Monday 4 February 2019

महेश लांडगे आणि मंगलदास बांदल या राजकीय पैलवानांच्या भेटीने चर्चेला ‘उधाण’

पिंपरी (Pclive7.com):- शिरूर लोकसभा मतदार संघाच्या आखाड्यात उतरण्यास तीव्र इच्छूक असलेले जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी आज भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली यावर दोघांनीही भाष्य करणे टाळले असले तरी आगामी निवडणूकीच्या दृष्टीने महत्वपूर्ण खलबते झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

गदारोळात संतपीठाचा विषय मंजूर, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे महापौरांच्या आसनासमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे टाळगाव चिखली येथे उभारण्यात येत असलेल्या ‘जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठा’चा विषय गदारोळातच महापौर राहुल जाधव यांनी उपसूचनेसह मंजूर केला. त्यामुळे सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक होत राजदंड पळविण्याचा प्रयत्न केला. गोंधळ सुरू असताना सभा तहकूब न करता महापौर जाधव खुर्ची सोडून उठून गेले.

नामांतराच्या विरोधात घरकुलवासियांचे महापालिकेसमोर आंदोलन

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिके तर्फे उभारण्यात आलेल्या घरकुलाच्या नामांतराला विरोध करत घरकुलवासियांना आज (सोमवारी) महापालिकेसमोर आंदोलन केले. तसेच ‘घरकुल नवनगर संकल्प’ असे सर्वसमावेशक नाव देण्याची मागणी करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जेएनएनयूआरएमअंतर्गत चिखली येथे आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी गृहप्रकल्पाचे बांधले जात आहेत. 160 इमारती उभारुन सहा हजार 720 सदनिका बांधल्या जाणार आहेत.

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘लेफ्ट फ्री सिग्नल’

थेरगाव : डांगे चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी उपाययोजना सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून चौकातील सिग्नल लेफ्ट फ्री करण्यात आले आहेत.

हिंजेवाडी नव्हे तर ‘हिंजवडी’ उल्लेख करावा

हिंजवडी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) कार्यालयातून होत असलेल्या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा करीत आहेत. चुकीच्या अपुऱ्या माहितीमुळे या चुका होत आहेत. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयातून होणार्‍या पत्रव्यवहारांमध्ये हिंजवडी गावाचा नामोल्लेख हिंजेवाडी असा न करता ‘हिंजवडी’ असा करावा. त्याबाबतचे आदेश काढण्याची मागणी हिंजवडी ग्रामस्थांनी पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

Your space: PCMC should bring dignity to sanitary work

The problem of failing to provide basic equipment to conservancy staff is not only restricted to Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) but it also prevails in Pune, Mumbai and other civic bodies. The sanitary staff have taken a bold step by approaching the National Commission for Scheduled Caste and Scheduled Tribe for justice. It is the responsibility of the civic body to provide the conservancy staff with drinking water,hand gloves,protective boots and masks.

पिंपरी शहरात मेट्रोचे दोनशे खांब पूर्ण

पिंपरी - महापालिका हद्दीमध्ये मेट्रोचे २०२ खांब उभा राहिले आहेत. व्हायाडक्‍ट सव्वादोन किलोमीटर पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोसाठी लोहमार्ग टाकण्याचे काम लवकरच सुरू होईल.

पर्यावरणासाठी जीवसृष्टी संवर्धन

पिंपरी - विविध कारणांमुळे वाढलेल्या प्रदूषणाचा परिणाम जैवविविधता अर्थात वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटकांवर होत आहे. त्यांच्या संवर्धनासाठी महापालिकेने तीन कलमी कार्यक्रम आखला आहे. त्या माध्यमातून सध्याच्या जैवविविधतेचे विविध पैलू व शहर क्षेत्रातील जैवविविधता समृद्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असून, त्यांच्याकडूनही सूचना मागविणार आहेत.

खुल्या प्रदर्शन केंद्राचे काम लवकरच

पिंपरी - मोशी येथील २४० एकर जागेत प्रस्तावित असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रात पहिल्या टप्प्यात २०.११ हेक्‍टर जागेमध्ये खुले प्रदर्शन केंद्र साकारणार आहे. या कामासाठी ४४ कोटी २२ लाख खर्च अपेक्षित आहे. कार्यादेश देऊन महिनाअखेर हे काम सुरू करण्याचे नियोजन आहे. 

पिंपरी-चिंचवड : विकासकामे की अपघातास निमंत्रण?

पिंपरी – सध्या शहरामध्ये पिंपरी-चिंचवड महानगपालिकेचा विकास कामांचा धडाका सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, ग्रेड सेप्रेटर भूमिगत रस्ते, पूल, मेट्रो आणि रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु ही कामे सुरू असताना सुरक्षेचे नियम ठेकेदार पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. बिजलीनगर परिसरात अलीकडेच रस्त्याचा मोठा हिस्सा खचला. बस निघून गेली आणि रस्ता खचला, यामुळे मोठी दुर्घटना टळली.

पिंपरी- चौकाचौकात वाहतूक नियम धाब्यावर

पिंपरी – उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील चौका-चौकात खुलेआम वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात येत असल्याने प्रशस्त रस्ते असूनही वाहतुकीचा खेळखंडोबा होत आहे. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील प्रत्येक चौकात वाहतूक नियम मोटार चालकांकडून धाब्यावर बसवण्यात येत असून, त्याकडे वाहतूक पोलिसांकडून पुर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. तर, काही ठिकाणी पोलीसच वाहतूक नियम मोडत असल्याचे चित्र आहे.

रस्ते खोदाईतील निष्काळजीपणा उठला प्रवाशांच्या जिवावर

पिंपरी चिंचवड ः सध्या शहरामध्ये पिंपरी चिंचवड महानगपालिकेचा विकास कामांचा धडाका सुरू आहे. शहरात विविध ठिकाणी उड्डाणपूल, अंतर्गत रस्ते, ग्रेड सेप्रेटर भूमिगत रस्ते, पूल, मेट्रो, बीआरटी प्रकल्प यांची कामे वेगाने सुरू आहेत. परंतु, सदरची कामे सुरू असताना सुरक्षेचे नियम ठेकेदार पायदळी तुडवत आहेत. त्यामुळे प्रवासी नागरिकांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजले आहेत. अशा निष्काळजीपणाचा फटका नुकताच प्राधिकरण आणि वाल्हेकरवाडीतील रहिवाशी प्रवास्यांना बसला. सध्या बिजलीनगर येथे ग्रेड सेपरेट कामाकरता खोदाईचे काम सुरू असून, काम करत असताना सुरक्षा हेतू पालिकेच्या नियमांचे तंतोतंत पालन सदस्थितीत होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिवर्तन सभेत धनंजय मुंडेंचे सुचक वक्तव्य

पिंपरी चिंचवड ः पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात अजित पवारांनी भरपूर काम केलयं. तरी देखील मागची अनेक निवडणूक मावळची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हारली आहे. आता माझी एक व्यक्तिगत विनंती आहे. महाभारतामध्ये सुध्दा एकदा प्रश्‍न असा झाला, की श्रीकृष्णाला अर्जुनाला म्हणावं लागलं आता उठ पार्था.. तुझ्याशिवाय पर्याय नाही. म्हणून हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आपल्यासाठी अजित पवारांनी स्वत:ला झिजवलं आहे. त्यांना आता काहीतरी देण्याची वेळ आहे. या परिवर्तनामध्ये आपले आशिर्वाद द्या, असं आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन यात्रा पिंपरी चिंचवड येथे पोहोचली. सांगवी येथे झालेल्या सभेत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जेष्ठ नेते छगन भुजबळ, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

बालाजीनगर येथे ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू

भोसरी ः पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने बालाजीनगर येथे  ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. याकामी महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, समर कामतेकर यांनी पाठपुरावा केला होता. बालाजीनगर येथे महापालिकेचा दवाखाना नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. महागड्या वैद्यकीय उपचारामुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागत होते. तसेच महापालिकेचा दवाखाना नसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य, कामगार यांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सीमा सावळे, सारंग कामतेकर  यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले.