Friday 23 November 2018

मध्यरात्री वाढदिवस साजरा केला तर पोलीस घेतील ताब्यात

वाढदिवस म्हटलं की सार्वजनिक रस्त्यावर मांडव टाकून वाढदिवस साजरा केला जात होता. मध्यरात्री केक कापला जात होता, आरडाओरडा आणि जल्लोष केला जात होता. मात्र यापुढे राजकीय नेत्यांसह युवा कार्यकर्ते,नागरिक यांना रस्त्यांवर वाढदिवस साजरा करता येणार नसून मित्रांना डीजेच्या तालावर थिरकता येणार नाही. कारण पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त आर.के पद्मनाभन यांनी सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्यास बंदी केली आहे. यासाठी वेळ ठरवली असून रात्री दहाच्या नंतर वाढदिवस साजरा करता येणार नाही.वाढदिवस साजरा केलाच तर एक वर्षाचा करावासाची शिक्षा बर्थ-डे बॉयसह मित्रांना होऊ शकते. या कारवाईचं सामान्य नागरिकांमधून स्वागत होत असून कौतुक केलं जातं आहे. वाकड पोलिसांनी अशा प्रकारची पहिली कारवाई केली आहे.

महापालिका स्थायीची 19 कोटीच्या विकास कामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे कारण्यासाठी येणा-या सुमारे 19  कोटी 16 लाख 28 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातांतर्गत डास निर्मुलन उपाय योजनेसाठी औष्णिक धुरीकरण व्हॅन फॉगींगच्या मशीनने करण्याच्या कामासाठी डिझेलवर धावणा-या प्रती दिन चार पिकअप व्हॅन/रिक्षा टेम्पो भाडे तत्वावर पुरविण्यासाठी येणा-या सुमारे एक […]

महापालिकेच्या तिजोरीत 302 कोटीचा महसूल

एमपीसी न्यूज – चालू आर्थिक वर्षाच्या नऊ महिन्यात मालमत्ता करातून 302.78 कोटी रुपयांचा महसूल पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कोषागरात जमा झाला आहे. 22 नोव्हेंबर 2018 अखेर दोन लाख 45 हजार 650 मिळकतधारकांनी कराचा भरणा केला असून त्यामध्ये सर्वाधिक एक लाख 23 हजार 54 मिळकत धारकांनी 151. 28 कोटी रुपयांचा कर ऑनलाईन पद्धतीने भरला आहे. याबाबतची माहिती अतिरिक्त […]

शहरातील 615 गृहसंस्थांना महापालिकेच्या नोटीसा

एमपीसी न्यूज – दैनंदिन शंभर किलो कचरा निर्माण करणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील गृहसंस्था आणि पाच हजार चौरस मीटर भूखंडावर वसलेल्या एकूण 615 गृहप्रकल्पांना महापालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत नोटीसा बजाविल्या आहेत. गृहसंस्थानी निर्माण होणाऱ्या ओला कच-यावर प्रक्रिया करावी. अन्यथा कचरा उचलला जाणार नाही. याच्या अमंलबजावणीमध्ये चालढकल केल्यास महापालिकेकडून कचरा स्वीकाराला जाणार नाही. तसेच दंडाची आकारणी केली जाईल, असा इशारा […]

पिंपरीत वर्षभरात १४ हजार भटक्या कुत्र्यांची नसबंदी झाल्याचा दावा

ठेकेदाराला दिलेल्या पैशांवरून महापालिकेत आरोप प्रत्यारोप

पिंपरीत ६०,९९० बेशिस्त चालक


त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त मोरया गोसावी मंदिरात दिपोत्सव साजरा

११ हजार दिव्यांच्या प्रकाशाने उजळला मंदिर परिसर

पिंपरी (Pclive7.com):- पवनामाईच्या जलस्पर्शाने पवित्र झालेल्या आणि धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व असलेल्‍या मोरया गोसावी मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त सलग १६ वर्ष दिपोत्सव साजरा होतो हे कौतुकास्पद आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांव्दारे धार्मिक-सांस्कृतिक वारसा नव्या पिढीकडून पुढे चालविण्यास मदत होते. पवना नदीतील पाणी प्रदुषित होत आहे. ते रोखण्यासाठी उपाययोजना करून पावित्र्य जपले पाहिजे. यासाठी शहरातील सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था, राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा चिंचवड देवस्थानचे माजी विश्वस्त विघ्नहरी देव महाराज यांनी व्यक्‍त केली.

पिंपरीत प्लास्टिक गोळा करणाऱ्या महिलेला सापडली ४३ जिवंत काडतुसे

पिंपरी-चिंचवड : चिंचवडजवळ असणाऱ्या पुलाखाली रेल्वे रुळांलगत भंगार आणि प्लास्टिक गोळा करणाऱ्या एका महिलेला काल संध्याकाळी ४३ जिवंत काडतुसे सापडल्यानं खळबळ उडाली आहे. या काडतुसांवर मेड इन बेल्जियम १२ आणि मेड इन यूएसए असा उल्लेख होता.

लोकलचे वेळापत्रक रुळावर कधी?

पुणे - पुणे-लोणावळादरम्यान लोकलची संख्या वाढवून गाड्यांच्या वेळेतील अंतर कमी करण्यासाठीचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली कामे लवकर करण्यात येतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र, लोकलची संख्या वाढविण्यात यावी आणि वेळेचे योग्य नियोजन करण्याची मागणी प्रवाशांकडून वेळोवेळी होत असली, तरी त्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

गॅस सिलिंडरची दरवाढ सुरूच

पिंपरी - गेल्या काही महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आठ महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल २८९ रुपयांची वाढ झाली आहे. 

नोकरी सोडणाऱ्यांची अडवणूक

पिंपरी - नोकरी सोडल्यानंतर आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचा पगार आणि अन्य रक्‍कम अडकवून ठेवल्याच्या २५ तक्रारी कामगार आयुक्‍तांकडे दाखल झाल्या आहेत. थकीत रकमेचा आकडा १५ लाखांपर्यंत आहे. दरम्यान, या सर्व केसेसची कामगार आयुक्‍त कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून त्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे

सकाळ बातमीचा परिणाम-सांगवी दापोडी पुल रस्त्याचे अखेर डांबरीकरण

जुनी सांगवी - जुनी सांगवी - दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले होते. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. गेल्या काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले होते. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाक्या घसरण्याचे प्रकार येथे वारंवार घडत होते. तर खड्ड्यांमुळे वहातुक कोंडी होवुन रहदारीस अडथळा येत होता. 

आता आरोग्य कार्यकारी अधिकाऱ्याचा चीन दौरा

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर हे चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीन येथे 25 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर होणा-या कार्यशाळेत ते सहभागी होणार आहेत. या दौऱ्यासाठी येणाऱ्या 75 हजार रुपयांचा खर्चाला स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, पदाधिकाऱ्यांचे परदेश दौरे सुरुच आहेत. नुकतेच स्मार्ट सिटीचे संचालक असलेले पदाधिकारी आणि अधिकारी बार्सिलोनाचा दौरा करुन आले आहेत. या दौऱ्यावर टीका होत असतानाच आता आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर चीन दौऱ्यावर जाणार आहेत.

शिवसेनेकडून पर्यायी चेहऱ्याची चाचपणी

पिंपरी- दोन खासदार असतानाही गतवेळी शिवसेनेचे एकमेव आमदार पिंपरी विधानसभा मतदार संघातून निवडून आले. पंचवार्षिक शेवटच्या टप्प्यात आली, तरी आमदार ऍड. गौतम चाबुकस्वार चमकदार कामगिरी करु न शकल्याने शिवसेनेसाठी विधानसभेचे मैदान आव्हानात्मक ठरणार आहे. त्यामुळे पर्यायी चेहऱ्याचा शोध घेण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली आहे. शिवसेनेची ही अवस्था पाहून विरोधी पक्षातील उमेदवारांच्या अपेक्षा उंचावल्या असून, सर्वच राजकीय पक्षातून इच्छुकांची संख्या वाढत आहे.

338 “खुशालचेंडू’ कर्मचारी आढळले

पिंपरी- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयाबरोबरच क्षेत्रीय कार्यालय परिसरात प्रशासन विभागाच्या वतीने अचानकपणे राबविण्यात आलेल्या तपासनी मोहिमत एकूण 338 कर्मचारी दोषी आढळले आहेत. एकूण नऊ दिवसांत केलेल्या या मोहिमेत 103 विभागांची अचानकपणे तपासणी करण्यात आली.

10 new bus shelters soon for Bopkhel-Alandi stretch in Pune


पीएमपीची लांब पल्ल्याची “थेट’ सेवा बंद

दोन टप्प्यांत वाहतूक, दहा मिनिटांच्या वारंवारिता
पाबळ, तळेगावसाठी वाघोलीवरुन सुटणार बसेस

कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आठ वर्षांत 13 परिपत्रके

पिंपरी – महापालिका कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी महापालिका प्रशासन कसोशिने प्रयत्न करत आहे. मात्र, हे कर्मचारी मात्र प्रशासनाला दाद देत नाहीत. या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी गेल्या आठ वर्षांत आतापर्यंत 13 परिपत्रके काढण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नुकतेच तेरावे परिपत्रक काढत, कारवाईचा इशारा दिला आहे.

वायू प्रदूषणाबाबतची मोजणी ‘हवेत’च!

गेल्या तीन महिन्यांपासून यंत्रणा बंद
पुणे : शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत ‘रिअल टाइम’ मोजणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विविध ठिकाणी मोजणी यंत्रणा बसविली आहेत. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून ती बंद आहे. त्यामुळे मंडळाच्या संकेतस्थळावरही हवेच्या प्रदूषणाच्या सद्यस्थितीबाबत कोणतीच माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.

शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे नियमित

राज्य शासनाचा मोठा दिलासा : …पण रक्‍कम भरावी लागणार
पुणे – शहरी भागातील शासकीय जागेवर अतिक्रमण करून बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी शासनाने काही अटी व शर्ती निश्‍चित केल्या आहेत. त्यानुसार 1 जानेवारी 2011 पूर्वीची आणि 1500 चौरस फुटांपर्यंतचीच घरे नियमित केली जाणार आहे. मात्र, त्यासाठी कब्जेहक्काची रक्कम शासन दरबारी जमा करावी लागणार आहे. अतिक्रमण धारकांची घरे नियमानुकूल करण्यासाठी शासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

FDA shuts down flour mills in Bhosari, Hadapsar

Officials of the Food and Drug Administration (FDA) issued 'stop activity' notices to two flour mills in Bhosari and Hadapsar industrial belts on November 17 after glaring lapses were noticed in initiating quality control measures at these units.

“पडीक’ प्लॅस्टिकबाबत लवकरच निर्णय

पुणे – प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यानंतर जप्त केलेला प्लॅस्टिक माल पुनर्प्रक्रियेसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपविण्यात आला आहे. मात्र, तीन महिने उलटूनही जप्त माल अजूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात पडून आहे. याची दखल घेत, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ लवकरच सर्व स्थानिक संस्थामध्ये प्लॅस्टिक रिसायकलिंगबाबतचा आढावा घेतला जाणार आहे. याद्वारे “पडीक’ प्लॅस्टिकबाबत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.