Saturday 1 July 2017

पिंपरी रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण

पिंपरी - सुमारे दीड कोटी रुपये खर्चून थिसेनक्रूप कंपनीमार्फत ‘सीएसआर’अंतर्गत पिंपरी रेल्वे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला जात आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याची कामे पूर्ण झाली असून, दुसऱ्या टप्प्यातील कामे येत्या चार महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकारे एखाद्या खासगी कंपनीकडून पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच रेल्वे स्थानक विकसित केले जात आहे. 

‘हेल्थ रेकॉर्ड’ तुमच्या खिशात!

तुम्ही वर्षभरामध्ये डॉक्‍टरांकडे किती वेळा जाता? प्रत्येक भेटीच्या वेळी तुम्ही किती कागदपत्रे, तपासणी किंवा चाचण्यांचे रिपोर्ट स्वतःजवळ बाळगता? या प्रश्‍नांचा गांभीर्याने विचार केल्यास लक्षात येईल, की आपण नकळतपणे कागदांचा ढीग गोळा करत बसलो आहे. त्याऐवजी मोबाईलवरील ॲप्लिकेशनद्वारे फक्त एका क्‍लिकवर जर तुम्हाला आणि तुमच्या डॉक्‍टरांना ही सर्व माहिती स्क्रीनवर दिसली तर? ‘जेनेक्‍स-ईएचआर’ या स्टार्टअप कंपनीने अशी सुविधा उपलब्ध करून दिली असून, तिचा लाभ देशभरातील अनेक डॉक्‍टर, दवाखाने, पॅथॉलॉजी लॅब, शिक्षण संस्था घेत आहेत. 

रुग्णांसोबतचे नाते दृढ व्हावे

पिंपरी - एकेकाळी डॉक्‍टरला ‘देव’ म्हटले जायचे. मात्र, आता डॉक्‍टर म्हणजे ‘पैसेकाढू’, अशी समाजाची धारणा झाली आहे. डॉक्‍टर आणि रुग्णांमधील विश्‍वासाला तडा गेला आहे. त्यामुळेच की काय आजच्या डॉक्‍टरांमध्ये असुरक्षिततेची भावना बळावली असून, प्रचंड सामाजिक ताणतणावाखाली त्यांना काम करावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी डॉक्‍टर आणि रुग्णांमधील नातेसंबंध सुधारणे आवश्‍यक असून, परस्परांमध्ये विश्‍वासाचे नाते दृढ होणे आवश्‍यक आहे, अशी अपेक्षा शहरातील बहुसंख्य डॉक्‍टरांनी आजच्या (ता. १) डॉक्‍टर्स दिवसानिमित्त व्यक्त केली. 

आवास प्रकल्प कासवगतीने

पिंपरी - वाल्हेकरवाडी येथे पंतप्रधान आवास योजनेंतर्गत हाती घेतलेल्या गृहप्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याबद्दल पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने औरंगाबाद येथील एलोरा कन्स्ट्रक्‍शन प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनीला दरदिवसाला पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. कंपनीच्या बिलातून हा दंड वसूल करण्यात येणार आहे.

रिंगरोडबाधितांची दिंडी

वाल्हेकरवाडी - पिंपरी चिंचवड येथील पेठ क्रमांक ३०, ३१ आणि ३३ मधून प्रस्तावित रिंगरोडला (एचसीएमटीआर) विरोध करण्यासाठी घरे वाचवा संघर्ष समितीने शुक्रवारी (ता. ३०) आकुर्डीतील प्राधिकरण कार्यालयावर पायी दिंडी काढून विरोध केला आहे. त्यावर पावसाळा संपेपर्यंत कोणतीही कारवाई करणार नसल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले.

'जीएसटी' वरून उद्योगनगरीत संभ्रमावस्था

'एक देश, एक करप्रणाली' असलेल्या वस्तू व सेवाकराची (जीएसटी) मध्यरात्रीपासून अंमलबजावणी सुरू झाली असतानाच यासंदर्भात संभ्रमावस्था असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीत स्पष्टपणे दिसून येत आहे. केंद्र तसेच राज्य सरकारकडून ...

मेट्रोच्या आर्थिक आराखड्यावर चर्चा

मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या मार्गावर प्रत्यक्ष जागेवरील काम सुरू झाले असून, आगामी काही दिवसांत वनाज ते शिवाजीनगर धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या दुसऱ्या मार्गावरील कामही सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच, प्राधान्य ...

पिंपरी-चिंचवडमध्ये पालखी काढत अनोखे आंदोलन, रिंगरोडचा वाद

नियोजित रिंग रोडसाठीचा तब्बल ३० किलोमीटर रस्ता हा पिंपरी-चिंचवडमधून जाणार आहे. परिणामी यात अनेक नागरिकांची घरे जमीनदोस्त होणार आहेत. पिंपरी चिंचवड मधील होणारा रिंगरोडचा वाद पुन्हा उफाळून आल्याचे पाहायला मिळाले.

पीएमसीला कमी दराने डिझेल पुरवठ्यामागचे गौडबंगाल काय?

– स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांचा तुकाराम मुंढेंना सवाल
पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमपीएमएलने एचपीसीएल या इंधन पुरवठादार कंपनीकडून बाजारभावानुसार डिझेल खरेदीचा प्रस्ताव तयार केला आहे. दुसरीकडे याच कंपनीने पुणे महापालिकेला प्रति लिटर डिझेलमागे बाजारभावापेक्षा ५० पैसे कमी दराने डिझेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला आहे. पुणे महापालिकेला वार्षिक २ लाख ७० हजार लिटर डिझेल लागते, तर पीएमपीएमएलला वार्षिक १० लाख लिटर डिझेलची गरज भासते. असे असताना पीएमपीएमएलने एचपीसीएल कंपनीकडून बाजारभावानुसार डिझेल खरेदी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यामागचे गौडबंगाल काय आहे?, असा सवाल पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी उपस्थित केला आहे. पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Free workshop for civil service aspirants