Wednesday 24 January 2018

निगडीपर्यंत मेट्रोसाठी मिस्ड कॉल मोहीम

पिंपरी - पहिल्या टप्प्यात मेट्रो निगडीपर्यंत नेण्यास सत्ताधारी विलंब करत आहेत, या विरोधात आवाज उठवण्यासाठी पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमतर्फे मिस्ड कॉल मोहीम हाती घेण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी ०८०३०६३६४४८ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सहभाग नोंदविण्याचे आवाहन फोरमतर्फे करण्यात आले आहे. 

MahaMetro looks to dip into corporate coffers

PIMPRI CHINCHWAD: The Maharashtra Metro Rail Corporation (MahaMetro) is seeking help from industrial units to construct stations on the Pimpri-Swargate Metro route.

पहिल्या टप्प्यातील मेट्रो 2019 मध्ये धावणार

पुणे – पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज-ते रामावाडी अशा दोन मेट्रो मार्गांचे काम सुरु आहे. दोन्ही मार्गांचे काम वेगाने सुरू असून 2021 पर्यंत दोन्ही मार्गांवर टप्प्याटप्प्याने मेट्रो धावणार आहे. पाच ते सहा किलोमिटरचे टप्पे करून मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. 2019 च्या शेवटापर्यंत पहिल्या टप्प्यातील मेट्रो धावेल तर, 2021 नंतर दोन्ही मार्गांवर पूर्ण क्षमतेने मेट्रो धावेल, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे ३२ पिलर पूर्ण – ब्रिजेश दिक्षीत

पिंपरी ते स्वारगेट मेट्रोचे काम वेगवान पध्दतीने सुरू आहे. पासून काम सुरू झाल्यानंतर मेट्रोचे ३२ पिलर पूर्ण झाले आहेत. खराळवाडी येथे दोन पिलरच्यामधील २८ मीटर लांबीचा १० सेगमेंटचा स्पॅन देखील बसविण्यात आला आहे, अशी माहिती पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी आज (मंगळवारी) पत्रकार परिषदेत दिली.

PCMC chief to look into allegations of discrimination

PIMPRI CHINCHWAD: Shravan Hardikar, the Pimpri Chinchwad municipal commissioner, promised to look into allegations of discrimination against opposition corporators and the double standards in taking action against agitators from the ruling BJP and the opposition parties.

Woman leaps to her death before demolition drive

PUNE: A 35-year-old woman jumped to her death from the fourth floor of an illegal building in Pimple Gurav when employees of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) turned up there to tear down the structure as part of its demolition drive.

संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच!

अनधिकृत इमारत प्रकरण ः एकनाथ पवार यांची संतत्प प्रतिक्रिया
पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपळे गुरव येथील देवकर पार्क येथे अनधिकृत बांधकामावर पालिकेचे अधिकारी गेल्या चार दिवसांपासून कारवाई करत आहेत. त्याच इमारतीवरून एका महिलेने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना अत्यंत क्‍लेशदायक आहे. एवढे मोठे अनधिकृत बांधकाम सुरू असताना पालिकेचे अधिकारी गप्प का बसले? याची चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पालिकेतील सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ, नागरिकांमध्ये भीती

दररोज १५ ते २० जणांना हे कुत्रे चावा घेत असल्याचे समोर आले आहे.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणार!

  • महापालिका आयुक्‍त : “हॉकर्स झोन’ धोरणाची अंमलबजावणी
पिंपरी, (प्रतिनिधी) – वर्षानुवर्षे रखडलेला राष्ट्रीय फेरीवाला धोरणांर्गत शहरात “हॉकर्स झोन’ धोरण निश्‍चित करण्यात येणार आहे. तसेच, फेरीवाल्यांना स्थलांतरित करुन त्यांना झोननुसार जागा देण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे लवकरच पुनर्वसन होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात आहे.

‘झोनिपू’मध्ये “बोगसगिरी’

  • प्रशासन आक्रमक : …तर मूळ मालकांवर होणार कारवाई
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिखली येथील घरकुल प्रकल्पात मूळ लाभार्थिंनी स्वतःची घरे भाड्याने दिल्याच्या तक्रारी महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार “झोनिपू’च्या पथकाने केलेल्या तपासणीत घरकुल प्रकल्पात भाडेकरु, नातेवाईक आणि बंद घरे आढळून आली आहेत. त्यामुळे घरकुल प्रकल्पातील मूळ मालकांना नोटीस बजावून त्यांचा खुलासा मागवण्यात येणार आहे. तसेच, संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे संकेत महापालिका प्रशासनाने दिले आहेत.

RERA or consumer forum, where does one get relief?

PUNE: A settled and well-oiled dispute settlement mechanism is the crux for restoring buyer and investors' confidence in the real estate market.

दापोडीतील जलसंपदाचा एक विभाग कायम ठेवण्याचा निर्णय – राज्यमंत्री विजय शिवतारे

दापोडी येथील जलसंपदा विभागात स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी, संकल्पनिय, यांत्रिकी इमारत, गुणनियंत्रण व निरिक्षण या चार विभागाची कार्यालये आहेत. त्यातील स्थापत्य बांधकाम व यांत्रिकी हा उपविभाग कायम ठेवणे तसेच या विभागाची ७२ एकर जमीन अतिक्रमाणापासून वाचविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी प्रशांत शितोळे यांची नियुक्ती

पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत शितोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी ही निवड केली असून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हे नियुक्ती पत्र देण्यात आले.

शहरबात पिंपरी : भाजपविरोधात सर्वपक्षीयांचा हल्लाबोल

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसकडे जवळपास १५ वर्षे शहराचा कारभार होता.

"एचए'मध्ये पुन्हा खडखडाट

पिंपरी - येथील हिंदुस्तान अँटिबायोटिक्‍स (एचए) कंपनीत उत्पादननिर्मितीचे काम सुरू झाले आहे. तरीही 980 कर्मचाऱ्यांना आठ महिन्यांचा पगार मिळालेला नाही. थकीत पगाराची रक्‍कम 24 कोटी रुपये आहे. ती मिळविण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे (कॅबिनेट) दाद मागण्याची कामगारांची तयारी आहे. केंद्र सरकारकडून केव्हा मंजुरी मिळेल, याचे उत्तर तूर्तास कोणाकडेच नसल्याने कंपनीतील कर्मचारी चिंतेत आहेत. 

‘इंदिरा ग्रुप’कडून कचरा गाडीचे लोकार्पण

वाकड – येथील इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने इंदिरा स्वच्छता अभियान अंतर्गत इंदिरा कॉलेजच्या परिसरातील कचरा संकलनासाठी कायमस्वरुपी सुरू केलेल्या कचरा गाडीचे लोकार्पण करण्यात आले.

शिवसेनेचे दोन्ही खासदार खोटारडे!

  • आरोप सिद्ध करा ः महापौर नितीन काळजे यांचे आव्हान
पिंपरी,  (प्रतिनिधी) – समाविष्ट गावांतील विकासकामांवर खर्च करण्यासाठी मंजूर केलेल्या 406 कोटींच्या निविदा सरासरी 7.19 टक्के कमी दराच्या आहेत. त्यामुळे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील व श्रीरंग बारणे यांना निविदा दहा टक्के जादा दराने मंजूर केल्याचे सिद्ध करता न आल्यास त्यांनी राजकारण सोडून द्यावे, असे आव्हान महापौर नितीन काळजे यांनी मंगळवारी (दि. 23) पत्रकार परिषदेत दिले.

नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांची “स्टडी टूर’

  • पालक मंत्र्यांशी संवाद ः सायन्स पार्क, महात्मा फुले संग्रहालयास भेट
पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दि. 20 ला शैक्षणिक सहली अंतर्गत सायन्स पार्क व महात्मा फुले संग्रहालयाला भेट दिली. विद्यार्थ्यांनी विविध विज्ञानावर आधारित वस्तू व प्रयोगांचा सहलीत आनंद घेतला. नॉव्हेलच्या विद्यार्थ्यांसाठी हा दुग्ध-शर्करा योग जुळून आला. यावेळी विद्यार्थ्यांची पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्याशी भेट झाली. बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये मुलांना नवनवीन प्रयोग शिकण्यास मिळाले. यामुळे मुलांचा शैक्षणिकदृष्ट्या सर्वांगीण विकास होण्यास चालना मिळाली. शैक्षणिक सहलीत विद्यार्थी जेव्हा विज्ञानावर आधारित प्रयोग बघतात, तेव्हा त्यांच्या मनात कुतूहल व जिज्ञासा जागृत होते आणि यातूनच एखादा वैज्ञानिक वा संशोधक तयार होतो. तसेच, नॉव्हेल शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशीर्वाद दिले.