Sunday 13 April 2014

Special squads for demolition men: HC to State govt


Not impressed by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation's (PCMC) contention that it requires over three years to go after the 66,000 illegal structures identified in its jurisdiction due to lack of police protection and manpower, the Bombay High ...

PCMC seeks GB nod to approach HC

Pune: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) wants to take the opinion of the high court for disqualifying two NCP corporators who have been accused of owning unauthorised constructions.

मतदानासाठी क्षेत्रीय अधिकारी सज्ज

मावळ लोकसभा मतदार संघासाठी येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होत आहे. त्यासाठी क्षेत्रीय अधिका-यांना आज (शनिवारी) प्रशिक्षण देण्यात आले.
मावळ लोकसभा मतदार संघातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या क्षेञीय अधिका-यांकरीता चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे हा प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे, समन्वय अधिकारी प्रशांत खांडकेकर, अजित रेळेकर, यांनी निवडणूक कामकाजा संदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना देऊन क्षेञीय अधिका-यांना कामकाजात उद्‌भवणा-या अडचणींचे निराकरणाबाबतही माहिती दिली. तसेच या प्रशिक्षण वर्गास संगणक अधिकारी नीळकंठ पोमण हे उपस्थित होते.

मोदी व गांधी सडलेले 'मॉडेल' - योगेंद्र यादव

काँग्रेसचे राहुल गांधी घराणेशाहीचे प्रतिनिधीत्व करतात तर भाजपचे नरेंद्र मोदी हे हुकुमशहा आहेत. विकासाच्या नावावर हे दोन्ही सडलेले 'मॉडेल' पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यात आले आहेत. मतदारांवर लादण्यात येत हे दोन्ही पर्याय लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचा घाणाघात आपचे राष्ट्रीय नेते योगेंद्र यादव यांनी आज (शनिवारी) चिंचवड केला. देशात मोदींची लाट असेल तर ते दोन मतदार संघातून निवडणूक का लढवत आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

अवैध बांधकामामुळे राष्ट्रवादीचे नगरसेवक काळजे, तापकीर अडचणीत

पात्रतेबाबत महापालिका न्यायालयाचे मत मागविणार 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नितीन काळजे आणि नगरसेविका विनया तापकीर हे अवैध बांधकामामुळे अडचणीत आले आहेत. च-होलीतील अवैध बांधकामाबाबत न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेवर दोन्ही नगरसदस्यांनी सादर केलेल्या खुलाशावरून त्यांचे पद पात्र ठरवायचे की अपात्र याबाबत न्यायालयाचे मत मागविण्याचा निर्णय महापालिका आयुक्त राजीव जाधव यांनी घेतला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळाला हादरा बसला आहे.

पिंपरीत औषध विक्रेत्यांचा ‘FDA’वर मोर्चा

जाचक कारवाईच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमधील औषध विक्रेत्यांनी स्वयंस्फूर्तीने औषध दुकाने बंद ठेऊन अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयावर शुक्रवारी सकाळी (एफडीए) मोर्चा काढला होता. नाहक कारवाई केल्यास औषध विक्रीचे परवाने परत करण्याचा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

अनधिकृत बांधकामांबद्दल राज ठाकरे काय बोलणार याबाबत उत्सुकता

बेकायदेशीर बांधकामांना पाठिंबा देणाऱ्या जगताप यांच्या प्रचारसभेत ठाकरे काय बोलणार, याबाबत उत्सुकता आहे.

जगताप यांच्या अवैध बांधकामामुळेच सगळे अडचणीत

पिंपरी : सांगवीतील न्यू मिलेनियम शाळेचे अनधिकृत बांधकाम केले. त्यामुळे शहरातील अन्य बांधकामे अडचणीत आली आहेत. हे निदर्शनास आणून देताना, आमदार लक्ष्मण जगताप स्वत:चे बांधकाम वाचवू शकले नाहीत, ते इतरांचे कसे वाचवणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी उपस्थित केला.

पोलिसांकडील तक्रारअर्जांचा निपटारा होईना

पिंपरी : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असून कायदा-सुव्यस्था कायम राखण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. निवडणूक कामकाजात पोलीस यंत्रणा व्यस्त असल्याने त्याचा परिणाम तपास यंत्रणेवर होत असून पोलिसांकडे येणार्‍या तक्रार अर्जांचा निपटारा करणेही कठीण झाले आहे. 

एकाच बूथला परवानगी

पिंपरी: परिसरात एकापेक्षा अधिक मतदान केंद्रे असतील, तर त्या भागात एका उमेदवारास एकच बूथ टाकण्यास मुभा दिली जाणार 
आहे. मतदान केंद्राच्या २00 मीटर अंतराच्या आत मतदानाच्या दिवशी कोणत्याही उमेदवारास प्रचार कार्यालय अथवा बूथ टाकता येणार नाही, असे नुकत्याच झालेल्या बैठकीत मावळ लोकसभा मतदारसंघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक आशिषकुमार यांनी स्पष्ट केले.

चार घरफोड्यांमध्ये चार लाखांचा ऐवज लंपास

पिंपरी : चिंचवड आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चार घरफोडीच्या घटना घडल्या. यामध्ये ४ लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 
चिंचवड एमआयडीसीतील मयूरी को- ऑपरेटिव्ह सोसायटीतील सत्यगीत सीताराम उमरजिकर (वय ४४) हे कुलूप लावून बाहेर गेले होते. दरम्यान, दरवाजाचा कडीकोयंडा व कपाटातील तिजोरी उचकटून त्यामधील १ लाख ७८ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने लंपास केले. तसेच उमरजिकर यांच्या शेजारीच राहणारे सदानंद प्रकाश बोरसे यांच्या घराचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी १ लाख १५ हजार ८00 रुपये किंमतीचे चांदीचे दागिने लंपास केले. या दोन्ही घटना गुरुवारी सकाळी ९ते पाचच्या दरम्यान घडल्या. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.