Sunday 10 May 2020

महापालिका हद्दीतील प्रवासासाठी Digital passची सुविधा; ‘येथे’ भरा फॉर्म

एमपीसी न्यूज – लॉकडाउनमध्ये अत्यावश्यक कारणासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून नागरिकांना प्रवासासाठी ‘डिजिटल पास’ उपलब्ध करून देण्यात येत आहेत. डिजिटल पास प्राप्त करण्यासाठी पालिकेच्या ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या मोबाईल अप्लिकेशनवर ऑनलाईन फॉर्म भरणे आवश्यक आहे. हे डिजिटल पास फक्त पिंपरी-चिंचवड शहराच्या हद्दीमध्ये प्रवास करण्यासाठी आहेत. ही सुविधा सोमवार (दि.11) पासून नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कोरोना […] 

चऱ्होली, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी, थेरगाव, रुपीनगरचे टेन्शन कायम ! 10 नवीन रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील च-होली, रुपीनगर, ताम्हाणेवस्ती, काळेवाडी आणि थेरगावातील 10 जणांचे तर पुण्यातील पण वायसीएममध्ये उपचार घेत असलेल्या दोघांचे असे 12 जणांचे आज (शनिवारी) सायंकाळी रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, सकाळीच तळवडेतील एका महिलेचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले होते. त्यामुळे दिवसभरात 13 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 77 झाली आहे. महापालिकेचे […]

Cvoid-19: Central team takes review of situation in Pune, Pimpri-Chinchwad


Pune: Small scale industries hope to restart work from next week


चार दिवसांत सुरू होणार पिंपरी-चिंचवड शहरातील उद्योग

पिंपरी  (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योग सुरु करण्याबाबत राज्याच्या उद्योग खात्याच्या सचिवांकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला चार दिवसांत परवनागी मिळेल. त्यानंतर लगेचच शहरातील कन्टेन्मेंट झोन नसलेल्या भागातील उद्योगांना परवानगी देऊ असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

परप्रांतियांना पाठविण्यासाठी भासणार 24 रेल्वे गाड्यांची गरज

पिंपरी (प्रतिनिधी) – शहरात अडकून पडलेल्या चाकरमान्यांना त्यांच्या गावी पाठविण्याच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे. शहरात खूप मोठ्या संख्येने परप्रांतीय कामगार आहेत. यापैकी अनेकांनी पोलिसांकडे घरी परत जाण्यासाठी अर्ज केला आहे. परप्रांतियांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्यासाठी 24 रेल्वे गाड्यांची गरज भासणार आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 24 रेल्वे गाड्यांचे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविले आहेत.

कुदळवाडीतून 50 कामगार मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशातील मूळ गावी रवाना

एमपीसी न्यूज : कोरोनामुळे कुदळवाडी चिखली भागात गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या मजुरांना सर्व वाहतूक परवानगी घेऊन शुक्रवारी ( दि. ८) त्यांच्या मध्य प्रदेश आणि उत्तरप्रदेशातील मूळ गावी पाठविण्यात आले. टाळ्यांच्या गजरात या मजूर बांधवांना निरोप देण्यात आला. या कामी आमदार महेश लांडगे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी पाठपुरावा केला होता. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ […]

पिंपरी-चिंचवड शहरातील 77 जणांची करोनावर मात

पिंपरी  (प्रतिनिधी) – गेल्या काही दिवसांत शहरातील करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. आत्तापर्यंत 77 जणांनी करोनावर मात केली आहे. तर, 87 जणांवर उपचार सुरू आहेत.

दिलासादायक की “करोना’ला आमंत्रण?

पिंपरी – केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करत पिंपरी-चिंचवड शहरातील लक्षणे नसलेल्या मात्र करोना बाधित असलेल्या तब्बल 34 रुग्णांना एकाच दिवशी (रविवारी) घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेचा हा निर्णय दिलासादायक ठरणार की करोनाला आमंत्रण देणारा हे काही दिवसांतच कळून येईल. मात्र करोनामुक्तीचे अहवाल न घेताच या रुग्णांना सोडण्यात आल्यामुळे केंद्राच्या अध्यादेशाचा दुष्परिणामच अधिक होण्याची भीती व्यक्त होत आहे.

भोसरीतील ‘संभाजीनगर’च्या रहिवाशांची सामाजिक बांधिलकी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ४३ हजारांची मदत..!

पिंपरी (Pclive7.com):- कोरोनाच्या या महासंकाटा विरोधातील लढ्यात आता नागरिकांचा सहभाग देखील वाढत आहे. भोसरीमधील आळंदीरोडवर असलेल्या ‘संभाजीनगर’ या वसाहतीतील रहिवासी पुढे आले आहेत. सामाजिक बांधिलकी राखत येथील रहिवाशांनी ४३ हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिली आहे. 

शाळांनी ‘जादा फी’ आकारल्यास होणार कारवाई -शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळांनी शुल्क वाढ करू नये आणि जर शाळांनी जादा शुल्क आकारले तर त्या शाळांवर कारवाई केली जाईल, असा इशारा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे दिला आहे. येत्या शैक्षणिक वर्षाची शालेय फी भरण्यासाठी पालकांना शाळेकडून निरोप दिले जात आहेत आणि फी भरण्याची मागणी केली जात आहे. […]

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची पुण्यातील ड्यूटी रद्द करा : नगरसेविका सीमा सावळे

पुणे शहरातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांची ड्युटी म्हणजे एक प्रकारे ‘द्रविडी प्राणायाम’ आहे. पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे, अशा परिस्थितीत हा अत्यंत चुकिचा निर्णय घेऊन प्रशासन स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेत आहे. किमान शहरातील कनिष्ठ अभियंत्यापुरता तत्काळ हा आदेश मागे घेण्याची विनंती भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मागणी केली.