Monday 6 August 2018

पिंपरी डिजिटली नंबर वन

पिंपरी - नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जास्तीत जास्त व्यवहार ऑनलाइन करण्याचे आवाहन केले. यामुळे बहुतांश सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांत ऑनलाइन पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली. सध्या देशातील १०० स्मार्ट सिटीतून डिजिटल पेमेंटचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहराने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे ऑनलाइन पेमेंटबाबत देशात पहिल्या पाच शहरांत राज्यातील इतर कोणतेही शहर नाही.

पवना, चासकमान भरले

पावसाने पुन्हा हजेरी लावल्यामुळे पानशेत आणि खडकवासला या दोन प्रमुख धरणांनंतर पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण; तसेच जिल्ह्यातील चासकमान ही धरणेही शंभर टक्के भरली आहेत.

मेट्रोमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी
महामेट्रोच्या पिंपरी ते हॅरिस पूल या दरम्यान सुरू असलेल्या कामामुळे वाहतुकीचा पुरता खेळखंडोबा झाला आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता महामेट्रो रस्त्यांची एक लेन रात्रीच्या वेळी बंद करीत असल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. मेट्रोकडून नेमण्यात येणाऱ्या वॉर्ड आणि वाहतूक अधिकाऱ्यांकडून कोणतीच उपाययोजना करण्यात येत नसल्याने या कोंडीत भर पडत आहे.

आयुक्तांसमोर विभागवार रचनेचे लक्ष्य

गुन्हेशाखेसह वाहतूक विभागाची रचना करण्यास सुरुवात

नवनियुक्त पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन पिंपरी-चिंचवडच्या गुन्हेशाखा आणि वाहतूक विभागाची रचना करणार आहेत. सरकारने आयुक्तालयाला मंजुरी देताना उपायुक्त आणि सहायक आयुक्त विभागाची रचना करून दिली. मात्र, शहरातील महत्त्वाच्या गुन्हेशाखा आणि वाहतूक विभागाची रचना करून देण्यात आली नसल्याने सर्वप्रथम आयुक्तांनी या रचनेकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे.

पिंपरी महापौर निवडीच्या दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उन्माद

वाहनांच्या टपावर, जेसीबीवर बसून भंडाऱ्याची उधळण

पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदी भाजपचे राहुल जाधव यांची निवड झाली, त्याचा आनंद साजरा करताना जाधव समर्थक तसेच भाजप कार्यकर्त्यांनी अक्षरश: उन्माद केल्याचे दिसून आले. ढोल ताशांच्या दणदणाटात सुमारे १०० पोती भंडारा उधळून त्यांनी पालिका मुख्यालयाचा रंग पालटून टाकला आणि त्यातच पाऊस पडल्याने सर्वत्र पिवळा चिखल तयार झाला, त्याचा नागरिकांना त्रास झालाच, वाहने अडकून पडली, काही दुचाकीस्वार घसरून पडण्याचेही प्रकार घडले.

पोलिसांकडे थकले महापालिकेचे दहा लाख

पिंपरी - महापालिकेने पोलिस प्रशासनाला भाडेतत्त्वावर दिलेल्या शहराच्या विविध भागांतील मिळकतींचे २०१७-२०१८ या वर्षातील दहा लाख २५ हजार ९९३ रुपये भाडे थकले असल्याचे माहिती कायद्यात समोर आली आहे. 

महापौर जाधव यांंची चापेकर स्मारकास भेट

महापौर जाधव यांंची चापेकर स्मारकास भेट
सिंहसन न्यूज : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन महापौर राहुल जाधव यांनी आज (रविवार) चिंचवड येथील चापेकर राष्ट्रीय संग्रहालयास भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी चापेकर राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी पाठपुरावा करणार असून चापेकर स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

शासकीय अधिकारी आणि कर्मचा-यांना जानेवारी पासून वेतनलाभ

मुंबई  : राज्य शासनाच्या अधिकारी आणिकर्मचारी यांना २०१७ मधील थकीत महागाई भत्त्यासह सातव्या वेतन आयोगाचा वेतनलाभ जानेवारी २०१९ पासून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज वर्षा निवासस्थानी विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांसमवेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

Pune: PMRDA set to take PMPML route, may become part of transport body board

The Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) may soon find a place in the board of the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML).

चलती का नाम ‘पीएमपीएमएल’

बसेसचे ब्रेकडाऊन 30 हजारांवर, जादा रकमेच्या निविदेमुळे चक्क बसेसमधील फायर अ‍ॅण्ड सेफ्टी ऑडिट रेंगाळले, देखभाल दुरुस्तीअभावी प्रवाशांचा असुरक्षित प्रवास, गळक्या आणि 422 स्क्रॅप बसेसचा भरणा, ठेकेदारांच्या ताब्यातील बस अपघाताची मालिका कायम, इंधन दरवाढीमुळे दर महिन्याला दोन लाखांचा अतिरिक्त बोजा, ठेकेदारांकडून महामंडळाच्या आदेशाला केराची टोपली अशा विविध घटनांमुळे पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) आर्थिक कोंडीचा फटका सहन करावा लागत आहे. त्यामुळे पीएमपीएमएलचा टॉप गिअर नक्की कशामध्ये गुंतला आहे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

मुद्रा योजनेवर महाराष्ट्राची छाप

पुणे - प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल २०१५ पासून ते जुलै २०१८ अखेरपर्यंत ५७ हजार ४४३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यात आतापर्यंत एक कोटीहून अधिक कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत. या योजनेंतर्गत कर्ज वितरित करण्यात महाराष्ट्र देशात अव्वल ठरले आहे. 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या संपूर्ण देशात ६४८ शाखा सुरु होणार

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ऑगस्टला बहुप्रतीक्षित इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा शुभारंभ करणार आहेत. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटल्याप्रमाणे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची प्रत्येक जिल्ह्यात एक शाखा असेल आणि हे ग्रामीण भागातील आर्थिक व्यवहारांवर लक्ष केंद्रित करतील.

Mhalunge residents ready to sell votes for road

After fi ve years of attempts to draw attention to a half-done approach road in the area, 5,000 locals have pledged to vote for the political party that gets it done.

रिक्त जागा वेबसाईटवर प्रसिद्ध करा : अभय वाघ

व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या पार पडलेल्या प्रवेश फेर्‍यानंतर रिक्त जागांचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक असून, रिक्त जागांचा तपशील महाविद्यालयांना संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे निर्देश राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांनी सर्व संस्थांना दिले आहेत. 

आता फोनवर प्रीस्क्रिप्शन नाही

आजारी पडला अथवा त्रास झाल्यास फोनव्हॉट्सअप, एसएमएसद्वारे रुग्णाने औषधोपचाराची मागणी केल्यास डॉक्टरांनी रुग्णांना प्रीस्क्रिप्शन देऊ नये, अशा सूचना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) राज्य शाखेने दिल्या आहेत. त्याबाबतचे परिपत्रक लवकरच डॉक्टरांच्या हाती पडणार आहे. 

Get set to junk small eats while in theatres

Soon, you can forget munching popcorn or any other snack of your choice and sipping a drink, as you catch the action on the big screen in movie theatres, if you are in Maharashtra. In the tussle to make multiplexes amenable to allowing audiences to bring in their own (outside) food, the state government is all set to invoke Section 121 of the Maharashtra Cinemas (Regulation) Rules, 1966, which bans sale and supply of any food or drink inside the screening auditorium.

केंद्र शासनाच्या दिव्यांग पुरस्कारासाठी आवाहन

हडपसर - केंद्र शासनाच्या विकलांगजन सशक्तीकरण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्ती व संस्था यांना राष्ट्रीय पुरस्कार दिला जाणार आहे. यासाठी जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. या पुरस्कारासाठी आलेल्या प्रस्तावमधूनच महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्फे दिल्या जाणा-या अपंग कल्याण राज्य पुरस्काराची निवड करण्यात येणार आहे. पुरस्काराचे अर्ज www.disabilityaffairs.gov.in या वेबसाईटवर उपल्बध आहेत. सदर प्रस्ताव 14 ऑगस्ट पर्यंत जिल्हा समजकल्याण कार्यालयात सादर करावेत, असे अवाहन जिल्हा समाजकल्याण  अधिाकारी दिपक चाटे यांनी केले आहे.