Friday, 7 September 2018

आधार क्रमांकासाठी विद्‌यार्थ्यांना शाळेत प्रवेश नाकारता येणार नाही

नवी दिल्ली – आधार कार्ड नाही म्हणून कोणाही विद्यार्थ्याला प्रवेश नाकारू नये असे आदेश यूआयडीआयएने शाळांना दिले आहेत. अशा प्रकारे प्रवेश नाकारणे बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

गौरीच्या साज शृंगाराने बाजारपेठ सजली

पिंपरी – अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गौरी-गणेशोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा गौरीचे मुखवटे व शृंगार साहित्याने सजल्या आहेत. यावर्षी बाजारात नवनवीन प्रकारातील गौरीचे मुखवटे बाजारात उपलब्ध असून खरेदीसाठी महिलांची गर्दी होवू लागली आहे. मुखवटे व मूर्तीच्या दरात यंदा कोणतीही वाढ झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

भाजपची “सोशल’ मोर्चेबांधणी

पिंपरी – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर देशव्यापी “सोशल’ मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांच्या टीकांना प्रभावी प्रत्त्युत्तर देता यावे. यासाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या सोशल मीडिया सेलसाठी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यामध्ये राज्यस्तरावरील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

खाडे यांनी स्विकारली प्राधिकरणाची सूत्रे पण…

पिंपरी – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला अखेर 18 वर्षांनी अध्यक्षपद लाभले असून सदाशिव खाडे यांनी आज (शुक्रवारी) अध्यक्षपदाची सूत्रे स्विकारली. ढोल-ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. या स्वागत सोहळ्याला भाजपच्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली. मात्र, नव्यांनी पाठ फिरवल्याने भाजपमधील खदखद अजूनच अधोरेखीत झाली आहे.

घरात अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीची अग्निशामक दलाच्या जवानांनी केली सुटका

पिंपरी (Pclive7.com):- दरावाजा ‘लॉक’ होऊन घरातच अडकलेल्या दीड वर्षाच्या चिमुकलीला अग्निशामक दलाच्या जवानांनी सुखरुप सुटका केली. कासारवाडीतील सरिता अपार्टमेंटमध्ये मंगळवारी दुपारी ही चिमुकली अडकली होती.

मच्छी-मटन मार्केटमध्ये अस्वच्छतेचा कहर

पिंपरी – महापालिकेच्या पिंपरीतील मच्छी आणि मटन मार्केटमध्ये अस्वच्छता पसरली आहे. चेंबर साफ न केल्यामुळे ड्रेनेजही तुंबले आहेत. महापालिकेला कराचा भरणा करूनही असुविधांचा सामना करावा लागत असल्याने विक्रेत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Thursday, 6 September 2018

दापोडी-निगडी ’बीआरटीएस’ बस प्रवास ठरतोय अडथळ्यांची शर्यत!

बसस्थानकावर चालकांकडून घेतली जात नाही दक्षता 
पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक
पिंपरी : अगोदरच वादात सापडलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी या बहुचर्चित बीआरटीएस मार्गावरील पीएमपीएमएल बसमधून प्रवास करणे धोकादायक बनत चालले आहे. बसस्थानकावर चालकांकडून दक्षात घेतली जात नाही. दरवाजे उघडे असतात. प्रवाशांच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यात येत नाही. मार्गातच बंद बस पडतात. काही वेळा तर प्रवाशी बीआरटी थांब्यावर तर बस सेवा रस्त्याने धावत असतात. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या थांब्यावर थांबावे, असा प्रश्‍न पडतो. यामुळे दापोडी-निगडी हा बीआरटीएस मार्ग म्हणजे एक अडथळ्यांची शर्यत असल्याच्या प्रतिक्रिया प्रवाशांकडून दिल्या जात आहेत.