Saturday 17 November 2018

प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा – गजानन चिंचवडे

एमपीसी न्यूज – प्राधिकरणाने पोलीस वसाहतीसाठी भूखंड आरक्षित करावा अशी मागणी पोलीस फेंन्डस्‌ वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवड यांनी केली आहे. याबाबत त्यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्त्यांवर दिवसा जड वाहनांना बंदी

एमपीसी न्यूज – वाकड व हिंजवडी येथील यशस्वी प्रयोगानंतर आता पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांवर जड वाहनांना व खासगी ट्रॅव्हल्सना, कंपनीच्या बसेसना प्रायोगिक तत्वावर दिवसा पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. यामध्ये जुना पुणे-मुंबई महामार्गाचाही समावेश आहे. ही बंदी 27 नोव्हेंबर पर्यंत कायम राहणार आहे. 

‘म्हाळुंगे-माण’ टीपी स्कीममध्येसर्वाधिक रस्त्यांचे जाळे

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील पहिल्या नगररचना योजनेमध्ये (टीपी स्कीम) सर्वाधिक खर्च रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी केला जाणार आहे. म्हाळुंगे-माणमधील टीपी स्कीमवर खर्च केल्या जाणाऱ्या ६२० कोटी रुपयांपैकी ४२ टक्के निधी (२६० कोटी ~) केवळ रस्त्यांसाठी खर्च केले जाणार आहेत. या निधीतून १२ ते ३० मीटरचे रस्ते तयार करण्याचे नियोजन प्राधिकरणाने केले आहे.

भविष्यात सर्व वाहतूक व्यवस्थेसाठी एकच तिकीट

पुणे : वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण आवश्यक आहे. त्यादृष्टीने राज्यात नागपूर, मुंबई आणि पुण्यात मेट्रो मार्गिकांचे जाळे निर्माण केले जात आहे. शहरात पीएमपी आणि मेट्रोच्या माध्यमातून एकात्मिक वाहतूक व्यवस्था उभारण्यात येत आहे. भविष्यातील या वाहतुकीसाठी एकच तिकीट असावे, असे नियोजन सुरू आहे, असे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पुण्यात केले.  पुणेकर जगाला सल्ले देतात. त्यांचे सल्लेही चांगले असतात. मात्र याच सल्ल्यांमुळे मेट्रोच्या कामाला काही काळ विलंब झाला. मात्र उशीर होऊनही मेट्रोचे काम वेगात प्रगतिपथावर आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरीत निम्म्याहून अधिक रिक्षा बेकायदा!

पिंपरी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) कार्यक्षेत्रामध्ये अकरा हजार आठशे सत्तर रिक्षांची नोंदणी झाली आहे. प्रत्यक्षात मात्र तीस ते पस्तीस हजार रिक्षा शहरात अनधिकृतपणे प्रवासी वाहतूक करतात. नोंदणी नसलेल्या रिक्षांवर वाहतूक पोलीस आणि आरटीओकडूनही कारवाई केली जात नाही. अनधिकृत आणि धोकादायक स्थितीत रिक्षांमधून प्रवासी वाहतूक होत असली तरी प्रशासनाकडून लक्ष दिले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा गौरव

पिंपरी : अण्णासाहेब मगर सोशल-स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या गुणवंतांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार (दि. 18) रोजी सकाळी अकरा वाजता कामगार कल्याण मैदान, भोईर नगर येथे होणार आहे. सिनेअभिनेते मकरंद अनांसपुरे आणि हास्य सम्राट दीपक देशपांडे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गुलाब बिरदवडे यांनी दिली.

’एक मूठ अनाज’ संकल्पनेतून स्नेहवनला धान्याची मदत

भोसरी : ’एक मूठ अनाज’ या संकल्पनेतून भोसरीतील चक्रपाणी वसाहत येथील स्नेहवन संस्थेस जमा केलेले गहू, तांदूळ, साखर असे 130 किलो धान्य, 100 बिस्कीट पुडे लायन्स क्लब ऑफ पूना निगडीच्या सभासदांनी भेट दिले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ पूना निगडीचे अध्यक्ष जनार्दन गावडे, अशोक येवले, जयंत व जयश्री मांडे, चंद्रशेखर व भाग्यश्री पवार, अजित देशपांडे, अविनाश चाळके, मारुती मुसमाडे आदी उपस्थित होते.

Selfie from 'study tour' to Spain goes viral, PCMC team comes under fire

The controversy over a ‘study tour’ to Spain by a delegation of officials and corporators of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) intensified on Wednesday when a selfie taken by Municipal Commissioner Shravan Hardikar went viral and became a matter of discussion in the industrial city.

वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात पाच टक्के वाढ

पिंपरी - दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी चांगल्या प्रतिसाद मिळाला असून एसटी महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या उत्पन्नात यंदा पाच टक्के वाढ झाली आहे. 

जुनी सांगवीत लाभार्थ्यांना पेन्शन मंजुरी पत्राचे वाटप

जुनी सांगवी - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या संजय गांधी निराधार योजना समिती अंतर्गत येथील जुनी सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव प्रभागातील अपंग, निराधार, दिव्यांग, विधवा श्रावणबाळ योजनेत पात्र लाभार्थ्यांना आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली एकुण ५९ लाभार्थ्यांना पेन्शन व विविध अर्थसहाय्य मंजुरीपत्र देण्यात आले. 

मुळा नदीपात्रात जलपर्णी वाढु लागली - हटविण्याची मागणी

जुनी सांगवी - जुनी सांगवी येथील मुळानदीपात्रात जलपर्णीची वाढ होवु लागल्याने नदीपात्रात जलपर्णीचे पुंजके फोफावताना दिसु लागले आहेत. जलपर्णीमुळे डास किटकांचा त्रास सांगवीकरांसाठी नविन नाही. गतवर्षी जुन अखेरपर्यंत सांगवीकरांना डासांच्या त्रासाचा सामना करावा लागला होता.प्रशासनाकडुन गतवर्षी जलपर्णी हटविण्याचे  काम धिम्या गतीने काम करण्यात आले होते. 

ताथवडे, पुनवळे “अंडरपास’ला गती मिळणार

पिंपरी – ताथवडे, पुनवळे गावच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावरील अंडरपासची उंची वाढवण्याबाबत ठोस कार्यवाही करण्यात येईल. तसेच, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणाच्या विभागीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले आहे.

ग्रामस्थांच्या सहभागामुळे “हायटेक सिटी’ उभी राहणार

पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून साकारणारा महाळुंगे-माण हायटेक सिटी प्रकल्प हा भूमीपुत्रांच्या भागिदारीतून उभा राहात आहे. या प्रकल्पामुळे एक मोठे अर्थकारण उभे राहणार असून ग्रामस्थांच्या सकारात्मक सहभागामुळे ते विकासाच्या समृद्धीचे नवे मॉडेल म्हणून ओळखले जाईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

उद्योगनगरीत पाणी कपात?

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने 440 एमएलडी पाणी उपसा करून पाणी काटकसरीने वापरण्याचा सूचना पाटबंधारे खात्याने केल्या आहेत. पाणीसाठा कमी झाल्याने त्यानुसार पालिकेकडून उपाययोजना करून खबरदारी घेण्यात येत आहे. संपूर्ण शहराला सुरळीत पाणीपुरवठा व्हावा म्हणून भविष्यात पाणी बचतीसोबतच पाणी कपात लागू करण्याची शक्‍यता आहे.

नगरसेवक संदिप वाघेरेंचा प्रभाग पाहणी दौरा

चौफेर न्यूज – पिंपरीगाव प्रभाग क्रमांक २१ मधील नियोजित कामांचा पाहणी दौरा भाजपाचे नगरसेवक संदिप वाघेरे यांनी आज केला. यावेळी पिंपरी महापालिकेतील संबंधित विभागाचे सर्वच अधिकारी त्यांच्यासोबत उपस्थित होते. या दौऱ्यात प्रभागाच्या नियोजन बध्द विकासासाठी संदिप वाघेरे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.