Thursday 15 May 2014

पिंपरी-चिंचवडकरांना सैर करण्यासाठी नवीन १२ उद्याने

शहरातील उद्यानांची संख्या पोहचणार 169 वर 
वैशिष्ट्यपूर्ण उद्यानांच्या उभारणीमुळे नावलौकीक प्राप्त होत असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरात नवीन 12 उद्यानांची भर पडणार आहे. त्यामुळे शहरातील उद्यानांची संख्या 169 वर पोहचणार आहे.  

पिंपरी-चिंचवड शहराचे क्षेत्रफळ 177.3 चौरस किलोमीटर आहे. शहराला 'मॉडेल सिटी' म्हणून विकसित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. एकीकडे प्रशस्त रस्ते, उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर सारख्या प्रकल्पांमधून शहराचा नियोजनबध्द पध्दतीने विकास साधण्याचा महापालिकेचा कयास असताना दुसरीकडे शहर हरीत रहावे याकडेही महापालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. महापालिकेने 350 एकर जागेवर तब्बल छोटी-मोठी 157 उद्याने विकसित केली आहेत. भोसरी सहल केंद्र, पिंपळेगुरव येथील डायनासोर उद्यान, सांगवीतील शिवसृष्टी उद्यान, कासारवाडीतील संगीत कारंजे असलेले उद्यान यांसारखी वैशिष्ट्यपूर्ण उद्याने महापालिकेने उभारली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच विदेशातील उद्यानांचा अभ्यास देखील त्यासाठी केला आहे.

Pimpri Chinchwad Municipal Corporation told to cut charges for sports facilities

The standing committee of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed the civic administration to prepare a revised proposal for reducing the charges of all its sports facilities.

4,200 unmetered water connections in Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad has over 4,200 unmetered water connections belonging to former corporators, educational institutions, cooperative banks, commercial establishments among others, stated the municipal corporation in response to a RTI query.

... गं वाट माझी अडवतोय रिक्षावाला !

(वर्षा कांबळे)
'चला,चला, काळेवाडी, निगडी, यायचं का ?'  असे विचारून त्रास देणा-या रिक्षा चालकांमुळे शहरातील सर्वसामान्य व नोकरदार महिला त्रस्त  होत आहेत. परंतु कारवाई होत नसल्यामुळे आणि एकटी-दुकटी महिला विरोध करू शकत नसल्यामुळे या रिक्षाचालकांची मुजोरी काही थांबत नाही.

प्रवाशाला लुबाडून रिक्षातून ढकलून दिले

रिक्षामध्ये बसलेल्या प्रवाश्याकडील सुमारे 15 हजारांचा ऐवज काढून घेऊन त्याला रिक्षातून ढकलून दिल्याचा प्रकार पिंपरीतील वल्लभनगर येथे मंगळवारी (दि. 13) सकाळी घडला. रिक्षाचालकासह तिघांविरुध्द पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

फसवणा-या बिल्डरांचा रहिवाश्यांकडून असाही निषेध

फलकबाजी करत बिल्डरांपासून सावधान राहण्याचा इशारा
फसवणूक करणा-या बिल्डरांना धडा शिकवण्यासाठी चिंचवड जिजामाता पार्कमधील रॉयल रेसीडेन्सीच्या रहिवाश्यांनी आगळ्या-वेगळ्या पध्दतीने निषेध नोंदवला आहे.  शंभर टक्के पैसे घेऊनही सुविधांपासून वंचित ठेवणा-या राम असोसिएटस् व पटेल बिल्डर यांच्यापासून सावधान राहण्याचा इशारा रहिवाश्यांनी फलकबाजी करून दिला आहे. तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी या रहिवाश्यांनी केली आहे.

Maval LS poll results expected by 2 pm on Friday

Pimpri: The election authorities have made all arrangements for counting of votes for Maval and Shirur Lok Sabha seats at Balewadi on May 16.

आता सगळेच तिकडे डोळे लावून बसलेत....!

उमेदवारांसह नागरिकांचीही उत्कंठा शिगेला
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघा एकच दिवस आड राहिल्याने सगळे त्याकडे डोळे लावून बसले आहेत. त्या एका दिवसानंतर नागरिकांना आपण मत दिलेला उमेदवार विजयी येणार का,  खरंच सत्ताबदल होणार का,  देश कोणाच्या हातात जाणार आणि भारताचा पंतप्रधान कोण होणार , या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तर या निवडणुकीत नशीब आजमवणा-या उमेदवारांना मतदारांनी आपल्याला कौल दिलाय का आणि आपण खासदार होऊन दिल्लीत जाणार का, या प्रश्नांची उत्तरेही तेव्हाच मिळतील. त्यामुळे उमेदवारांबरोबरच आता नागरिकांचीही उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

नेहरुनगर येथे एमएनजीएमलच्या गॅस पाईपलाईन मधून गॅसगळती

नेहरूनगर येथील पीएमपीएमएलच्या बस डेपोजवळ आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडच्या गॅस पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणात गॅसगळती झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

महापालिका सेवकांच्या पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ, पुणे महानगर परिवहन महामंडळ कर्मचारी महासंघ आणि महापालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच चिंचवडमधील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडली.