Tuesday 9 October 2018

पिंपरी ते निगडी मेट्रो; ‘डीपीआर’ महापालिकेकडे सादर

चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूह शिल्प चौकापर्यंतच्या पुणे मेट्रोच्या वाढीव सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) अहवाल महामेट्रोने गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सादर केला आहे. त्या संदर्भातील कार्यवाहीसाठी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे, असे पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. 8) सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहर झाल गोधड्यामय

पिंपरी - नवरात्रोत्सवानिमित्त गोधड्या धुण्यासाठी शहरातील पवना नदी पात्रालगतच्या घाटांवर महिलांनी गर्दी केली. रस्ता दुभाजक, उड्डाण पुलाचे कठडे, ग्रेड सेपरेटरच्या भिंतींवर तसेच नदी पात्राचा परिसरात धुतलेल्या गोधड्या सुकविण्यासाठी टाकल्या होत्या. त्याची ही चित्रमय झलक टिपली आहे. सकाळचे छायाचित्रकार अरुण गायकवाड यांनी.

आळंदीत इंद्रायणी प्रदूषणात वाढ

आळंदी - गणेशोत्सव काळात जलप्रदूषण रोखण्यासाठी मूर्तिदानाची मोहीम राबविणाऱ्या आळंदी पालिकेने विसर्जनानंतर मात्र जलप्रदूषणाकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून इंद्रायणीत कपडे आणि गाड्या धुण्याचे प्रकार सुरू आहे.

अखेर घटस्थापनेला चिखली पोलीस ठाण्याचे उद्घाटन

गेली अनेक वर्षे चर्चा, प्रस्ताव आणि मंजुरी मिळालेल्या चिखली पोलीस ठाणे सुरु करण्यास अखेर मुहूर्त लागला आहे. घटस्थापनेला म्हणजे बुधवारी दि. १० ऑक्टोबर रोजी पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पोलीस अधिकाऱ्यांना खटारे वाहने

पिंपरी चिंचवडचे नवीन पोलीस आयुक्तालय अनेक समस्याने ग्रासलेले आहे. अद्याप पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाही तर हद्दीत गस्त घालण्यासाठी पुरेशी वाहने उपलब्ध नाहीत. विशेष म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेली वाहने खटारा असून कुठेही आणि कधीही बंद पडतात. याचा फटका पोलीस उपयुक्तांनाही बसला आहे. याच आयुक्तल्याच्या शेजारील पुणे पोलिस आयुक्तांच्या ताफ्यामध्ये ८६६ वाहने असून पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयासाठी फक्त ४४ वाहने आहेत. यावरून शासनाकडून नवीन पोलिस आयुक्तालयावर भेदभाव केला जात असल्याची टीका होत आहे.

Experts say polio vaccine safe

PUNE: Paediatricians on Monday clarified that bivalent oral  ..

पिंपरीत एनजीओजचा मार्गदर्शन मेळावा

विविध सामाजिक संस्था व सीएसआरच्या वतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास सामाजिक संस्थांचा व कंपनीमधील प्रतिनिधी यांचा सहभाग उत्स्फूर्त होता.

३३ वर्षापासून सुधारित विकास आराखडा ‘जैसे थे’च का?-‘घर बचाव संघर्ष समिती

पिंपरी-नुकताच पिंपरी चिंचवड शहरातील १० वर्षापूर्वी समाविष्ट झालेल्या ताथवडे गावाचा सुधारित विकास आराखडा (डीपी) २८ ठिकाणच्या आरक्षणांमध्ये बदल करून मंजूर करण्यात आला. परंतु १९८६ पासून पिं-चिं महापालिकेत समाविष्ट असलेल्या १५ पेक्षा जास्त गावांच्या सुधारित विकास आराखडयाबाबत प्रशासन गेल्या ३३ वर्षापासून “जैसे थेच” का ? असा सवाल ‘घर बचाव संघर्ष समितीने’ उपस्थित केला जात आहे. मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी याबाबत लेखी पत्राद्वारे माहिती दिली आहे.

विद्यार्थ्यांनी घेतला ‘पोलीस’ बनून कायद्याचा अनुभव

भोसरी : भोसरी एमआयडीसी पोलिसांसोबत एक दिवसासाठी विद्यार्थी पोलीस बनले. यावेळी विद्यार्थ्यांनी एफ.आय.आर. नोंदणीपासून ते शेवटपर्यंत चालणारे काम याबाबत पोलिसांची दिनचर्या जाणून घेतली. या कार्यक्रमासाठी भोसरी एमआयडीसी पोलीस चौकीचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक भीमराव शिंगाडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक विठ्ठल साळुंखे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. ताथवडे येथील जे.एस.पी.एम.च्या एम.बी.ए.च्या विद्यार्थ्यांनी यावेळी पोलीस बनून कायद्याचे तंत्र समजून घेतले. एफ.आर.आय.म्हणजे काय, पोलीस कसे तपास करतात आदी गोष्टी यावेळी वरिष्ठ पोलिसांनी त्यांना मार्गदर्शन केले.

#PCMCIssues तहान भागेना

पिंपरी - शहरातील निम्म्या लोकांना मानंकानुसार ठरलेला पाणीपुरवठा होत नाही. कारण शहराच्या अनेक भागांतून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर गांभीर्याने विचार सुरू आहे.

महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा

चिखली - महापौरांच्या प्रभागात अपुरा पुरवठा
चिखली परिसरात गेल्या आठ दहा दिवसांपासून अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. विशेष म्हणजे महापौर आणि विरोधी पक्षनेत्यांचे हे प्रभाग आहेत. चिखली गावात पाण्याची टाकी बांधूनही तिचा वापर करण्यात येत नसल्याने नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. धर्मराजनगर, रिव्हर रेसिडेन्सी भागातील सोसायट्यांमधील नागरिकांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, कुदळवाडी, जाधववाडी, चिखली गावठाण परिसरात पाणीपुरवठा होत असला तरी अतिशय कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. सध्या आक्‍टोबर हीट जाणवू लागली आहे. काही दिवसांत दसरा आल्याने महिला कपडे आणि भांडे धुण्याची लगबग सुरू आहे. त्यातच अनेकजण नळजोडाला इलेक्‍ट्रीक मोटर लावून पाणीउपसा करतात. मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू असून, काही नागरिक बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरतात. मात्र, पाणीपुरवठा विभागाचे यावर नियंत्रण नाही. इलेक्‍ट्रीक मोटर जप्त केल्या तरी मोठा राजकीय हस्तक्षेप होतो. त्यामुळे पाणीपुरवठा कर्मचारी त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. परिणामी कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. चिखली परिसरात कामावर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कामगार महिला व बॅचलर मुलांची ओढाताण होत आहे. 

राष्ट्रध्वजाचा आकार कमी होणार

पिंपरी - देशातील सर्वांत उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ निगडीतील भक्ती-शक्ती शिल्पसमूह उद्यानात महापालिकेने उभारला आहे. मात्र, वाऱ्याच्या झोतामुळे राष्ट्रध्वज फाटत असल्यामुळे त्याचा आकार कमी करण्यात येणार आहे. त्यासाठी १२ राष्ट्रध्वज खरेदी करण्यात येणार आहेत. 

#Banmanja मांजाने गळा चिरल्याने डॉक्‍टर तरुणीचा मृत्यू

पिंपरी - पतंगाचा मांजा अडकून गळा चिरल्याने दुचाकीवरील डॉक्‍टर तरुणीचा जागीच मृत्यू झाला. नाशिक फाट्यावरील जेआरडी टाटा उड्डाण पुलावर रविवारी (ता. ७) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास ही घटना घडली. 

तांबे यांचे “पितळ’ उघडे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे यांचे पाणी पुरवठ्याबाबतचे स्वयंनिर्णय आता त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातील बांधकामांना पाणी पुरवठा करण्यासाठी “एनओसी’ देणे थांबविणे आणि पुन्हा नव्याने सुरु करण्याच्या उद्योगाने त्यांच्याकडे काही तासांपूर्वीच सोपविलेला सहशहर अभियंते पदाचा अतिरिक्त पदभार आयुक्त हर्डीकर यांनी तडकाफडकी काढून घेतला आहे. त्यांचे हे निर्णय तपासून घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

प्राधिकरणाचा राज्याभिषेक झाला कारभारी कधी?

पिंपरी  – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी सदाशिव खाडे यांची नियुक्ती होऊन महिना उलटला आहे. मात्र, अद्यापही कोणत्याच राजकीय पक्षाचे प्राधिकरणाचे एकूण सात सदस्यांच्या नावावर एकमत होत नाही. प्रत्येक पक्षाकडून वरिष्ठ पातळीकडे बोट दाखविले जात आहे. त्यामुळे इच्छुकांचा जीव टांगणीला लागला आहे. तर दुसरीकडे प्राधिकरणाच्या कामाचा खोळंबा झाला आहे.

भाजपवर महापालिका प्रशासन मेहेरबान

पिंपरी – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्‍स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापूर्वीच तत्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दाखविली होती. मात्र, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे वाढदिवसानिमित्तचे बहुतांशी अनधिकृत फ्लेक्‍स चार दिवसांपासून शहरभर झळकत आहेत. त्यांच्याकडे मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे फ्लेक्‍स अनधिकृत असल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांना दिली.

गुन्हेगारीवर अंकुश कधी?

पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार व वाढती गुन्हेगारी पाहून शहरात 15 ऑगस्ट रोजी पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. मात्र या आयुक्तालयाला पुरेसे मनुष्यबळ व साधन सामग्रीचा पुरेसा पुरवठा अद्यापही झालेला नाही. त्यामुळे शहरात आयुक्तालय तर आले पण पोलीस संख्याबळ नाही. तर दुसऱ्या बाजूला शहरात होणारे गुन्हे देखील आयुक्तालयाच्या स्थापनेच्या एक महिन्यानंतर पुन्हा डोके वर काढू लागले आहेत. वाढत्या गुन्ह्यांचे प्रमाण पाहता स्वतंत्र पोलीस आयुक्तालय स्थापन करुन काय साध्य झाले, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

१ टन गोमांस विक्रीसाठी घेऊन जाणारा टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये पकडला

पिंपरी (Pclive7.com):- संगमनेर येथून तब्बल १ टन गोमांस विक्रीसाठी मुंबई येथे घेऊन जात असलेला टेम्पो बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी चिंचवडमध्ये पकडून दिला आहे. कै.आप्पासाहेब चिंचवडे चौकात, चिंचवड पोलीसांच्या मदतीने सापळा रचून रविवारी पहाटे हा टेम्पो पकडण्यात आला.

पिंपरी-चिंचवड शहरात अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण सुरू; आकाशचिन्ह परवाना विभागाची माहिती

शहरात एकूण 1 हजार 850 अधिकृत परवानाधारक जाहिरात होर्डिंग आहेत. पालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने सुरू केलेल्या सर्वेक्षणात एकूण 325 अनधिकृत होर्डिंग आढळून आले आहेत. आतापर्यंत 125 अनधिकृत होर्डिंग तोडून ते जप्त करण्यात आले आहेत. अजूनही शहरात त्या संदर्भात सर्वेक्षण सुरू असून, अनधिकृत होर्डिंग तोडून, मालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती आकाशचिन्ह परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी सोमवारी (दि.8) दिली. खोराटे म्हणाले की, शहरात रितसर परवानगी घेऊन 1 हजार 850 जाहिरात होर्डिंग उभे आहेत

पिंपरी चिंचवड शहरातील जाहिरात होर्डिंगचे सर्वे करून धोकादायक होर्डिंग हटवा – मारुती भापकर

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीत दोन ते अडीच हजार पेक्षा अधिक जाहिरात होर्डिंग उभे आहेत. जागा मिळेल त्या ठिकाणी त्या होर्डिंग उभे केले आहेत. विशेषतः रस्त्याच्या कडेला व चौकांत होर्डिंगची गर्दी पाहायला मिळते. महापालिकेच्या विकास आराखड्यात (डीपी रस्ता) व आरक्षित जागेवरही होर्डिंग उभे आहेत. कशाही रीतीने उभे केलेले हे होर्डिंग पडून काही जणांना जीव गमवावा लागला आहे. पुण्यात जुन्या बाजार चौकात गुरुवार (दि.५) झालेल्या दुर्घटनेत होर्डिंगचा लोखंडी सांगाडा पडून ४ जणांचा हाकनाक बळी गेला, तसेच आठ जण गंभीर जखमी झाले आहेत, या घटनेची पुनरावृत्ती पिंपरी – चिंचवड शहरात होवू नये म्हणून शहरातील अधिकृत आणि अनाधिकृत जाहीरात होर्डिंगचा सर्व्हे करून धोकादायक होर्डिंग हटवा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे

भाजपवर महापालिका प्रशासन मेहेरबान

पिंपरी – राष्ट्रवादीच्या हल्लाबोल कार्यक्रमाचे पिंपळे गुरव येथील फ्लेक्‍स बेकायदेशीर ठरवत ते कार्यक्रमापूर्वीच तत्काळ काढून टाकण्याची तत्परता महापालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी दाखविली होती. मात्र, उपमहापौर सचिन चिंचवडे यांचे वाढदिवसानिमित्तचे बहुतांशी अनधिकृत फ्लेक्‍स चार दिवसांपासून शहरभर झळकत आहेत. त्यांच्याकडे मात्र, महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. हे फ्लेक्‍स अनधिकृत असल्यास, त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांना दिली.

शिक्षक वर्गीकरण प्रस्ताव पडताळणीनंतर कार्यवाही

पिंपरी – जिल्ह्यांतर्गत शिक्षक वर्गीकरणाच्या ऐनवेळच्या प्रस्तावाला समितीने मान्यता दिली आहे. मात्र, महापालिका सेवा प्रवेश नियमावलीत अशी तरतूद नाही. हा प्रस्ताव प्रशासनाकडून पडताळणी केल्यानंतरच याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. त्यामुळे ऐनवेळच्या या प्रस्तावावरील विरोधकांचे आरोप व सत्ताधाऱ्यांच्या स्पष्टीकरण अधांतरीच राहिले आहे.

ऐनवेळच्या निमंत्रणाने हुकला दिल्ली दौरा

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण समिती सदस्यांना दिल्ली दौऱ्याचे ऐनवेळी निमंत्रण देण्यात आले. त्यामुळे कोणतीही तयार न झाल्याने बहुतांशी सदस्यांना या दौऱ्याला मुकावे लागले आहे. “स्मार्ट सिटी’ पाहणीकरिता सर्व गटनेते मात्र या दौऱ्यात सहभागी झाले आहेत. भाजपच्या या “ट्रीप डिप्लोमसी’ची महापालिका वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

तरुणाईला रास दांडीया, गरब्याचे वेध

पिंपरी – नवरात्रोत्सव तोंडावर येऊन ठेपल्याने तरुणाईला रास दांडीया व गरब्याचे वेध लागले आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात रास दांडीया व गरबा खेळण्यासाठी तरुणाईसाठी नव-नवीन फॅन्सी ड्रेसेसचा ट्रेंन्ड व विविध प्रकारच्या आकर्षक दांडीया बाजारपेठेत पाहावयास मिळत आहे.

विनातपासणी अहवाल देणाऱ्या “टेस्टिंग लॅब’चा सुळसुळाट

पिंपरी – बांधकाम कोसळून होणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम साहित्याची तपासणी करण्याबाबत बांधकाम व्यावसायिकांकडे जागृती वाढता आहे. त्याचा गैरफायदा घेत शहरात बांधकाम साहित्य टेस्टिंग लॅबचा सुळसुळाट झाला आहे. बांधकाम साहित्याची शास्त्रशुध्द तपासणी न करताच अहवाल दिला जात आहे. एवढेच नव्हे तर बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक तपासणीसाठी एक तर प्रत्यक्षात दुसरेच साहित्य वापरत आहेत. याची फेरतपासणी करणारी कोणतीही शासकीय यंत्रणा नसल्याने बांधकामांच्या दर्जाबाबत साशंकता कायम आहे.

भाजपा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नाही – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी (Pclive7.com):- मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही, युती झाली आणि तिकीट मिळाले नाही तर भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप भाजपला ‘रामराम’ ठोकून राष्ट्रवादीत जाणार या चर्चा केवळ चर्चाच असल्याचे स्पष्ट झालयं. भाजपा व्यतिरिक्त इतर कुठल्याही पक्षाकडून निवडणूक लढविणार नाही असे जगताप यांना जाहिर केलयं.

देशातील ‘शाळा, कॉलेजांमध्ये एक तास खेळासाठी ठेवा’

चौफेर न्यूज – भारत हा जगातील सर्वात तरुण देश म्हणून उदयाला येत असून, २०२० साली देशाची ६० टक्के लोकसंख्या ३५ वर्षाच्या आतील असेल. मात्र दुसरीकडे भारत मधुमेहाची राजधानी होत असून, लठ्ठपणामध्ये देश जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आपली तरुणाई तंदुरुस्त आणि स्वस्थ राहण्यासाठी क्रीडा हा विषय शिक्षणात समाविष्ट करावा. तसेच शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी दिवसातून किमान एक तास खेळण्यासाठी राखीव ठेवण्यात यावा, अशी विनंती भारतरत्न क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांना केली आहे.