Sunday 8 October 2017

‘पीएमआरडीए’च्या नियोजनासाठी सिंगापूरच्या कंपनीची मदत घेणार

मुख्यमंत्र्यांची माहिती : सकारात्मक बदल घडविण्याचा निर्धार
प्रभात वृत्तसेवा
पुणे – ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’च्या (पीएमआरडीए) नियोजनाची प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्यासाठी “सुर्बना ज्युरॉन्ग’ या सरकारी कंपनीची मदत घेण्यात येणार आहे. त्या माध्यमातून “पीएमआरडीए’चे नियोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. पुणे राज्यातील महत्त्वाच्या शहरांपैकी एक आहे. राज्य सरकारच्या अजेंड्यावर पुण्याचा समावेश आहे. महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी, मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीला सुरूवात झाली आहे. आता पुणे महानगराचे नियोजन केले जात आहे. त्यासाठी नुकत्याच झालेल्या सिंगापूर दौऱ्यादरम्यान “सुर्बना ज्युरॉन्ग’ या जगप्रसिद्ध कंपनीशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

10 new courts to come up in PCMC school

Pimpri Chinchwad: The civic body has decided to rent out its municipal school building at Ajmera Complex in Pimpri to the state law department, where 10 new ...

Officials mull policy for elderly

Pimpri Chinchwad: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will soon draft a policy for senior citizens Speaking at 'Anand Melava', organised by the civic body to celebrate World Senior Citizens' Day here, mayor Nitin Kalje said, "A senior ...

Patient's kin assault YCM doc, medics go on strike

As many has 25 resident doctors of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation- run Yashwantrao Chavan Memorial (YCM) Hospital in Pimpri went on mass leave on Saturday, in protest against the attack on a female resident doctor of YCM hospital in the ...

आळंदी-पुणे पालखी मार्ग कासव गतीने

भाविकांच्या प्रवासात अडथळे : कामाला गती देण्याची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे चऱ्होली ते बोपखेल रस्ता रुंदीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहन चालक व भाविकांच्या प्रवासातील अडथळे काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. हे काम कधी पूर्ण होईल, असा सवाल उपस्थित होत आहे.

'आयटीआय'ला झळाळी; राज्य सरकारकडून शंभर कोटींची तरतूद

पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवडमधील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना आवश्‍यक मनुष्यबळ तयार करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) आता अद्ययावत व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत. ओल्ड एज केअर, फॅशन डिझायनिंग, इलेक्‍ट्रोनट्‌स मेकॅनिकल याबरोबरच पारंपरिक पद्धतीपेक्षा कॉम्प्युटराइज्ड पद्धतीने कामाला प्राधान्य मिळावे, यादृष्टीने अत्याधुनिक पद्धतीची यंत्रसामग्री 'आयटीआय'ला मिळणार आहे. त्यासाठी शंभर कोटी रुपयांची तरतूदही राज्य सरकारने केली आहे. 

‘प्रथा’ बोनस व सानुग्रह अनुदान द्या

पिंपरी – महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रथा बोनस व सानुग्रह अनुदान देण्यास आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. मात्र, बोनस अधिनियम 1965 अन्वये हा बोनस देण्यात येत नसून प्रथा बोनस असल्याचा निर्वाळा आयुक्‍तांनी केला आहे. त्यानुसार वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि रजा राखीव वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांना 8.33 टक्के प्रथा बोनस आणि 15 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात येणार आहे.

बॅडमिंटन हॉल “ऑनलाइन बुकिंग’मध्ये “फिक्‍सींग’?

वाकड – महापालिका आणि क्रीडा विभागाकडून ठिकठिकाणी बॅडमिंटन हॉल बांधण्यात आलेले आहेत. या ठिकाणी खेळण्यासाठी नागरिकांना आपला ग्रुप तयार करून “ऑनलाइन बुकिंग’रावी लागते. मात्र या “बुकिंग’मध्येच “सेटींग’ होत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी केला आहे.

बुद्धिबळ स्पर्धेत “पीसीसीओई’ची सांघिक “हॅटट्रीक’

पिंपरी – पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या निगडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने आंतर महाविद्यालय बुद्धिबळ स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी सांघिक विजेतेपद पटकावून “हॅटट्रीक’ केली.

एच. ए. कामगारांची दिवाळी गोड होणार?

पिंपरी – पिंपरीतील एचए कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी काही रक्कम मिळावी, याकरिता एचए मजदूर संघाच्या हालचाली सुरु आहेत. त्यादृष्टीने कंपनी प्रशासनाशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे संघटनेच्या या प्रयत्नांना यश मिळाले, तर या कामगारांची दिवाळी गोड होण्याची शक्‍यता आहे.

ठेकेदारांच्या दलालीपेक्षा झाडू घेऊन शहराची स्वच्छता करा – एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने नियमाने काम करून प्रशासकीय शिस्त लावली आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीतून शिवसेनेत गेलेल्या खासदार श्रीरंग बारणे यांना त्रास होऊ लागला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीत असताना बारणे यांना निविदा न काढताच ठेकेदारांना थेट कामे देऊन मलिदा खाण्याची सवय होती. मात्र आता भाजपने अशा कारभाराला महापालिकेतून हद्दपार केले आहे. प्रत्येक काम निविदा काढूनच देण्याचा पायंडा पाडला जात आहे. त्यामुळे खासदार बारणे यांनी ठेकेदारांची दलाली करण्यापेक्षा जनसेवेसाठी स्वतः हातात झाडू घेऊन शहराची स्वच्छता करावी. अपयशी खासदार म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या बारणे यांनी महापालिकेत कसा कारभार करावा, हे भाजपला शिकवू नये, अशी घणाघाती टिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी केली आहे.

[Video] लोडशेडिंग कोणासाठी आणि कशासाठी? - अजित पवार


राष्ट्रवादीच्या ‘जन हाहाकार’ आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी (प्रतिनिधी):-  भाजप सरकार सत्तेत आल्यापासून प्रचंड महागाई वाढली आहे. पेट्रोल, डिझेल, घरगुती गँस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाठ वाढ झाली आहे. शहरातील अनधिकृत बांधकामे, शास्तीकर, रेडझोन, रिंगरोडचा प्रश्न प्रलंबित आहे. भाजप सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली आज ‘जन हाहाकार’ आंदोलन काढण्यात आले. या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे पहायला मिळाले.

कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार ; केंद्र सरकारची दिवाळी भेट

चौफेर न्यूज – वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीत शुक्रवारी सर्वसामान्यांना दिलासा देत सुमारे २७ वस्तूंवरील कर कमी करण्यात आले आहेत. यामुळे कपडे, आयुर्वेदिक औषधे स्वस्त होणार असून वातानुकूलित हॉटेलमधील जीएसटी १८ टक्क्यांऐवजी १२ टक्क्यांवर आला आहे. सर्व सामान्यांसह छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेत सरकारने दिवाळीची भेटच दिली.

भारनियमन महानिर्मितीची अर्कायक्षमता

वीज ग्राहक संघटनेचा आरोप : ग्राहकांनी आयोगाकडे तक्रारी नोंदवावी
पुणे – सर्वाधिक विजेची मागणी असणाऱ्या उन्हाळ्यात ही तब्बल 19 हजार मेगावॅटपर्यत वीज देणाऱ्या महावितरण कंपनीला पावसाळ्यात फक्‍त 15 हजार 400 मेगावॅट ही वीज निर्माण करता येत नाही. या तुटवड्यामुळे ज्या शहरांमध्ये भारनियमन नाही. त्या शहरांमध्ये सुध्दा भारनियमन करावे लागले. याला कोळशाचा तुटवडा कारणीभूत नसून हे भारनियमन म्हणजे महानिर्मितीच्या अकार्यक्षम कारभाराचा नमुना असून त्याचा फटका मात्र सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे.