Sunday 6 May 2018

Sarathi continues to get good response. Complaints are being reopened: Shravan Hardikar

The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) administration has faced controversies over road projects and awarding contracts for garbage collection. Municipal Commissioner Shravan Hardikar sets the record straight in an interview to The Indian Express.

As diesel prices soar, PMPML struggles with burden of extra costs

Of the 2,124 buses in the PMPML’s fleet, 900 run on diesel. There are 130 midi buses that use diesel for operations. As many as 571 other buses owned by PMPML run on CNG, while 653 buses owned and operated by contractors also run on CNG.

…तोपर्यंत पालिकेने ओला कचरा स्वीकारावा!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील दररोज 100 किलोपेक्षा अधिक ओला कचरा असणाऱ्या हौसिंग सोसायट्यांचा कचरा 1 एप्रिल 2018 पासून स्वीकारणे बंद केले आहे. ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेक सोसाट्यांनी कचरा जिरविण्याची व्यवस्था केली नाही. त्यामुळे सोसायट्या अशी व्यवस्था करत नाहीत, तोपर्यंत ओला कचरा स्वीकारण्यात यावा, अशा सूचना भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी पालिका प्रशासनाला केल्या आहेत.

“नो-पार्किंग’ मधील वाहनांवर कारवाई

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोरील पुणे-मुंबई महामार्गावर बेकायदेशीरपणे “नो पार्किंग’ मध्ये पार्क केलेल्या वाहनांवर पिंपरी विभागाच्या वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. 20 चार चाकी वाहनांना जॅमर लावण्यात आले आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक आर. एस. निंबाळकर यांनी दिली.

रस्ते खोदाईत पाच वर्षांत चारशे कोटींचे नुकसान ?

पिंपरी – गेल्या पाच वर्षांचे रस्ता खोदाईचे रेकॉर्ड, ताळेबंद तपासणे आवश्‍यक आहे. पाच वर्षांमध्ये अंदाजे 400 कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याचे माहिती अधिकारातील कागदपत्रांच्या आकडेवारीवरून प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यासाठी राज्य सरकारने दक्षता समितीची नेमणूक करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

झोपडपट्ट्यामधील सोयी, सुविधांवर जास्त लक्ष द्या

अनुराधा गोरखे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतर प्रभागाच्या तुलनेने अधिक झोपडपट्ट्यांचा भाग हा अ प्रभागाच्या कार्यक्षेत्रात येतो. त्यात प्रभाग क्रमांक १०,१४,१५ आणि १९ यांचा समावेश असून गोर-गरीब नागरिकांच्या वस्त्या आहेत. तेथे पाणी, वीज आणि स्वच्छताविषयक चांगल्या सोयी, सुविधांवर अधिका-यांनी लक्ष द्यावे, अशा सुचना अ प्रभागाच्या नवनिर्वाचित अध्यक्षा अनुराधा गोरखे यांनी बैठकीत दिल्या.

अवैध धंद्यांविरोधातील निगडी पोलिस ठाण्यावर बाटली मोर्चा

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलिस ठाण्यावर 'बाटली मोर्चा' काढण्यात आला. मोर्चा दरम्यान अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. 

पिंपरी महापालिकेचे विरोधी पक्षनेते योगेश बहल यांचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेता बदलाचे वारे वाहत असून इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

पोलीस फ्रेन्डस् वेलफेअरकडून पोलिसांना मोफत छत्री वाटप

पिंपरी (Pclive7.com):- सध्याच्या रणरणत्या उन्हाळ्याच्या झळा अंगावर घेत वाहतूक पोलीस आपली कर्तव्ये पार पाडत आहे. वाहतुकीचे नियमन करत असतात. यामुळेच असोसिएशनने पोलिसांप्रती असलेल्या सामाजिक भावनेतून सावलीसाठी व पावसाळ्यात पावसापासून संरक्षण होण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील मुख्य चौकांमध्ये पोलीस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने मोठ्या आकाराच्या छत्र्यांचे मोफत वाटप करण्यात आले. 

फक्त शहरच नव्हे तर गावदेखील वेगाने बदलतोय – प्रदीप लोखंडे

पिंपरी (Pclive7.com):- “आपला देश शिक्षण , उद्योग, तंत्रज्ञान अशा सर्व क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहोत, असे आपण अनुभवत असताना फक्त शहर नजरेसमोर आणतो. कारण आपला दृष्टीकोन मर्यादित आहे. प्रत्यक्षात मात्र देशातील प्रत्येक गाव देखील याच वेगाने बदलत आहे. संपर्कयंत्रणा, शेती, शिक्षण, स्वयंरोजगार गावोगाव उपलब्ध होत आहे. या सर्व खेड्यांना, गावांना बरोबर घेऊन आपला देश बदलत आहे,” असे मत प्रदिप लोखंडे यांनी प्राधिकरण येथे व्यक्त केले.   

अवैध धंद्यांविरोधातील निगडी पोलिस ठाण्यावर बाटली मोर्चा

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहरामधील वाढती गुन्हेगारी व अवैध धंद्यांविरोधात अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांच्या नेतृत्वाखाली अंकुश चौक ते निगडी पोलिस ठाण्यावर 'बाटली मोर्चा' काढण्यात आला. मोर्चा दरम्यान अवैध दारू धंदे बंद करा, हफ्तेवसुली करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा, गुन्हेगारी थांबवा अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या. 

दारूच्या दुकानांवरील ब्रँडच्या जाहिराती १५ दिवसांत हटवा

मुंबई : दारूच्या चमकणाऱ्या बाटल्या, झगमगते जाहिरातींचे बोर्ड कोणाचेही लक्ष सहज वेधून घेतात. मात्र, आता या अशा जाहिरातबाजीला चाप लागणार असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारूच्या दुकानांबाहेरील लिकर ब्रँड्स, फ्लेक्स, साईनबोर्ड १५ दिवसांच्या आता हटविण्याचे आदेश दिले आहेत.

‘प्लास्टिक आवरण असलेल्या खाद्यपदार्थाचा साठा संपवा’

चौफेर न्यूज – राज्य सरकारकडून गुढीपाडव्यापासून प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली. त्याची अंमलबजावणी मध्य रेल्वेनेही करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शुक्रवारी स्टॉलधारकांशी झालेल्या बैठकीत तीन महिन्यात प्लास्टिक आवरण असलेल्या खाद्यपदार्थाचा साठा संपवा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून स्टॉलधारकांना करण्यात आले आहे. मोठय़ा प्रमाणात नवीन खाद्यपदार्थ घेताना कागदाचा वापर असलेले खाद्यपदार्थ घ्या, असेही बैठकीत स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन स्टॉलधारकांनी दिले आहे.