Sunday 2 March 2014

PCMC should not disclose names of complainants, says RTI activist Vijay Kumbhar

RTI and citizen activist Vijay Kumbhar has urged Pimpri Chinchwad Municipal commissioner Rajeev Jadhav not to disclose the names of citizens who make complaints to the Sarathi helpline started by the municipal corporation.

PCMC GB to discuss merger of 20 villages on March 18

In August, the state government had directed PCMC to send a report on whether the villages should be merged within the PCMC limits.

PCMC's draft budget okayed with changes

A total of 93 changes were made in the draft budget of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) for 2014-15.

New DCR for PCMC

Mumbai: The Maharashtra Government on Friday assured to bring in a new DCR to protect and regularise nearly 66,000 illegal structures in the Pimpri-Chinchwad area.

आयुक्‍तांचा उद्यापासून क्षेत्रीय पाहणी दौरा

पिंपरी - महापालिकेमार्फत नागरिकांना देण्यात येणाऱ्या विविध सेवा, सुविधांची अंमलबजावणी व त्यावरील नियंत्रणाची कामे वेळेवर व समाधानकारकरीत्या होतात की नाही, याची पाहणी आयुक्त राजीव जाधव करणार आहेत.

अधिका-यांची मुदतपूर्व बदली करताना कारणे जाहीर करा

राज्य मुख्य माहिती आयुक्तांचे शासनाला आदेश
अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका-यांची मुदतपूर्व बदली केल्यास त्याची कारणे आठ दिवसांच्या आत सामान्य प्रशासन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी, असे आदेश राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी आज शासनाला दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या बदलीमागील कारणे 10 मार्च पूर्वी जाहीर करावीत, असेही त्यांनी बजाविले आहे.

आढळराव पाटलांचे मताधिक्‍य वाढणार?

पिंपरी - स्थानिक उमेदवार नसणे, मित्रपक्ष भाजपचा गड आणि नरेंद्र मोदींची लाट यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना मताधिक्‍य मिळण्याची शक्‍यता आहे.

आझम पानसरेंचा राष्ट्रवादीला "रामराम'

पिंपरी - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी शुक्रवारी पक्षाला "रामराम' करून कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केल्याने राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

नवनाथ जगताप यांनी घेतली स्वपक्षीयांची सुपारी

सभागृह नेत्या मंगला कदम गरजल्या
कोणाच्या तरी पुण्याईवर स्थायी समिती सभापतीपद मिळविणा-या नवनाथ जगताप यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. विरोधी पक्षांच्या कार्यालयात बसून कारभार चालविणा-या जगतापांनी स्वपक्षीयांची सुपारी घेतली असून येत्या लोकसभा निवडणुकीत ते सुपारी फोडतीलही, अशी घणाघाती टीका सभागृहनेत्या मंगला कदम यांनी केली.  आम्ही 'बाहेरवाले’ असलो तरी स्वाभिमानी आहोत. गावववाल्यांचे बिनबुडाचे आरोप सहन करणार नाही, जशास तसे प्रत्युत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी दिला.

'पिंपरीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीच विकासकामे अडवली'

राष्ट्रवादीच्याच स्थानिक नेत्यांनी शहरातील विकासकामे अडवून धरली होती, असा गंभीर आरोप स्थायी समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी ‘जाता-जाता’ केला व राष्ट्रवादीला घरचा आहेर दिला.

सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट

शहरातील सांगवी, पिंपरी, भोसरी आणि निगडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना शनिवारी (दि.1) घडल्या. या घटनांमध्ये सुमारे दोन लाख रुपये किमतीच्या सोनसाखळ्यांवर चोरट्यांनी हात मारला आहे. सोनसाखळी चोरीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांची हतबलता समोर आली आहे.

महापालिकेतर्फे शुक्रवारपासून जयंती महोत्सव

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 11 ते 14 एप्रिल या कालावधीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार असल्याची माहिती महापौर मोहिनी लांडे यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात भीमसृष्टी उभारण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे होणा-या विविध विकासकामांचे भूमिपूजन राज्याचे नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज (शनिवारी) झाले. त्यात केएसबी चौक व सांगवी फाटा येथील उड्डाणपूल, ग्रेडसेप्रेरेटर, देहु-आळंदी रस्त्याचा दुसरा टप्पा आदी कामांचा समावेश आहे.

"हाफकिन'ची उलाढाल 300 कोटींची

पिंपरी - खर्चात बचत, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर यामुळे राज्य सरकारच्या मालकीच्या हाफकिन जीव-औषध निर्माण महामंडळाने या वर्षात फेब्रुवारीअखेर 300 कोटींची दणदणीत उलाढाल केली.

Post-Pardeshi, SARATHI helpline takes a beating

Pimpri: There has been an alarming percentage drop in the compliance rate of the Pimpri Chinchwad Municipal Corporation's (PCMC) 'SARATHI' (System of Assisting Residents And Tourists through Helpline Information) helpline.

Rise in crimes in Pimpri Chinchwad due to rapid urbanization: Police Commissioner

Speaking at the annual conference on crimes in 2013 on Thursday, police commissioner Gulabrao Pol said that industries are growing in the Chakan and Talegaon industrial belts. Many employees working in these industrial units stay in Pimpri Chinchwad.

Sangvi-Kivale route operational to be in April

Sangvi-Kiwale BWhile the Pimpri Chinchwad Municipal Corporation has planned to make the Sangvi-Kivale route operational in April, it is highly unlikely that the plan would materialise for reasons of election code of conduct and the fact that the works are incomplete.

Pimpri Chinchwad municipal corporation to develop crime detection patrolling software system

The Pimpri Chinchwad municipal corporation has proposed to set up a system for beat marshals and crime detection team patrolling for zone III of the Pune police commissionerate.

Pimpri Chinchwad school board seeks additional provision of Rs 6.45 crore

The Pimpri Chinchwad school board has sought additional provision for various projects and for distributing various school items including raincoats and sweaters to students.

BRT terminal for pilot route in Pimpri Chinchwad may come up at Khadki

The terminus for the Bus Rapid Transit (BRT) corridor between Nigdi and Dapodi is likely to come up at the main bus stand in Khadki bazaar area.

Property tax: PCMC to collect twice the amount

PIMPRI: Despite the General Body's resolution, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will continue to collect twice the property tax amount from illegal structures in the twin township.

ऐनवेळचे अडीचशे कोटींचे प्रस्ताव स्थायीत दाखल

सत्तारुढ पक्षनेत्या मंगला कदम व स्थायी समिती सभापती नवनाथ जगताप यांच्यात जोरदार शीतयुध्द सुरु आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात उपसूचना स्विकारताना डावलल्यामुळे नाराज झालेल्या जगताप यांनी त्यांच्या कार्यकालात शेवटच्या सभेत ऐनवेळचे अडीचे कोटी खर्चाचे प्रस्ताव स्थायी समितीत दाखल करुन घेतले. उद्या (शुक्रवारी) होणा-या स्थायी समितीच्या सभेत त्यावर अंतिम निर्णय होणार आहे.

उद्योगनगरीला अपुरे पाणी, गृहप्रकल्पासाठी मात्र धो धो!

पवना धरणातून होणारा पाणीपुरवठा उद्योगनगरीला अपुरा पडत असल्याने एकीकडे पवना धरणाशिवाय भामा-आसखेड व आंद्रा धरणातून शहरासाठी पाणी आणण्याचे नियोजन केले जात असताना दुसरीकडे जलसंपदा विभागाकडून मात्र गृहप्रकल्पाला आणि कंपन्यांना पाणी पुरविण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी चिखलीतील एक गृहप्रकल्प आणि मावळातील नवलाख उंबरे येथील कंपनीसाठी बिगर सिंचन पाणी आरक्षणाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहचली

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात 80 हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदारांची संख्या 11 लाखांवर पोहचली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. वयाची 18 वर्षे पूर्ण होणा-या प्रत्येक पात्र नागरिकास मतदार यादीत आपले नाव नोंदविता यावे, मतदार यादीतील चुकांची दुरुस्ती करता यावी, पत्ता बदलला असल्यास नवीन पत्त्याची नोंद करता यावी आणि दुबार नाव असल्यास किंवा निधन झाले असल्यास त्यांचे मतदार यादीतून नाव वगळता यावे, यासाठी हे अभियान राबविण्यात आले.

चिखलीत मनसेच्या नगरसेवकाचे बेमुदत ...

समाविष्ट गावांना 'बजेट'मध्ये डावलल्याच्या निषेध
महापालिकेच्या अंदाजपत्रकात समाविष्ट गावांना यावेळीही वाटाण्याच्या अक्षता दाखविण्यात आल्याच्या निषेधार्थ मनसे नगरसेवक राहुल जाधव यांनी आजपासून (गुरुवारी) बेमुदत उपोषण सुरु केले. चिखली-कुदळवाडीतील मुख्य चौकामध्ये ते उपोषणाला बसले आहेत.  

मावळ लोकसभेसाठी 'आप'कडून मारुती भापकर

लोकचळवळीतील कार्यकर्ता आणि महापालिकेतील भ्रष्टाचाराविरुध्द लढणारे माजी अपक्ष नगरसेवक मारुती भापकर यांना आम आदमी पक्षाकडून मावळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे.
'आप'ने  आगामी लोकसभा निवडणूक लढवणा-या पक्षाच्या उमेदवारांची दुसरी यादी आज (गुरुवारी) जाहीर केली आहे. या यादीत 28 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रातील 10 जणांचा समावेश असून मावळ लोकसभा मतदार संघातून मारुती भापकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

वैद्यकीय परवाना शुल्काच्या ...

कारखाने व उद्योगधंद्यांच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड शहरातील खासगी रुग्णालये, दवाखान्यांनाही वैद्यकीय परवाना शुल्क आकारणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. शहरातील विविध डॉक्टर्स संघटनांचा त्याला तीव्र विरोध असून याविरोधात उद्या (शुक्रवारी) लाक्षणिक बंदची हाक दिली आहे.
शहरातील विविध पाच डॉक्टर्स संघटनांची चिंचवड येथील फरांदे रुग्णालयात बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.   इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) शहराध्यक्ष डॉ. दिलीप कामत, इंडियन डेन्टल असोसिएशनचे (आयडीए) डॉ. अभिजीत फरांदे, पीसीडीएचे डॉ. रवी कुलकर्णी, निमाचे डॉ. सुहास जाधव, होमिओपॅथी डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. संदीप लुणावत आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक झाली.        

मेट्रोसाठी हजारो कोटी; पीएमपीसाठी काय?

मेट्रोसाठी जी तरतूद केली जाणार आहे त्याच्या दहा टक्के म्हणजे एक ते दोन हजार कोटी रुपयांच्या तरतुदीत मेट्रोच्या तुलनेत दहापट प्रवासी वाहतूक होऊ शकते, असे जुगल राठी आणि विवेक वेलणकर यांनी नमूद केले आहे.

दिवसा घरफोडी करणारे आरोपी पकडले

आरोपींनी सांगवी, पिंपरी, चिंचवड, निगडी, हिंजवडी, औंध, सुसगाव या भागात २५ घरफोडय़ा केल्याची कबुली दिली आहे. आरोपींकडे पॅशन प्रो ही मोटारसायकल होती. या मोटारसायकलवरून ते उच्चभ्रू सोसायटय़ांची पाहणी करीत

शहरात हापूस आंबा आला!

पिंपरी : उन्हाळ्याची चाहूल लागताच वेध लागतात रसरशीत पिवळ्या धमक आंब्याची. बाजारपेठेत रत्नागिरी, देवगडच्या प्रसिद्ध हापूस आंब्याची आवक झाली आहे. 
हिरवा व पिवळ्या रंगातील हापूस आंब्याच्या पेटीची आज चिंचवड येथे आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी काही दिवस लवकर आंब्याची आवक झाली आहे. वातावरण पोषक असल्याचे यंदा आवक मोठी असल्याने शेतकर्‍यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यंदा जून ते जुलै महिन्यापर्यंत आंब्याचा हंगाम चालण्याची शक्यता आहे. चिपळूण, रत्नागिरी येथील आमराईतून आंब्याच्या तीन पेट्या येथे दाखल झाल्या.