Wednesday 29 August 2018

[Video] वाहतूक पोलिसांच्या हप्तेखोरीमुळे रिक्षाचालक मुजोर, निगडी-दापोडी बीआरटी मार्ग फेल होण्याची शक्यता


PCMC commissioner gives a nod to new parking policy

Initiative to decongest roads, encourage citizens to use public transport

Day 5 | PMPML yet to catch up with BRTS tech: Doors of 100 buses fail to open

On the fifth consecutive day after its launch, the Bus Rapid Transport System (BRTS) track between Nigdi and Dapodi continued to cause confusion among commuters as PMPML buses plied on the track built for them, but also used the service road outside.

शहरबात : नियोजनशून्य बीआरटी

पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी ते दापोडी या १२ किलोमीटर अंतराचा बीआरटी प्रकल्प पाच वर्षांपासून रखडलेला आहे.

PMPML bus breaks down on Nigdi BRTS corridor

A PMPML bus broke down along the newly inaugurated Nigdi-Dap ..

Maha-Metro digs into fully operational BRTS lane putting Nigdi-Dapodi commuters in a jam

Even as Pimpri-Chinchwad municipal corporation launched its bus rapid transport system (BRTS) on Nigdi - Dapodi stretch, Maha-Metro has continued its work in the BRTS lane which poses a question on future of the BRTS.
Pune,Maha-Metro,BRTS lane

पालिकेसमोर आता मेट्रोचे काम

पिंपरी - महापालिका भवनासमोरील सेवा रस्त्यावर महामेट्रोने या आठवड्यात कामाला सुरवात केल्यानंतर शहरवासीयांना खऱ्या अर्थाने वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकादरम्यान मेट्रोचे वीस खांब उभारण्यात येणार आहेत. त्यांच्या पायासाठी पाच ठिकाणी खोदकाम करण्यात येत आहे. या कामाला किमान सहा-सात महिने लागणार असल्याने शिल्लक राहिलेल्या अरुंद रस्त्यावरूनच पीएमपी गाड्यांसह सर्व वाहनांना जावे लागणार आहे. 

IT ministry launches Aadhar-based online registration, appointment system for government hospitals

The Ministry of Electronics & Information Technology has launched a new e-portal for online patient registration and appointments across government hospitals in India. The new online registration system (ORS) will link various government hospitals together and allow patients to fix appointments using their UID or Aadhar numbers. The process has been digitised with the help of Hospital Management Information System and the application is hosted on the cloud services of National Informatics Centre (NIC).

आरोग्यमंत्री डॉ. दिपक सावंत यांची वायसीएम रुग्णालयास भेट

चौफेर न्यूज – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत यांनी मंगळवारी दुपारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयास भेट दिली. शहरामध्ये स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून आल्याने रूग्णालयाकडून घेण्यात येणाऱ्या स्वाईन फ्लू प्रतीबंधात्मक उपाय योजनांचा आढावा घेतला. या अनुषंगाने स्वाईन फ्लू बाबत स्टँडर्ड प्रोटोकॉलचे पालन होते किंवा कसे याचीही माहीती घेतली. तसेच त्यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागाला भेट दिली. पदव्यूत्तर संस्था स्थापन करण्याच्या तयारी बाबत आढावा घेतला.

गावठी हातभट्टी गाळप ठिकाणावर कारवाई

पिंपरी, भाटनगर मधील बेकायदेशिररित्या सुरु असलेल्या गावठी गाळप हातभट्टी अड्यावर पिंपरी पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापे टाकले. यावेळी मोठ्या प्रमाणावर दारु साठा जप्त करुन दहाजणांवर कारवाई करण्यात आली आहे.

आयुक्‍तांचे कोट्यवधींच्या निविदांकडे दुर्लक्ष

एकाच ‘आयपी अ‍ॅड्रेस’वरून भरलेल्या 360 हून अधिक किरकोळ निविदांवर आयुक्‍त श्रावण हर्डीकर हे ढोंग करीत आहेत. पंतप्रधान आवास, ‘वेस्ट टू एनर्जी’, घरोघरचा कचरा संकलन व वाहतूक या कोट्यवधी रकमेच्या ‘रिंग’च्या निविदेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून एकप्रकारे अभय देण्याचे काम आयुक्त करीत आहेत, असा आरोप विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मंगळवारी (दि.28) केला.

पिंपरी-चिंचवड शहराचा गुरुवारी पाणी पुरवठा राहणार बंद राहणार

पिंपरी चिंचवड महापालिकेकडून विविध आवश्यक कामे करण्यासाठी गुरुवारी ( दि. 30) सायंकाळीच्या वेळेला शहरात होणारा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा पुरेशा साठा करुन काटकसरीने वापर करावा, असे आवाहन सहशहर अभियंता आयुबखान पठाण यांनी केले आहे.

पाच हजार सोसायट्या पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत

पुणे जिल्ह्यात १६ हजार गृहनिर्माण संस्था असून, अनेक संस्थांनी त्यांचे पुनर्विकसन केले आहे. मात्र, काही संस्थांच्या पुनर्विकसनात अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा सुमारे चार ते पाच हजार गृहनिर्माण संस्था पुनर्विकसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पिंपरीत जागेअभावी फूलबाजार रस्त्यावर

पिंपरी कृषी उत्पन्न उप बाजार समितीने फूल विक्रेत्यांना विक्रीचे परवाने दिले आहेत.

पायाभूत चाचणीत सावळा गोंधळ

पिंपरी - प्रश्‍नपत्रिका अपुऱ्या आल्यामुळे, पायाभूत चाचणी परीक्षेच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी अनेक शाळांमध्ये दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना गोंधळाला सामोरे जावे लागले. विशेषतः सेमी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू माध्यमांच्या शाळांमध्ये ही परिस्थिती उद्‌भवली. काही शाळांमध्ये प्रश्‍नपत्रिकेच्या छायांकित प्रती काढून उशिरा परीक्षा सुरू केल्या, तर एक-दोन शाळांवर परीक्षेचा पेपरच पुढे ढकलण्याची वेळ आली. 

…तर आमदारांनी राजीनामा द्यावा!

पिंपरी – भाजप व सहयोगी आमदारांना शहराच्या विकासाची एवढी चिंता वाटत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन, महापालिकेत महापौर व स्थायी समिती अध्यक्षपद मिळवून महापालिकेचा कारभार बघावा, अशी उपरोधिक टीका विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांचा नामोल्लेख टाळत केली.

कमकुवत पोलिसांना पुणे शहर, ग्रामीणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दमबाजी

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाची निर्मीती करण्यात आली. पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस दलातून पिंपरी चिंचवड आयुक्तालयात बदलून आलेल्या कमकुवत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पुणे शहर आणि ग्रामीणच्या अती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दमबाजी करण्यात येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ग्रामीणचे पोलीस अधिक्षक आणि पुणे शहर मधील काही वरिष्ठ अधिकारी पिंपरी आयुक्तालयात नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तीक भेटी घेऊन त्यांना दमबाजी करत असल्याचा दावा केला आहे.

केरळ पूरग्रस्तांसाठी लघुउद्योजकही सरसावले

पिंपरी - केरळमधील पुरग्रस्तांसाठी अनेक जण मदतीचा हात घेऊन सरसावले आहेत. शहरातील उद्योजकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.