Saturday 1 December 2012

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान

कारखान्यांच्या जंगलात आढळले दुर्मिळ उदमांजर ; महापालिकेच्या उपचारानंतर जीवदान
पिंपरी, 1 डिसेंबर
मुख्यत्वे पश्चिम घाटामध्ये आढळणा-या उद्‌मांजराचे पिल्लू पिंपरी-चिंचवड शहरात जखमी अवस्थेत सापडले आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागामार्फत त्याच्यावर वेळीच उपचार झाल्याने त्याला जीवदान मिळाले आहे. प्राणीविश्वामध्ये दुर्मिळ असले तरीही रेबीजच्या प्रसारासाठी धोकादायक असणा-या या उदमांजराला उपचारानंतर वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडून दिले जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड ही कामगारनगरी. कारखान्यांबरोबरच इमारतींच्या जंगलात एखादा वेगळा प्राणी दिसला की त्याचे शहरवासियांना अप्रुप वाटते. गुरुवारी (दि. 15) रात्रीच्यावेळी कामावरुन घरी परतणा-या एका कामगाराला भोसरी-टेल्को रस्त्यावर टाटा मोटर्स कंपनीजवळ उंदरासारखे निमुळते तोंड मात्र अंगावर काळे पट्टे असलेला हा छोटासा प्राणी जखमी अवस्थेत आढळला. उंदीर, खारुताई आणि मुंगूस यांच्यासारखेच बरेचसे साम्य असलेला हा छोटा प्राणी दुर्मिळ असावा, हे त्याच्या लक्षात आले. त्याने तातडीने महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागाला याबाबत माहिती दिली.

महापालिकेच्या चिंचवड येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानाचे संचालक अनिल खैरे यांनी जखमी अवस्थेतील या पिल्लाला उद्यानामध्ये आणले. महापालिकेचे पशूवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्याच्या शेपटीला व मागील पायाला जखमा आहेत. त्याच्या प्रकृतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली आहे. उदमांजर प्राण्यांबरोबरच माणसाला चावल्यास रेबीजची लागण होते. रेबीजच्या प्रसारासाठी उदमांजराचा निवासी भागामध्ये वावर असणे धोक्याचे आहे. त्यामुळे या पिल्लाच्या जखमा ब-या झाल्यानंतर त्याला वनअधिका-यांच्या मदतीने निसर्गात सोडले जाणार असल्याचे डॉ. गोरे यांनी सांगितले.

उदमांजराविषयी अधिक माहिती देताना अनिल खैरे म्हणाले की, अंदाजे एक महिन्याचे वयोमानाची ही उदमांजराची मादी आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या वनराईतून हे पिल्लू रस्त्यावर आले असावे. उदमांजर पश्चिम घाटामध्ये आढळते. इतर ठिकाणी विशेषतः शहरी भागामध्ये हे मांजर आढळणे दुर्मिळ आहे. केळी व अंडी हे खाद्य त्याला आवडते. ते शाकाहारी आणि मांसाहारी देखील आहे. याला मसण्यामांजर, ऊद या नावानेही ओळखले जाते. जंगलामध्ये त्याचा अधिवास असतो. निशाचर असल्याने ते रात्रीच्यावेळीच बाहेर पडते. त्यामुळे ते दिवसा सहसा दिसत नाही. पिंपरी-चिंचवड शहरात चार वर्षांपूर्वी उदमांजर सापडले होते, असेही त्यांनी सांगितले.
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

चुलत भावावर खुनीहल्ला करणारे सख्खे भाऊ गजाआड

चुलत भावावर खुनीहल्ला करणारे सख्खे भाऊ गजाआड
पिंपरी, 1 डिसेंबर
व्यावसायिक वादातून चुलत भावावर कोयत्याने खुनी हल्ला करणा-या दोन सख्खा भावांना खडकी पोलिसांनी अटक केली आहे. बोपोडीतील आदर्शनगर येथे शुक्रवारी (दि. 30) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.

बिलाल उस्मान शेख (वय-21, रा. आदर्शनगर, बोपोडी) असे खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी बिलालचे चुलत भाऊ गफार महेबूब शेख (वय-25) व इब्राहिम महेबूब शेख (वय-20, दोघेही रा. आदर्शनगर, बोपोडी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. बिलाल व गफार यांचा प्लास्टिक भंगाराचा व्यवसाय आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिलाल हा गफार व इब्राहिम यांचा चुलत भाऊ आहेत. यापूर्वी गफर यांची वाहने तोडली होती. पूर्वीचे भांडण आणि व्यवसायाच्या वादातून गफार व इब्राहिम यांनी बिलाल याच्यावर कोयत्याने डोक्यावर, हातावर वार केले. जीवे मारण्याच्या उद्देशाने गफार व त्याच्या भावाने बिलालवर कोयत्याने हल्ला चढविला. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक बी. आर. लोंढे तपास करीत आहेत.
www.mypimprichinchwad.com

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद

शेतक-यांचा थेट माल विक्रीला उत्तम प्रतिसाद
पिंपरी, 1 डिसेंबर
राज्यात नाशवंत शेतमालावर सरसकट सहा टक्के आडत आकारण्याच्या राज्यशासनाच्या निर्णया विरोधात आडत व्यापा-यांनी संप पुकारला आहे. मात्र पिंपरी उपबाजार समितीने आजपासून (शनिवार) सुरू केलेल्या शेतकरी ते ग्राहक अशा थेट माल विक्रीला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

याबाबत अधिक माहिती देताना बाजार समितीच्या पिंपरी-चिंचवड उपबाजार विभागप्रमुख एन. डी. घुले म्हणाले की, आडत व्यापा-यांनी जरी संप पुकारला असला तरी बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांच्या आदेशानुसार शेतक-यांचे नुकसान होऊ नये यासाठी पिंपरी आणि चिंचवड याठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विकण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

या दोन्ही ठिकाणी शेतक-यांचा शेतमाल विक्रीला उत्तम प्रतिसाद मिळाला. संप असलातरी आज मार्केटमध्ये मालाची चांगली आवक झाली होती. फळ आणि भाजीपाळ्याची 111 क्विंटल, तर एक लाख बार हजार पालेभाज्यांची आवाक झाली. शिवाय शेतक-यांच्या मालावर कोणतीही आडत न घेता शेतक-यांना रोखीने पैसे देण्यात आले. फुलबाजारात देखिल फुलांची चांगली आवक झाली. त्यामुळे या संपाचा काही परिणाम शेतमालावर झाला नाही. उलट शेतक-यांना चांगला फायदा मिळाला, असा दावा घुले यांनी केला आहे.

शेतक-यांनी कोणालाही न घाबरत आपला शेतमाल पिंपरी व चिंचवड भाजी मंडई येथे घेऊन यावा. भाजीपाला अथवा फळे याबाबत काही अडचणी असल्यास नीलेश लोखंडे (9011115656) व फुल शेतक-यांनी राजू शिंदे (9860562404) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एन. डी. घुले यांनी केले आहे.

Know Your Customer form deadline extended till Dec 31

Know Your Customer form deadline extended till Dec 31: Residents who have multiple LPG connections can submit their Know Your Customer (KYC) forms by December 31 as the union government on Friday announced an extension of the deadline by another month.

थिसेनक्रूप कंपनीत वेतनकरार १० हजारांची वाढ

थिसेनक्रूप कंपनीत वेतनकरार १० हजारांची वाढ: पिंपरी येथील थिसेनक्रुप इंडस्ट्रीज व थिसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया वर्कर्स युनियन यांच्यामध्ये नुकताच वेतनकरार करण्यात आला. या करारानुसार, कामगारांना सरासरी दहा हजार रुपयांची वेतनवाढ मिळणार आहे.

उद्योग नगरी बनतेय शॉपिंग नगरी

उद्योग नगरी बनतेय शॉपिंग नगरी: उद्योगनगरी असा नावलौकिक असलेलं पिंपरी-चिंचवड आता शॉपिंग नगरी म्हणून नावारुपाला येतंय. या शहरात भोसरी, आकुर्डी, निगडी, चिखली, खडकी, सांगवी परिसरांत बाजारपेठा विकसित होत असून, तिथं पुणेकरही खरेदीसाठी जाताहेत, हे विशेष.

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’

भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना हवीय दुसरी ‘टर्म’:
भाजपच्या ७५ टक्के पदाधिकाऱ्यांच्या विरोधानंतर नियुक्ती, तीव्र गटबाजीचा फटका, आंदोलनातही दुफळी, समित्यांचा घोळ, मित्रपक्षांशी संघर्ष व प्रतिस्पध्र्याशी सलगी, पालिका निवडणुकीत लाजिरवाना पराभव, वादग्रस्त 'एसएमएस' मुळे झालेली बदनामी, सदस्य नोंदणीचा बोजवारा असे 'कर्तृत्व' सिध्द झाल्यानंतरही शहराध्यक्ष एकनाथ पवार यांना सलग दुसरी टर्म हवी आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डींग लावली असली तरी प्रदेश कार्यकारिणीने मात्र 'रेड सिग्नल' दाखवला आहे.
गोपीनाथ मुंडे गटाच्या विरोधानंतरही गडकरींच्या आशीर्वादाने पवारांची वर्णी लागून विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत शिक्कामोर्तबही झाले होते. अजंठानगरच्या पोटनिवडणुकीत विरोधात काम केले म्हणून तसेच लोकसभा निवडणुकीची प्रचारपत्रके गायरानात टाकल्याच्या आरोपावरून त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली होती. मात्र, तरीही त्यांच्याकडे नेतृत्वाची धुरा दिली गेली. पवारांना सहकार्य न करण्याचे धोरण मुंडे गटाने राबवले. बैठका नाहीत, कोअर कमिटीचे त्रांगडे, मतदार व कार्यकर्ते पक्षापासून दुरावलेले. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी नेत्यांच्या सोयीनुसार भाजपचे उमेदवार ठरले व बदलले गेले. शिवसेनेशी नको तितका संघर्ष झाला. पर्यायाने निवडणुकीत पुरती वाट लागली. पराभवानंतर मोठय़ा गटाने प्रदेशाध्यक्षांना हटवण्याची मागणी केली. मात्र, कारवाई करू म्हणणाऱ्या नेत्यांनीच त्यांना पाठीशी घातले.
शिवसेनेशी जमत नाही म्हणायचे व त्यांच्या मागेपुढे करायचे. महायुतीत जायचे नाही अन् शिवसेनेच्या आंदोलनांमध्ये मिरवायचे, अशी दुहेरी नीती दिसून आली. 'एसएमएस' प्रकरणाने कळसच गाठला. गडकरी गटाचे पाठबळ असल्याचा आव पवार आणतात. मात्र, तिकडून भाव मिळत नसल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. कोणतीही गोष्ट 'मॅनेज' करण्याच्या फाजील विश्वासामुळेच प्रतिकूल परिस्थितीतही आपण पुन्हा अध्यक्ष होऊ, असा पवारांना विश्वास वाटत होता. मात्र, प्रदेश कार्यकारिणीने अपरिहार्य कारणाशिवाय महाराष्ट्रात कोणत्याही जिल्हाध्यक्षास पुन्हा त्याच पदावर बसता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कर्तबगार, संघटनात्मक बांधणी करणारा अथवा पर्यायच नसेल, अशा नेत्याला पुन्हा संधी द्यायची वेळ आलीच तर सुकाणू समिती निर्णय घेईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्यामागे ‘जाता-जाता’ चौकशीचा ससेमिरा

शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्यामागे ‘जाता-जाता’ चौकशीचा ससेमिरा:
दोनच दिवसात सेवानिवृत्त होत असलेल्या िपपरी माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू जाधव यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला असून त्यांच्या काळात आर्थिक अनियमितता व नुकसान झाल्याचे चौकशीत सिध्द झाल्यास त्यांच्याकडून ते वसूल करण्याची भूमिका पालिका प्रशासनाने घेतली आहे.
विष्णू जाधव यांच्याकडे शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी व माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अशा दोन विभागांची जबाबदारी आहे. ३० नोव्हेंबरला ते सेवानिवृत्त होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याविषयी तक्रारींचा सपाटा सुरू असून त्याची दखल पालिका प्रशासनाने घेतली आहे. अलीकडील काही तक्रारीनंतर जाधव यांच्याकडे खुलासा मागण्यात आला होता. जाधव यांनी दिलेल्या उत्तरात हे आरोप फेटाळून लावले. तथापि, प्रशासनाला त्यांचा दावा पटला नाही म्हणून योग्य पुरावे सादर करून पुन्हा खुलासा करण्याचे आदेश जाधवांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये शिक्षकांची संख्या कशी वाढली, भरती प्रक्रिया पारदर्शक का नव्हती, माध्यामिक विभागाच्या ५० पेक्षा अधिक तुकडय़ांना मान्यता नाही का, पर्यवेक्षक जादा का भरले, अवैध जातप्रमाण पत्र स्वीकारून भरती केली का, पालिकेचे कोटय़वधी रुपयांचे अनुदान बुडाले का, बूट व गणवेश खरेदीत भ्रष्टाचार झाला का, वाकड येथील महालक्ष्मी कंपनीस दरवर्षी काम का दिले जाते, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भात, तातडीने आपली बाजू मांडण्याचे आदेश जाधवांना देण्यात आले आहेत. या संदर्भात, सहआयुक्त अमृत सावंत यांना विचारले असता, जाधव यांच्याविषयी असलेल्या तक्रारींची चौकशी सुरू आहे, असे ते म्हणाले. तथापि, अधिक भाष्य केले नाही.  

पिंपरीतील कत्तलखान्याचे राजकारण अन् ‘अर्थ’कारणही !

पिंपरीतील कत्तलखान्याचे राजकारण अन् ‘अर्थ’कारणही !:
पिंपरीच्या रेल्वे उड्डाणपुलाखालील कत्तलखाना कायमचा बंद करण्यासाठी विविध संस्था, संघटनांनी पुढाकार घेतला असतानाच यामागे काही बडय़ा मंडळींचे राजकारण व अर्थकारणही पुन्हा एकदा उघडपणे चर्चेत आले आहे.
पिंपरीतील कत्तलखान्याच्या आजूबाजूला काही उद्योगपती, राजकारणी व बांधकाम व्यावसायिकांच्या जमिनी आहेत. कत्तलखान्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणी येत आहेत. यापूर्वीही कत्तलखान्याचा विषय अनेकदा चर्चेत आला. तेव्हा उलट-सुलट दावे व पक्षीय राजकारण झाले तसेच आरोप-प्रत्यारोपही झाले. प्रत्येकवेळी या बडय़ा मंडळींच्या जागांचा व अर्थकारणाचा विषय ऐरणीवर आला. गुरुवारी काढलेल्या मोर्चानंतर पुन्हा एकदा 'त्या' चर्चेला उधाण आले होते.
िपपरीत मागील २० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेला कत्तलखाना बंद करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली नव्हती. त्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी गोवंश रक्षा समितीने गुरुवारी मोर्चा काढला. त्यामध्ये सेना-भाजप व अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना सर्व पाश्र्वभूमी सांगण्यात येऊन कत्तलखाना बंद करण्याची मागणी करण्यात आली. तेव्हा याबाबतची सर्व माहिती घेऊ व आठ दिवसात निर्णय घेऊ, असे आश्वासन परदेशी यांनी यावेळी दिले. दुसरीकडे, जमिनींच्या उद्योगाची चर्चाही जोरदारपणे सुरू झाली आहे.   

अजितदादांच्या बैठकीत नगरसेवकांच्या तक्रारींचा पाऊस

अजितदादांच्या बैठकीत नगरसेवकांच्या तक्रारींचा पाऊस:
पिंपरी पालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी अजित पवार यांच्यासमोर तक्रारींचा अक्षरश: पाऊस पाडला. सत्ता असूनही प्रभागातील कामे होत नाहीत, हाच नगरसेवकांच्या तक्रारीचा समान मुद्दा होता. याशिवाय, शहरातील कामे संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून देत विकासकामांचा वेग वाढवण्याची सूचना अजितदादांनी आयुक्तांना केली.
पिंपरी पालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची अजितदादांच्या उपस्थितीत चिंचवडला बैठक झाली. अ‍ॅटो क्लस्टरला झालेल्या बैठकीत सिटीसेंटर, नदीसुधार प्रकल्प, पाणीपुरवठा, उड्डाणपूल, गृहप्रकल्प, बीआरटीएस, बसथांबे, रस्तेविकास, रेडझोन, डीयर पार्क, मोकळी मैदाने, आरक्षित जागा, डेंग्यू आदी प्रमुख विषयांवर यावेळी चर्चा झाली. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी व अधिकारी वर्ग तसेच महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, पक्षनेते मंगला कदम, उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे अध्यक्ष जगदीश शेट्टी आदी उपस्थित होते.
प्रभागातील कामे होत नाहीत, अधिकारी दाद देत नाहीत, अशा तक्रारी प्रामुख्याने नगरसेवकांनी केल्या. ज्यांना बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही, त्यांनी निवेदनाद्वारे पवार यांच्याकडे समस्या मांडली. यावेळी बोलताना अजितदादांनी नव्या गावांसह शहराचा सर्वागीण विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. अर्थसंकल्पात तरतुदी आहेत. मात्र, त्यानुसार कामे होत नाहीत, कामांचा वेग अतिशय संथ का आहे, याविषयी त्यांनी आयुक्तांकडे विचारणा केली. कामे करताना दर्जा सांभाळा, जकातदर निश्चित करताना उद्योजकांचाही विचार करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. सायन्स पार्क दोन महिन्यात सुरू करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

सहा वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा सूड

सहा वर्षांनंतर मुलाने घेतला वडिलांच्या हत्येचा सूड
पिंपरी, 30 नोव्हेंबर

भारतीय जनता पक्षाचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांची सहा वर्षांपूर्वी डोक्यात दगड घालून निर्घृणपणे हत्या झाली होती. या हत्येच्या सुडातून भोसरीत गुरूवारी (दि. 29) सराईत गोट्या ऊर्फ सचिन धावडेचा 15 जणांच्या टोळक्यांनी तलवार, कोयत्याने आमनुषपणे खात्मा केला. वडिलांवर झालेल्या निर्घृण खुनाचा सूड मुलाने घेतल्याने पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. भोसरीत गेल्या सहा वर्षांत 'गँगवॉर'च्या भडक्यातून सहा जणांचा काटा काढण्यात आला आहे. दुहेरी खुनप्रकरणी अंकुश लांडगे यांचा मुलगा राहुल लांडगे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. तिघांना आज, शुक्रवारी (दि. 30) पिंपरी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

भोसरी येथील धावडेवस्तीत गुरूवारी दुपारी 'क्रॉस फायरिंग' व कोयता, तलवारीच्या अमानुष हल्यात सराईत गोट्या धावडे, अंकुश लाडके यांचा खात्मा झाला. तर संदीप मधुरे हा गंभीर जखमी झाला. या प्रकरणी स्व. अंकुश लांडगे यांचा मुलगा राहुल (वय-20), किशोर मधुकर साखरे (वय-22), अभिषेक शिवाजी जरे (वय-22, सर्व रा. धावडेवस्ती, भोसरी) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांना आज पिंपरी न्यायालयात हजर केले असता मुख्य न्यायदंडाधिकारी सुनील हाके यांनी तिघांना 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून आय-20 मोटार व एक इटालीय बनावटीचे पिस्तुल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

'या' दुहेरी हत्याकांडातील अजूनही भोसरी पोलिसांसाठी तब्बल 11 आरोपी 'वॉन्टेड' आहेत. त्यामध्ये बाळा ऊर्फ प्रकाश बाबासाहेब लांडगे, रवी बाबासाहेब लांडगे, प्रवीण ऊर्फ चिम्या पोपट लांडगे, विकास पोपट लांडगे, किरण काटकर, अतुल काटकर, जगदाळे, जगदाळे याचा भाऊ (सर्व रा. धावडे वस्ती, भोसरी), योगेंद्र ऊर्फ चिन्या रावत (रा. इंद्रायणी नगर), दीपक मार्कंडेय राय (रा. नेहरूनगर, पिंपरी), सचिन रावताळे (रा. धावडेवस्ती, भोसरी) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

खुनाच्या गुन्ह्यात राहुल लांडगे याने परदेशी बनावटीचे (मेड इन इटली) पिस्तुल वापरले. याशिवाय घटनास्थळावर गोळीबार झाला असून, दोन रिकाम्या पुंगळ्या व एक लिड मिळालेली आहे. राहुलने किती गोळ्या फायर केल्या. याशिवाय अन्य तपासासाठी पोलिसांनी 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. परंतु न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सिंचन श्वेतपत्रिका वाचलीच नाही - अजित पवार

सिंचन श्वेतपत्रिका वाचलीच नाही - अजित पवार
पिंपरी, 30 नोव्हेंबर
श्वेतपत्रिका आपण वाचलीच नाही. त्यामुळे त्याबद्दल बोलणे चुकीचे ठरणार असल्याचे सांगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंचन श्वेतपत्रिकेबाबत मौन बाळगले. सिंचन प्रकल्प, साहेब आणि आपल्यातील संबंध आणि आता बारामतीच्या विभाजनावरुन काही महाभाग आपल्याविरोधात गैरसमज पसरवित आहेत. मात्र कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करुन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन करतच जातीयभेद करु नका, बेरजेचे राजकारण करा, असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिका-यांना कानपिचक्याही दिल्या.

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे, महापौर मोहिनी लांडे, उपमहापौर राजू मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शहर समन्वयक नानासाहेब शितोळे, प्रदेश सरचिटणीस यशवंत भोसले, सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती जगदीश शेट्टी, माजी महापौर अपर्णा डोके, आर. एस. कुमार, महिला आघाडीच्या शहराध्यक्षा सुरेखा लांडगे, युवक शहराध्यक्ष मयुर कलाटे, शिक्षण मंडळाचे सभापती विजय लोखंडे, नगरसेवक उल्हास शेट्टी, जितेंद्र ननावरे, सुजाता पालांडे आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहर चहुबाजूने वाढत आहे. महापालिका, एमआयडीसी आणि प्राधिकरणाबरोबरच समाविष्ट गावांचे प्रश्न वेगवेगळे आहेत. शहराचे प्रश्न शंभर टक्के सुटत नाहीत. काही सुटले तरी नव्याने प्रश्न निर्माण होतात. विकास कामे करताना संघटना मजबूत असायला हवी. महापालिका निवडणुकीच्या वेळी सर्व कार्यकर्ते एकत्र येवून काम करतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीत त्याचे चांगले यश मिळते. मात्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत संघटनेऐवजी नगरसेवकांवर अवलंबून रहावे लागत असल्याने काम न करणा-या नगरसेवकांच्या प्रभागामध्ये फटका बसतो. त्यामुळे मिळून मिसळून काम करा, काम करा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याच्या सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केल्या.

सिंचन श्वेतपत्रिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, राज्य सरकारने सिंचन श्वेतपत्रिका काढली आहे. मात्र आपण ती वाचली नाही. त्यामुळे त्याच्याबाबत बोलणं चुकीचं ठरेल. मधल्या काळामध्ये सिंचन प्रकल्पांवरुन आपल्या विरोधात चुकीची माहिती पसरविली गेली. मात्र श्वेतपत्रिकेतून दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल. बारामती जिल्ह्याच्या विभाजनाबाबतही चुकीची माहिती पसरविली जात आहे. माझ्या वक्तव्याच्या विपर्यास केला गेला. काहींनी तर शिरुर, पुरंदर देणार नाही, असे म्हणत विरोध करायलाही सुरुवात केली आहे. जिल्हा म्हणजे कोणा एकट्या-दुकट्याची मक्तेदारी आहे का, असा सवालही त्यांनी केला. ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाबाबत प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शरद पवार साहेब आणि आपल्यात बिनसल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र आमच्यात असे कोणतेही वाद नाहीत. शरद पवार हे आपले दैवत आहेत. राष्ट्रवादी हे आपले कुटुंब आहे. त्यामुळे कुटुंबाचा सदस्य या नात्यानेच आपण पक्षाचे मनापासून काम करत आहोत. काही महाभाग नाहक माझ्या विरोधात गैरसमज पसरवित आहेत. मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. राज्यात अर्धी सत्ता असली तरी चुकीच्या कामांना विरोध करा, असेही त्यांनी सांगितले. पक्षाचे काम करताना जातीयवाद करु नका, आपआपसातील मतभेद ताणू नका, बेरजेचं राजकारण करा, गटातटाचे राजकारण करु नका, असे सांगत त्यांनी स्थानिक पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या.

धावडेवस्तीत दुस-या दिवशीही तणावपूर्ण शांतता

धावडेवस्तीत दुस-या दिवशीही तणावपूर्ण शांतता
पिंपरी, 30 नोव्हेंबर
भोसरी येथील धावडेवस्तीत सराईत गोट्या धावडे व अंकुश लाडके यांच्या खुनानंतर परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले. या दुहेरी खुनानंतरच्या दुस-या दिवशीही धावडेवस्तीत तणावपूर्ण शांतता पाहावयास मिळाली. दंगल काबू पथक, सीआरपीएफ या पथकासह पोलीस पथके तैनात करण्यात आली आहेत.

गोट्या उर्फ सचिन कुंडलीक धावडे (31, रा. धावडेवस्ती, भोसरी) आणि अंकुश रामदास लाडके (27, रा. धावडेवस्ती) या दोघांचा गुरूवारी (दि. 29) दुपारी खून झाला. या हल्ल्यात संदीप रामचंद्र मधुरे (30, रा. आकुर्डी) हा गंभीर जखमी असून, त्याच्यावर भोसरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

गुरुवारी साडेअकराच्या सुमारास गोट्या, संदीप व त्याचे अन्य दोन मित्र धावडेवस्ती येथील हॉटेल मनीष शेजारी असलेल्या त्याच्या कार्यालयासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी एका महिंद्रा मॅक्सीको (एम एच 24 जे 8315) या टेम्पोतून तोंडाला माकड टोप्या घातलेले 12 ते 15 जण त्या ठिकाणी आले. हातातील हॉकी स्टिक, दगड याच्यासह तलवार, कोयता या सारख्या धारदार हत्याराने गोटय़ावर हल्ला चढविला. तसेच संदीप यालाही मारहाण करण्यात आली. गोट्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले.

या प्रकरणी भोसरी पोलिसांनी राहुल लांडगे, किशोर साखरे आणि अभिषेक जरे या तिघांना शुक्रवारी (दि.29) पहाटे दोनच्या सुमारास पोलिसांनी अटक केली. तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

भोसरीतील दुहेरी खुनप्रकरणानंतर धावडेवस्तीत दंगल काबू पथक, सीआरपीएफ तुकडी व पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गोट्या धावडे व राहुल लांडगे यांच्या घरासमोर पोलिसांचा पहारा तैनात केला आहे. त्यामुळे धावडेवस्तीला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दुस-या दिवशीही धावडेवस्ती परिसरातील व्यावसायिकांनी व्यवहार बंद ठेवले होते.

HIV cases dip in Pune city, detection rate up in Pimpri

HIV cases dip in Pune city, detection rate up in Pimpri: After a decline in the number of new HIV infections this year within the Pune Municipal Corporation (PMC) limits, the civic health department is planning to set up HIV testing facilities at 10 civic hospitals.

Road safety week at Pune's Birla hospital

Road safety week at Pune's Birla hospital: The drill was conducted specially for its non-medical staff in the hospital, with three dummy accident situations created.

आता मिळणार वीजबिलाचा SMS

आता मिळणार वीजबिलाचा SMS: वीजबिले तयार झाल्यानंतर त्यांची माहिती लगेचच ‘एसएमएस’द्वारे ग्राहकांच्या वैयक्तिक मोबाइलवर पाठविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरातील परिमंडळातील वीजग्राहकांना ही सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय ‘एसएमएस’च्या माध्यमातून वीजबिलेदेखील भरता येणार आहेत. याशिवाय ‘एसएमएस’च्या माध्यमातून वीजबिलेदेखील भरता येणार आहे.

पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हेच ध्येय- पवार

पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हेच ध्येय- पवारपिंपरी- "पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास हेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव ध्येय आहे,'' असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा मेळावा व नियुक्‍ती पत्र प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, महापौर मोहिनी लांडे, मुख्य समन्वयक नाना शितोळे, ग्राहक कल्याण मंडळाचे अध्यक्ष आझम पानसरे, सत्तारूढ पक्षनेत्या मंगला कदम, प्रदेश उपाध्यक्ष वसंत वाणी आणि नगरसेवक, नगरसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष योगेश बहल होते. पवार यांच्या हस्ते पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, ब्लॉक अध्यक्ष, शहर चिटणीस, उपाध्यक्ष आदींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 
पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास हेच ध्येय- पवार

खुनाचा बदला म्हणूनच खून

खुनाचा बदला म्हणूनच खून: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

गोट्या ऊर्फ सचिन कुंडलिक धावडे (३१) आणि अंकुश रामदास लाडके (२१, दोघेही रा. धावडेवस्ती, भोसरी) या दोघांच्या खूनप्रकरणाचा उलगडा करण्यात भोसरी पोलिसांना यश आले. भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या सहा वर्षांपूर्वीच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच गोट्याचा खून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. लांडगे यांचा मुलगा राहुल याच्यासह दोन साथीदारांना अटक केली आहे.

अंकुश लाडके आरोपींसमवेतच आला होता. राहुल लांडगे याने केलेल्या क्रॉस गोळीबारात तो मारला गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना पिंपरी न्यायालयात हजर केले असता त्यांना ७ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Ajitdada Pawar Pimpri Visit

(title unknown):
Ajitdada Pawar Pimpri visit
Ajitdada Pawar Pimpri Visit www.mypimprichinchwad.com www.mpcnews.in

कत्तलखान्याविरोधात गोवंश रक्षा समितीचा महापालिकेवर मोर्चा

कत्तलखान्याविरोधात गोवंश रक्षा समितीचा महापालिकेवर मोर्चा
ttp://www.mypimprichinchwad.com/
पिंपरी, 29 नोव्हेंबर
पिंपरीतील इंदिरा गांधी उड्डाणपुलाखाली निवासी भागामध्ये सुरू असलेला कत्तलखाना बंद करण्याच्या मागणीसाठी गोवंश रक्षा समितीच्या वतीने आज (गुरुवारी) महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. त्यास कत्तलखाना परिसरातील रहिवाश्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कासारवाडीत माथेफिरुकडून पीएमपीएमएल बसची तोडफोड

कासारवाडीत माथेफिरुकडून पीएमपीएमएल बसची तोडफोड
पिंपरी, 29 नोव्हेंबर
http://www.mypimprichinchwad.com/
कासारवाडी चौकात अज्ञात तरुणाने पीएमपीएमएल बसच्या काचा फोडल्या. या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही मात्र काही वेळ परिसरात तणाव पसरला होता. दुपारी सव्वाचारच्या सुमारास ही घटना घडला.

धावडेवस्तीत सहा वर्षांनी पुन्हा थरारनाट्य सराईत गुन्हेगार गोट्या धावडे याच्यासह दोघांचा खून

धावडेवस्तीत सहा वर्षांनी पुन्हा थरारनाट्य ; सराईत गुन्हेगार गोट्या धावडे याच्यासह दोघांचा खून
www.mpcnews.in

सहा वर्षांपूर्वी झालेल्या पिंपरी-चिंचवडचे भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अ‍ॅड.अंकुश लांडगे यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी गोट्या ऊर्फ सचिन कुंडलिक धावडे (वय 35) आणि त्याचा मित्र अंकुश रामदास लकडे (वय 25) याचा आज (गुरुवारी) निर्घूणपणे खून करण्यात आला. दहा ते बारा जणांच्या टोळक्याने गोळीबार करत धारदार शस्त्रास्त्राने त्यांच्यावर हल्ला चढविला. त्यांचा अन्य एक मित्र संदीप मधुरे गंभीर जखमी झाला आहे. भोसरीतील धावडेवस्तीमध्ये दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने तणावाचे वातावरण आहे.