Wednesday 26 April 2017

PCMC chief’s stenographer remanded in police custody till April 29

Rajendra Sopan Shirke, the stenographer of Pimpri Chinchwad municipal commissioner, was remanded in police custody till April 29 on Tuesday, a day after he was arrested for accepting bribe.

Rot runs deep: ACB may summon brains behind Shirke, PCMC officials in a tizzy


नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे काम १५ मे पर्यंत सुरु करा : महापौर

पिंपरी : शहरातील सर्व नद्यांमधील जलपर्णी काढण्याचे काम १५ मे पर्यंत सुरु करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिल्या. स्थायी समिती सभागृहात नद्यांमधील जलपर्णी काढण्याबाबत महापौर नितीन काळजे यांनी आज बैठक आयोजित केली होती, त्यावेळी ते बोलत होते.

‘लाचलुचपत’तर्फे आयुक्‍तांची चौकशी करा - खासदार श्रीरंग बारणे

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांचे स्वीय सहायक व प्रत्यक्षात स्टेनो या पदावर गेल्या १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या राजेंद्र शिर्के याला बांधकाम व्यावसायिकाकडून १२ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. यामुळे पुन्हा महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आला आहे. याप्रकरणी आयुक्‍त दिनेश वाघमारे यांची लाचलुचपत प्रतिबंध विभागातर्फे चौकशी करण्याची मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 

सभागृहात ठाकरे, सावरकरांचे तैलचित्र

महासभेची मान्यता ः प्रस्तावाला हवी राज्याची मान्यता
पिंपरी, (प्रतिनिधी) – महापालिका सभागृहात स्व. बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि चापेकर बंधू यांचे तैलचित्र बसविण्यास मंगळवारी (दि.25) झालेल्या महासभेत मान्यता देण्यात आली. मात्र, मागणी केलेल्या तैलचित्रांचा शासन परिपत्रक यादीत समावेश नसल्याने, सदरील तैलचित्रे बसविण्यास महापालिकेला राज्याची मान्यता घ्यावी लागणार आहे.

कार्यकारिणी बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज

पिंपरी - भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची बैठक चिंचवड येथे बुधवारी (ता. २६) व गुरुवारी (ता. २७) होणार आहे. या बैठकीसाठी कामगारनगरी सज्ज झाली आहे. बैठकीची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.

आजपासून भाजपचे 'चिंतन'


पिंपरी-चिंचवड
 शहरात पस्तीस वर्षांनंतर भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होत आहे. यापूर्वी १९८२मध्ये प्रदेशपातळीवरील बैठक झाली होती. यंदा पालिकेत कमळ फुलल्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे ...

शहरबात पिंपरी-चिंचवड : गोंधळात गोंधळ अन् सर्वपक्षीय योगदान

त्यातून कोणाची काय गणिते साध्य झाली, हे गुलदस्त्यात आहे. मानदंड पळवणे असो की अन्य कोणत्याही कारणावरून पिंपरी पालिकेत गोंधळ होणे, यात काही नावीन्य राहिले नाही. त्यामध्ये सर्वपक्षीय योगदान आहे. वर्षांनुवर्षे सुरू असलेली गोंधळी ...