Monday 13 August 2018

पिंपरी-चिंचवड : अधिकाऱ्यांच्या कार्यालयासाठी वणवण, साहित्याची जुळवा-जुळव

पिंपरी- चिंचवडच्या स्वतंत्र पोलिस आयुक्‍तालयाचा कारभार येत्या पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहे. पोलीस आयुक्त, अतिरीक्त पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, सात सहायक पोलिस आयुक्त आणि गुन्हे शाखेची वेगवेगळी युनिट या सगळ्यासाठी जागेची शोधा शोध सुरु आहे. तर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त कार्यलायत लागणाऱ्या साहित्याची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. जागांची शोधा शोध आणि साहित्याची जुळवा जुळव करुन येत्या बुधवार पासून कामकाज सुरु करण्यासाठी सगळीकडे एकच लगबग सुरु आहे.

After 5-year delay, Dapodi to Nigdi BRTS gets green signal

The Bombay high court, on Saturday, gave a green signal to the bus rapid transport system (BRTS) on Dapodi-Nigdi route, a project that had been delayed since 2013.

Pimpri Chinchwad municipal corporation,Dapodi,Nigdi

पिंपरी महापालिका स्वत: खरेदी करणार बसेस

पिंपरी : पीएमपीएलकडून बस खरेदीमध्ये विलंब होत आहे. एकूण 1 हजार 550 पैकी केवळ 200 बस गेल्या 2 वर्षांत खरेदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पालिका स्वत: बस खरेदी करून पीएमपीएलला देणार आहे. 

महासाधू मोरया गोसावी द्वारयात्रा आजपासून सुरू

पिंपरी-चिंचवड : सालाबादप्रमाणे श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे श्रावण शु. प्रतिपदेपासून म्हणजे रविवार (दि. 12) पासून महासाधू मोरया गोसावी यांच्या द्वारयात्रेला प्रारंभ होणार आहे. यंदा तिथीक्षय असल्यामुळे ही द्वारयात्रा तीन दिवस चालणार आहे. या चार दिवसात मोरया गोसावी देवस्थानाच्या चार द्वाराला असणार्‍या देवींच्या स्थानाला तसेच श्री भैरोबाच्या स्थानाला द्वारयात्रा काढली जाते.

Stop Metro work till Ganpati ends: PCMC

Civic body concerned that construction will cause chaos during festivities; MahaMetro officials refuse to budge.

मेट्रो मार्गिकेलगत सिमेंटच्या जंगलास अटकाव!

सरसकट चार ‘एफएसआय’च्या खैरातीला लगाम घालण्याचा प्रस्ताव

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन करणे काळाची गरज – पक्षनेते एकनाथ पवार

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून मोठय़ा प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे व पर्यावरणाचा समतोल राखणे प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. असे मत पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केले.

Police chief's office to start from August 15

The new Pimpri Chinchwad police commissionerate will be func ..

“स्मार्ट सिटी’ साठी महापालिकेची मालमत्ता!

सर्वसाधारण सभेपुढे प्रस्ताव : तब्बल 1 हजार 149 कोटींचा खर्च
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत शहरात विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या इमारती, जागा, शाळा, पथदिवे, चौक, उद्यान आदी मालमत्ताचा वापर केला जाणार आहे. या वापरास परवानगी देण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.

थेरगावात पीएमपीएल बसच्या गियर बॉक्स मधून रस्त्यावर ऑईल गळती; तरूणांच्या तत्परतेने वाचले अनेक अपघात

पीएमपीएलच्या चालत्या बसचा गियर बॉक्स मधून अचानक ऑईल गळती झाल्याने भर रस्त्यावर ऑईल पसरले. य़ेणारा प्रत्येक दुचाकीस्वार घसरून पडू लागल्याची माहिती मिळताच ”थेरगाव सोशल फाउंडेशं”च्या कार्यकर्त्यांच्या लक्षात येताच त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता अग्नीशामक दलाला कळवून सांडलेल्या ऑईल वर माती टाकत वहातूक पर्यायी मार्गाने वळवत अनेक अपघात वाचवले. या त्यांच्या कामगिरीबाबत परिसरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत.

सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत

जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असुन परिसरातील मुख्य चौकातुन, रस्त्यावर कुत्र्याच्या झुंडींचा मोकाट वावर वाढल्याने नागरिकांना कुत्र्यांच्या दहशतीला सामोरे जावे लागत आहे. येथील माहेश्वरी चौक, मुळानदी किनारा रस्ता, शिंदेनगर, शितोळेनगर प्रमुख रस्ता, वसंतदा पुतळा बसस्थानक, भाजीमंडई परिसर, उद्यान परिसर, नदीघाट परिसर आदी सार्वजनिक ठिकाणी मोकाट भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. कुत्री अचानक नागरिकांच्या अंगावर धावुन जातात.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ दिखाव्यापुरतेच

शहरात नद्या प्रदूषित होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातील पर्यावरणाचा दिवसेंदिवस र्‍हास होत असून हवा, जल, ध्वनी, मृदा, प्रकाश हे सर्वच घटक प्रदूषणाने ग्रासले गेले आहेत. त्यामुळे वाढते प्रदूषण ही समस्या औद्योगिक नगरीला भेडसावत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ दिखाव्यापुरतेच उरले असल्याचे चित्र आहे.

अन्नाची नासाडी रोखण्यासाठी सरसावले तरुण

भारतीय संस्कृतीने अन्न हे पूर्णब्रह्म मानले आहे. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे,’असे जेवणाआधी वंदन करण्याची प्रथा आहे.  मात्र, जीवनात आपले आचरण वेगळेच दिसते.  जागतिक क्रमवारीनुसार भुकेल्या देशांच्या यादीत भारत 67वा, तर अन्न वाया घालवणार्‍यांमध्ये सातव्या क्रमांकाचा देश ठरला आहे.  हे वास्तव  सर्वांना सुन्न करणारे आहे. अन्नाची ही नासाडी रोखण्यासाठी जैन समाजातील तरुण गेल्या काही वर्षांपासून प्रबोधन करत आहेत.

विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेविषयी मार्गदर्शन

वाल्हेकरवाडी : आकुर्डीतील डाॅ डी वाय पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविदयालयात स्पर्धा परिक्षा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मोहन वामन, डी वाय एस पी परीक्षा उत्तीर्ण झालेले दत्तु शेवाळे, सुजीतकुमार क्षीरसागर उपस्थित होते.

आता गुंड मवाली यांची खैर नाही...