Tuesday 21 May 2013

Resolution to clean up 3 rivers in Pimpri-Chinchwad approved

Resolution to clean up 3 rivers in Pimpri-Chinchwad approved: The Pimpri-Chinchwad municipal corporation (PCMC) approved a resolution at a meeting on Monday to clean up the riverbeds of Pavana, Mula and Indrayani rivers to increase the water carrying capacity and reduce pollution.

चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायिकाला ...

चिंचवडमध्ये बांधकाम व्यवसायिकाला ...:
एका बांधकाम व्यावसायिकाच्या बांधकामावर जाऊन त्याला मारहाण केल्याचा प्रकार चिंचवड येथे घडला आहे. हा प्रकार शक्रवारी (दि. 17) दुपारी घडला. अनधिकृत बांधकामावरून ही मारहाण झाल्याचे समोर आले आहे.
राजेंद्र
Read more...

निगडी येथे मंगळवारपासून नारदीय ...

निगडी येथे मंगळवारपासून नारदीय ...:
श्रीसिद्धी विनायक सेवा मंडळ आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 मे या कालावधीत निगडी येथील श्री सिध्दिविनायक मंदिरात नारदीय कीर्तन प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त या कालावधीत कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 
Read more...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ...:
जागतिक पर्यावरणदिनानिमित्त पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने 5 जून रोजी संभाजीनगर येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

याबाबतची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. संभाजीनगर
Read more...

शिवसेनेची मंगळवारी आढावा बैठक

शिवसेनेची मंगळवारी आढावा बैठक:
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पदाधिका-यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 21) होणार आहे.

चिंचवडस्टेशन येथील एमआयडीसीच्या विश्रामगृहात होणा-या बैठकीस पुणे, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या
Read more...

नवीन विकास कामांना महासभेची ...

नवीन विकास कामांना महासभेची ...:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात लहानमोठी अशी 2100 नवीन कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या कामांना महासभेने आज (सोमवारी) प्रशासकीय मंजुरी दिली. त्यामुळे रेंगाळलेल्या विकास कामांना गती मिळेल, असा दावा केला जात आहे.

Read more...

महापालिका सभेत खेळाडूंचा गौरव

महापालिका सभेत खेळाडूंचा गौरव:
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शहरातील गुणवंत खेळाडूंचा महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते आज (सोमवारी) सत्कार करण्यात आला.

या वेळी सहआयुक्त पांडुरंग झुरे, सभागृहनेत्या मंगला कदम, स्थायी समितीचे सभापती नवनाथ
Read more...

उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनानंतर ...

उपमुख्यमंत्र्यांच्या समर्थनानंतर ...:
अनधिकृत बांधकामांवरील कारवाईचे उपमुख्यमंत्री यांनी काल पुण्यात झालेल्या बैठकीत समर्थन करताच महापालिकेने आज (सोमवारी) कारवाईला सुरुवात केली. तब्बल महिनाभरानंतर हातोडा उगारत तळवडे येथील साडेचार हजार चौरस फुटातील वाणिज्य वापराची इमारत भुईसपाट केली. 

Read more...

भोसरी पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक ...

भोसरी पोटनिवडणुकीसाठी प्राथमिक ...:
बनावट जात दाखला प्रकरणी भोसरी गावठाण प्रभागातील (क्र. 35) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे या रिक्त जागेवर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीसाठी प्रक्रिया सुरु केली आहे. महापालिकेने आज प्राथमिक मतदार यादी प्रसिध्द केली असून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
Read more...

पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्र ...

पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्र ...:
पवना, मुळा व इंद्रायणी नदीपात्र होणार 'मोकळे' महापालिका सभेची मंजुरी
नदीपात्रातील भराव, राडारोडा, गाळ, अनावश्यक बंधारे यामुळे नदीचे पात्र अरुंद होऊन पूररेषा वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उशिराने का होईना जागे झालेल्या महापालिकेने पवना, मुळा व इंद्रायणी
Read more...

चिंचवड मध्ये आज साहित्यिक आणि ...

चिंचवड मध्ये आज साहित्यिक आणि ...:
साहित्य संवर्धन समितीच्या वतीने आज (सोमवारी) चिंचवड येथे रात्री आठ वाजता साहित्यिक आणि साहित्यप्रेमींची सभा आयोजित करण्यात आलेली आहे.

अखिल भारतीय नाट्य परिषदेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या भोईरनगर येथील निवासस्थानी ही सभा होणार असून सभेला सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपरी पालिका सभा अर्धा तासात गुंडाळली

पिंपरी पालिका सभा अर्धा तासात गुंडाळली: पिंपरी पालिकेची सर्वसाधारण सभा तासनतास चालण्याची परंपरा असताना सोमवारी अर्धा तासात सभेचे कामकाज गुंडाळण्यात आले.

संगणक अभियंत्याची हिंजवडीत आत्महत्या

संगणक अभियंत्याची हिंजवडीत आत्महत्या: रहाटणी : हिंजवडीतील साखरे वस्तीत एका संगणक अभियंत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मेहुल दिनकर गावित (२२, रा. साखरे वस्ती, हिंजवडी) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा अहमदनगरचा रहिवासी आहे. हिंजवडीतील कॉग्निझंट कंपनीत तो नोकरीस होता. गेल्या काही महिन्यांपासून भाडेतत्वावर खोली घेऊन तो मित्नांसमवेत राहात होता. सोमवारी दुपारपासून तो मोबाईलवरील कॉल स्वीकारत नसल्याने चारच्या सुमारास त्याची मैत्नीण त्याच्या खोलीवर आली. खोलीचे दार आतून बंद होते. वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे ती खिडकीतून आत डोकावली. मेहुल याने गळफास घेतल्याचे दिसले. इमारतीच्या सुरक्षारक्षकाला तिने याबाबत माहिती दिली. पोलीसदेखील घटनास्थळी पोहोचले. पोलीसमित्र स्वामी पिंजण यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. गावित दुपारीच गावाहून परतला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तो प्रत्येक शनिवार, रविवारी गावी जात असे, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे. (वार्ताहर)

अर्थसंकल्पातील आठशे कोटींच्या कामाला मंजुरी


अर्थसंकल्पातील आठशे कोटींच्या कामाला मंजुरी

पिंपरी - महापालिकेच्या अर्थसंकल्पात असलेल्या सुमारे 800 कोटी रुपयांच्या दोन हजार 100 लहान मोठ्या कामांना आयुक्‍तांकडून दाखल झालेल्या ऐनवेळच्या प्रस्तावाद्वारे सोमवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

महापालिका एलबीटी वसुलीत "नापास'


महापालिका एलबीटी वसुलीत "नापास'

पिंपरी - एलबीटीचा भरणा करण्यासाठी दिलेल्या अखेरच्या दिवशी साडेसहा कोटी रुपयांचा एलबीटी जमा झाला आहे.

बोगस डॉक्‍टरकडून महिलेची लूट


बोगस डॉक्‍टरकडून महिलेची लूट

पिंपरी - थेरगावमधील बिर्ला रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेला मानेत इंजेक्‍शन देण्याच्या बहाण्याने तिच्याजवळील दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने एका बोगस डॉक्‍टरने लंपास केले.

Cops lathicharge crowd gone berserk outside former Pimpri mayor''s house

Cops lathicharge crowd gone berserk outside former Pimpri mayor''s house: Mob fuelled by rumour that Behl asked traders to lift shutters.

आकुर्डी रेल्वेस्थानकावर सुविधांचा ...

आकुर्डी रेल्वेस्थानकावर सुविधांचा ...:
आकुर्डी रेल्वे स्टेशनवर सुविधांचा अभाव असल्यामुळे प्रवाशांना दररोज विविध समस्यानां तोंड द्यावे लागत आहे. या समस्यांचा सहानुभूतीपूर्व विचार करून या समस्या ताबडतोब सोडवाव्यात  अशी मागणी  आकुडीतील रेल्वे प्रवाशांनी पुण्याचे रेल्वे विभागीय व्यवस्थापक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विस्तार अधिकारी वाळुंज यांचा सत्कार

विस्तार अधिकारी वाळुंज यांचा सत्कार:
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधुन विस्तार अधिकार पदावर असलेले संत तुकारामनगर येथील शांताराम वाळुंज हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

महिलांसाठी स्वतंत्र ...

महिलांसाठी स्वतंत्र ...:
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी प्राधिकरणातील दिशा फोरमच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन समितीच्या संचालिका भारती चव्हाण यांनी केली आहे.
यासंदर्भात भारती चव्हाण यांनी आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांना निवेदन दिले आहे. त्यांनी त्यात म्हटले आहे की, महिलांचा सार्वजनिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. असंख्य महिला घराबाहेर पडून काम करीत असल्याचे आढळून येत आहे.
महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने त्या जास्त काळ बाहेर राहू शकत नाही, यामुळे त्यांच्या कार्यक्षमता व आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेमध्ये 50 टक्के महिला नगरसेविका आणि इतर अधिकारी असताना देखील शहरात महिलांसाठी स्वच्छतागृहाची अंमलबजावणी होत नाहीत ही खेदाची बाब आहे.
महापालिकेच्या काही प्रभागांमध्ये स्वच्छतागृह आहेत. मात्र त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. दरवाजे, खिडक्या तुटल्या आहेत. पाण्याचाही अभाव आहे. त्यामुळे महिला वर्गाची कुचंबणा होत असून महापालिकेने महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावीत, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

विद्यापीठ उपकेंद्र उभारणीला धक्का

विद्यापीठ उपकेंद्र उभारणीला धक्का: पुणे विद्यापीठाला जागा देताना कोणतीही सवलत मंजूर न करता बाजारभावानुसार तब्बल ५० कोटी रुपयांचा मोबदला मागण्यात आल्याने पिंपरी-चिंचवड परिसरासह ग्रामीण पुण्यातील विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्र उभारण्याच्या विद्यापीठाच्या नियोजनाला धक्का बसला आहे.