Sunday, 4 March 2018

राष्ट्रवादीकडून स्थायी समिती अध्यक्षपदासाठी मोरेश्वर भोंडवे यांचा अर्ज दाखल

राष्ट्रवादीकडून नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला आहे. यावेळी नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आदी उपस्थित होते. भोंडवे आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. भोंडवे यांना आमदार दादा समर्थक पाठिंबा देणार असल्याची, चर्चा महापालिका वर्तुळात जोरदार रंगली आहे.

पिंपरीत स्थायी समिती अध्यक्षपदावरून भाजपमध्ये उलथापालथ

शीतल शिंदे, राहुल जाधव यांचे सदस्यपदाचे राजीनामे

स्थायीच्या निवडीवरून ‘महाभारत’, महापौर नितीन काळजे यांच्यासह शितल शिंदे आणि राहुल जाधव यांचा राजीनामा

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडीवरून बरेच महाभारत घडले आहे. आमदार महेश लांडगे गटाला अध्यक्षपदावरून डावलल्याने मोठा राजकीय भूकंप झाला आहे. नितीन काळजे यांनी महापौर पदाचा राजीनामा दिला. तर लांडगे समर्थक राहुल जाधव यांच्यासह जुने निष्ठावंत शितल  शिंदे यांनी स्थायीच्या सदस्यपदाचा राजीनामा पक्षनेते तसेच शहराध्यक्षांकडे देऊन आपली नाराजी जाहिर केली आहे.

नाट्यमय घडामोडीनंतर स्थायीच्या अध्यक्षपदासाठी ममता गायकवाड यांचा अर्ज दाखल

पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हातात जाणार यावरून बरेच नाट्य घडले. अनेक घडोमोडी घडल्या, नव्या जुन्यांचा वाद झाला, दबावतंत्र वापरण्यात आले. अखेरीस भाजप शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी यशस्वी राजकीय खेळी करत त्यांचे समर्थक ममता गायकवाड यांच्याच नावावर शिक्कामोर्तब करून घेतली आहे. गायकवाड यांचा स्थायीच्या अध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: आमदार जगताप महापालिकेत आले असून त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला आहे.

भाजप फुटीच्या उंबरटीवर ? स्थायी अध्यक्ष पदाचा वाद विकोपाला

– महापौर काळजे यांचा महापौरपदाचा राजीनामा
– राहुल जाधव, शीतल शिंदे यांचा स्थायीसमिती सदस्यपदाचा राजीनामा
– राष्ट्रवादीचे मोरेश्वर भोंडवे अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात…

पॅथॉलॉजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्यांनाच लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करता येईल

बारामती : पॅथॉलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तसेच मेडीकल कौन्सिलकडे नोंदणीकृत डॉक्टरच फक्त लॅबोरेटरी रिपोर्ट प्रमाणित करु शकतात असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर या पुढील काळात जे डॉक्टर्स रुग्णांना इतर अर्हताधारकांकडे पाठवतील अशा डॉक्टरांविरुध्द मेडीकल कौन्सिलकडे तक्रार करणार असल्याचे महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्रॅक्टीसिंग पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबॉयोलॉजिस्ट संघटनेने आज स्पष्ट केले. 

पिंपरी सीट से सोनकाम्बले ही होंगी आरपीआई प्रत्याशी

आठवले की घोषणा से भाजपा में बढ़ी बेचैनी
पिंपरी: पुणे समाचार की खबर पर मुहर लग गई है। होली की पूर्व संध्या पर पिंपरी चौक में सम्पन्न हुई सामाजिक सलोखा परिषद एक तरह से आरपीआई के विधानसभा चुनाव का आग़ाज़ साबित हुई। इस परिषद के जरिये पार्टी ने न केवल शहर में जोरदार शक्ति प्रदर्शन किया बल्कि पिंपरी विधानसभा सीट पर अपना दावा ठोंकते हुए वरिष्ठ नेता व पूर्व नगरसेविका चंद्रकांता सोनकाम्बले को अपना प्रत्याशी भी घोषित कर दिया।