Friday 13 October 2017

Water scarcity hits Akurdi and Chinchwad residents

Pimpri Chinchwad: The daily life of around 30,000 residents of parts of Akurdi and Chinchwad has been affected due to inadequate, irregular and low pressured water supply for the past six months. They have now warned of an agitation if the problem is ...

Pune Police launch ‘We Fight Cyber Crime’ initiative

‘We have started the We Fight Cyber Crime initiative. We aim to train over a thousand teachers and more than 20,000 students from different schools and colleges about dealing with cyber crimes,’ said Sudhir Hiremath, DCP (Cyber Crime)

पीएफची थकीत रक्कम ४६ कोटींवर

पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्‍स (एचए) कंपनीतील कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी (प्रॉव्हिडंट फंड, पीएफ), त्यावरील व्याज आणि अन्य थकीत रकमेचा आकडा ४६ कोटी ६१ लाखांवर पोचला आहे. ही थकीत रक्‍कम वसूल करण्यासाठी प्रॉव्हिडंट फंड कार्यालयाने बोर्ड ऑफ इंडस्ट्रिअल ॲण्ड फायनान्शिअल रिकन्स्ट्रक्‍शन (बीआयएफआर) यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. मात्र, केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये ही संस्था बंद केल्यामुळे हा प्रस्ताव नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्यूनलकडे वर्ग करण्यात आला असून त्यांच्याकडे या प्रस्तावावर सुनावणी होणार आहे. 

डॉक्‍टरांची संख्या वाढविण्याचा निर्णय

पिंपरी – महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात डॉक्‍टरांची संख्या अपुरी असल्याने चांगली वैद्यकीय सेवा पुरविण्यात कमतरता येत नाही. डॉक्‍टरांची संख्या वाढविण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. डॉक्‍टरांना काही सवलती व भत्ते वाढवून आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

डॉ. रॉय यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई?

पिंपरी – आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदावर डॉ. अनिल रॉय यांच्या ऐवजी शैक्षणिक अर्हतेनुसार पात्र ठरणारे डॉ. पवन साळवे यांची नेमणूक करण्याचा ठराव विधी समितीने नुकताच पारित केला. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेऊन साडेचार वर्षानंतर पदोन्नती योग्य नसल्याचा साक्षात्कार प्रशासनाला झाल्याचा आरोप डॉ. रॉय यांनी केला. या आरोपाने पालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन झाल्याचा ठपका ठेवून आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी डॉ. रॉय यांना प्रशासकीय नोटीस बजावली आहे. यासंदर्भात 24 तासाच्या आत समाधानकारक खुलासा न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी सक्त सूचना हर्डीकर यांनी दिली आहेत. त्यामुळे डॉ. रॉय यांच्या अडचणीत आणखीन भर पडली आहे.

खडकीत वाहतुकीत बदल

बुधवारपासून येरवड्यावरून होळकर पुलावर येणाऱ्या वाहनांपैकी ज्या वाहनांना पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जायचे आहे, अशा वाहनांनी होळकर पुलावरूनच मुळा रोडच्या दिशेने वळून मुळा रोड मार्गे अंडी उबवणी चौकात येऊन मुंबई-पुणे रस्त्याने मुंबईकडे ...

“अंनिस’चे फटाकेमुक्‍त दिवाळी अभियान

पिंपरी – पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी फटाकेमुक्‍त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प पर्यावरणप्रेमी, विविध संस्था व शाळांनी हाती घेतला आहे, मात्र हा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी शाळा व महाविद्यालयांमध्ये “अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने विशेष जनजागृती अभियान राबवले आहे.

आयुक्‍त, अतिरिक्‍त आयुक्‍त बोनसला मुकणार

पिंपरी – महापालिकेचे आयुक्‍त श्रावण हर्डीकर व अतिरिक्‍त आयुक्‍त अच्युत हांगे यांचा महापालिकेत सहा महिन्यांचा कार्यकाळ पुर्ण न झाल्याने त्यांना यंदा बोनस व सानुग्रह अनुदानापासून वंचित राहावे लागणार आहे, तर माजी आयुक्‍त दिनेश वाघमारे आणि अतिरिक्‍त आयुक्‍त तानाजी शिंदे या दोघांनाही बोनस द्यावा लागणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने माजी आयुक्‍त व अतिरिक्‍त आयुक्‍तांना बोनस देण्याबाबत हालचाली सुरु आहेत, अशी माहिती विश्‍वसनीय सुत्रानी दिली.

देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना सातवे वेतन

चौफेर न्यूज – केंद्र सरकारने बुधवारी देशभरातील अनुदानित विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापकांना दिवाळी भेट दिली आहे. या प्राध्यापकांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. ते दिल्ली येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी जानेवारी २०१६ पासून प्राध्यापकांसाठी सातवा वेतन लागू करण्यात आल्याचे सांगितले. देशभरातील ७ लाख ५८ हजार प्राध्यापकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. यामध्ये ३२९ राज्य विद्यापीठे आणि १२१९२ महाविद्यालयांतील सहायक आणि सहयोगी प्राध्यापकांचा समावेश असेल.

माथाडी कामगारांची “दिवाळी’!

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील व पुणे जिल्हा परिसरातील माथाडी कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. 12.33 टक्के या दराने कामगारांना बोनस देण्यासाठी पिंपरी-चिंचवड माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाने आठ कोटीपेंक्षा जास्त रक्कम दिली आहे. याचा पाच हजारहून अधिक माथाडी कामगारांना लाभ होणार आहे. यामुळे माथाडी कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.