Wednesday 11 July 2018

Surbana Jurong bags project management, design services for India Pimpri Chinchwad Smart City

SURBANA Jurong has been awarded project management and design services for India's Pimpri Chinchwad Smart City in partnership with professional services firm KPMG, the urban consulting firm announced on Tuesday.

पिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करावे – आ. लक्ष्मण जगतापांची मागणी

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात सध्या पिंपरी व भोसरी अशी दोन वीज वितरण विभागीय कार्यालये असुन ही कार्यालये पुण्यातील गणेशखिंड मंडळ कार्यालयांतर्गत जोडली आहेत. परंतु शहरातील नागरिकांना वीज समस्यासाठी पुणे शहरात जवळ्पास १० किमी दूर जावे लागते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्यात यावे, अशी मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी उर्जा मंत्री चंन्द्रशेखर बावनकुळे यांना केली आहे

पालिकेची अनधिकृत फलकांवर बेधडक कारवाई

सिंहासन न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या सौंदर्याला बाधा पोहचविणा-या 135 अनधिकृत फलकांवर आकाशचिन्ह परवाना विभागाने गेल्या सहा महिन्यात धडक कारवाई केली आहे. हे फलक तोडून जप्त करण्यात आले आहेत. ९८० अनधिकृत जाहिरात फलकांना आकाशचिन्ह परवाना विभागाने नोटीस बजावण्यात आलेल्या आहेत. आकाशचिन्ह परवाना विभागाने १७ जणांवरती गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, ज्यामध्ये क्लासचालक, जाहिरात एजन्सींचा समावेश आहे. याबाबतची माहिती आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांनी दिली.

‘Misbehaving with MLA’s son’: Top cop says PSI Patil warned, won’t be punished

Pune Police Commissioner Rashmi Shukla said Sub-Inspector Rupali Patil, who was accused of “misbehaving” with an MLA’s son, has been cautioned. The PSI has been merely cautioned and “there will be no punishment…,” she said. In October 2017, an MLA from Pimpri-Chinchwad had filed a complaint against PSI Rupali Patil from Bhosari police station, accusing her of “behaving rudely” with his son while he was celebrating his birthday on the Nashik Phata flyover with his friends.

पिंपरीत बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी सहा टन गोमांस पकडले

पिंपरी (Pclive7.com):- अहमदनगर येथून मुंबई येथे बेकायदेशीररीत्या टेम्पोतून घेऊन जाणारे सहा टन गोमांस हिंदू आघाडी गोरक्षण विभाग आणि बजरंग दल यांनी पोलिसाच्या मदतीने सोमवारी रात्री पिंपरी येथे पकडले.

महापालिकेच्या शहर अभियंता व स्थापत्य विभागातील अभियंते यांच्यावर कारवाही करा – माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या नियोजनशून्य कामामुळे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. जागीजोगी पाणी साचले आहे. ड्रेनेजचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. नाल्यांच्या कामात स्थापत्य विभागाच्या अभियंत्यानी हलगर्जीपना केल्याने घरात पाणी शिरण्याच्या घटना घडत असल्याचे निवेदन महापालीकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर यांनी आयुक्त श्रावन हर्डीकर यांना दिले आहे.

पवना धरण परिसरात वृक्षारोपण

पवनानगर व पवना धरण परिसरात पाटबंधारे व वन विभागाच्या वतीने संयुक्तरित्या वृक्षारोपण करण्यात आले.

फ्रान्स सरकार पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मदत करण्यास तयार

पिंपरी-चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी संदर्भात फ्रान्सचे भारतातील राजदूतअलेक्झांडर झीग्लर यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने तांत्रिक क्षेत्रात मदत करणेसाठी व विविध माहितीची देवाणघेवाण होणेकरीता पिंपरी चिंचवड महापालिकेस आज मंगळवार (दि. ९) भेट देऊन माहिती घेतली.

टीडीआर व्यवहारांचा आढावा

पुणे, पिंपरी-चिचंवड आणि सोलापूर महानगरपालिकांसह राज्यभरातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हस्तांतरणीय विकास हक्काचे (टीडीआर) व्यवहार कसे होतात, डेव्हलमेंट राइटस् सर्टिफिकेट (डीआरटी) कशा प्रकारे खर्ची पडते, 'टीडीआर'ची बाजारातील दर निश्चिती कशी होते, याचा आढावा राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांनी मंगळवारी घेतला. 'टीडीआर'च्या व्यवहारांवर नव्याने मुद्रांक शुल्क आकारणी करण्याच्या उद्देशाने 'टीडीआर'च्या व्यवहारांची माहिती संकलित करण्यात येत असल्याचा दावा नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाकडून करण्यात येत आहे.

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि आकलन शून्य

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा डंका राज्य सरकार पिटत असताना शिक्षण क्षेत्रातील दयनीय अवस्था समोर आली आहे. मंथन एज्युकेशनल इनिशिएटिव्ह या संस्थेच्या अहवालातून १२८४ विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्यांला वाचलेल्याचे आकलन होत नाही, तर ६८१ विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नसल्याची धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पुणे शहरातील ही अवस्था असेल तर राज्यातील इतर भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाआरोग्य शिबिराचा 160 जणांनी घेतला लाभ

आकुर्डीः भाजपा युवा मोर्चा, कर्तव्य फाउंडेशन आणि चैतन्य मेडिको यांच्या पुढाकाराने आणि स्टार हॉस्पिटल आकुर्डी यांच्या सहयोगाने, ईशान हॉस्पिटल, चिंचवड येथे नागरिकांसाठी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा 160 नागरिकांनी लाभ घेतला. महाराष्ट्र राज्य लेखा समितीच्या सदस्य अ‍ॅड. सचिन पटवर्धन यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी भाजयुमो शहराध्यक्ष तथा नगरसेवक रवी लांडगे, नगरसेवक मोरेश्‍वर शेडगे, सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशन अध्यक्ष संतोष खिंवसरा, महावितरण समिती सदस्य भारती विनोदे, प्रभाग समिती स्वीकृत सदस्य विठ्ठल भोईर, देविदास पाटील, बिभीषण चौधरी, भाजपा व्यापारी आघाडी अध्यक्ष, राजेंद्र चिंचवडे, भाजपा शहर पदाधिकारी पाटील चिंचवडे, कांता मोंढे, संजीवनी पांडे, रवींद्र देशपांडे, नंदू भोगले, राज दरेकर,सिद्धू लोणी, सुनील कुलकर्णी, अजय भोसले, सत्पाल गोयल, प्रवीण मुथा, सुजित आरुडे आदी उपस्थित होते.

‘बायसिकल शेअरिंग’ स्वातंत्र्यदिनाच्या मुहुर्तावर होणार सुरु

पिंपरीः स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पिंपळे गुरव व पिंपळे सौदागार भागात लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे. त्यासाठी 350 सायकली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. हा प्रकल्प 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी सुरु करण्याचे नियोजित आहे. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश झाल्यानंतर या योजनेतील संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत नागरिकांना सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘बायसिकल शेअरिंग’ ही योजना राबविण्याच्या नियोजनाची बैठक आयुक्त दालनात नुकतीच पार पडली. या बैठकीला महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, शहर अभियंता अंबादास चव्हाण, सहशहर अभियंता राजन पाटील, आयुबखान पठाण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण व विविध सायकल कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पुलाची उंची वाढविण्यासाठी आयुक्तांना दिले निवेदन

निगडीः ताथवडे व पुनावळेमधून जाणारा पुणे-मुंबई हायवेच्या अंडरपास पुलाची उंची वाढवावी म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदन दिले. यावेळी नगरसेवक मयूर कलाटे, युवा नेते संदीप पवार, युवा नेते सागर ओव्हाळ, अनुप गायकवाड, स्वप्नील भांडवलकर आदी उपस्थित होते. या पुलाखाली पावसाचे पाणी खूप मोठ्या प्रमाणात साचत होते. शालेय विद्यार्थ्यांना व नागरिकांना रस्ता ओलांडत असताना त्रासाला सामोरे जावे लागते. हे काम लवकरात लवकर पूर्ण होईल, असे आश्‍वासन आयुक्तांनी दिले.

पिंपळेगुरवमधील युवकाची बॉलिवडमध्ये एन्ट्री

पिंपरी- बॉलिवूडचा ‘बॅक टू डॅड’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी १३ रोजी देशभरात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळेगुरवमध्ये राहणा-या डॉ. सॅम्युअल कांबळे याने सहकलाकाराची भूमिका बजावत बॉलिवडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटातून व्यसनाधीनता, चोरी, प्रेम, मैत्री अशा विविध गोष्टीवर प्रकाश टाकला आहे.

मनपाच्या १६५ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची शक्यता

पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग या प्रवर्गातील केवळ ४६ अधिकारी व कर्मचा-यांनी जात वैधता प्रमाणपत्र सादर केले आहे. तर ११३ जणांनी जात पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची प्रत सादर केली आहे. याशिवाय १६५ कर्मचा-यांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या सर्व कर्मचा-यांवर बडतर्फीची कारवाई केली जाण्याची दाट शक्‍यता असून यापैकी बहुतांशी कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील आहेत.

महापौरांचा चिंचवडवर “राग’

पिंपरी – “शांत, संयमी आणि हसतमुख’ अशी प्रतिमा असलेले पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांचा गेल्या काही दिवसांपासून चिंचवड विधानसभा मतदार संघावर “राग’ दिसत आहे. कारण, चिंचवडमधील विकासकामांच्या अथवा अन्य कोणत्याही जाहीर कार्यक्रमात महापौर सहभागी झालेले नाहीत. क्रांतीवीर चापेकर यांच्या टपाल तिकीटाच्या अनावरण कार्यक्रमाचा त्याला अपवाद आहे. पण, चिंचवडचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्यासोबत एकाही कार्यक्रमाला महापौरांनी हजेरी लावली नाही. परिणामी, महापौरांच्या नाराजीत गटबाजीचे “राजकीय राग-रंग’ दिसू लागले आहेत.

पोलिसांचा जीव टांगणीला

पिंपरी – ज्या पोलिसांवर शहराची सुरक्षा अवलंबून आहे. ज्यांच्यामुळे आपण सुरक्षित जीवन जगत आहोत अशा पोलिसांचा जीव मात्र टांगणीला लागलेला दिसत आहे. पिंपरी पोलीस वसाहतीत राहणारे पोलीस व त्यांचे कुटुंबीय अक्षरश: जीव मुठीत धरुनच आलेला दिवस पुढे ढकलत आहेत. त्यांची वसाहत असलेल्या इमारतींची अवस्था अतिशय दयनीय अशी झालेली आहे. दैनिक प्रभातच्या टीमने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन वास्तव शोधण्याचा प्रयत्न केला असता अत्यंत भयानक वास्तवाचे दर्शन झाले.

रस्ते झाले खड्डेमय

पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

भयमुक्तीसाठी प्राधिकरणातील तरुणांची शक्ती

पिंपरी - आपण बाहेरगावाहून आलात किंवा कामावरून घरी जाण्यासाठी आकुर्डी रेल्वे स्थानकावर उतरलात तर, घाबरण्याचे कारण नाही.
बिनधास्तपणे जा. कारण, प्राधिकरणातील ५० तरुणांच्या पथकाने रात्रं-दिन गस्त घालून संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर भयमुक्त केला आहे. गेल्या दोन महिन्यांत १७ गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. त्यातील चार अल्पवयीन होते. 

पिंपरी-चिंचवड शहरात खड्डेच खड्डे चोहीकडे...

पिंपरी - शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने विविध भागांतील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालविताना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

“जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने’…

जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरूकता निर्माण करण्यासाठी सयुंक्त राष्ट्राकडून दरवर्षी 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. ‘कुटुंब नियोजन हा मानवी हक्क’ ही यंदाच्या वर्ष-2018 च्या लोकसंख्या दिनाची संकल्पना आहे. सद्य स्थितीमध्ये ‘लोकसंख्या’ हा बहुतेक राष्ट्रांपुढे एक ज्वलंत प्रश्न बनला आहे. 

चंदुकाका सराफ यांची स्नेहवनला 1 लाखाची मदत

भोसरी – चंदुकाका सराफ अँड सन्स प्रा. लि. या सराफ पेढीने सामाजिक बांधिलकीतून भोसरी येथील स्नेहवन संस्थेलातील विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्य आणि 1 लाख 1 हजार रुपयांचा धनादेश दिला.