाई केल्यामुळे मोठे झाड मुळे उखडून पडल्याचा प्रकार पिंपरीतील मोरवाडीमध्ये घडला. या  प्रकाराबाबत खोदाई करणा-या संबधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पीएमपीएमएलला सात कोटी अदा करण्यास स्थायीचा हिरवा कंदिल

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून पीएमपीएमएलला संचलन तूटीपोटी ६ कोटी व सवलतीचे पासेस साठी १ कोटी ५० लाख रुपयांसह सुमारे ७ कोटी ५० लाख रुपये अदा करण्यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली. तसेच, शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे ३ कोटी २९ लाख २७ हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

Pawar asks leaders to oppose wrongdoings

Pimpri Chinchwad: Sharad Pawar, the president of the NCP, directed the party’s Pimpri Chinchwad unit not to obstruct development works in the city but oppose any wrongdoing by the BJP.

कॅरिबॅग दिसताक्षणी दंड

पिंपरी - पर्यावरणरक्षणासाठी प्लॅस्टिक कॅरिबॅग व थर्माकोल वापरावर राज्य सरकारने २३ मार्चपासून बंदी घातली आहे. येत्या शनिवारी (ता. २३) हा निर्णय लागू होण्यास तीन महिने पूर्ण होणार आहे. या कालावधीत केलेल्या कारवाईचा व राबविलेल्या धोरणाचा त्रैमासिक अहवाल राज्य सरकारला महापालिकेतर्फे पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर म्हणजे रविवारपासून (ता. २४) प्लॅस्टिक व थर्माकोल वापरणाऱ्यांवर तीव्र कारवाई केली जाणार आहे.

प्राथमिक शाळा आरक्षणावर अतिक्रमण

पिंपरी - पालिकेच्या विविध आरक्षणांवर अतिक्रमणाचा धंदा सध्या तेजीत आहे. दिघी येथील सर्व्हे क्रमांक ७८/२ मधील प्राथमिक शाळेसाठी आरक्षित जागेवर गेल्या महिनाभरात दुकाने आणि घरांचे अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन ठोस कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वसंत नाथा रेंगडे यांनी केली आहे.

आरटीईअंतर्गत प्रवेश नाकारल्याची तक्रार

पिंपरी - बिजलीनगर येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये २५ टक्‍क्‍यांतर्गत प्रवेशित बालकांना प्रवेश नाकारल्याची पालकांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.

Housing projects: Pimpri Chinchwad BJP chief refutes charges

PUNE: Laxman Jagtap, president of Pimpri Chinchwad unit of BJP refuted the allegations that the standing committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation(PCMC) had taken a decision to direct the building permission department to stop temporarily giving permissions for new housing projects in fast developing areas of his constituency for garnering funds for BJP for 2019 elections. Jagtap refuted these allegations while addressing a hurriedly called press conference in PCMC main office building in Pimpri.

राष्ट्रवादीला दुसरा उद्योग राहिला नाही; हॅरिष पुलाच्या उद्घाटनावरून एकनाथ पवार यांचा पलटवार

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका या दोन्हीच्या खर्चातून मुळा नदीवर हॅरीस ब्रीजला समांतर दोन पुल बांधण्यात येत आहेत. एक पूल पुर्ण झाला आहे, परंतु पुणे महापालिकेच्या हद्दीत बापोडीतील रस्ता अरुंद असल्याने हा पुल सुरू केलेला नाही. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा उद्योग नसल्याने ते नियोजनपूर्व उद्घाटने करत आहेत, असा पलटवार महापालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी राष्ट्रवादीवर केला आहे.

जागतिक पितृदिनानिमित्त वडिलांना दिली अनोखी भेट; वाकड येथे चॅलेंजर पब्लिक स्कूलचे उद्घाटन

पिंपरी (Pclive7.com):- जागतिक पितृदिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील उद्योजक  संदीप काटे, निलेश काटे आणि संतोष काटे यांनी आपले वडील विठ्ठल सीताराम काटे व आई हिराबाई काटे यांना अनोखी भेट दिली. कोणीही मोठी तसेच राजकीय व्यक्ती न बोलवता आपल्या आई-वडीलांच्याच हस्ते शाळेचे उद्घाटन केले.

चिंचवड-केशवनगर येथे वाहतूक कोंडी

पिंपरी - चिंचवड-केशवनगर येथे क्राँक्रीट रस्त्याच्या कामासाठी महापालिका शाळेपासून पुढे एकेरी मार्ग करण्यात आला आहे. मात्र, येथून सर्रास दुहेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे येथे सध्या वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. 
केशवनगर हा दाट लोकवस्तीचा भाग आहे. महापालिकेतर्फे येथून काळेवाडी पुलापर्यंत क्राँक्रिट रस्ता करण्याचे काम सध्या सुरू आहे. केशवनगर महापालिका शाळेपासून (अभिनव चौक) पुढे कुणाल इस्टेटपर्यंत रस्त्याचे काम चालू आहे. या रस्त्यावर काळेवाडी पुलाकडून चिंचवडला येणारी एकेरी वाहतूक सुरू आहे. केशवनगरकडून काळेवाडीला महापालिका मराठी शाळेपासून, काकडे टाऊनशिप, मोरया गोसावी क्रीडा संकुल, कुणाल इस्टेट अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. 

थेरगाव सोशल फाऊंडेशनची शहर विद्रपीकरण हटाव मोहिम

चौफेर न्यूज – थेरगाव सोशल फ़ाऊंडेशनने “थेरगाव सुधारण्यासाठी, २ तास आपल्या थेरगावसाठी” या उपक्रमा अंतर्गत दर रविवारी शहर विद्रुपीकरण हटाव मोहिम हाती घेतली आहे. त्याच अनुषंगाने रविवार दि. १७ जून रोजी डांगे चौक फ़्लाइओवर ब्रिज पिलरला लावण्यात आलेल्या जहिराती स्टिकर्स, पोस्टर्स, फ़्लेक्स तसेच पॉमप्लेट्स काढण्यात आले.

निगडीतील “ई-टॉयलेट’ हलविले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महिलांसाठी शहरातील पहिले “ई-टॉयलेट’ प्रायोगिक तत्वावर निगडी बस स्टॉप येथे उभारण्यात आले होते. हे “ई-टॉयलेट’ महिलांसाठी उपयुक्त ठरत होते. परंतु, अचानक पालिका प्रशासनाने हे “टॉयलेट’ तेथून हलविले आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे. यामुळे महिला वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे. हे “टॉयलेट’ पिंपळे सौदागर येथे स्थलांतरीत करण्यात येणार असल्याचे समजते.

भोसरीत ‘दादा’गिरीचा कळस; ‘भयमुक्त’ची घोषणा हवेतच – विलास लांडे

पिंपरी (Pclive7.com):- संतांची भूमी तसेच उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या भोसरी परिसराला आता गुन्हेगारीने मोठ्या प्रमाणात ग्रासेल आहे. ‘भयमुक्त’ भोसरीची घोषणा देऊन सत्तेत आलेली मंडळीच गुंडांचे पाठीराखे झालेत. गल्लो-गल्ली ‘दादा’गिरी वाढलीय, वाहनांच्या तोडफोडी घटना तर नित्याच्याच झाल्या आहेत. तसेच कामगारांना लुटणे, टपरीधारकांकडून हप्तेगिरीचा धंदा गावगुंडांकडून राजरोसपणे सुरू आहे. सध्या संपूर्ण भोसरी परिसरातील रहिवासी दहशतीत असून ‘कुठे गेलेत अच्छे दिन’ असा सवाल करित असल्याचे मत राष्ट्रवादीचे माजी आमदार लांडे यांनी व्यक्त केले आहे.

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिका प्रकल्प अहवालाचे काम सुरु; पहिल्या टप्प्यातच काम पूर्ण करण्यावर मनसे ठाम!

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गिकेकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. याबाबतचे पत्र महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन यांनी मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले यांना दिले आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यातच हे काम पूर्ण करावे अशी आमची मागणी कायम राहणार असल्याचे चिखले यांनी स्पष्ट केले आहे.

शिधापत्रिकाधारकांच्या तक्रारींना ‘आधार’

नवी यंत्रणा कार्यान्वित होऊनही क्रमांक जोडणीमध्ये गोंधळ

वाहतूककोंडीवर स्मार्ट सिग्नलचा उतारा

सिग्नल बिघाड झाल्यास अथवा वाहतूक कर्मचारी उपलब्ध नसल्यास होणारी वाहतूककोंडी, वाहनचालकांना त्रासदायक ठरते. त्यामुळे वाहतूककोंडी सोडविण्यासाठी शहरातील तब्बल 125 चौकात स्मार्ट सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. अ‍ॅडव्हान्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिमनुसार (एटीएमएस) वाहतूककोंडीला ब्रेक लागणार आहे.

रेल्वेला उशीर झाला तर प्रवाशांना मिळणार मोफत जेवण

नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणा-यांसाठी एक खूशखबर आहे. जर, तुम्ही आरक्षित तिकिटावर प्रवास करत असाल आणि तुमची ट्रेन पाच ते सहा तास उशिराने धावत असेल तर तुम्हाला भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन निगम (IRCTC) कडून जेवण मोफत मिळणार आहे.

भाग्यश्री मोरे यांची झू इंटरप्रेटर प्रशिक्षणासाठी निवड

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाच्या शैक्षणिक अधिकारी भाग्यश्री मोरे यांची International Zoo Educators Association (IZEA) यांच्या Job Exchange Program 2018 या कार्यक्रमाअंतर्गत अमेरीकेतील San Diego Zoo Global (SDZG) येथे Zoo Interpreter या प्रशिक्षणाकरीता निवड झाली आहे.