Sunday, 9 December 2012

PCMC extends deadline for water meters

PCMC extends deadline for water meters: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has extended the deadline till December 31 for its amnesty scheme in which citizens were asked to get authorized water connections.

मेट्रोच्या दुसऱ्या मार्गालाही मंजुरी

मेट्रोच्या दुसऱ्या मार्गालाही मंजुरी: वनाझ ते रामवाडी या मेट्रोला मिळालेल्या मान्यतेपाठोपाठ आता स्वारगेट ते पिंपरी-चिंचवड या दुसऱ्या मेट्रोचा मार्गही मार्गी लागणार आहे. या साडेसोळा किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीपुढे प्रशासनाने सादर केला असून यामध्ये भुयारी आणि एलिव्हेटेड अशा दोन्ही प्रकारे मेट्रो धावणार आहे.

मेट्रो विलंबाचा भुर्दंड २,६३१ कोटी

मेट्रो विलंबाचा भुर्दंड २,६३१ कोटी: भुयारी की एलिव्हेटेड; अशा मुद्यांवरून चर्चा-वादांचे गुऱ्हाळ, प्रशासकीय कूर्मगती आणि पक्षीय राजकारण अशा कारणांमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील मेट्रोला प्रचंड विलंब झाला आहे. या विलंबामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ झाली असून, त्याचा भुर्दंड आहे दोन हजार ६३१ कोटी रुपये!

नागरिकांना मिळणार 'टेंपररी आधार'

नागरिकांना मिळणार 'टेंपररी आधार': नोंदणी करून कित्येक महिने लोटले, तरी आधार कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो नागरिकांना सरकारने आता दिलासा दिला आहे. आधार कार्ड मिळेपर्यंत या नागरिकांना पोर्टलवरून टेंपररी आधार कार्ड मिळणार आहे. ज्या नागरिकांकडे इंटरनेट नाही, अशा नागरिकांना महा ई-सेवा केंद्र, सेतू सुविधा केंद्र, संग्राम केंद्र येथे दोन रुपये घेऊन 'आधार'ची प्रत दिली जाणार आहे.

आकुर्डीत सव्वालाखाची घरफोडी

आकुर्डीत सव्वालाखाची घरफोडी: दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख २९ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिराशेजारी असलेल्या विठ्ठल हेरिटेज मध्ये ही घटना घडली. मंगळवारी (चार डिसेंबर) पहाटे पावणेचारच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. प्रशांत सोमनाथ दशपुत्रे (वय ४३) यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.

आकुर्डी सब-वे ला रेल्वेची परवानगी

आकुर्डी सब-वे ला रेल्वेची परवानगी: पुणे-मुंबई लोहमार्गावर आकुर्डी येथे सब-वे उभारण्याला रेल्वे खात्याने तत्त्वतः मान्यता दिली आहे. लेखी पत्रानंतर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ करता येऊ शकेल, असे आश्वासन रेल्वेचे विभागीय जनरल मॅनेजर एस. के. जैन यांनी बुधवारी (पाच डिसेंबर) दिले.

राजगुरूनगर विमानतळाचे लवकरच ‘टेकऑफ’

राजगुरूनगर विमानतळाचे लवकरच ‘टेकऑफ’: राजगुरूनगर परिसरात उभारण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा ‘विमानतळ प्राधिकरणा’च्या तांत्रिक समितीने निश्चित केली असून, जागेचे नकाशे तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुढील आठ ते दहा दिवसात हे नकाशे पूर्ण होतील, त्यानंतर हे नकाशे मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविले जातील, असे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांन‌ी बुधवारी सांगितले.