Wednesday 25 May 2016

पावसाळ्याच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये केवळ 15 ते 20% नाले सफाई

31 मे अखेर नाले सफाई पूर्ण होईल- प्रशासनाचा दावा एमपीसी न्यूज – पावसाळा तोंडावर आला असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे संपूर्ण शहरातील…

नदीपात्रातील अतिक्रमणांवर कारवाई करणार तरी कोण?

अधिकारावरून पिंपरी महापालिका प्रशासन व पाटबंधारे विभागाची टोलवा-टोलवी पावसाळा जवळ आला तरी पूर रेषेवर अनधिकृत बांधकामे तशीच   एमपीसी न्यूज…

पिंपरी-चिंचवडला वाटाण्याच्या अक्षता

गुणवत्ता असताना स्मार्ट सिटीसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या दहा शहरांच्या यादीतून पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीला वगळण्यात आले. शहरावर अन्याय झाल्याने सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. स्मार्ट सिटीतून ...

शुल्क भरण्यास विलंब केला, तरी पालकांकडून दंड घेऊ नये


शिक्षण विभागाकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील साधारण आठ ते दहा शाळांच्या शुल्कवाढीबाबत तक्रारी आहेत. त्याची प्रकरणे अजूनही तडीस लागलेली नाहीत. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे, तशी या तक्रारींमध्ये भर पडत चालली आहे. शुल्क नियमन ...

महापालिकेची पदाधिकाऱ्यांच्या दौऱ्यांवर उधळपट्टी सुरूच


राज्यात दुष्काळाची पार्श्वभूमी असताना आणि पुणे महापालिकेचे पदाधिकारी दुष्काळी भागाची पाहणी करण्याकरिता गेले असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्यांच्या नावाखाली सहलीचा आनंद लुटत आहेत. मागील ...

अभ्यासाच्या नावाखाली सहलीची टूर


म. टा. प्रतिनिधी, पिंपरी राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेचे पदाधिकारी अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली सहलीची मजा लुटत असल्याच्या शिवसेनेच्या आरोपाकडे दुर्लक्ष करीत सिक्कीम पाठोपाठ केरळ दौऱ्याची टूर ...

[Video] एकनाथ खडसे पुन्हा अडचणीत


एमपीसी न्यूज - राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या भोवती असलेले वादाचे शुक्लकाष्ठ कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही. दाऊद प्रकरणी क्लिनचीट मिळताच ते परत एकदा नव्या वादात अडकले आहेत. पुण्याजवळील भोसरी एमआयडीसीच्या ताब्यातील एक प्लॉट त्यांच्या घरातल्यांनी बेकायदेशीररित्या 3 कोटी 75 लाखांना खरेदी केल्याचे प्रकरण पुढे आल्याने त्यांच्यासमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (वय 56) जावई गिरीश दयाराम चौधरी (वय 43) यांच्या नावाने याचा व्यवहार झाला असून, बाजारभावानुसार या जमिनीचे मूल्य 40 कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे याप्रकरणाची कायदेशीर चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुण्यातील बांधकाम व्यावसायिक हेमंत गवंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत गवंडे म्हणाले, पिंपरी-चिंचवड मनपा हद्दीतील भोसरी येथे सर्व्हे नं. 52 हिस्सा नं. 2 अ/2 या मिळकतीवरील एकूण क्षेत्र एक हेक्टर 21 आर या जमिनीची मूळ मालकी अब्बास रसुलभाई उकानी व हसनैन झोएब उकानी (रा. कोलकत्ता, पश्चिम बंगाल) यांच्या नावाने आहे. यामध्ये सलमा सपैद्दीन वाना, बानुबेन फिरोजभाई पटेल, मुस्लिम पकरूद्दीन उकानी, नफीसा लियाकत काथवाला, मारिया मुस्तफा लकडावाला, सकीना नजीमुद्दीन उकानी, इन्सीया मुर्तुझा बादलावाला हे इतर वाटेकरी आहेत. उकानी यांची जमीन महामंडळाने (एमआयडीसी) 25 वर्षांपूर्वी संपादित केलेली आहे. ही जमीन परत मिळावी, याकरिता उकानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात 8 सप्टेंबर 2015 रोजी याचिका दाखल केली. मात्र, उच्च न्यायालयाने उकानी यांची याचिका फेटाळून लावली आहे.

एमआयडीसी, प्राधिकरणातील सर्वच व्यवहारांची चौकशी व्हावी


हे एक प्रकरण समोर आले म्हणून बोभाटा झाला. सर्व व्यवहार रीतसर असल्याचे खुद्द खडसे यांनी स्पष्ट केले आहे. आता कायद्यानुसार त्यात काय व्हायचे ते होईल. मात्र, एमआयडीसी आणिपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणात अशी शेकडो प्रकरणे आजही ...

खडसेंच्या नातलगांना एमआयडीसीची जागा

पिंपरी-चिंचवड येथील भोसरी एमआयडीसीमधील अब्बास रसुलभाई उकानी यांच्या मालकीची ३ एकर जागा एमआयडीसीने २५ वर्षांपूर्वी संपादित केली होती. परंतु भूसंपादनाची कारवाई पूर्ण न केल्याने सदर जमीन परत मिळावी म्हणून उकानी यांनी सप्टेंबर ...