पुणे : मंगळवारी आलेली नाताळच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी शनिवारीच कोकणात फिरायला निघालेल्या पर्यटकांना वाहतूककोंडीचा फटका बसला आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर बोरघाटात वाहतूक संथ गतीने सुरू आहे. विशेषतः अमृततांजन पुलाजवळ अवजड वाहनांमुळे वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 22 December 2018
मेट्रोसाठी स्वनिधीतून १५५ कोटी
पिंपरी - पिंपरी- चिंचवड महापालिका भवन ते निगडी या अंतरात मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालास गुरुवारी (ता. २०) सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. तसेच, संबंधित प्रकल्पास पुणे मेट्रोऐवजी पुणे व पिंपरी- चिंचवड मेट्रो असे नामकरण करण्याच्या प्रस्तावालाही सभेने मान्यता दिली. राज्य सरकारने निधी न दिल्यास या प्रकल्पासाठी महापालिकेच्या स्वनिधीतून १५५ कोटी रुपये देण्याची उपसूचना संमत करण्यात आली.
वीटभट्टीवरील मुलांसाठी हवी स्कूलबस
पिंपरी - रावेत, पुनावळे, ताथवडे, किवळे, मामुर्डी भागातील वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना स्टोअर स्टेप स्कूलच्या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण दिले जाते. मात्र, वीटभट्ट्यांपासून शाळांचे अंतर चार ते पाच किलोमीटर असल्याने मुलांना पायपीट करावी लागत आहे. या मुलांसाठी महापालिकेने बसची व्यवस्था करावी, या मागणीसाठी मुलांसह त्यांच्या पालकांनी महापालिका भवनाच्या पायऱ्यांवर शुक्रवारी ठिय्या मांडला.
स्मार्ट सिटीचे दोन ‘डीपीआर’ मंजूर
पिंपरी - स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या एरिया बेस्ड् डेव्हलपमेंट आणि पॅन सिटीअंतर्गत पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर परिसरात कामे करण्यासाठीच्या दोन डीपीआरला (सविस्तर प्रकल्प आराखडा) पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या शुक्रवारच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्या अंतर्गत सुमारे २५५ कोटी रुपयांची कामे एल अँड टी कंपनीच्या माध्यमातून केली जाणार आहेत.
पिंपरी शहरात होणार सांडपाण्याचा पुनर्वापर
पिंपरी - शहरात सांडपाण्याचा पुनर्वापर व्हावा, यासाठी पुनर्वापर प्रक्रिया केंद्र व यंत्रणा उभारणीसाठी नागरिकांचा खासगी सहभाग घेतला जाणार आहे. त्यासाठी धोरण व कृती आराखडा निश्चित केला आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला गुरुवारी सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाडची आयपीएलमध्ये निवड, चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार
पिंपरी (Pclive7.com):- आयपीएलमध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. पिंपरी चिंचवडच्या ऋतुराज गायकवाड याचे हे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्याची चेन्नई सुपर किंग्ज संघात निवड झाली आहे. शहरातून आयपीएलमध्ये निवड झालेला तो पहिला खेळाडू आहे. त्याच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पीसीएससीएलच्या वैधानिक लेखापरीक्षकपदी प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस
पिंपरी (दि. २० डिसें.) :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड (पीसीएससीएल) च्या वैधानिक लेखापरीक्षकपदी (ऑडीटर) चिंचवड येथील प्रधान फडके ऍण्ड असोसिएटस यांची नेमणूक करण्यात येणार आहे.
Subscribe to:
Posts (Atom)