Saturday 25 August 2018

पिंपरी-निगडी मेट्रो डीपीआर तयार

पिंपरी - पिंपरी महापालिकेपासून निगडीपर्यंतच्या मेट्रोचा सर्वांगीण प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, तो सप्टेंबरमध्ये महापालिकेला सादर करण्यात येईल. या पाच किलोमीटर अंतराच्या प्रकल्पासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, चिंचवड, आकुर्डी व निगडी येथे मेट्रो स्थानके असतील, असे महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे यांनी सांगितले. 

बाप्पा झाले "महाग'

पुणे - शाडू मातीच्या कमतरतेमुळे यंदा बाप्पांच्या मूर्ती महागल्या आहेत. सहा, नऊ इंचांपासूनच्या मूर्तीच्या किमती दोनशे, अडीचशे ते चारशे रुपयांपर्यंत आहेत. त्याहून अधिक उंचीच्या मूर्ती दहा हजारांच्या पुढे आहेत. 
विक्रेत्यांनी शहर व उपनगरांमध्ये गणेशमूर्तींचे स्टॉल, दुकाने थाटली आहेत. शाडू माती गुजरात (भावनगर), राजस्थान व मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातून येते; परंतु मातीची मर्यादित उपलब्धता, घाऊक विक्रेत्यांकडून घ्यावी लागणारी माती आणि कारागिरांचे पगार व रंगरंगोटीसह अन्य खर्चाचा ताळमेळ बसविताना कारखानदारांनी मूर्तीच्या घडणावळीसाठी पाच ते दहा टक्के वाढ केली असल्याचे पेण येथील कारखानदार आनंद देवधर यांनी सांगितले. 

चिंचवडला साकारतेय ‘ऑक्‍सिजन पार्क’

पिंपरी - केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून शहरामध्ये चिंचवड आणि पुनावळे येथे दोन उद्याने साकारण्यात येत आहेत. चिंचवड येथील लक्ष्मीनगर येथे अत्यंत आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित म्हणजेच ‘ऑक्‍सिजन पार्क’ आकार घेत आहे. या उद्यानामुळे प्रदूषणात घुसमटलेल्या शहरवासीयांना आरोग्यदायी वातावरण अनुभवता येणार आहे. 

वाहतूक कोंडीचा नाशिक महामार्ग

पुणे-नाशिक महामार्ग हा गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षापर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूक कोंडीची. त्यामुळे वाहतूक कोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.

वाहतूक कोंडीवर उत्तर कधी?

पुणे-नाशिक महामार्गाचे रुंदीकरण झाले; पण चाकणचे औद्योगीकरण होत असताना वाहतुकीचे कोणतेही नियोजन केलेले नव्हते, हे सध्याच्या चित्रावरून दिसत आहे. वाढत्या औद्योगिकरणाबरोबर वाहतूकही मोठ्या प्रमाणात वाढली. तुलनेने रस्ते कमी पडू लागले. त्यात रस्त्यालगतची अतिक्रमणे, अवैध वाहतुकीच्या वाहनांच्या रांगा, पथारीवाले यांची भर पडली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागू लागल्या. सहापदरीकरणाचे जाऊ द्या, पहिली चाकणची वाहतूक कोंडी सोडवा, अशी मागणी होऊ लागली. या वाहतूक कोंडीला आता सारेच वैतागले आहेत. 

पिंपरीगावात विकास नाही, केवळ वाढदिवसाचे कलरफूल फ्लेक्स..

पिंपरी, 23 ऑगस्ट 2018 – बीआरटीएस, स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी आदी एकापेक्षा एक असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पिंपरी-चिंचवड शहरात होत आहेत. याची फळे शहराच्या काही भागातील नागरिक चाखत आहेत. मात्र ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली त्या पक्षाचे नेतृत्व करणा-या पिंपरीगावातील नागरिक यापासून वंचित आहेत. नदीच्या पल्याड असलेल्या रहाटणी, पिंपळे सौदागर, सांगवी आदी भागात विकासाची गंगा अविरत वाहत आहे. असे असताना पिंपरीगावातील नागरिक अद्यापही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.

बदली झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न सोडण्याचे आदेश

पिंपरी : अमोल येलमार : पोलीसनामा ऑनलाईन
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलिसांकडून आयुक्तालयासाठी मनुष्यबळ मिळाले. मात्र यावेळी सध्या आयुक्तालयात आलेल्या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस ठाण्यातील कामात चांगले असणारे अधिकारी व कर्मचारी काढून घेण्यात आले. यामुळे या अधिकाऱ्यांनी जायचे कुठे हा प्रश्न दहा दिवस झाला सुरु आहे. अखेर बदल्या झालेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सोडू नये असे आदेश पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे यांनी दिले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी हा प्रश्न सुटला असे शहर पोलीस म्हणत आहेत. मात्र या आदेशात पुणे ग्रामीणचा काही उल्लेख नसल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे सह दोघांना अटक व सुटका

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन
आर्थिक दुर्बल घटकातील एका रुग्णावर मोफत उपचार न करता उपचाराचे पैसे दिले नाही म्हणून रुग्णाला डांबून ठेवणे आणि रुग्णाच्या नातेवाईकांना धक्काबुकी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या थेरगाव येथील आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सीईओ रेखा दुबे यांच्यासह दोघांना वाकड पोलिसांकडून अटक करण्यात आली आणि त्यानंतर लगेचच पोलीस ठाण्यात जामीन मंजूर करुन सोडून देण्यात आले आहे.

Nigdi-Dapodi: Third BRTS comes with chaotic traffic, confused agencies, hassled commuters



The BRTS was officially launched at 12.30 pm, when Pimpri Mayor Rahul Jadhav flagged off the first vehicle on the route, at around 12.30 pm.

शिवसेनेच्या दोन्ही खासदारांचा पक्षनेते एकनाथ पवारांनी घेतला समाचार; गल्लीत लक्ष घालू नये, स्थानिक प्रश्न सोडविण्यास भाजप सक्षम

निर्भीडसत्ता न्यूज –
गल्लीपासून ते  दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शास्तीकरांसह अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाच्या दोन्ही आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला. त्याच्या पाठपुराव्यामुळेच शास्तीकरांचा निर्णय मार्गी लागला. शास्तीकरांचा प्रश्न भाजपने सोडविल्यामुळेच त्या कामाचे श्रेय खासदारांनी घेवू नये, तसेच खासदारांनी गल्लीतील प्रश्नामध्ये लक्ष न घातला. लोकसभेतील प्रश्न सोडवावेत, अशी उपरोधिक टीका सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली.

महापालिका प्राधिकरणाच्या जागा ताब्यात घेवून उद्यान, क्रिंडागणे विकसित करणार – पक्षनेते एकनाथ पवार

निर्भीडसत्ता न्यूज – 
पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या खुल्या जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. नाममात्र भाडे कराराने जागा घेवून प्राधिकरण, वाकड, चिखली यासह अन्य भागात उद्याने, क्रिंडागणे बनविण्यात येणार आहेत. येत्या आठ दिवसात जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया राबवून जागा ताब्यात घेणार आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आज (दि.२४) पत्रकारांना दिली. यावेळी महापाैर राहूल जाधव उपस्थित होते.
महापालिकेच्या आयुक्तांच्या दालनात नवनगर विकास प्राधिकरणाकडील जागा हस्तांतरित करण्याबाबत आज (शुक्रवारी) बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, प्राधिकरणाचे सीईआे सतीशकुमार खडके उपस्थित होते.

खासदार बारणेंना शहर नियोजनाची किती दूरदृष्टी ते जनतेने थेरगावात जाऊन पाहावे; आमदार जगताप यांची उपरोधिक टिका

निर्भीडसत्ता न्यूज –
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व त्यांचे कुटुंबिय गेल्या २५ ते ३० वर्षांपासून थेरगाव परिसराचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला आणि तेथील हप्तेवसुली कोण करत आहे?, याचे उत्तर आधी त्यांनी जनतेला द्यावे. या भागातील केवळ डांगे चौकाचा विचार केल्यास अनधिकृत टपऱ्या, हातगाड्या आणि रस्त्यावरच भरणारा बाजार यांमुळे तेथे प्रचंड वाहतूककोंडी होते. हे सर्व पाहिल्यास बारणे यांचे शहरनियोजनाबाबतचे किती दूरदृष्टीचे लोकप्रतिनिधीत्व आहे, हे सिद्ध होते. आपल्या परिसराचा विकास न करता निवडणूक जवळ आली की प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर मोघम आरोप करण्याची बारणे यांची जुनी सवय आहे. आता ते जनतेनेही ओळखले आहे. बारणे यांनी गेल्या साडेचार वर्षांत शहर विकासासाठी केंद्रांचा निधी आणण्याच्यादृष्टीने किती प्रयत्न केले, हा संशोधनाचा विषय असल्याची उपरोधिक टिका भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणजगताप यांनी केली आहे.

खासदार बारणे यांनी नागरी प्रश्नासाठी घेतली पालिका आयुक्ताची भेट !

श्रीरंग बारणे यांची पालिका आयुक्ताकडे बैठक ! शहरातील नागरी प्रश्नाबाबत श्रीरंग बारणे यांची पालिकेत आयुक्तांबरोबर बैठक ! खासदार श्रीरंग बारणे यांची पालिकेत बैठक !
From: Maza Aawaj

दोन महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर बीआरटी बससेवा सुरू

पिंपरी पालिकेच्या दापोडी ते निगडी या १२ किलोमीटरच्या बीआरटीचे प्रकरण उच्च न्यायालयात आहे.
पिंपरी पालिकेचा पाच वर्षांपासून रखडलेला पुणे-मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्ग दोन महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यास उच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला. त्यानंतर, शुक्रवारी या मार्गावरील बससेवा सुरू करण्यात आली.

‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’ संदेशांनी अधिकारी त्रस्त

पिंपरी पालिकेने हद्दीतील नागरिकांना त्यांच्या समस्यांविषयी तक्रार दाखल करण्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध करून दिली आहेत.
नागरिकांच्या तक्रारींसाठीच्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकावर चुकीचे संदेश
नागरिकांना आपल्या तक्रारी दाखल करणे अधिक सोयीचे व्हावे, यासाठी पिंपरी महापालिकेने ‘व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांक उपलब्ध करून देत चांगली सुविधा दिली. त्याचा अपेक्षित उपयोग होतो की नाही, हे पुरते स्पष्ट झाले नाही. मात्र, त्या क्रमांकावर ‘सुप्रभात’, ‘शुभरात्री’च्या संदेशांचा मारा सुरू असून ‘कट-पेस्ट’ आणि नको ते संदेश आहे तसेच पुढे पाठवण्याच्या सपाटय़ामुळे ही यंत्रणा सांभाळणारे अधिकारी-कर्मचारी पुरते वैतागून गेल्याचे दिसून येते.

कर्मचारी बदलीप्रकरणी आयुक्‍तांचा “यु-टर्न’

राजकीय दबाव? : “त्या’ कर्मचाऱ्यांची बदली स्थगित
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने दिलेल्या बदलीच्या आदेशाला न जुमानणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली स्थगित करून महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर व प्रशासन विभागाने माघार घेतली आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच दुटप्पीपणाची वागणूक दिली जात असून, राजकीय दबावापुढे आयुक्‍त व प्रशासनाचे काही चालत नाही का? असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

गरवारे नायलॉन्स कामगारांना सुखद धक्‍का

पिंपरी  – पिंपरीतील गरवारे नायलॉन कंपनी बंद होवून येत्या 27 ऑगस्ट रोजी 22 वर्षे पुर्ण होत आहेत. गेली अनेक वर्षे आपली हक्काची देणी मिळावीत यासाठी लढा देणाऱ्या कामगारांना मालकाकडील भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) टक्के हिस्सा दिला जाणार आहे. त्यामुळे कामगारांना सुखद धक्‍का बसला आहे.

चिखलीतील “सोनोग्राफी सेंटर’ विरुद्ध गुन्हा

– बाळाच्या संदर्भात खोटा “रिपोर्ट’ दिल्याचा आरोप
पिंपरी – चिखली येथे बाळाच्या संदर्भात खोटे “रिपोर्ट’ दिल्याप्रकरणी संबंधीत डॉक्‍टर व सोनोग्राफी सेंटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकांची तक्रार व ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Driving licences to be produced in electronic form


PUNE: The ministry of road transport and highways had received a number of grievances where the citizens had raised the issue that the documents available in DigiLocker or the mParivahan app of the ministry are not considered valid by the traffic police or the motor vehicles department when asked to produce.

निगडी बीआरटी बस स्टॉपचे ‘लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल’ असे नामकरण

पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.१३ मधील निगडी जकात नाका येथे असणाऱ्या बीआरटी बस स्टॉपला “लोकशाहीर अण्णाभाऊ साठे बस टर्मिनल” असे नाव देण्यात आले आहे. या बस स्टॉपला अण्णाभाऊ साठे यांचे नाव द्यावे अशी मागणी मनसेच्या माजी नगरसेविका अश्विनी चिखले यांनी केली होती. त्यांच्या त्या पाठपुराव्याला आज यश आले आहे.

पिंपरीत आरटीओच्या अधिकाऱ्यास फासले काळे

पिंपरी-पिंपरीतील आरटीओच्या एका अधिकाऱ्याने परवाना देण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप करत प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले आहे.पिंपरीतील मोटार वाहन निरीक्षक सिद्धीराम पांढरे हे परवाना देण्यासाठी पैसे घेतात आणि यासाठी त्यांनी एक माणूस नेमला आहे, असा प्रहार संघटनेचा आरोप आहे. आरटीओचे मुख्याधिकारी आनंद पाटील यांच्याकडे वारंवार तक्रार करून त्यांनी याची दखल घेतली नाही, असे संघटनेचे म्हणणे आहे.

विनापरवाना जाहिराती ; रॉयल अ‍ॅकॅडमीवर गुन्हा

पिंपरी : महापालिकेची परवानगी न घेता महापालिकेच्या हद्दीत जाहिरातीचे फलक लावले. यावरून रॉयल अकॅडमी पिंपरी-चिंचवडचे संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक शशिकांत शिवाजी मोरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार रॉयल अकॅडमीच्या संचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळेवाडी येथील महाराष्ट्र भूषण डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील खांबावर जाहिरातीचे स्टिकर चिकटवले होते.

जय महाराष्ट्र मंडळातर्फे घरोघरी कापडी पिशव्या

गणेशोत्सवानिमित्त आदर्श उपक्रम
पिंपरी-चिंचवड : नेहरूनगर येथील जय महाराष्ट्र मित्र मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत परिसरातील नागरीकांना, वर्गणीदार, व्यापारी यांना कापडी पिशवी चे वाटप करून कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी हा पर्यावरण विषयी सामाजिक संदेश देण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर ट्रस्ट (पुुणे) चरणी नारळ व कापडी पिशवीचे अर्पण करून या सामाजिक उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.

PCMC chief draws flak from MP for civic woes

Pimpri Chinchwad: Shiv Sena’s Maval MP Shrirang Barne on Thursday blamed Pimpri Chinchwad municipal commissioner Shravan Hardikar as well as the civic administration for failure to repair roads, remove encroachments and also for not taking measuresto provide adequate water to residents.


Umbrella body of industries in Pimpri-Chinchwad setting up special consultancy cell to help entrepreneurs in electric vehicles sector

New Delhi, Aug 23 (KNN) Envisaging a boom in electric vehicles, the Forum of Small Scale Industries Association, an umbrella body of industries in Pimpri-Chinchwad has decided to form a special consultancy cell to help entrepreneurs in the sector.
image

खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध

मळेकर वस्ती ते किवळे गावठाण रस्त्याची दुरवस्था
पिंपरी-चिंचवड : किवळे-रावेतहून मळेकर वस्ती ते किवळे गावठाणकडे जाणार्‍या रस्त्याची चिखलामुळे व खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली आहे़ वाहनचालक व स्थानिकांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. चिखलामुळे दुचाकी घसरून तसेच खड्ड्यांचा अंदाज न आल्याने आदळून अपघात होत आहेत. गेल्या पंधरवड्यात रस्त्यावरील चिखल व खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ व वाहनचालक त्रस्त झाले आहेत़  या रस्त्यावरील चिखलाचा थर काढून सर्व खड्डे बुजवून रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने खड्डेमय रस्त्यात वृक्षारोपण करण्यात आले.