एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड अडव्होकेट्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. सुनील कडुसकर यांची तर उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा यांची बुधवारी (ता. 31) निवड करण्यात आली. पिंपरी-चिंचवड अडव्होकेटस बार असोसिएशनच्या एक हजार एकशे एकतीस सभासदांपैकी नऊशे आठ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. अध्यक्षपदासाठी अॅड. सुनील कडूसकर व अॅड. मनोज अगरवाल यांच्यात लढत झाली. उपाध्यक्षपदी अॅड. योगेश थंबा 444 […]
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 1 November 2018
सरदार पटेल, इंदिरा गांधी यांना आदरांजली
पिंपरी – स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची 143वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि एकमेव महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 34व्या पुण्यतिथी निमित्त शहरात वेगवेगळ्या कार्यक्रमांद्वारे त्यांना आदरांजली अर्पित करण्यात आली.


सफाई कामगारांच्या मागण्यांसाठी घंटानाद
पिंपरी – कंत्राटदाराकडून सफाई कामगारांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत जनरल माथाडी कामगार संघर्ष सेनेच्या वतीने दापोडी चौकात बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.


सीपीएम अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना आकारणार शुल्क
– वैद्यकीय अधिकाऱ्यांना मिळणार सवलत
चौफेर न्यूज – पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात आतापर्यंत कॉलेज ऑफ फिजीशियन अॅन्ड सर्जन (सीपीएस) या अभ्यासासाठी विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात नव्हते. मात्र, यापुढे महापालिका खासगी रुग्णालयाप्रमाणे वायसीएम रुग्णालयातील सीपीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून दोन वर्षांत तब्बल 9 लाख रुपये शुल्क आकारणार आहे, त्या प्रस्तावास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी महापैार राहूल जाधव होते.
पिंपरी-चिंचवडच्या गिर्यारोहकांनी फडकाविला ‘माउंट मेरा’ हिमशिखरावर तिरंगा
चौफेर न्यूज – पिंपरी—चिंचवड शहरातील ५ गिर्यारोहकांनी ‘माउंट मेरा’ या उत्तुंग हिमशिखरावर तिरंगा फडकावला आहे. ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट कांचनगंगा इको इक्स्पिडिशन २०१९’ ला पाठिंबा म्हणून या मोहिमचे आयोजन केले होते.
इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे सिग्नलवर साहित्य विकणाऱ्या मुलांना गणवेश वाटप
चौफेर न्यूज – रस्त्यावर, सिग्नलवर आणि चौकासारख्या ठिकाणी पोस्टर, लिंबू मिरची, फुगे विकणाऱ्या मुलांच्या शाळेत इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडने ३५ गणवेश वाटप केले. खऱ्या अर्थाने गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना या माध्यमातून मदत करण्यात आली आहे. दिग्विजय प्राथमिक विद्यालय, धनकवडी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा प्रतिभा जोशी-दलाल, आरती मुळे आदी उपस्थित होत्या.
उद्योग सुलभतेत भारत ७७ व्या क्रमांकावर
तब्बल २३ गुणांनी आगेकूच, आघाडीचे सलग दुसरे वर्ष
चौफेर न्यूज – जागतिक बँकेच्या उद्योगसुलभता क्रमवारीत भारताने तब्बल २३ गुणांनी उडी मारली असून यंदा देशाने ७७ क्रमांकावर स्थान मिळवले आहे. गेल्या वर्षी भारत १००व्या क्रमांकावर होता. सलग दुसऱ्या वर्षी भारताने उद्योगसुलभतेत आघाडी घेतली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)