Wednesday 28 May 2014

In future, light rail may connect Pune with Hinjewadi


The PMC, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) and the Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) would implement the project, if it is sanctioned. A Japanese company is giving financial support to design the project for which it ...

Last chance to get names in voter list before Assembly polls

The drive will be carried out at zonal offices of PMC and PCMC, besides electoral registration offices and voters’ help centres.
Thousands of voters in Pune — and also in Mumbai —  had anger writ large on their faces on the polling day when they found their names missing from the electoral rolls. The district collectorate in Pune had been gheraoed by hundreds of residents who wanted to know why their name were deleted from the voter list, especially when they had voted in the previous elections.

Automen protest at Pimple Saudagar

Pune: The auto union in Pimple Saudagar, led by Shailendra Gade has called for an agitation at Shivar Chowk.

दंड भरून अनधिकृत बांधकामांना संरक्षण


अनधिकृत बांधकामांचा विषय पिंपरी-चिंचवडसह सर्वत्र गाजतो आहे. ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली बांधकामे अवैध म्हणून आतापर्यंत गणली जात होती. आता मात्र ग्रामपंचायतीने दिलेल्या परवानगीच्या आधारे झालेली बांधकामेही नियमित म्हणून ...

आचारसंहितेमुळे स्थायी समितीचे 'अवलोकन'

लोकसभेची आचारसंहिता संपताच पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महापालिकेची विकास कामे खोळंबली असतानाच स्थायी समितीवरही अवलोकनाचे प्रस्ताव रेटून नेण्याची वेळ आली आहे. 
लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे दीड महिन्यांचा कालावधी आचारसंहितेमध्ये गेला. निवडणुकीच्या निकालानंतर आचारसंहिता संपताच महापालिका प्रशासनाने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांना गती देण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणुकीसाठी 20 मे पासून पुन्हा आचारसंहिता लागू झाली. महिनाभर ही आचारसंहिता कायम राहणार आहे. लवकरच विधानसभा निवडणुकीचेही बिगूल वाजणार आहे. त्यामुळे विकास कामे पुन्हा एकदा आचारसंहितेच्या कचाट्यात सापडणार आहेत. 

एलबीटीला मुळ किंमतीवर उलाढाल कराचा पर्याय

पिंपरी-चिंचवड चेंबरचा राज्य शासनाला इशारा
स्थानिक स्वराज्य संस्था (एलबीटी) कराला योग्य पर्याय व्हॅटवर सरचार्ज नसून "विक्रीच्या मुळ किंमतीवर उलाढाल कर" हाच आहे. लोकसभेतल्या पराजयानंतर आघाडी सरकारने आता तरी व्यापारी व उद्योजजकांचा विचार करावा. आताही त्यांच्या विरोधात निर्णय घेतल्यास विधानसभा दूर नाही, असा इशारा पिंपरी-चिंचवड चेंबर ऑफ इंडस्ट्रीज, कॉमर्स, सर्व्हिस अ‍ॅन्ड अग्रीकल्चर संघटनेकून देण्यात आला आहे.

'मोदी सरकार'कडून अपेक्षांवर पिंपरीत गुरवारी कामगार नेत्यांचे शिबीर

कामगारांच्या विविध प्रश्नांचा उहापोह तसेच कामगार कायद्यामध्ये महत्त्वपूर्ण बदल सुचविण्यासाठी 'मोदी सरकारकडून कामगारांच्या अपेक्षा' या विषयावर राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने पिंपरीमध्ये येत्या गुरुवारी (दि. 29) एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातील कामगारनेते या शिबिरामध्ये सहभागी होणार आहेत.

पंडीत नेहरु यांना महापालिकेचे अभिवादन

भारताचे पहिले पंतप्रधान दिवंगत पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस व पुतळ्यास आयुक्त राजीव जाधव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 
महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास शहर अभियंता एम. टी. कांबळे, सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे, प्रशासन अधिकारी अण्णा बोदडे आदींनी पंडीत नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.