Friday 8 December 2017

[Video] पिंपरीतील रस्ते कसे रे भाऊ... हिरोईन च्या गालासारखे गुळगुळीत!

Pimpri Chinchwad | Mahanagar Palika Claims Of Having Potholes Free Smooth Road

PCMC clears 87 homes encroaching HA's land

Neighbouring residents had complained of theft incidents; authorities had issued warning
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Thursday carried out a massive drive at the Hindustan Antibiotics (HA) Limited ground in Tukaram Nagar, Pimpri to clear it of squatters. Most of the evicted tenants belong to the Phase Pardhi community and claim to have lived on this land for almost 15-20 years now.

‘रेरा’साठी पुण्यात न्यायाधिकरण हवे

पुणे - राज्य सरकारने गेल्यावर्षी ‘रेरा’लागू केला असला, तरी अद्याप या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या तक्रारींची सुनावणी घेण्यासाठी न्यायाधिकरणाची पुण्यात स्थापना झाली नाही. यामुळे पुण्यातील ग्राहकांना सुनावणीसाठी मुंबईला जावे लागत आहे.

सोमवारपासून शहरात अनधिकृत फ्लेक्स दिसणार नाही – सिमा सावळे

स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्तांचे निर्देश

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत गुरुवारी (दि. ७) सदस्यांनी अनधिकृत फ्लेक्सवरून प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारपासून (दि. ११) शहरात एकही अनधिकृत फ्लेक्स दिसणार नाही. त्यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेच्या संबधित अधिका-यांना दिल्या आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्षा सिमा सावळे दिली आहे.

सीएसआरमधून महापालिकेसाठी १०० कोटी उभारण्याचा निश्चय – पक्षनेते एकनाथ पवार

स्वतंत्र सीएसआर सेलचे कामकाज सुरू

मागील दीड वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अ‍ॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेल स्थापन करण्याची चर्चा होती. मात्र, अखेर या सेलची स्थापना महापालिकेने केली असून मानधन तत्वावर एका सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. या कंपन्याच्या माध्यमातून येत्या पाच वर्षांत सुमारे शंभर कोटीची निधी आणून शहर विकासात भर घालण्यात येईल, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिली.

राष्ट्रवादीपेक्षा भाजपच्या काळात विकासकामांना “अच्छे दिन"

भाजपने पिंपरी चिंचवड महापालिकेत प्रथमच सत्ता स्थापन केल्यानंतर शहरातील विकासकामांना “अच्छे दिन” आले आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांच्यातुलनेत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात विकासकामांवर सर्वाधिक खर्च करून भाजपने बाजी मारली आहे. महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना २०१५-१६या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांच्या कालावधीत भांडवली कामांवर अर्थसंकल्पात एकूण तरतूद रक्कमेपैकी २९.२३ टक्के रक्कम खर्च झाले होते. २०१६-१७ या आर्थिक वर्षात याच कालवाधीत भांडवली कामांवर २१.२० टक्के रक्कम खर्च करण्यात आले होते. भाजपची सत्ता आल्यानंतर २०१७-१८ या आर्थिक वर्षातपहिल्या आठ महिन्यांत भांडवली कामांवर ३४.७९ टक्के रक्कम खर्च झाले आहे.

‘दहा दहा’ची लोकल होणार शेवटचीच

पुणे-लोणावळा मार्गावर लोकलने प्रवास करणाऱ्यांसाठी आता रात्री दहा वाजून १० मिनिटांची डेडलाइन असणार आहे. या मार्गावर पुणे स्टेशनहून सुटणारी पुणे-तळेगाव ही अकरा वाजताची शेवटची लोकल कमी प्रवासी संख्येमुळे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे.

Divn to get 3 centres for hurt wild animals

Forest dept to set up rescue and treatment facilities for Sahyadri belt, for which a feasibility report is ready; experts laud the move
With the template of the successful Wildlife SOS Manikdoh Leopard Rescue Centre in Junnar in mind, the state forest department has narrowed down on three spots to set up rescue and treatment centres for wild animals, to address the rising numbers of injuries in this faunal demographic. The centres are planned to be put up at Taljai Hills, Kushgaon and Bhugaon Road, catering to a wide variety of animals like deer, antelopes, elephants, monkeys, snakes, birds and water birds. A feasibility report for the same has already been made, to get an idea of how the project will be implemented on ground.

Childline to hold camps on minors' abuse

Pune: In the light of increasing addiction to pornography among high school students as well as overall rise in child sexual abuse cases, the city advisory board of Childline, the 24-hour helpline for children in distress, has decided to raise awareness about the matter by keeping parents in the loop.

[Video] मोरया गोसावी पुष्पवृष्टी सोहळा

मोरया गोसावी 456 संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्याने मोरया गोसावी ह्याच्या मंदीरावर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली ह्यावेळी हजारो भक्तांनी हजेरी लावली

रस्त्यावरील पार्किंग अन्‌ वाहतुकीचा बोजवारा

पिंपरी - पिंपरीतील शगुन चौक ते साई चौकापर्यंत असलेल्या संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध मोबाईल बाजारपेठेतील अतिक्रमण व वाहतूक समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. मोबाईल दुकान व्यावसायिक तसेच फेरीवाल्यांकडून होणारी अतिक्रमणे, रस्त्याच्या दुतर्फा दुहेरी-तिहेरी पार्किंग हे येथील रोजचेच चित्र असून, महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिस केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची स्थानिक व्यापारी आणि नागरिकांची तक्रार आहे. 

पाणी पुरवठ्यावरून "स्थायी'त खडाजंगी

पिंपरी - निगडी-प्राधिकरणात विस्कळित पाणीपुरवठ्यावरून स्थायी समिती सभेत गुरुवारी (ता. 7) सदस्यांनी महापालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. आठवडाभरात याबाबत तोडगा न निघाल्यास "अ' क्षेत्रीय कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सदस्य राजू मिसाळ यांनी दिला. 

चिंचवड येथील नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी घेतला लाभ

श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवानिमित्त नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा व महाआरोग्य शिबिराचा ४१७ जणांनी लाभ घेतला.

शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत – दिलीप गावडे

चौफेर न्यूज – स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील स्वच्छ  सर्वेक्षण ४ जानेवारी २०१८ पासून सुरु होणार असून शहर स्वछतेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तसेच, या अभियानामध्ये पिंपरी चिंचवड शहराला अव्वलस्थानी आणण्यासाठी सहकार्य करावे, असे  आवाहन सह आयुक्त दिलीप गावडे यांनी केले.

[Video] महापालिका उद्यानात दारू पार्टी नागरिकांना त्रास


पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शुभश्री संकुलाच्या मागील बाजूस नवीन उद्यानाचे काम महापालिके कडून सुरू आहे परंतु त्या ठिकाणी कोणत्या ही प्रकारे सुरक्षा किंवा रक्षक उद्यानात नेमण्यात आले ली नाही उलट झोपडपट्टीच्या बाजूला एक जाण्यायेण्यासाठी एक रस्ता ठेवण्यात आला आहे आणि त्याच ठिकाणाहून झोपडपट्टतील तरुण रात्र भर दारू पार्टी करताय आणि त्याचाच त्रास शुभश्री संकुलातील नागरिकांना होतोय

हेल्मेट सक्‍तीला वाहन चालकांचा विरोध

पिंपरी - वाहतूक पोलिसांनी गुरुवार (ता.7) पासून "नो ट्रॅफिक व्हायोलेशन झोन' या अंतर्गत पिंपरी चौक ते शगुन चौक दरम्यान वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. यावेळी हेल्मेट परिधान न करणाऱ्या दुचाकीस्वारांवरही कारवाई केली. या कारवाईला दुचाकी चालकांनी तीव्र विरोध करीत पोलिसांशी वाद घालता.

आधार लिंक करण्याची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवण्यात येणार

नवी दिल्ली : सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. 31 मार्चपर्यंत मुदत वाढवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टातील आधार अनिवार्यतेच्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आले आहे.

‘रेरा’ ग्राहकांच्या हिताचा

हायकोर्टाकडून वैधतेवर शिक्कामोर्तब : सर्व याचिका फेटाळल्या
मुंबई – बांधकाम क्षेत्रातील व्यवहारात पारदर्शकता आणून ग्राहकांची फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने अंमलात आणलेल्या रेरा (रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऍथॉरिटी) कायद्यावर उच्च न्यायालयाने आज शिक्कामोर्तब केले. या कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देणाऱ्या खासगी भुखंड मालक तसेच बांधकाम व्यावसायीकांनी दाखल केलेल्या याचिका न्यायमूर्ती नरेश पाटील आणि राजेश केतकर यांच्या खंडपीठाने फेटाळून लावताना रेरा कायदा हा सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचा आणि घटनात्मकदृष्ट्य पूर्णपणे वैध असाल्याचा निर्वाळा दिला.

तक्रारदारांमध्ये बांधकाम विभागात हाणामारी?

पिंपरी – अनधिकृत बांधकामासंदर्भातील तक्रार मिटविण्यासाठी आलेल्या दोन तक्रारदारांमध्ये पालिकेतच अधिकाऱ्यांच्या समोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ आणि हाणामारी झाल्याचा प्रकार बुधवारी (दि. 6) महापालिका मुख्य प्रशासकीय विभागातील बांधकाम परवाना विभागामध्ये घडला. यामुळे काही काळ या विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.

इंद्रायणीनगरमध्ये जलतरण तलावाचा घाट

पिंपरी – इंद्रायणीनगर सेक्‍टर क्रमांक 1 मधील महाराष्ट्र कॉलनी शेजारील मोकळ्या भूखंड क्रमांक 3 मध्ये पोहण्याचा जलतरण तलाव बांधण्याचा घाट घालण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या (गुरुवारी) होणाऱ्या स्थायी समितीसमोर ऐनवेळी दाखल करण्यात आला आहे. मात्र, भोसरी, नेहरुनगर आणि संभाजीनगर परिसरात क्रीडा विभागाचे जलतरण तलाव उपलब्ध असताना पुन्हा इंद्रायणीनगरमध्ये जलतरण तलाव बांधणार का? असा प्रश्‍न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

तळेगाव-चाकण-शिक्रापूर-चौफुला चौक रस्त्यासाठी अठराशे कोटींचा निधी मंजूर

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांसमवेत आमदार बाळा भेगडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 5) रोजी विभागीय आयुक्‍त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत तळेगाव-चाकण-शिक्रापूर-नाव्हरा-चौफुला चौक या रस्त्याकरिता अठराशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.