Saturday 30 September 2017

'रोझलँड'वर अभिनंदनाचा वर्षाव

via Sakaal

Roseland Society bagged national level prestigious Swachh Bharat Mission award for category - 'Innovative ideas & practises under RWH'. Award will be given on 2nd Oct, Gandhi Jayanti on the occasion of 3rd Anniversary of SBM in Delhi. From Maharashtra only two - Rosland & Military College will receive Swachhata Award in the hands of PM Narendra Modi

देशातील सुयोग्य शहरांच्या यादीत पिंपरी-चिंचवड पाचव्या स्थानी

पिंपरी-चिंचवड हे शहर अत्यंत वेगाने विकसित झालेले शहर आहे. आता या शहराचा समावेश स्मार्ट सिटीत झाला आहे. स्वच्छ भारत अभियानातही राज्यात पहिला आणि देशात नववा क्रमांक मिळाला होता. त्यानंतर सुयोग्य शहराच्या यादीत शहरास पाचवा क्रमांक मिळाला आहे, ही भूषणावह बाब आहे. आपले शहर रहिवाशांसाठी सर्वोत्तम शहर आहे, यावर मोहोर उमटविली आहे. - श्रावण हर्डीकर,
महापालिका आयुक्त

पिंपरी-चिंचवड रेल्वे स्थानक : लोकसंख्या सातपट, पुलाची रुंदी तेवढीच

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर व परिसराची लोकसंख्या सुमारे तीन लाख असताना शहरातून जाणाºया पाच रेल्वे स्थानकांवर पादचारी पूल उभारण्यात आले. मात्र, सध्या हीच लोकसंख्या वीस लाखांच्या वर गेलेली असतानाही पादचारी पुलांची रुंदी तेवढीच ...

पिंपरी महापालिकेकडून सांडपाणी थेट मुळा नदीत

पिंपरी - शहरातील सांडपाणी पवना आणि इंद्रायणी नदीत सोडले जात असल्याचे यापूर्वीच उघड झाले आहे. मात्र आता मुळा नदीतही सांडपाणी सोडले जात असल्याचा धक्‍कादायक प्रकार ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत उघडकीस आला आहे. मुळा नदीत आता राडारोड्यासह सांडपाणीही सोडण्यात येत असल्याने तिची गटारगंगा झाली आहे. 

Pimpri Chinchwad civic panel strips garden dept of buying powers

PIMPRI CHINCHWAD: The civic authorities have stripped the garden department of its powers to invite bids to puchase goods, and gave the engineering department the responsibility. The standing committee took this decision as the garden department, ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शहरात पाच ठिकाणी पथसंचलन

पिंपरी – विजया दशमीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शनिवारी (दि.30) शहराच्या विविध भागांत पाच ठिकाणी पथसंचलन होणार आहे.
चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृृहाजवळील धोका मैदान व जीवननगर येथे सकाळी सात वाजता पथसंचलन होणार आहे. आकुर्डीमध्ये छत्रपती शाहू उद्यानासमोर,बिजलीनगर येथील विश्‍वेश्‍वर मंदीराजवळ सकाळी सव्वा सात वाजता पथसंचलन होणार आहे. देहू गटाच्या वतीने म्हेत्रे उद्यान, मोरेवस्ती आणि चिखली येथे सकाळी साडे सात वाजता पथसंचलन केले जाणार आहे.

क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्तांची उचलबांगडी

पिंपरी – महापालिकेच्या क्रीडा विभागाच्या जबाबदारीतून सहायक आयुक्त योगेश कडूसकर यांना कार्यमुक्‍त करण्यात आले. तर यापुढे क्रीडा विभागाची जबाबदारी सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. असा निर्णय महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घेतला.

पिंपरीतील प्रलंबित प्रश्‍नांसाठी पृथ्वीराज चव्हाणांना साकडे

चौफेर न्यूज   पिंपरी-चिंचवड महापालिकेशी संबंधित प्रश्‍नांवर कॉंग्रेसने येत्या लोकसभा व विधानसभेच्या अधिवेशनात आवाज उठवावा, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे त्यांची भेट घेऊन केली.

विधीमंडळात भ्रष्टाचारावर आवाज उठवू – अजित पवार

पिंपरी – महापालिकेतील भ्रष्टाचार, गैरव्यवहारावर भापकर यांनी दिलेल्या सीडी व कागदपत्रानुसार राज्याच्या दोन्हीही सभागृहात आम्ही आयुदांचा वापर करुन आवाज उठविणार आहे, असे मत अजित पवार यांनी व्यक्‍त केले. सत्ताधारी भाजपच्या सहा महिन्यातील अनेक प्रकरणाबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पंधरा मिनिटे चर्चा केली. गैरकारभारावर विधीमंडळात लक्षवेधी करुन आवाज उठविण्यात यावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

'सहामाहीत भाजप अनुत्तीर्ण'

'पिंपरी-चिंचवड महापालिकेतील गेल्या सहा महिन्यांतील भारतीय जनता पक्षाचा कारभार अपयशी ठरला असून, बहुमताच्या बळावर लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम चालू आहे,' असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम, अजित पवारांचा आरोप

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताच्या जोरावर भाजपाच्या वतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले जात आहे, एका मिनिटात बजेट मंजूर केले जाते, विरोधकांची कामे होऊ दिली जात नाहीत, विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम केले जात ...

दिवस बदलल्यावर ‘ते’ कुठे असतील बघा; अजितदादांचा जगताप-लांडगेंना सूचक इशारा

पिंपरी (प्रतिनिधी):- सध्या राज्यमंत्री मंडळात ‘वर्णी’ लागावी यासाठी एकीकडे शहरातले नेते प्रयत्न करत असताना अजित पवारांनी मात्र या नेत्यांना त्यांची जागा दाखऊन दिली आहे. आता हे नेते मंत्रीपदाची स्वप्ने पाहत आहेत, पण या नेत्यांना ‘मी लहानाचे मोठे केले’, ‘त्यांची ओळख माझ्यामुळे झाली’ ते ‘स्वार्थासाठी’ तिकडे गेले, ज्यावेळी दिवस बदलतील त्यावेळी ते कुठे असतील ते तुम्ही पाहा अश्या शब्दात अजित पवारांनी शहरातील नेत्यांची जागा काय आहे हे दाखवून दिले आहे.