Wednesday 30 May 2018

85 हजार कुटुंबांना 24 तास पाणी

पिंपरी  - अमृत योजनेअंतर्गत शहरात जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील ८५ हजार ४८ कुटुंबांना २४ तास पाणीपुरवठा होणार आहे. या कामासाठी सुमारे २४० कोटी ४६ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. 

[Video] अखेर पिंपरी चिंचवड करांना दिलासा

पिंपरी चिंचवड । 2008 पासूनचा शास्तीकर माफ

[Video] धार्मिक आणि राजकीय स्टेटस असलेल्या गायींची पिंपरीत काय अवस्था

Pimpri Chinchwad | 85 Kg Plastic Found In Cow During Surgery

बेशिस्तीमुळे होतेय कोंडी

रावेत, ता. २८ : तळवडे येथील ‘सॉफ्टवेअर पार्क’ चौकात बंद असणारे वाहतूक नियंत्रक दिवे, तसेच पोलिस कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. बेशिस्तपणे वाहनचालकही याला काही अंशी कारणीभूत असले, तरी सॉफ्टवेअर पार्कसह तळवडे गावठाण चौकातही वाहतूक नियंत्रक दिवे सुरू करावेत. तसेच, नियमित पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

अतिक्रमणाकडे काणाडोळा

पिंपरी : मोरवाडी चौक ते इंदिरा गांधी पूल मार्गालगत बेकायदा कपडे विक्रीची दुकाने लावली जात आहेत. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक काणाडोळा करत आहे. पिंपरी पुलाकडे जाण्याच्या मार्गावर डावीकडे काही महिन्यांपूर्वीपर्यंत मोजकीच दुकाने होती; परंतु हळूहळू त्यामध्ये वाढ होत गेली. सध्या या परिसरात सुमारे ८० पेक्षो अधिक दुकाने आहेत. यापैकी बहुसंख्य दुकानदारांकडे अधिकृत वीजमीटर नाही. तरीही त्या दुकानांमध्ये विजेची सुविधा असल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

शहरबात पिंपरी : पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाचं ‘घोडं गंगेत न्हालं!’

जुन्या हद्दीसह नव्या कार्यक्षेत्रातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आव्हान

अजित पवार यांचे आज बैठकांचे सत्र

पिंपरी  - केंद्र व राज्य सरकारविरोधात केलेल्या हल्लाबोल आंदोलनामुळे निर्माण झालेले वातावरण, वर्षभरात होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटनेतील मरगळ झटकून पुन्हा आक्रमक पवित्रा घेण्याच्या दृष्टीने पावले टाकण्यास सुरवात केली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी (ता. ३०) शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन संवाद साधणार आहेत.

आळंदी रोड येथील साई मंदिरात रविवारी साईभक्तांच्या मेळाव्याचे आयोजन

पिंपरी (Pclive7.com):- श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्षानिमित्त होणा-या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी येत्या रविवारी (दि.३) साईभक्तांच्या मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आळंदी रोडवरील वडमुखवाडी येथील साई मंदिरात हा मेळावा होणार आहे, अशी माहिती श्री साई सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष नेलगे यांनी दिली आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ण शास्तीकर माफ; मंत्रीमंडळात निर्णय झाल्याची आमदार जगतापांची माहिती

पिंपरी (Pclive7.com):- राज्य सरकारच्या मंत्री मंडळाच्या बैठकीत पूर्वलक्षी प्रभावाने पूर्ण शास्तीकर माफ करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निर्णयाने पिंपरी चिंचवडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

डी.वाय.पाटील रूग्णालयात गैरव्यवहार; आमदार जगतापांची कारवाईची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल ऑड रिसर्च सेंटर मध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याचे आढळून येत आहे. रूग्णालयामध्ये येत असलेल्या गरिब व गरजू रूग़्णांची पिळवणूक रूग्णालय व्यवस्थापनाकडून होत आहे. तरी या रूग्णालयावरती तातडीने कारवाई करावी अशी मागणी भाजपा पिंपरी चिंचवड अध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी लेखी निवेदनाव्दारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे केली आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक हैराण

रावेत. ता. २८  : रूपीनगर,जोतिबानगर, तळवडे परिसरांतील वीजपुरवठा अचानक खंडित होत असल्याने नागरिकांसह लघुउद्योजक हैराण झाले आहेत. ही समस्या तातडीने सोडवावी, अशी मागणी होत आहे.

सांगवीत नागरीक कचराकुंड्याभोवतीच टाकतात कचरा

जुनी सांगवी : जुनी सांगवीत रस्त्याकडेला ठेवण्यात आलेल्या कचराकुंड्यामधे नागरीक कचरा टाकण्याऐवेजी कचराकुंड्यांभोवती कचरा भिरकावुन टाकण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. दुचाकी,चारचाकी वहानांतुन कुंड्याचे दिशेने फेकलेला कचरा कुंड्यात न पडता कुंड्यांभोवती पडतो. हा कचरा भटकी जनावरे, कुत्री अस्तव्यस्त करून रस्त्यावर आणतात.

वीस लाखांचे गोमांस खराळवाडीमध्ये जप्त

पिंपरी - अहमदनगरहून नवी मुंबईला जाणारा टेंपो पिंपरी पोलिसांनी सापळा रचून जप्त केला व सुमारे 20 लाख किमतीचे गोमांस जप्त केले. ही कारवाई मुंबई-पुणे महामार्गावर खराळवाडी येथे मंगळवारी (ता. 29) पहाटे तीनच्या सुमारास करण्यात आली. दरम्यान, याप्रकरणी अटक केलेल्या दोघांना न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत (ता. 1) पोलिस कोठडी सुनावली आहे. 

21 कंत्राटदारांना “शॉक’

  • वीजवाहिन्या तोडल्या: महावितरणला लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान
पुणे  – मागील वर्षभरामध्ये पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील विविध कामांसाठी जेसीबी किंवा इतर यंत्राद्वारे झालेल्या खोदकामात तब्बल 318 ठिकाणी महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्यात आलेल्या आहेत. याप्रकरणी महावितरणकडून 21 कंत्राटदारांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वीजवाहिन्या तोडल्यामुळे महावितरणला लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीसह ग्राहकांनाही त्रास सहन करावा लागला आहे.

Water supply to PCMC areas likely to be hit as farmers protest at Pavana dam

The agitation continued for five hours, during which the agitators did not allow Pavana dam officials to release water for Pimpri-Chinchwad.

PMPML cuts a sorry figure with 13,200 breakdowns in 12 months

PUNE: A total of 13,206 PMPML bus breakdowns were reported in 12 months from April 2017 to this March, showcasing the poor upkeep of the public transport vehicles and the hassles of commuters.

बँकांचा ३० आणि ३१ मे रोजी देशव्यापी संप

चौफेर न्यूज – उच्च वेतनासाठी देशभरातील बँकांनी बुधवार ३० आणि ३१ मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत. आठवड्याच्या वारी बँका बंद असल्याने नागरिकांची बँकेची कामे खोळंबण्याची शक्यता आहे. याबरोबरच बँका बंद असल्याने एटीएममध्येही खडखडाट होऊ शकतो. महिनाअखेर दरम्यान हा संप असल्याने नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे बँकांची महत्त्वाची कामे असल्यास ती आजच पूर्ण करावीत. इंडियन बँक असोसिएशन (आयबीए)ने प्रस्तावित केलेल्या २ टक्के पगारवाढीचा निषेध म्हणून संपाची हाक देण्यात आली आहे. मुंबईतील फोर्ट भागात असलेल्या स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर काही बँक कर्मचारी निदर्शने करणार असल्याचीही माहिती समोर येत आहे.

लोहमार्ग पोलिसांची वेबसाइट सुरू

पुणे लोहमार्ग पोलिसांनी नागरिकांना वापरासाठी सोयीची आणि अद्ययावत अशी वेबसाइट सुरू केली आहे. अंध व्यक्तींनादेखील 'स्क्रीन रीडर' या सॉफ्टवेअर अॅपद्वारे ही वेबसाइट वापरता येणार आहे. त्याबरोबरच आता रेल्वेत एखादी वस्तू अथवा कागदपत्रे हरवल्याची व सापडल्याची तक्रार ऑनलाइन देण्याची सोय करण्यात आली आहे.

रेल्वेने सुरु केलेल्या ‘या’ सुविधेचा कोट्यावधी प्रवाशांना होणार फायदा

नवी दिल्ली : रेल्वेच्या तिकीट बुकिंगदरम्यान जर तुमचे तिकीच कन्फर्म होणार की नाही याबाबत साशंक असाल तर आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरुन तुम्हाला नवीन सुविधेचा फायदा होऊ शकतो. यावरुन तुम्ही हेही जाणून घेऊ शकता की तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची किती शक्यता आहे. यामुळे प्रवाशांना प्रवासाचे प्लानिंग करणे सोपे होऊ शकते. आयआरसीटीसीकडून सोमवारी मध्यरात्रीपासून ही सेवा सुरु करण्यात आली आहे.

एक भीषण आरोग्य संकट (भाग- २)

विषाणूसंबंधी
सूक्ष्मजीवशास्त्राच्या वंशावळीनुसार, निपाह हा विषाणू हेनिपाव्हायरस या प्रजातीतील पॅरामिक्‍सोव्हायरिडी या कुलातील सदस्य आहे. त्याला वैद्यकीय परिभाषेत छळत या संज्ञेने ओळखले जाते. ही साथ प्राण्यातून माणसांमध्ये आणि नंतर एका माणसाकडून दुसऱ्याला होत राहते. संशोधनामध्ये सिद्ध झाले की, फळे खाऊन उपजीविका करणाऱ्या एका विशिष्ट वाटवाघळापासून हा पसरतो. संसर्ग झालेल्या वटवाघुळांनी खाल्लेल्या खजुराच्या किंवा फळाच्या संपर्कात आल्याने ही साथ पसरते. मलेशियामध्ये निपाह आजार प्रथम वटवाघळापासून डुकरांना झाला. तो एका डुकरापासून दुसऱ्या डुकरामध्ये पसरला आणि डुकरांपासून माणसांमध्ये पसरला.

तंबाखू सेवन आणि परिणाम (भाग १ )

31 मे हा जागतिक तंबाखूू विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना रोखण्याचा हा दिवस या निमित्ताने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थामुळे होणाऱ्या जीवघेण्या परिणामांची माहिती देणारा हा लेख. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्या आजूबाजूला सर्वत्र दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणारी व धूम्रपान करणारी मंडळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

राज्यातील महामार्गांवर उभारण्यात येणार १६० ठिकाणी स्वच्छतागृहे

मुंबई : राज्यातील महामार्गांवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची कुचंबणा लवकरच दूर होणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या महामार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी १६० ठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले.