Thursday 27 July 2017

लोकाभिमुख 'सारथी' पॅटर्न

याच भूमिकेतून औद्योगिकनगरी म्हणून ठसा उमटविलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कारभार पारदर्शक करण्यासाठी तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी 'सारथी' हेल्पलाईन सुरू केली होती.

ग्रेडसेपरेटर रस्ता पुन्हा सुरू

पिंपरी - शहरात सुरू असणारी विकासकामे पूर्ण करण्यासाठी कासारवाडी ते खराळवाडीदरम्यानचा ग्रेडसेपरेटर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र सेवा रस्त्यावर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे ग्रेडसेपरेटर बुधवारपासून पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. दरम्यान, या रस्त्याचा पुन्हा आढावा घेऊन त्यासंदर्भातील निर्णय वाहतूक पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. 

Rs 7.88 lakh stolen from 3 ATMs in PCMC limits

PUNE: Miscreants with a clear understanding about the functioning of automated teller machines (ATMs) stole Rs 7.88 lakh from three ATM kiosks of a bank in Old Sangvi and Pimple Gurav. The incident occurred on June 14, but came to light only on ...

महापौरांच्या दाखल्यावर तीन ऑगस्टला सुनावणी

पिंपरी - महापौर नितीन काळजे यांच्या कुणबी जात दाखल्याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या दक्षता पथकाने त्यांना ‘क्‍लीन चिट’ देणारा अहवाल दिला आहे. ज्या मूळ कागदपत्रांच्या आधारे हा अहवाल दिला, ती कागदपत्रे द्यावी. संबंधित कागदपत्रे तपासल्यानंतरच याबाबत पुढील भूमिका मांडता येईल, असा युक्तिवाद तक्रारदार घनश्‍याम खेडकर यांच्या वकिलाने बुधवारी समितीसमोर झालेल्या सुनावणीत केला. त्यामुळे आता या प्रकरणाची अंतिम सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.

चर्चेचे गुऱ्हाळ कुठवर?

पिंपरी  - पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह विविध शासकीय अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली खरी; पण ही बैठक म्हणजे निव्वळ देखावाच होता, असा सणसणीत आरोप ‘फ्री अप हिंजवडी’च्या समन्वयकांनी केला. पालकमंत्री म्हणून हिंजवडीतील प्रश्‍न सोडविण्याबाबत आपण किती गंभीर आहोत, हे दाखविण्याचाच या बैठकीतून प्रयत्न झाला. गेल्या आठ-दहा वर्षांत अशा बऱ्याच बैठका झाल्या. अनेक नेते, मंत्री, अधिकाऱ्यांनी दौरे केले. समस्या मात्र ‘जैसे थे’ राहिल्या. बापट यांनी घेतलेली ही बैठकही निष्फळ ठरण्याची खात्रीच सर्वांना अधिक वाटत आहे.

देहुरोड वीर स्थळावर कारगील शहिदांना अभिवादन

देहुरोड, (वार्ताहर) – कारगील युद्धात तसेच देशाची सेवा करताना शहीद झालेल्या अधिकारी व जवानांचे स्मरणार्थ बुधवार दि. 26 ला देहुरोड लष्करी भागातील वीर स्थळावर शहीद अधिकाऱ्यांच्या तीन पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

‘त्या’ तक्रारीवर काय केले?

सीमा सावळे : कायदा विभागाला सवाल
पिंपरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यालयाच्या संकेतस्थळावर पालिकेतील टक्केवारीच्या नावाखाली केलेली तक्रार कोणी उघडकीस आणली? याची माहिती स्थायी समिती सभेत देण्यास प्रशासनाने नकार दिला. त्यावर या तक्रारीत आमची नावे आहेत. पालिकेचे पदाधिकारी म्हणून कायदा विभागाने पुढील कोणती कार्यवाही केली? याची माहिती पुढच्या स्थायी सभेत प्रशासनाने सादर करावी, अशी सूचना स्थायीच्या सभापती सीमा सावळे यांनी केली.

करदात्यांच्या पैशातून नगरसेवकांना विम्याचे “कवच’

पिंपरी – महापालिकेचे आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या कुटुबियांचा पाच लाख रूपयांचा आरोग्य विमा पालिकेच्या तिजोरीतून उतरविला जाणार आहे. त्यामुळे करदात्यांच्या पैशातून लोकप्रतिनिधी व त्यांच्या कुटुंबियांचा विमा महापालिका उतरविणार आहे. मात्र, महापौर नितीन काळजे यांच्यासह पाच नगरसेवकांनी विमा नाकारला आहे. विमा योजनेचा लाभ आम्हाला नको, तसे पत्र नगरसेवकांनी वैद्यकीय विभागाला दिले आहे.

उद्योगनगरीत ९९ इमारती, वाडे धोकादायक

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असणाºया पिंपरी-चिंचवड शहरात आजही पुरातन वाडे अस्तित्वात आहेत. मात्र, हे वाडे आता जीर्ण झाले असल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून असे वाडे आणि ...

ई-कचºयामुळे आरोग्याला धोका

आयटी पार्क व उद्योगनगरी असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये संगणक, त्याचे सुटे भाग, मोबाईल, केबल्स, सेल्स, किबोर्ड, माऊस, हेडफोन आदी ई-कचरा मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. सध्या शहरात दररोज दहा ते ...

Waste pickers not paid salary for a month demonstrate against PCMC

Tired of going about their thankless daily task with no remuneration for several weeks from the civic authority, waste pickers who work at the zonal wards A and F ...

सार्वजनिक स्वच्छतागृहांसाठी शूल्क मोजावे लागणार

खासगी संस्था नेमणार : “पे ऍण्ड युज’ तत्व लागू होणार
पिंपरी – स्वच्छ भारत अभियानांतर्गत हागणदारीमुक्त शहर करण्यासाठी घराघरात स्वतंत्र शौचालय बांधण्यावर पालिकेचा भर आहे. परंतु, सार्वजनिक स्वच्छतागृहांकडे पालिकेचे जाणिवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. देखभाल दुरूस्तीअभावी या स्वच्छतागृहांची दूरवस्था झाल्याने शहरातील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहे “पे ऍण्ड युज’ तत्वावर चालवली जाणार आहेत. यापुढे नागरिकांनाही या स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी शूल्क मोजावे लागणार आहेत.

चिंचवड परिसराला साथीच्या आजाराचा विळखा

रुग्णांची संख्या वाढली : रुग्णालये, दवाखाने फुल्ल
चिंचवड – पावसाळी वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्‌भवू लागल्या आहेत. अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी, थंड हवा, दूषित पाणी पुरवठा, अस्वच्छतेच्या तक्रारी आदींमुळे चिंचवड परिसरात साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. यामुळे सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांत रुग्णांची गर्दी वाढत आहे.

वृक्ष तोड प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करा

हरित लवादाचे आदेश : निगडी- देहूरोड रस्ता रुंदीकरण प्रकरण
पिंपरी – निगडी ते देहूरोड दरम्यान वृक्षतोड संबंधात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) प्रतिज्ञापत्र सादर करावे, असे आदेश हरित लवादाने आदेश दिले आहेत.

'मेट्रो' प्रकल्पासाठी ४८६ झाडांचा बळी

पिंपरी : ग्रीन सिटीचा लौकीक असणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील ४८६ झाडे मेट्रो प्रकल्पासाठी काढण्यात येणार आहेत. महापालिका आयुक्तांनी त्यासाठी थेट परवानगी दिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. प्रकल्पासाठी काढण्यात येणा-या ...