Friday 30 March 2018

मोशी कचरा डेपोला मोठी आग; बारा तासानंतरही आग आटोक्यात नाही

पिंपरी :  मोशी येथील कचरा डेपोला गुरुवारी (ता.२९) रात्री लागलेली आग बारा तासानंतरही आटोक्यात आलेली नाही.
 मोशी येथील कचरा डेपोला आग लागल्याची वर्दी गुरुवारी (ता.२९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार सुरुवातीला भोसरी येथील अग्निशामक उपकेंद्राचा बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र आगीचे स्वरूप पाहता आणखी चार बंब घटनास्थळी दाखल झाले. 

‘पवना’तून शहराला जादा पाणी

पिंपरी - पिंपरी- चिंचवड शहरासाठी पवना धरणातून पुरेसे पाणी देण्यात येणार असून, आवश्‍यकतेनुसार मंजुरीपेक्षा जादा पाणी देण्याचीही तयारी जलसंपदा विभागाने दर्शविली. सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा नदीत सोडण्याचे महापालिकेने मान्य केले आहे.

स्वतंत्र आयुक्तालयात 15 ठाणी

पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय करण्याचे आश्‍वासन भाजपच्या सर्वच नेत्यांनी यापूर्वी अनेकदा दिले आहे; मात्र सध्या हे आश्‍वासन पूर्ण होणार असे चित्र दिसत आहे; कारण शहरातील सर्वच प्रशासन यंत्रणा मनापासून स्वतंत्र पोलिस आयुक्तालयासाठी काम करताना दिसत आहे. नव्याने होणार्‍या पोलिस आयुक्तालयाच्या प्रस्तावात सध्या तरी पंधरा पोलिस ठाण्यांचा समावेश आहे.

दुभाजक सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’

पिंपरी – शहरातील विविध भागातील रस्ते दुभाजक पालिकेच्या वतीने कोट्यावधी रूपये खर्च करून सुशोभिकरण केले जाते. परंतु, संबंधित ठेकेदार व्यवस्थित कामे करत नाहीत. त्यामुळे काम सुरू होण्यापूर्वी व काम झाल्यानंतर सुशोभिकरणाचे “व्हीडिओ शुटिंग’ व छायाचित्र काढून ठेवण्याचा निर्णय स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.

सांगवीत जेष्ठांची पाणी बचतीसाठी जनजागृती

सांगवी – जागतिक पाणी दिनानिमित्त जुनी सांगवी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पाणी बचतीसाठी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. पाण्याची बचत करा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, गळणारे नळ, दुरूस्त करा, पाणी वाया घालवू नका, अशा घोषणा देत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थी, महिला, नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

“रेडझोन’ हद्दीत अनधिकृत “होर्डिंग्ज’चे पेव

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीचा काही भाग लष्कराच्या “रेडझोन’ने बाधित झाला आहे. या बाधित जागेत खासगी संस्थांकडून मोठमोठे “होर्डिंग्ज’ लावले जात आहेत. अशांवर कारवाई होत नसल्यामुळे महापालिकेचे लाखो रुपयाचे चलन बुडत असून लष्कराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. अशा अनधिकृत “होर्डिंग्ज’वर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निगडी येथील सजग नागरीक सतिश कदम यांनी केली आहे.

खड्डेमुक्‍त पिंपरी-चिंचवडचा पोकळ दावा

राज्यातील रस्ते 15 डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करण्याची मुदत राज्याच्या सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली होती; परंतु ही मुदत उलटून दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, तरी रस्ते खड्डेमयच आहेत. तीच परिस्थिती पिंपरी-चिंचवड शहरात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी संपूर्ण शहर खड्डेमुक्‍त केल्याचा दावा सत्ताधारी व महापालिकेच्या वतीने करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र संपूर्ण शहरात याउलट परिस्थिती आहे. विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांची अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसून, या खड्ड्यांमुळे अपघातसदृश स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे मुश्कील झाले असून, हे खड्डे कधी बुजवणार, असा संतप्त सवाल वाहनचालक करत आहेत.

पीएमपीच्या सीएनजी बसेसने आठ महिन्यात घेतला नऊवेळा पेट

अगोदरच खिळखिळी बनलेल्या पीएमपीला खरोखर ग्रहण लागले आहे की काय असे म्हणण्याची वेळ आली आहे .गेल्या आठ महिन्यात सुमारे नऊ सीएनजी बसेसने भर रस्त्यात पेट घेतलेला आहे. पेटलेल्या बहुतांशी बसेस या खासगी ठेकेदारांच्या आहेत. शॉर्ट सर्किट आणि वेळेवर मेंटनेस न केल्यामुळे या बसेस पेटल्या असल्या असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असली तरी बस पेटण्यामागे नक्कीच  मोठे गौंडबंगाल असल्याची बाब आता समोर येऊ लागली आहे. त्यानुसार केवळ ‘इन्शुरन्सचा क्लेम’ मिळावा अशी शक्यता काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

पुण्यातही मेट्रोमार्गावर बहुमजली उड्डाणपूल शक्य

नागपूर मेट्रोला बहुमजली उड्डाण पुलांसाठी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आर्थिक मदत केली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये कचरा डेपोला भीषण आग

पिंपरी चिंचवडमधील कचरा डेपोला भीषण आग लागली आहे. महापालिकेचा हा कचरा डेपो मोशी येथे आहे. सव्वा आठच्या सुमारास आग लागली असून मोठ्या प्रमाणात कचरा असल्याने आग सर्वत्र पसरू लागलीये.

भोसरीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्केटिंग रिंक

भोसरी - येथील इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमध्ये पेठ क्रमांक तीनमध्ये दीड एकर जागेत दोनशे मीटर लॅपिंग असणारे आंतरराष्ट्रीय स्केटिंग रिंक तयार करण्यात येत आहे. येत्या दोन महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून, शहरातील स्केटिंगप्रेमींना खेळण्यासाठी उत्तम सुविधा निर्माण होणार आहेत.

सांगवीकर डासांच्या त्रासाने हैराण

जुनी सांगवी-  मुळा व पवना नदीपात्रातील जलपर्णीमुळे सांगवीत डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. वाढलेल्या जलपर्णीमुळे गेली दोन महिन्यांपासुन सांगवीकरांना डासांच्या उपद्रवाला तोंड द्यावे लागत आहे. यावर प्रशासनाकडुन तात्काळ उपाययोजना सरू करून सांगवीकरांना डासमुक्त करावे अशी मागणी पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी निवेदनाद्वारे पालिका आयुक्तांकडे केली आहे.

दापोडीत श्री. फिरंगाई देवीचा उत्सव सुरू

जुनी सांगवी - दापोडी येथील ग्रामदैवत श्री.फिरंगाई देवीचा उत्सव सुरू आहे. या देवीचे मुळस्थान पुणे जिल्ह्यातील व दौंड तालुक्यातील कुरकुंभ या गावी आहे. दापोडी स्थित फिरंगाई उत्सवा दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिरंगाई महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ, संत्सग महिला भजनी मंडळ, गणेश नगर महिला भजनी मंडळ, विठ्ठल रूक्मिणी महिला भजनी मंडळ पवारवस्ती, श्री.फिरंगाई देवी जागरण गोंधळ पार्टी यांचा भजनांचा कार्यक्रम यानिमित्ताने होणार आहे.

टपरी-पथारी धारकांचे पक्‍क्‍या गाळ्यांत पुनर्वसन

पिंपरी – कष्टकरी कामगार पंचायतीच्या मागणीची दखल घेत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी प्रत्येक प्रभागात “हॉकर्स झोन’ करण्यासाठी जागेचा शोध घेण्याचे आणि यासाठी क्षेत्रीय आधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्याचे आदेश दिले असल्याची माहिती बाबा कांबळे यांनी दिली.

नियमाप्रमाणे स्वीकृत नगरसेवक निवड करा

पिंपरी – महापालिकेच्या प्रभाग स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. ही निवड योग्य नियमांप्रमाणेच करावी, अशी मागणी भीम संग्राम सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली.

जमीन नकाशांच्या डिजिटायझेनसाठी 6 कोटींचा निधी

पुणे- संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील जमिनींची पुर्नमोजणी प्रकल्प राबविण्यास शासनाने मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक महसूली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांमध्ये पुनर्मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी या जिल्ह्यातील जमीन नकाशांचे डिजिटायझेशन करण्यासाठी शासनाने 6 कोटी 43 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

कल्याणकारी योजनांना “आधार’ जोडण्यासाठी 3 महिन्यांची मुदतवाढ

नवी दिल्ली – कल्याणकारी योजनांसाठी “आधार’ क्रमांक जोडण्यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत सरकारने आज आणखीन तीन महिन्यांनी वाढवली आहे. कल्याणकारी योजनांचे अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून नागरिकांना मिळण्यासाठी “आधार’ क्रमांकाची जोडणी होणे आवश्‍यक असणार आहे.