Monday 4 February 2013

Each bus station on BRTS routes will cost about Rs 40 lakh

Each bus station on BRTS routes will cost about Rs 40 lakh: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct 73 bus stations on the four BRTS corridors at an estimated cost of Rs 33.64 crore.

Training programme for Anganwadi workers held

Training programme for Anganwadi workers held: A day-long training programme-cum-workshop for Anganwadi workers was conducted under the Rajmata Jijau Mother and Child Health and Nutrition Mission at the D Y Patil Medical College in Pimpri on Friday.

FDA issues 'stop-sale' notices to 31 chemists

FDA issues 'stop-sale' notices to 31 chemists: The Food and Drug Administration (FDA) has issued 'stop -sale' notices to owners of 31 medical stores in the city for not employing a pharmacist, a mandatory requirement for a medical store The officials have inspected 86 medical stores in Pune and Pimpri-Chinchwad during a drive that started on January 24.

New green building rating to be introduced

New green building rating to be introduced: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will introduce a new green building rating system wherein a building constructed on plot area below 2,500 sq.m. can obtain the rating.

पिंपरीतील ४५२ हॉटेल बेकायदेशीर

पिंपरीतील ४५२ हॉटेल बेकायदेशीर: परिमंडळ तीनच्या हद्दीतील ४५२ बेकायदेशीर आणि विनापरवाना हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर ही कारवाई करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

अनधिकृत बांधकामांचे भूत, आरोपांना आलाय ऊत

अनधिकृत बांधकामांचे भूत, आरोपांना आलाय ऊत: पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात पुन्हा वादळ निर्माण झाले आहे. दोषारोपामुळे हा प्रश्न चिघळतो आहे.

पिंपरी-चिंचवड आयुक्तांना पुन्हा धमकी

पिंपरी-चिंचवड आयुक्तांना पुन्हा धमकी: पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकावणीचे पत्र आले असून, बेकायदा बांधकामांवरील कारवाई न थांबविल्यास गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल अशा आशयाचा मजकूर त्यात लिहिला आहे.

बालिकेवर सामूहिक बलात्कार

बालिकेवर सामूहिक बलात्कार: - चिंचवडमध्ये ३ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात
पिंपरी। दि. ३ (प्रतिनिधी)

महापालिका शाळेच्या बांधकामावरील ३ मजुरांनी तेथील रखवालदाराच्या साडेचार वर्षीय बालिकेवर बलात्कार केला. चिंचवड गावात रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. संतप्त जमावाने चिंचवडगाव पोलीस चौकीसमोर जमून या घटनेचा निषेध केला. पोलिसांनी तीन मजुरांना ताब्यात घेतले असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

भुरा पुरूषोत्तम आदिवासी ( वय १८, मूळ रा. सतना, मध्य प्रदेश), प्रदीप अशोक रावत (२0) आणि अनिल श्रीवास्तव रावत (२१, सर्व राहणार पडवळ आळी, चिंचवड) यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनुसार, महापालिकेच्या वतीने शाळेच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्याचे बांधकाम सुरू आहे. तेथेच पीडित मुलगी आपल्या आईबाबांसमवेत राहाते. तिचे वडील तेथे रखवालदार म्हणून नोकरीस आहेत.

आरोपी हे या इमारतीचेच बांधकाम करणारे परप्रांतीय मजूर आहेत. ते बाजूच्याच खोलीत राहतात. पीडित मुलगी अंगणात खेळत होती. चॉकलेटचे आमिष दाखवून ते तिला इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर घेऊन गेले. तेथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. मुलगी रडू लागताच त्यांनी तिच्या हातात चॉकलेट घेण्यासाठी दोन रुपये दिले. मुलगी रडत खाली आली. तेव्हा आईने तिची विचारपूस केली. त्या वेळी घडला प्रकार त्यांच्या लक्षात आला. तोपर्यंत दोघे आरोपी पसार झाले होते. परंतु एकजण या कुटंबाच्या ताब्यात सापडला. त्याची चौकशी केली असता त्याने अन्य दोघा साथीदारांनी बलात्कार केल्याची माहिती दिली.

त्यानंतर पोलीस ठाण्यात धाव घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. घटनेबाबत कळताच परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पोलीस चौकीत दाखल झाले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. कासारवाडी येथे बालिकेवर बलात्कार करून तिचा खून करणारा अजून पोलिसांना मिळू शकलेला नाही. गेल्या रविवारी भोसरीत सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. एका रखवालदाराच्या पत्नीला दारू पाजून अन्य दोन रखवालदारांनी तिच्यावर बलात्कार केला. पिंपरी-चिंचवड परिसरातील ही तिसरी घटना आहे. सहायक पोलिस निरीक्षक एन. सी. मिसाळ, उपनिरीक्षक सुरेश माने, अर्जुन पवार तपास करीत आहेत.

पोलीस निरीक्षक कवडे यांना चित्रपट पाहण्यात स्वारस्य
सामूहिक बलात्कार घडला ते घटनास्थळ पोलीस ठाण्यापासून अवघ्या २00 मीटरवर आहे. सहाच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराची माहिती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना रात्री १0 पर्यंत मिळत नव्हती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोपट लोखंडे यांची सुटी असल्याने त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. तर गुन्हे निरीक्षक संजय कवडे पोलीस ठाण्यातील दूरचित्रवाणीवर चित्रपट पाहण्यात रमले होते. घटनेबाबत त्यांना विचारणा केली असता अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी रात्री पावणेबाराला घटनास्थळाची पाहणी केली.

‘कारवाई’चे उत्तर देणार ?

‘कारवाई’चे उत्तर देणार ?: - पिंपरीत साहेब, बाबा, दादा येणार प्रथमच एकत्र
पिंपरी । दि. ३ (प्रतिनिधी)

सायन्स सेंटर उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार असे ‘बाबा’, ‘दादा’ आणि ‘साहेब’ एकाच व्यासपीठावर येणार आहेत. अनधिकृत बांधकामाविराधातील कारवाई, प्राधिकरणाची लोकनियुक्त समिती, रेडझोन प्रश्न, रखडलेला घरकुलप्रकल्प याविषयी निर्णय घेणार की पुन्हा हे प्रश्न तसेच भिजत ठेवणार? हे येत्या ८ तारखेला स्पष्ट होईल. त्यामुळे आठला होणार्‍या कार्यक्रमाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये बाबा, साहेब आणि दादा हे एकाच व्यासपीठावर प्रथमच येत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून येथील सर्वसामान्य माणसांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत. या प्रश्नांविषयी फक्त निवडणुकीपूर्वी व निवडणुकीत चर्चा होते? निर्णय घेऊ, न्याय देऊ? असे सांगण्यात येते, मात्र निर्णय घेतला जात नाही. आता तिनही नेते एकाच व्यासपिठावर येत असल्याने त्यांना या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत.

तसेच अपक्ष आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन सभेचे कामकाज होऊन देणार नाही, असा इशारा दिला होता. ही कृती अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन देणारी आहे, असा आक्षेप घेत सुजाण नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. त्याचबरोबर पिंपरीचे आयुक्त व प्राधिकरणाचे मुख्याधिकारी या दोघांचीही तक्रार मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. आजवरची बांधकामे नियमित करून यापुढील बांधकामांना निर्बंध घालावेत, अशी येथील आमदारांची, नगरसेवकांची मागणी आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांविषयी प्रशासकीय अधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीविषयी मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणार्‍या रेडझोन प्रश्नाबाबत अनेक बैठका होऊनही निर्णय झालेला नाही.

नवनगर विकास प्राधिकरण असतानाही काँग्रेसचा आवाज मुंबईत उठविणारे नेतृत्त्व नसल्याने गेल्या १0 वर्षांपासून समिती झालेली नाही, पालिकेच्या निवडणुकीनंतर कार्यकर्त्यांना संधी देऊ, असे मुख्यमंत्र्यानी सूचित केले होते.

सध्या शहरात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न गाजत आहे. आयुक्तांनी राजकीय दबावाला भीक न घालता कारवाई सुरूच ठेवली आहे. येथील सत्ताधारी स्थानिक नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे आयुक्तांची तक्रार केली होती. मात्र, उपमुख्यमंत्र्यांनी आयुक्तांची बाजू घेतल्याने स्थानिक नेतेमंडळी अडचणीत आली आहेत. प्राधिकरण विरोधी पक्षांचे वॉर्ड असणार्‍या थेरगाव, वाकड, चिंचवड परिसरात कारवाई करते. मात्र, इतरत्र करीत नाही, असा आक्षेप शिवसेनेने घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.

PCMC to allow 2.5 FSI for MHADA colony residents

PCMC to allow 2.5 FSI for MHADA colony residents - Indian Express:

PCMC to allow 2.5 FSI for MHADA colony residents
Indian Express
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is all set to allow 2.5 FSI to the residents of MHADA colonies, said Municipal Commissioner Dr Shrikar Pardeshi at a function organised by Sant Dnyaneshwar Cooperative Housing Society Federation Ltd ...

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-यास अटक

मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-यास अटक
पिंपरी, 3 जानेवारी
दुकानात खरेदीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणा-या सेल्समनला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरीतील नेहरूनगर येथे रविवारी (दि. 3) दुपारी हा प्रकार घडला.

अब्दुल रेहमान युसूफ सय्यद (वय 19, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्याचे युवकाचे नाव आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या नातेवाईकांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलगा व त्याच्या मित्र हे दोघे सय्यद काम करीत असलेल्या दुकानात आज दुपारी खरेदीसाठी गेला होता. त्यानंतर काही वेळाने पीडित मुलगा घरी गेला व त्याने आजोबांना घडलेल्या प्रकार सांगितला. त्याच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, सय्यद याला अटक करण्यात आली आहे. मुलाला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याचा अहवाल अद्याप आला नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
पिंपरी पोलीस ठाण्याचे फौजदार राहुल भुतेकर तपास करीत आहेत.

रेल्वेच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

रेल्वेच्या धडकेने एकाच कुटुंबातील दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
पिंपरी, 3 फेब्रुवारी
डोक्यावर लाकडाचा भारा घेऊन लोहमार्ग ओलांडणा-या देहुरोड येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा रेल्वेच्या धडकेने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज संध्याकाळी पाचच्या सुमारास घोरावाडी-बेगडेवाडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान घडली. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या नागरकोयल एक्सप्रेसची धडक या दोन महिलांना बसल्याने या दोघी जागीच ठार झाल्या तर त्यांच्या सोबत असलेली आणखी एक महिला प्रसंगावधान राखल्याने बचावली.

सुरेखा बबन बिले (वय-21) व मनीषा सुभाष बिले (वय-31, दोघीही रा. शंकरवाडी, देहूरोड) असे या दुर्दैवी महिलांची नावे आहेत. तर प्रसंगावधान राखल्याने कांता बाळू शिंदे (वय-45) ही महिला बचावली आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड येथील शंकरवाडीत राहणा-या मनीषा बिले आणि त्यांची धाकटी जाऊ सुरेखा बिले, कांता शिंदे या तिघी आज सायंकाळी लाकूडफाटा गोळा करण्यासाठी घराबाहेर पडल्या. लोहमार्गालगत झुडपातून लाकूडफाटा गोळा करून त्या लाकडाची बांधलेली मोळी डोक्यावर घेऊन तिघीजणी घरी निघाल्या होत्या.

बेगडेवाडीकडून घोरावडी रेल्वे स्टेशनच्या दिशेने लोहमार्गावरून निघाल्या होत्या. त्यामुळे त्यांना लोणावळ्याहुन पुण्याकडे धावणारी रेल्वेगाडी दिसली. त्यामुळे त्यांनी शेजारच्या लोहमार्गावरून चालण्यास सुरूवात केली. त्याचवेळी पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या नागर कोयल रेल्वेगाडीखाली मनीषा बिले व सुरेखा बिले या सापडल्या. तर प्रसंगावधान राखल्याने कांता शिंदे यातून बचावल्या. मनीषा आणि तिची धाकटी जाऊ सुरेखा यांच्या मृत्युमुळे शंकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवी कामथे हिचे यश पिंपरी, 3 फेब्रुवारी राज...

इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवी कामथे हिचे यश
पिंपरी, 3 फेब्रुवारी
राज्य शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत निगडी प्राधिकरणातील जान्हवी कामथे हिने गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकविला. याशिवाय स्थिरचित्र विषयात 'टॉपटेन' स्थान मिळविले आहे.

निगडी केंद्रात झालेल्या इंटरमिजिएट चित्रकला परीक्षेत जान्हवीला गुणवत्ता यादी पाचवा क्रमांक मिळविला. जान्हवी कामथे हिने भूमिती व अक्षरलेखन विषयात राज्यात सहावा क्रमांक पटकविला आहे. राज्यस्तरीय खासगी देणगीदारांकडून आठ जणांसाठी मिळणा-या पारितोषिकांच्या यादीत तिचा समावेश आहे. निगडीतील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाच्या माध्यमिक मराठी विभागाच्या नववीत जान्हवी शिकत आहे. तिचे वडील ज्ञानप्रबोधिनीचे कलाध्यापक अशोक कामथे यांचे तिला मार्गदर्शन लाभले आहे.

काळभोरनगर (आकुर्डी) केंद्रात ती परीक्षेसाठी बसली होती. तिच्या या यशाबद्दल ज्ञानप्रबोधिनीचे केंद्रप्रमुख वा. ना. अभ्यंकर, मनोज देवळेकर, प्राचार्या सुमन शेणॉय यांनी जान्हवीचे अभिनंदन केले. तत्पूर्वी सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय कल्चरल ऑलिंपियाड स्पर्धेत तिने युगल कथक नृत्य प्रकारात जान्हवीने सुवर्णपदक पटकविले होते.

वाल्हेकरवाडीत महिलांसाठी कराटे प्रशिक्षण

वाल्हेकरवाडीत महिलांसाठी कराटे प्रशिक्षण
पिंपरी, 3 फेब्रुवारी
वाल्हेकरवाडी महिला महामंच आणि युनिव्हर्सल शोतोकान कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कराटे प्रशिक्षण शिबिरात सुमारे तीनशे महिला व विद्यार्थीनींनी सहभागी होऊन स्वसंरक्षणाचे धडे गिरवले.

यामध्ये रोड फाईट, होल्डिग, थ्रॉ इन, हॅन्ड पॉवर, व्हील पॉवर पंन्च, क्विक इम्प्रुवमेन्ट अशा विविध प्रकारावर भर देण्यात आला.याप्रसंगी नगरसेवक राजेंद्र साळुंखे, महिला महामंचच्या अध्यक्षा उषा साळुंखे, पल्लवी शेंडे, जयश्री क्षीरसागर, सोफिया हॉगकॉग, पूर्वा मुकादम, वनिता शेंडे, रजनी कदम, अर्चना भारंबे, स्वाती पाटील, राजश्री नवले, अंजली कोलते, वैशाली पाटी आदी उपस्थित होते.

निगडीत शुक्रवारी तबला महोत्सव

निगडीत शुक्रवारी तबला महोत्सव
पिंपरी, 3 जानेवारी
गुरूवर्य पंडीत वसंतरावजी घोरपडकर स्मृती संस्था आणि नाद मधूर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने पुरब व पश्चिम बाज या विषयावर निगडीमध्ये 8 व 9 फेब्रुवारी रोजी 'तबला महोत्सवाचे' आयोजन केले आहे.

निगडीतील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकार सभागृहात शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याप्रसंगी पंडीत भाईजी गायतोंडे, पंडीत सुधीर माईणकर, ज्येष्ठ तबला बादक पंडीत सुरेश तळवलकर, कथक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, पुणे विद्यापीठ ललीत कला केंद्राच्या विभाग प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर आदी उपस्थित राहणार आहेत.
तबला महोत्सवामध्ये शुक्रवारी (दि. 8) पुण्याचे पंडीत उमेश मोघे, मुंबईचे अनिश प्रधान यांच्या तबला वादनाचा कार्यक्रम होणार आहे. तर शनिवारी झारखंडचे यशवंत वैष्णव, उस्ताद निसार हुसेन खाँ तबला वादन करणार आहेत. यासाठी हार्मोनियमवर पंडीत सुधीर नायक, चिन्मय कोल्हटकर, मिलिंद कुलकर्णी हे साथसंगत करणार आहेत.
महोत्सवाच्या प्रवेशिकांसाठी संतोष साळवे (9881057776), विनोद सुतार (9850075176), अनुजा बोरुडे (9272392320) यांच्याशी संपर्क साधावा, असे अवान संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

युथ कौन्सिलतर्फे 'मारवेल 2013' चे आयोजन

युथ कौन्सिलतर्फे 'मारवेल 2013' चे आयोजन
पिंपरी, 2 जानेवारी
इंदिरा इन्स्टिट्युटमधील काही तरुणांनी एकत्र येऊन यूथ कौन्सिल ऑफ पुणे या सामाजिक संस्थेचीची स्थापना केली आहे. युवावर्गाला एकत्र करत या तरुणांनी 2 ते 4 फेब्रुवारी या कालावधीत 'मारवेल 2013' या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. विविध क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून 'महिला सुरक्षा' या विषयावर जनजागृती करण्याचे या तरुणांनी ठरविले आहे.

निगडीतील यमुनानगर येथील प्रबोधकार ठाकरे क्रीडासंकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून याचे उद्‌घाटन शनिवारी (दि. 2) सकाळी इंदिरा इन्स्टिट्युटच्या अध्यक्षा सरिता शंकर यांच्या हस्ते कण्यात आले. इंदिरा इन्स्टिट्युटमधील 19 ते 23 वयोगटातील काही तरुणांनी सामाजिक जाणीवेतून एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. सर्व उपक्रमांमध्ये महिलांची सुरक्षा यावर भर देण्यात आला आहे.

युथ कौन्सिलतर्फे शहरातील युवक-युवतींसाठी विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले आहे. यामध्ये फुटबॉल, व्हॉलिबॉल, कबड्डी, टेबलटेनिस, बॅडमिंटन, बॉक्स क्रिकेट, कॉप्युटर गेम आदी स्पर्धाचा समावेश आहे. सोमवारी (दि. 4) पिंपरीतील आचार्य अत्रे रंगमंदिरात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिला सुरक्षेवर वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे, आशा शेळके आणि शहरातील काही महिला पोलीस उपनिरीक्षक मार्गदर्शन करणार आहेत. या संपूर्ण उपक्रमातून मिळणारी रक्कम सामाजिक संस्थाना देणगी स्वरुपात दिली जाणार आहे.

युथ कौन्सिलची संकल्पना अक्षय शेळके, शुभम देशमाने, आशिष शेळके, सागर पवार, आशिष तांबोळी यांची असून त्यांनी या संपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले आहे. सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम, नगरसेविका सुलभा उबाळे, आशा शेळके यांचे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.

विनयभंग करणा-या संगणक अभियंत्याला अटक

विनयभंग करणा-या संगणक अभियंत्याला अटक
पिंपरी, 2 फेब्रुवारी
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणा-या हिंजवडी आयटी पार्कमधील एका संगणक अभियंत्याला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. निगडीतील गंगानगर येथील इंटरसेक सायबर कॅफेत शनिवारी (दि. 2) दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

कमलअल्ली अमीन दुकानदार (वय-26, रा. टेल्को सोसायटी, सेक्टर 24, प्राधिकरण) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. या प्रकरणी नऊ वर्षीय मुलीने पोलिसांत फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगानगर येथे इंटरसेक सायबर कॅफेमध्ये संबंधित मुलगी अभ्यासाच्या चौकशीसाठी आली होती. त्यावेळी या कॅफेत असलेल्या कमलअल्ली याने सायबर कॅफेत या मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्याच्या महिला उपनिरीक्षक रूपाली देशमुख तपास करीत आहेत.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज महिला बीट मार्शल

महिलांच्या सुरक्षिततेसाठी सज्ज महिला बीट मार्शल
पिंपरी, 2 फेब्रुवारी
महिलांवरील अन्याय, अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात महिला बीट मार्शलचे पथक तैनात करण्यात आले आहे. आता या महिला बीट मार्शल शहरात गस्त घालून महिलांवरील अत्याचारांच्या, छेडछाडीच्या घटनांवर आळा बसविणार आहेत. आज परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी या बीट मार्शलना सतर्कतेच्या सूचना दिल्या.

दिल्लीतील सामूहिक बलात्कारासारख्या दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या अडचणी समजावून घेण्यासाठी व सुरक्षिततेकरिता पिंपरी-चिंचवड शहरात महिला बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत.

पुणे शहर परिमंडल तीनमध्ये आठ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो. प्रत्येक पोलीस ठाण्यासाठी दोन अशा 16 महिला बीट मार्शल तैनात करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी आज परिमंडल तीनमधील महिला बीट मार्शलना सतर्कतेच्या सूचना दिल्या. अन्यायग्रस्त महिलांना कशा पद्धतीने मदत करता येईल, नियंत्रक कक्षाकडून 'कॉल' आल्यानंतर महिला बीट मार्शल घटनास्थळी किती तत्परतेने पोहचावे, परिस्थिती कशा पद्धतीने हाताळावी यासारख्या सूचना उपायुक्त उमाप यांनी महिला बीट मार्शलना दिल्या.

आमदार चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत कमलनयन बजाज स्कूलची चमकदार कामगिरी

आमदार चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेत कमलनयन बजाज स्कूलची चमकदार कामगिरी

पिंपरी, 2 फेब्रुवारी - प्राधिकरणातील सिटी प्राईड स्कूलमध्ये शनिवारपासून (दि. 2 ) आयोजित करण्यात आलेल्या आमदार चषक आंतरशालेय क्रीडा स्पर्धेमध्ये बास्केटबॉल क्रीडा प्रकारात चिंचवडच्या कमलनयन बजाज हायस्कूलने बास्केटबॉलमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात सीएमएसशाळेचा (0-27) असा पराभव करीत अंतिम सामन्यात विजय प्राप्त केला आहे तर 17 वर्षाखालील मुलांच्या गटात निर्मल बेथने शाळेचा 41-22 असा पराभव करीत अंतिम फेरीत मजल मारली आहे. या स्पर्धेत 45 शाळांमधील एक हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्पर्धेचे उद्‌घाटन महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा आमदार अण्णा बनसोडे यांनी पुरस्कृत केली आहे.

आज दिवसभरात झालेल्या सामन्यांचा निकाल पुढीलप्रमाणे- (कंसात गुण)

बास्केट बॉल 17 वर्षाखालील मुले- (उपांत्य फेरी) - इंदिरा राष्ट्रीय शाळा विरुद्ध सिटी प्राइड शाळा (37-15), कमल नयन बजाज विरुद्ध निर्मल बेथने शाळा (41-22)
अंतिमफेरीत पोचलेल्या शाळा- इंदिरा राष्ट्रीय शाळा आणि कमल नयन बजाज हायस्कूल
बास्केट बॉल 17 वर्षाखालील मुली- (अंतिम फेरी)
सीएमएस विरुद्ध कमल नयन बजाज (0-27), कमलनयन बजाज शाळेचा अंतिम सामन्यात विजय
व्हॉलीबॉल (उपांत्य फेरी)
महापालिका शाळा विरुद्ध वाघेश्वरी विद्यालाय (25-20 व 25-19), सिटी प्राईड विरुद्ध डी.वाय पाटील शाळा (25-17, 5-18)
महापालिका शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश तर सिटी प्राईड शाळा विजयी
व्हॉलीबॉल 17 वर्षाखालील मुली (अंतिम फेरी)
सिटी प्राईड विरुद्ध सेंट अन्ड्रुज (25-11,25-18) सिटी प्राईड विजयी
14 वर्षाखालील मुले (योगासन)
सुशात तरवडे (ज्ञानप्रबोधिनी विद्यालय), सुदर्शन अय्यर, हर्षल भुरे, दिशांत शहा (सिटी प्राईड शाळा), सौरव कळसे व धीरज जैस्वाल (संत तुकाराम प्राथमिक विद्यालय)
17 वर्षाखालील मुले (योगासन)
दीपक जैस्वाल, मोहसीन शेख (संत तुकाराम विद्यालय), जतीन आव्हाड (ज्ञानप्रबोधनी नवनगर विद्यालय), राकेश कदम, दुर्गेश निखार, घनश्याम बांकर (एम.एम.विद्यामंदिर)

डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकीचे पत्र

डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकीचे पत्र
पिंपरी, 2 फेब्रुवारी
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना पुन्हा धमकीचे पत्र आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. परदेशी यांनी शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात हाती घेतलेली कारवाईची धडक मोहीम थांबविण्यासाठी एका बनावट नावाने धमकी देणारे पत्र टपालाने त्यांच्या कार्यालयात प्राप्त झाले आहे. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आयुक्तांच्या संरक्षणात वाढ केली आहे. त्यांच्या कार्यालयात तसेच निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतल्यानंतर डॉ. श्रीकर परदेशी यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीमच हाती घेतली. शहरात बेकायदा बांधकामे करणा-या माफियांचे त्यामुळे धाबे दणाणले आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी बांधकाम माफियांकडून विविध दबावतंत्रांचा वापर करण्यात येत आहे. आयुक्त परदेशी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिवे मारण्याची धमकी देणारे पत्र 17 जुलै 2012 रोजी आले होते. त्यानंतर आयुक्तांना 24 तास सशस्त्र पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. पोलिसांनी ते धमकीचे पत्र पाठविणा-याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापि त्यांच्या हातात काहीही ठोस माहिती मिळू शकलेली नाही.

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अधिक तीव्र करीत उपमुख्यमंत्री अजित पवार व आयुक्त परदेशी यांनी धमकीच्या पत्राला कृतीने उत्तर दिले. शहरात बेकायदा बांधकाम करणा-या 811 जणांविरुद्ध महापालिकेने फौजदारी गुन्हे दाखल केले असून आतापर्यंत 177 बेकायदेशीर बहुमजली बांधकामे जमीनदोस्त केली आहेत.

व्यापारी वापराच्या बेकायदा इमारतींनंतर महापालिकेने आता बेकायदा निवासी बांधकामांना नोटीस बजावल्या आहेत. त्यामुळे शहरातील वातावरण पुन्हा तापले आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार विलास लांडे यांनीही पत्रकार परिषद घेऊन आयुक्तांना कारवाई थांबविण्याचा इशारा दिला होता. त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना आठ दिवसांत हा प्रश्न सोडविण्याचा अल्टिमेटमही दिला होता. ती मुदत संपून गेली तर अद्याप आमदार महोदय काही रस्त्यावर उतरल्याचे नागरिकांना पहायला मिळालेले नाही.

लोकप्रतिनिधींच्या दबावाबरोबरच बांधकाम माफियांकडून धमक्यांची पत्रे पाठविणे सुरूच आहे. तरी देखील श्रीकर परदेशी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसारच ही कारवाई सुरू असल्याचे त्यांनी वारंवार स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याने लोकप्रतिनिधींची चांगलीच गोची झाली आहे.

आयुक्तांना नव्याने मिळालेल्या धमकीच्या पत्रावर पिंपळे निलख येथील विशालनगरच्या राजेंद्र महादेव घोंगडे पाटील यांचे नाव लिहिलेले असले तरी ते नाव व पत्ता बनावट असल्याचा पोलिसांना संशय आहे. अनधिकृत बांधकामांवरील कारवाई थांबविली नाही तर त्यांचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे.

हस्ताक्षरावरून पत्र पाठविणा-याचा शोध घेण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. धमकीचे मागील पत्र पाठविणा-याचा तपास अद्यापि लागलेला नाही. त्यामुळे नवे पत्र पाठविणा-यापर्यंत पोलीस पोहचू शकतील का, या विषयी नागरिकांच्या मनात साशंकता आहे. तूर्त तरी पोलिसांनी आयुक्तांच्या कार्यालयात व निवासस्थानी बंदोबस्त वाढवून प्रतिबंधात्मक उपाययोजना केली आहे.