Thursday 15 November 2018

[Video] What is Pimpri-Chinchwad?


विकासनगरमध्ये सोसायट्यांचा कचरा रस्त्यावर

महापालिकेचे होत आहे सपशेल दुर्लक्ष
देहूरोड : स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणार्‍या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून रावेत, किवळे, मामुर्डी या समाविष्ट गावांकडे दुर्लक्ष होत असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे. या दिवाळीत विकासनगर, किवळे, मामुर्डी परिसरातील सोसायट्यांचा कचरा मोठ्या प्रमाणात थेट रस्त्यावरच टाकण्यात आला असून तो उचलण्यासाठी काहीच हालचाली दिसून येत नसल्याचे चित्र आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या किवळे, रावेत, मामुर्डी परिसराचा मागील दोन दशकात कायापालट झाला आहे. या परिसरात सोन्याच्या भावाने जमीनी विकल्या गेल्या. पुर्वीची हिरवीगार शेती नाहीशी झाली. त्याजागी आता टोलेजंग इमारतींनी घेतली. ग्रामीण बाज हरवून शहरीकरण झालेल्या या भागात कचर्‍याची समस्या मात्र, प्रचंड प्रमाणात वाढली. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना, झपाट्याने शहरीकरण झालेल्या या भागाकडे पालिकेचे मात्र सपशेल दुर्लक्ष झाले आहेत.