Tuesday 27 May 2014

पिंपरी पालिकेला अंधारात ठेवून एमआयडीसीचा ‘उद्योग’

एमआयडीसीने पिंपरी महापालिकेला अंधारात ठेवून एका औद्योगिक संस्थेला साडेचार एकरचा भूखंड परस्पर विकला आहे, अशी तक्रार राष्ट्रवादीचे नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

नियोजनाच्या अभावामुळे चिंचवड स्थानकावर प्रवाशांच्या रांगा

चिंचवड रेल्वे स्थानकावरील तीन तिकीट खिडक्या सुरू करण्याच्या प्रवासी संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांचे हाल होत असल्याची तक्रार संघाने केली आहे.

Ajit Pawar for core group to review CCTV project

Deputy chief minister Ajit Pawar on Sunday asked for various steps including formation of a group of officials to monitor the installation of CCTV surveillance system in Pune and Pimpri Chinchwad.

अपर तहसील कार्यालयाकडून अनधिकृत उत्खनन करणा-यांवर कारवाई

पिंपरी-चिंचवड अपर तहसील कार्यालयाकडून अनधिकृत उत्खननास आळा बसावा म्हणून अनधिकृत उत्खनन करणा-यांवर कारवाई सुरू असून 51 लाख 74 हजार 490 रूपये दंड वसुल करण्यात आलेला आहे.

महापालिकेचा पूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष 1 जूनपासून कार्यान्वित

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पूर आपत्ती व्यवस्थापन कक्ष 1 जूनपासून मुख्य कार्यालयासह सहा क्षेञीय कार्यालयात कार्यान्वित होणार आहे. पूर आपत्ती व्यवस्थापनाबाबत झालेल्या बैठकीमध्ये आयुक्त राजीव जाधव यांनी अधिका-यांना आज (सोमवारी) याबाबतच्या सूचना दिल्या. 

बहिणाबाई प्राणीसंग्रहालयासाठी आणखी एका सल्लागाराचा घाट

पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून सल्लागारांवर उधळपट्टी सुरुच आहे. संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयाच्या बृहत आराखड्याच्या पाठपुराव्यासाठी यापूर्वीच एका सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असताना आता नियोजन व विकासाच्या कामकाजाच्या नावाखाली आणखी एक सल्लागार नेमण्याचा घाट घालण्यात आला आहे. 
महापालिकेच्या वतीने पर्यटन विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा तयार करण्याचे काम पी. के. दास असोसिएटस् अँड कंपनी यांना देण्यात आले आहे. याअंतर्गत महापालिकेच्या संभाजीनगर येथील निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी उद्यानाच्या बृहत विकास आराखडा तयार करण्यासाठी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठपुरावा करणे तसेच वास्तुविशारद सल्लागार म्हणून पी. के. दास असोसिएटस् यांची नियुक्ती करण्याचा निर्णय महापालिकेने यापूर्वीच घेतला आहे. 

सायन्स पार्कमध्ये कृतीशील विज्ञान कार्यशाळेचे आयोजन

पिंपरी-चिंचवड सायन्स पार्कच्या वतीने 3 ते 7 जून या कालावधीत कृतीशील विज्ञान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. 
या विद्यार्थी केंद्रीत कार्यशाळेत कोणत्याही प्रकारच्या यांत्रिक साधन सामुग्रीशिवाय कमीतकमी खर्चातील व सहज बनविता येणा-या वैज्ञानिक सिध्दांतावर आधारित भौतिक, जीव व रसायन तसेच दैनंदिन जीवनातील विज्ञानावर आधारीत गमतीदार प्रयोगाची साहित्य निर्मिती व प्रात्यक्षिक होणार आहे. 

जावडेकर यांच्या माध्यमातून पुण्याला पुन्हा एकदा मंत्रीपद

गतीमान कामकाजासाठी 'छोटे मंत्रिमंडळ, जास्त काम' असा सिद्धांतमांडत नरेंद्र मोदी यांनी तयार केलेल्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) म्हणून अनपेक्षितपणे भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांची आज वर्णी लागली. त्यांच्यामाध्यमातून माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्यानंतर पुण्याला पुन्हा एकदा मंत्रीपद मिळाले आहे. 

मोदींच्या शपथविधी सोहळ्यामुळे महापालिकेत शुकशुकाट

भारताचे 15 वे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या होणा-या बहुचर्चित शपथविधी सोहळ्याचे दूरचित्रवाहिनीवरील चित्रण पाहण्यासाठी नगरसेवक, ठेकेदार यांच्यासह महापालिका कर्मचा-यांनीही दुपारनंतर 'बुट्टी' मारल्याने शुकशुकाट पसरला होता.

रुपीनगरमध्ये विषबाधा होऊन सात मेंढ्या मृत्युमुखी

तळवडे येथील रुपीनगरमध्ये कीटकनाशकाची फवारणी केलेल्या शेतातील गवत खाल्ल्यामुळे विषबाधा होऊन सात मेंढ्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 25) सायंकाळी घडली. या घटनेत विषबाधा झालेल्या आणखी काही मेंढ्या मृत्युमुखी पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संत तुकारामनगरमध्ये अनधिकृत टप-यावर कारवाई

महापालिका व म्हाडाची संयुक्त कारवाई
म्हाडा आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने संयुक्तपणे कारवाई करीत संत तुकारामनगर परिसरातील सुमारे 40 अनधिकृत टप-या आज (सोमवारी) हटविण्यात आल्या.

'एलबीटी'चे विसर्जन होणार?


... नगर (90 ते 95), उल्हासनगर (128), अमरावती (90), कल्याण-डोंबिवली (180), चंद्रपूर (50), परभणी (40), लातूर (30), पुणे (1500), पिंपरी-चिंचवड (1200), नागपूर (400), नवी मुंबई (700), ठाणे (600), सांगली (75), भिवंडी (200), मालेगाव (120), नाशिक (650), धुळे (80) आणि अकोला (50).

मतदारनोंदणी गुरुवारपासून

लोकसभेची निवडणूक समाप्त झाल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वतीने येत्या गुरुवारपासून मतदारयादी पुनर्निरीक्षण मोहीम हाती घेण्यात येत आहे. या मोहिमेत मतदारनोंदणी केल्यास विधानसभेच्या निवडणुकीत मतदानाची संधी मिळणार आहे.